पॉली ॲमरी- आजच्या लोकरंग मधील अरुंधती घोष यांचा लेख

Submitted by Sharadg on 21 May, 2023 - 02:47

नमस्कार.
आजच्या लोकसत्ता मधील लोकरंग पुरवणीमध्ये अरुंधती घोष यांचा एकाच वेळी अनेक स्त्री व पुरुषाशी प्रेमात असणे, त्यातील आनंद, अडचणी व भावनिक गुंतागुंत यावर सुंदर ललित लेख आहे. त्या स्वतः प्रांजळपणे त्यांच्या अशा संबंधांविषयी लिहीत आहेत. आपण कुणी हा लेख वाचला आहे काय? कुणाला असा अनुभव आहे काय?
मला तरी त्यांचा दृष्टिकोन पटला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लेखाच्या लिंकसाठी धन्यवाद @ भ्रमर .
लेख वाचला. लेखिकेचं स्वकथन आहे. आवड,इच्छा आणि अडचणी आहेत.

पण या प्रकारच्या नायिकांची वर्णने पुराणांत आणि कथांमध्ये आहेत. त्यांना विशेष नावेही आहेत. (अभिसारिका?)
एवढेच नाही तर उदात्तीकरण आहे. विनसचं लग्न एकाशी आणि आनंद घेते दुसऱ्याशी. शिवाय तिच्या नवऱ्याला आक्षेपही नाही. (ग्रीक कथेत अफ्रेडिटी).
अगदी अलिकडे यावर उजेड टाकणारं लेखन/कथा वगैरे शोभा डे करते. ठीक आहे . काही भाष्य न करता,न्यायनिवाडा न करता कथेतील पात्र दाखवतात. मराठी मालिकांही आता मागे राहणार नाहीत.
मात्र अशी जोडपी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र किंवा सरळ थेट बिनधास्त असतात. पापभिरू मध्यमवर्गाची धाव फक्त लेखांची पानं उलटावणे,चालेल बदलणे. त्यापलीकडे जाणे म्हणजे बबबबबबबब ब.
या मायबोलीचं करायचं काय?

मला तो लेख वाचताना गौरी देशपांडेंच्या नायिका आठवल्या.

लेख काही अंशी पटल्या. आपल्या अनेक गरजा , इच्छा, हौशी असतात आणि आपल्या एकुलत्या एका जोडीदाराच्याही त्याच असतील असं नाही. अशा वेळी वेगवेगळ्या इच्छा, हौशी , गरजांसाठी वेगवेगळे पार्टनर असणं वावगं वाटत नाही. त्या प्रत्येकावर किंवा त्यातल्या एकापेक्षा अधिक जणांवर 'प्रेम'च असलं पाहिजे का आणि असलं तरी ते दोघांनी व्यक्त केलंच पाहिजे का, व्यक्त केलं तर ते कितपत पुढे न्यायचं यावर हायपोथिटेकली विचार करून उपयोग नाही. प्रत्यक्षात काय 'होतं' हे ज्याचं त्याला माहीत.

@ उपाशी बोका , डेक्कन हेराल्डचा मूळ लेख वाचला.
काही जणांसाठी विचारप्रवर्तक. पण हे असं ऐतिहासिक घडतच होते .

भ्रमर लेखाच्या दुव्याकरता धन्यवाद.
लेख आवडला. जेलसीच्या वि जी भावना सांगीतलेली आहे ती म्हणजे अन्य कोणी व्यक्ती आपल्या जोडीदारास कोणत्याही पातळीवरती, संतुष्ट करत असेल तर त्याचा आनंदच होणे.
वर्षानुवर्षांच्या कंडिश्निंगनंतर ते अवघड आहे परंतु अशक्य नाही.
आपल्या जोडीदारावरील, 'मालकी हक्काची' भावना ही प्रचंड बोगस, फालतू भावना आहे. त्यानी फक्त दु:खाकडे वाटचाल होते. दोघांचीही फरफट होते.

माफ करा, जरा परीक्षा घेण्यामध्ये व्यस्त आहे, पण अभ्यासू वाचक प्रतिसाद देत आहेत. एक दोन दिवसात सविस्तर लिहितो.

त्याआधी घोष आइवजी रॉय लिहिल्याबददल माफी. घरची चटणी करायला मिरची कांडप दंकावर वाट पहात बसलो होतो आणि आवाजाने डोके उठले होते, त्यामुळे चूक झाली. क्षमस्व.

नाही हो!
माझ्या 1 व 10 मे च्या लेखाचे संपादन अजून चालू आहे

मलाही ३० एप्रिलचा लेख अजून संपादित करता येतो आहे, पण मी फोनवरसुद्धा ब्राउजरवरच मायबोली बघते, अ‍ॅपवर नाही.
मोबाइल अ‍ॅपचा प्रॉब्लेम असेल का हा?

बदलणार असाल तर ते 'ऑ'मरीचं 'अ‍ॅ'मरीदेखील करून टाकाल का हातासरशी? Happy

पॉलीअ‍ॅमरी Awe inducing आहे म्हणून ऑमरी Happy

तो लोकसत्तेतील लेख वाचला. वरती इ-पेपर मधे पूर्ण दिसला नाही मला. पण आता लिन्क सापडली. एकूण भाषांतर वाचून लक्षात आले की इंग्रजीतील लेख तो तसाच्या तसा मराठीत रूपांतर करणे अवघड आहे. त्यामुळे खूप वर्ड सॅलड झाले आहे. "मी माझ्या हृदयावर हात ठेवते तेव्हा मला जाणवतं की निर्वासितांना स्वीकारलं जातं ती भूमी, ते प्रेम आणि ते आयुष्य फार सुंदर आणि समृद्ध असतं" वगैरे

बाकी पॉलीअ‍ॅमरी बद्दलचे गैरसमज वगैरे सांगताना "एकल नात्यांच्या गर्तेत अडकलेल्या" वगैरे सुद्धा लेखात आहे Happy

तो एक शेवटचा खुलासा बळंच वाटतो. वोक ब्रिगेडमधे आपली पत घसरू नये म्हणून आजकाल असे खुलासे लोक करतात असे वाटते.

एकल नात्यांच्या गर्तेत अडकलेल्या दुर्दैवी लोकांना ही गंमत काय कळणार असं म्हणायचं असेल.
तर लागा कामाला.
हिंदी चित्रपटांत तिसरे वाक्य "ये शादी मैं होने......"
बदलून "ठीक है . . .ऐसे भी आगे . . . " येईल.
कारण यांचं उदात्तीकरण आताच पडद्यावर होणं गरजेचं आहे.

मालकी हक्काची भावना आली की मग वस्तूला घासून पुसून स्वच्छ करण्याकडे कल होतो. तू माझ्याकरता बदल - ही अपेक्षा इतकी भयंकर असते ना . कशाला एकमेकांना बदलायचा अट्टाहास?

इथे मालकी हक्क म्हणजे तू माझी/माझा आहेस तर माझीच/माझाच रहा अशी अपेक्षा असू शकते ना. एकनिष्ठतेची अपेक्षा करणे चूक असते का? मी ४ लोकांना भेटणार पण तू नाही भेटायचे असे वागणे चूकच. पण या नात्यात स्थिर आहे आणि तूही असावे असे वाटणे चूक नाही.
तूला हवे तेव्हा ये तूला हवे तेव्हा जा. माझे माझ्यावरच इतके प्रेम आहे कि किती आले किती गेले मला फरक नाही पडत. असे असेल तर आनंदच आहे.

For most of the people, dignity is a lack of good opportunity.

Pages