अचानक त्वचेवर प्रलयपात झाले,
बटांचे तुझ्या रेशमी घात झाले.
सखे ठेव ताब्यात ती लांब वेणी,
किती ठार प्रत्येक झोक्यात झाले.
कसे तरसलेले खुळे हे दिवाणे,
तुझा गंध धरण्या पुढे हात झाले.
परम भाग्य तू माळल्या मोगऱ्याचे,
अमोदित तुझ्या पुष्पगंधात झाले.
तुझ्या अस्मितेचाच ताऱ्यांस हेवा,
जळजळून ते उजळ गगनात झाले.
निघालीस बाहेर या निग्रहाने,
जुने पुरुषप्राधान्य हे मात झाले.
जरी काल हरलीस तू ती लढाई,
तुझे शौर्य विश्वात विख्यात झाले.
गुलामी लथडलीस तू कुंडलीची,
संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क.
जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का?