नरभक्षी भाग १

Submitted by बेधुंद on 12 January, 2013 - 08:17

वेळ रात्रीचे ११ ,

डॉ.रावते आपले क्लिनीक बंद करुन निघण्याच्या तयारीत होते,सायंकाळ ची ओ.पी.डी. संपली होती,त्यांनी श्यामला , त्यांच्या कंपाऊंडरला, क्लिनीक चा मुख्य दरवाजा बंद करायला सांगितले,नर्स व रिसेप्शन वरची मुलगी दोघेही थोड्या वेळापुर्वीच पेशंट संपले तसे घरी गेले होते.डॉ.रावते दोन मिनीटे खुर्चीत बसुन उद्या लागणार्या पेशंटचे रिपोर्ट लॉकर मध्ये ठेवत होते,ते काम संपले,आता ते रिसेप्शनिस्ट ने आणून दिलेले पैसे मोजत होते.
कंपाऊडर श्याम बाहेर आला,मुख्य दरवाजा बंद करायला त्याने सुरुवात केली ,क्लिनीक ला एक मुख्य मोठा दरवाजा होता व एक लहान दरवाजा होता,त्याने क्लिनीकचा बाहेरील दिवा घालवला ,आणी रस्त्यावर एक नजर टाकली,रस्त्यावर सर्वत्र सामसुम झाली होती,रस्त्यावर सोलर चा एक दिवा थोडासा प्रकाश देत होता,गावातील मुख्य रस्त्यापासुन आतल्या गल्लीत हे क्लिनीक होते त्यामुळे कदाचित थोडी लवकर सामसुम झाली असावी,श्याम ने दरवाजा बंद केला व तो आत जायला वळणार ईतक्यात त्याला कोणीतरी आवाज दिला,त्याने मागे वळुन पाहीले . अंगावर शाल पांघरलेला एक माणुस त्याच्या समोर उभा होता,त्याचा चेहरा पुर्णपणे झाकला जाईल अशा पदधतीने त्याने शाल पांघरली होती,त्याचे डोळे फक्त दिसु शकत होते.तो श्यामला बघुन म्हणाला ''डॉक्टर आहेत का आतमध्ये?"आवाजात एक प्रकारची जरब होती
श्यामला तो माणुस थोडा विचित्र वाटला,अगदी सेकंदापुर्वी तिथे कोणीही नव्हते ,तो अचानक तिथे कसा आला याचाच खरेतर श्याम विचार करत होता,थोड सावरुन तो म्हणाला '' डॉक्टर आहेत पण आता पेशंट तपासणार नाहीत ,उद्या सकाळी यावा'
तसा तो म्हणाला " उद्या पर्यंत वेळ नाही निघायचा ,महत्वाच आहे ,आत जाऊन डॉक्टराना सांग "

श्याम म्हणाला ,'' तुम्ही इथेच उभे रावा,मी डॉक्टरांना विचारुन येतो''.आणी तो आतमध्ये आला व डॉक्टरांना म्हणाला 'सर्,बाहेर एक पेशंट आलयं,तुम्हाला भेटायचय असे म्हणतोय.'
तसे र्डॉ.रावते म्हणाले,'' आरे ,तु त्याला सांगीतले नाहीस का कि दवाखाना बंद झालाय म्हणुन ,उद्या यायला सांगायचे ना त्याला'
श्याम म्हणाला '' सर ,मी सांगीतल त्याला पण तो म्हणतो उद्यापर्यंत नाही थांबु शकत"
तसे डॉ.रावते त्याला म्हणाले,'आरे हे काय हॉस्पीट्ल आहे का,फक्त क्लिनीक आहे,आता काही जास्त मोठी केस असेल तर उगाच जास्त वेळ थांबाव लागेल्,ठिक आहे पाठव त्याला आत"

तसा श्याम बाहेर आला ,तो माणुस अजुन तिथेच उभा होता ,त्याला म्हणाला '' चला ,तुम्हाला बोलावलयं"
दोघही आत आले ,तो आत डॉक्टरांच्या टेबलासमोर येऊन उभा राहीला,डॉ.रावते त्याला म्हणाले
" हं बोल बाबा काय झालयं?" तसा तो माणुस पांघरलेल्या शालीतुन आपला हात बाहेर काढत रावतेंना दाखवत म्हणाला '' हाताला जखम झालीये ती दाखवायची होती"आणी तो हाताभोवती गुंडाळलेले फडके सोडु लागला.तसे त्याच्या चेहर्यावर पांघरलेली शाल निसटुन खाली आली आणी त्याचा चेहरा प्रकाशात पहील्यांदाच समोर आला,अत्यंत कुरुप चेहरा,चेहर्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्यानंतर पडतील असे बरेच व्रण होते,त्यात डाव्या डोळ्याखाली जुनी टाके घातल्याची खुण होती.श्यामला खरेतर किळीस आणी भिती दोघ एकदम वाटले पण तो काही बोलला नाही.
डॉ.रावतेनीही एकदा त्याच्याकडे निरखुन बघीतले.तो या गावातला रहीवाशी वाटत नव्हता,यापुर्वी त्यानी त्याला त्या गावात कधीच पाहीले नव्हते..
तो हाताला गुंडाळलेले फडके अजुनही सोडत होता,रावतेनी हातानेच त्याला थांबायचा इशारा केला आणी ड्रावर मधुन ग्लोव्हज काढुन आपल्या हातावर चढवले व आपल्या हातानी त्यानी जखम उघडायला सुरुवात केली.श्यामने इतर तयारी केली..जखम बघुन डॉ.रावते ही थक्क झाले त्या माणसाच्या डाव्या हाताची २ बोटं कापली गेलेली होती आणी तो काही झालेच नाही या थाटात उभा होता.डॉक्टरानी लगेचच त्या ठिकाणी कापुस दाबला रक्त जोरात वाहत होते,व टाके घालावे लागणार होते .त्या माणसाची चर्या मात्र काहीच फरक पडणार नाही अशी होती.ते बघुन डॉ.रावते त्याला म्हणाले

'' बाबारे खुपच लागलय्,बोटं कापली गेलीयेत्,टाके घालावी लागतील्,कसे झालं हे सगळं ?"

तसा तो म्हणाला,
",कसं काय झाले याच्याशी तुम्हाला काय करायचय्,तुम्ही तुमचे काम करा,टाके घाला
आणी मला जाउद्या"
आता त्याच्या डोळ्यात खुनशी भाव जमा झाले होते,डोळे जणुकाही रक्त ओकत होते,तो भेसुर चेहरा अजुनच भेसुर दिसत होता...
डॉ.रावतेंना खरे तर पुढे काही विचारायची हिंमतच उरली नव्हती पण तरीही ते म्हणाले" असे कसे मला काय करायचे विचारतोस ,तु काही गुन्हा करुन आलेला असला,तर उद्या मला उत्तर द्यावे लागेल ,काय झाले ते सांगणार नसशील तर जा ईथुन"

तसा तो म्हणाला,'' रानातुन येत होतो कोल्ह्याने हल्ला केला त्यानेच खाल्ली बोटं"

रावतेंच्या अंगावरुन भितीची एक लहर गेली,कसंही करुन ही ब्याद लवकर काढावी लागणार होती,त्यांनी पुढे काहीच न बोलता आपल्या कामाला सुरुवात केली.आधी जखम स्वच्छ केली व तुटल्यानंतर उरलेल्या बोटांना भुलीचे ईंजेक्शन दिले ,खरे तर त्याची गरजच नव्हती,तो माणुस एकदम स्तब्ध उभा होता जणु काही त्याला काही संवेदनाच नव्हत्या,
श्याम त्याना मदत करत होता. बरेच टाके घालावे लागणार होते,डॉ.रावते आपले काम शिताफिने करत होते.एकदाचे सर्व काम झाले आणी शेवटचे ड्रेसिंग करुन त्यांनी जखम बंद केली,व त्याला म्हणाले
"तुला ईजेक्शन घ्यावे लागेल व काही औषधे ही "
तसा तो म्हणाला '' त्याची गरज नाही ,आपले पैसे किती झाले ?''
डॉ.रावतेनी त्याला बिल सांगीतले ,खरेतर पैसे मिळाले नसते तरी चलणार होते,पण त्याने पैसे काढुन त्यांना दिले ,आणी जायला निघाला ,

थोडा पुढे गेला आणी मागे फिरुन आला व डॉ.रावतेंकडे बघुन म्हणाला '' डॉक्टर ,कोल्हा चावल्यावर माणुसही कोल्हा बनतो हे खरं आहे का"?

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

दुसरा दिवस उगवला तशी डॉ.रावतेंच्या क्लिनीक पुढे गर्दी जमा झाली होती ,पोलीसांनी क्लिनीक चा ताबा घेतला होता,आत मध्ये डॉ.रावते आणी श्यामचे म्रुत शरीर क्लिनीकच्या फरचीवर पडलेले होते,त्या दोघांच्या मानेवर अगदी सारख्याच जखमा होत्या,

कुठलही मांसभक्षी जनावर आपल्या शिकाराचे रक्त पिऊन टाकल्या नंतर मागे ठेवतं ना तशा

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा भाग ही टाकलाय,धन्यवाद्,दादाश्री,श्रीमंत,अनिश्का,विनायक,किसन सर्वांचे आभार