गद्यलेखन
आशीर्वाद
घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.
कांती शाह नावाच कल्ट
काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे.
तेथे पाहिजे जातीचे..
ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! सदानं घड्याळात पाहिलं.. सकाळचे १० वाजले होते. 'बायकोचा फोन असणार! श्या! आज काय विसरलं बरं? पण लँडलाईनवर कसा आला?'.. मेंदुला ताण देत सदा पुटपुटला. छातीची धडधड कारच्या २५ किमी वेगाइतकी झाली. त्यानं फोन घेतला. सदा प्रोजेक्ट मॅनेजर असला तरी घरची प्रोजेक्टं मॅनेज करणं म्हणजे मेदुवड्याच्या रेसिपीने बटाटेवडे करण्यातला प्रकार!
'हॅलो! सडॅ स्पेअर आहे का?'.. इंग्रजीतून विचारणा झाली. अमेरिकन उच्चार कळत होते.. स्वर थोडा वैतागलेला वाटत होता. बायकोचा फोन नाहीये म्हंटल्यावर सदाची धडधड कारच्या आयडलिंग इतकी कमी झाली.
आमचे गोंय - भाग ६ - स्वातंत्र्यलढा १
सूड (संपूर्ण)
सुमतीबाई शांतपणे येऊन सोफ्यावर बसल्या. आतल्या खोलीतून सुधीरराव बडबडतच होते. त्यांचा आवाजदेखील सुमतीबाईना आत्ता नकोसा झाला होता. तिरीमिरीत त्यांनी बाजूचा रिमोट उचलला आणि टीव्ही लावला. टीव्हीवरती कुठलातरी साऊथचा मारधाडीचा सिनेमा चालू होता. त्याचा आवाज त्यांनी इतका वाढवत नेला की अख्ख्या फ्लॅटमधे तो धडाम धडाम आवाज दणदणायला लागला. बेडरूमममधून येणारा सुधीररावांचा आवाज ऐकू येईना झाला तरी त्या तशाच तिथे बसून राहिल्या.
नरभक्षी भाग १
वेळ रात्रीचे ११ ,
डॉ.रावते आपले क्लिनीक बंद करुन निघण्याच्या तयारीत होते,सायंकाळ ची ओ.पी.डी. संपली होती,त्यांनी श्यामला , त्यांच्या कंपाऊंडरला, क्लिनीक चा मुख्य दरवाजा बंद करायला सांगितले,नर्स व रिसेप्शन वरची मुलगी दोघेही थोड्या वेळापुर्वीच पेशंट संपले तसे घरी गेले होते.डॉ.रावते दोन मिनीटे खुर्चीत बसुन उद्या लागणार्या पेशंटचे रिपोर्ट लॉकर मध्ये ठेवत होते,ते काम संपले,आता ते रिसेप्शनिस्ट ने आणून दिलेले पैसे मोजत होते.
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
चारचौघी - ४
पंधरा दिवस झाले, पण निली आणि जया एकमेकींशी एक अक्षर बोललेल्या नव्हत्या. सिम आणि जो ने बराच प्रयत्न केला समेटाचा, पण निष्फळ ठरला. शेवटी प्रत्येकजण आपापल्या उद्योगात गुंतून गेली. 'बोलतील तेव्हा बोलतील' ही पॉलिसी सर्वांनीच स्वीकारली. पण त्या रात्री निलीने केलेले अनुभवकथन, जयाने मांडलेले विचार आणि शेवटी निलीने तिचा केलेला अपमान या सर्वांमुळे एक गढूळ वातावरण रूममध्ये तयार झालेले होते. या पंधरा दिवसात जो ला ते तीन जणांचे मोटरसायकल घेऊन आलेले टोळके एकदाही दिसले नाही. तसेही ती एकदाही उशीरा आलीच नाही ऑफीसमधून!
आणि तयारी फुकट गेली...
"उद्यापासून दूध नको".. दूधवाल्याला सांगून टाकलं.. क्यूं भाभी ? तो कळवळून विचारु लागला. पण त्याचं टेन्शन का वाढवा उगाच ! म्हटलं, कुछ नही, बाहर जा रहे है .. दूधवाला हारवाला इस्त्रीवाला कामवाली सा-यांचे हिशोब चुकते केले. म्हटलं उगाच कुणाचं देणं राहून जायला नको. मुलांना शाळेत पाठवलं नाही. शाळेला काही माणुसकी वगैरे आहे की नाही, हा वर उद्धारही करुन झाला. शांतपणे सारे घरीच राहिलो. मस्त चिकन बिर्याणी, पापलेट वगैरे करुन झ्याक बेत केला.. दिवाळीला घेतलेले नवे कपडेही घातले. घर आवरुन घेतलं. चार जणांचे अत्यावश्यक कपडे मावतील इतकी छोटीशी हॆण्डबॆगही भरुन ठेवली. काही आवडीची पुस्तकं घातली त्यात..
