"अरे उठ आता...किती वेळ झोपणार आहेस? आज ऑफिस आहे माहित आहे ना..."
आईच्या आवाजाने तन्मय जागा झाला तर पाहतों आई समोरच उभी
. "अग...आज फार थडी वाजतेय...पुरता गारठलोय मी..आज ऑफिस नको .."
तन्मायचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत आई म्हणाली "वर्षाच्या बारा महिन्यांपैकी सहा महिने तर थंडीनेच कुडकुडतो. काही विशेष थंडी नाही आज. जा ऑफिसला. घरी राहिलास तर दिवसेभर आळशासारखा झोपून राहशील ."
आता मात्र ऑफिसला जाण्यावाचून पर्याय नव्हता. कसेतरी घाईत आवरले.तोंडावर पाण्याचा शिद्कारा केला तरी झोप काही जात नव्हती. गडद तपकिरी आणि
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १
......तोच त्या सद्गृहस्थांचेच पत्र मला माझ्या पत्त्यावर आले. मी ते सोबत आणले आहे व आता तुम्हाला वाचून दाखवते: ... इथून पुढे चालू -
"कॉपर बीचेस, विंचेस्टर जवळ
प्रिय मिस. हंटर,
वसंत ऋतु नुकताच सुरू झाला होता. एका गुलाबी थंडीत सकाळचा नाश्ता नुकताच संपवून मी आणि होम्स बेकर स्ट्रीट वरील आमच्या खोलीत भट्टीची आल्हाददायक ऊब शेकत बसलो होतो. खिडकीसमोरच्या ओळीने पसरलेल्या करड्या रंगाच्या घरांच्या रांगांमधून धुक्याचा एक दाट ढग तरंगत चालला होता. त्याच्या पिवळसर आच्छादनात लपेटलेल्या त्या घरांच्या खिडक्या अंधुक, धुरकट दिसत होत्या. आम्ही नाश्ता केलेल्या मेजावर अजूनही चीनी मातीची भांडी व प्लेट्स इत्यादी सामन तसेच पडले होते. शेरलॉक सकाळपासूनच शांत शांत होता. गेल्या काही दिवसांतल्या वर्तमानपत्रांतले जाहिरातींचे रकाने बारकाईने वाचण्यात तो गढून गेला होता.
ती आणि तो रेल्वे स्टेशनवर ..
निशब्द शांततेत दोघे स्टेशनच्या पायऱ्या उतरू लागले. गाडीची वेळ होत आली होती. रेल्वेत बसल्यानंतर तिने एकवार त्यच्याकडे पहिले. तोही तिच्याकडेच बघत होता, पण आज त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. काही समजत नव्हते. किती वर्षांची मैत्री ती पण असे कधी जाणवले नाही त्याला.
तुमच्या कधी असं लक्षात आलयं का एक असं चित्र, जिथे आपण एकाच माणसाला काम करताना पहातोय आणि बाकीचे सारे आरामात बसलेत. अगदी लहानपणापासून, म्हणजे मला कळायला लागले तेंव्हापासून, मला हे दृश्य अजिबात आवडत नाही. मग ते घ्ररात असो वा बाहेर! लहानपणी वाटलं नव्हतं की हे आपल्याला वारंवार पहायला लागेल. कारण आमच्या घरी अगदी घर साफ करण्यापासून ते दिवाळी, लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमापर्यंत सगळ्या कामात घरातील सर्व सभासदांचा थोडा सहभाग असायचा. मग आजोबा असोत, मोठ्ठे काका असोत की छोटा पाच वर्षाचा बंड्या असो प्रत्येकाला जमेल ते काम तो तो माणूस करत असे, तशी कामाची विभागणीही केली जात असे.
सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...
रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.
तेवढ्यात त्याला चौथी 'ई'च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'
म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...
-- इतरत्र पूर्वप्रकाशित
आपल्या सर्वांच्याच घरात कधी कधी कोणत्या न कोणत्या प्रकारचा समारंभ आयोजित करण्याचा प्रसंग येतो. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, वास्तुशांती, उदघाटन असे कितीतरी समारंभ आपण साजरे करीत असतो. आपल्या आनंदात आपले नातेवाईक, हितचिंतक, मित्र-मैत्रिणी इ. सहभागी व्हावेत, अशी त्या मागील मुख्य भावना असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनांत कित्येक वेळा जवळच्या नातेवाईकांची अथवा मित्रांची वर्षांनुवर्षे भेट होत नाही, या निमित्ताने ते भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. नवीन ओळखी होतात, माणसं जवळ येतात, नाती अधिक घट्ट होतात.