दोस्ती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ही कथा जुन्या मायबोलीवरची आहे. त्यावेळेला या कथेचे नाव फ्रेंड असे ठेवले होते. इथे नविन मायबोलीवर दोस्ती असे नाव दिलेले आहे.

हा माझा कथालेखनाचा पहिलाच प्रयत्न. थोडाफार बालिश आहे पण तरी आवडेल असी आशा करते.

आपल्यापैकी कित्येकांनी ती वाचलेली आहे. आता नविन मायबोलीवर आणत आहे. माझ्या बहुतांश कथांप्रमाणे या कथेचा शेवटदेखील गंडलेला होता; आता शेवट बदलत आहे Happy (अन्यथा रिमेक कसा म्हणणार?)
असं आधी म्हट्लं होतं खरं पण शेवट बदलता आला नाही; त्याबद्दल दिलगीर आहे. (दुसर्‍या कुणाला नविन शेवट सुचत असल्यास मलादेखील सुचवाच) Proud

या कथेचा आणि सध्या मीच लिहत असलेल्या "मोरपिसे"चा काहीएक संबंध नाही. Happy

पहिल्यांदा कथा वाचणार्‍यांना एक फुकट सल्ला: सलग वाचू नका. गरगरेल. वैयक्तिक अनुभव.

=================================================

हरामी साला भ****
ती पुटपुटली...
"क्या?"
तो उडाला.. तीन ताड.
ती.. प्रिया कुलकर्णी. तो रेहान खान..
देशपान्डे सर unit test चे पेपर वाटत होते. पहिलीच test बहुतेकजण उडालेच होते.. तिचा नम्बर आला.. अकरावीच्या वर्गात गणिताचा तास चालू होता.

"या, कुलकर्णीबाई.. दिवे लावले आहेत. दिवसभर उनाडत फ़िरता.. वर्गात बसायला नको. घ्या पेपर."
ती शान्तपणे उठली.. नाकावरचा चष्मा वर केला आणि जाऊन पेपर आणला.. किती मार्क्स पडले हे सर बोलले नाहीत.. तिने पाहिले.. पन्नासपैकी एकेचाळीस होते Not Bad .. ती शेवटच्या बेन्चवर येऊन बसली..

वर्गात तिच्या बाजुला कुणीच बसायला तयार नसायचे.. हे रेहानला एव्हाना समजलं होतं. पण आज नाइलाज होता. एक तर त्याची late admission होती.. त्यात लेक्चरला उशीर झालेला.. आला देशपाड़एनी "उगवलात का युवराज" हे ऐकायला मिळाले. पटकन पाठी जाऊन बसला.. तिच्याच बेँचवर..

पेपर घेऊन आली आणि सराचा सत्कारसमारंभ सुरू झाला होता.. अर्थात हळू आवाजात.. this was realy surprising for him एकतर या गावात सगळ्या मुली म्हणजे एकता कपूरच्या सिरियल सारख्या सज्जनतेचा परिपाक.. देहरादूनच्या boarding मधे त्याचे शिक्षण... तिथल सगळेच वेगळे होते. त्यात ही मुलगी म्हणजे एक अजब रसायन होतं.

काय भान्गड आहे ती त्याला ही माहित नव्हतं. पण मुलगी होती एकदम ग्रेट.
===============================================

गावातलं एकदम बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणजे खानचाचा.. त्यानी सुरू केलेला कापडाचा व्यपार त्याच्या मुलानी परदेशात नेला. तीनही मुलगे कर्तुत्ववान निघाले. रेहान हे मोठ्याचे शेंडेफ़ळ. हातात पैसा असल्यावर मुलान्चं जे होतं तेच याचही झालेलं. खरं खोटं कुणालाही माहीत नव्हतं.पण गावात चर्चा होती की खानचा हा लाडका नातू बारावी नापास होता. आणि "बाहेरच्या" नादाला लागला होता.

खानाचाचानी बिझिनेस मुलाकडे केव्हाच सोपवला होता. त्यामुळे बरेचसे दिवस त्याचा मुक्काम गावात असायचा. सध्या त्यानी नारळी पोफ़ळीच्या बागेत लक्ष घालायला सुरुवात केली होती. मात्र अचानक त्यानी रेहानला इथल्या कॉलेजात घातलं. आणि कधीही विशेष काही न घडणार्या गावात चर्चेला ऊत आला. तो वीस वर्षाचा मुलगा जणू एखादा हिरोच्याच प्रसिद्धीला जाऊन पोचला. त्यातच रेहानसाठी त्याची दादी मुलगी बघतेय असं अशी बातमी फ़ुटली आणि मग तर विचारूच नका. आणि हे सगळे कॉलेजात जॉईन व्हायच्या आधी.....

कॉलेजात सगळ्या मुली आपल्याकडे चोरून पाहतात याची त्याला गम्मता वाटायची. चुकुन एखादिला हाय म्हटले तर त्यात लाजण्यासारखे काय आहे हे त्याला अजूनतरी समजलं नव्हतं.

एकतर सगळ्या मुली हिन्दी फ़िल्म हीरॉईन प्रमाणे गरज नसतानाही मुरकायच्या. त्यात मुलगे मुलीशी बोलत नसतात हेही त्याला पहिल्यादाच समजलं. लायब्ररी मधे, केंटीनमधे gents & ladies सेक्शन वेगळं पाहून त्याची छान करमणूक झाली होती.

मात्र या सगळ्या प्रिया हे एक गूढ होतं. तिच्याशी जास्त कोणी बोलत नाही हे तर कळलं होतं पण का ते माहित नव्हतं. सावळा वर्ण, लाम्ब केस आणि अत्यन्त सडपातळ. नाकवर घसरणारा चष्मा.. पाहताक्षणी हे ध्यान बावळट आहे याची पूर्ण कल्पना यायची. पण आज या बावळटाच्या तोंडुन हे असं बोलणं?
खरं तर त्याला प्रश्न पडला..की एवढे चांगले मार्क्स असूनही सर तिला असं का म्हणाले There must be some reason

लेक्चर चालू झालं. अर्थात तिचं लक्ष नव्हतं आणि त्याचंही. तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि हसली. एखाद्या लहान मुलाकडं पाहून हसावं तसं. निरागसपणे.

का कोणास ठाऊक रेहानला तिला काहीतरी विचारावंसं वाटत होतं. पण काय विचारावं तेच समजत नव्हतं. तसं आवडलेल्या मुलीला तो your place or mine हे पहिलंच वाक्य फ़ेकू शकत होता.. पण प्रिया..

तिनं पेपर शान्तपणे बेगेत घातला. देशपांडे integration समजावत होता. ती उठली. आणि लेक्चर चालू असताना चक्क वर्गाबाहेर पडली. shocking . रेहान बघतच राहिला. ती वर्गाबाहेर गेली तशी देशपांडेची टकळि सुरू झाली.. काय बोलला ते रेहानला जास्त समजलं नाही. तेवढं मराठी clear नव्हतं ना!

पण काहीतरी प्रियाच्या सन्दर्भात होतं. आणि मुलं हसत होती याचा अर्थ तिची निन्दा चालू असणार. अन्दाज बान्धायला काय जातय? मुळात ज्या कॉलेजातल्या मुली आणि बरीचशी मुलं सुद्धा लेक्चर बंक करणे हीनपणाचं मानत होते तिथे ही पोरगी उठून बाहेर जाते. अख्खं लेक्चरभर त्याच्या मनात हाच विचार चालू होता.

शेवटी एकदाचं लेक्चर संपलं. तो वर्गाबाहेर आला. आता फ़िजिक्स ऐकणं was too much for him तो अकरावी पास झाला होता तरी दादाजीनी त्याला मुद्दाम परत बसवलं होतं. एकदा शिकताना कंटाळा येतो तर परत चार वर्षानी कोण ते परत रखडणार?

सध्या मात्र त्याला प्रियाला भेटायचं होतं, या शहरात जिथे त्याला दोन चार मित्र मिळणं अवघड झालं होतं तिथे ही बिनधास्त फ़टाकडी भेटली होती. त्यानं अख्खं कॉलेज शोधलं. ती कुठेच दिसली नाही. हे सगळं इतक्या अचानक घडलं ना की त्याला वाटलं आपण स्वप्नातच आहोत. आज आपण कसलीही नशा केली नाही याची त्याने मनोमन खात्री केली.
रेहानने स्वत:चीच समजूत घातली.
बहुतेक आपण स्वप्नातच असू.
================================================

"रे उठ ना सकाळची आठ वाजले. बाबा काय लडका आहे?"
रेहान डोळे चोळत उठला. खरं तर त्याला स्वप्नातून बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. गेली दहा वर्षं हेच स्वप्न तो जगत आला होता.
त्याने डोळे किलकिले करून पाहिलं. प्रिया नुकतीच न्हाउन आली होती. पाठीवर मोकळे सोडलेले तेच केस तोच कमनीय बान्धा तीच भेदक नज़र.. हीच का ती प्रिया? शोधणं कठीण नाही..
"नीन्द आ रही है.." त्याने परत चादर तोंडावर घेतली. प्रिया गर्र्कन पाठी वळली. "बैला उठतोस का घालू कमरेत लाथ?" तिने चिडून विचारलं. पण रेहान काही आता अकरावीच्या वर्गात बसला नव्हता तिच्या शिव्यानी बिचकायला. बरोबर हीच ती प्रिया..
तिने त्याच्या तोंडावरची चादर खेचली. "झोपेचं सोंग बरं जमतं रे तुला?"
"अजूनही बरच कही चांगलं जमतं मला" त्याने डोळे मिटूनच उत्तर दिलं,
"अच्छा, तो फ़िर जरा breakfast बनाके दिखाना"
"प्रिया,तुला काय मजा येते माझं स्वप्न दरवेळेला तोडायला सोने दो और थोडी देर"
प्रिया आता मात्र मनापासून चिडली. तिला सकाळी साडेपाचला उठायची सवय आणि हे महाराज मात्र सकाळी दहाला साखरझोपेत!
"रे उठ ना प्लिज"
तो अंथरूणात उठून बसला. "प्रिया मी कसम खाल्लि आहे ..."
"की सकाळी लवकर उठणार नाही. अरे पण कमीतकमी सकाळी उठ. हे काय दुपारपर्यन्त झोपणं"
त्याचे वाक्य पूर्ण न करू देता ती म्हणाली
" Ok I give up, now make a cup of coffee for me "
ती परत हसली.. तेच लहान मुलवाले smile
"सकाळी कॉफ़ी?"
तिच्या प्रश्न्नातला मिस्किलपणा त्याला समजला. पण त्याने उत्तर द्यायचं टाळलं. त्याने तिचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात त्याने पाहिल
"आज रह जाओ यही पे"
प्रियाने हात सोडवून घेतला. या विनवणीची तिला सवय झाली होती.
तिचं काही न बोलणं त्याला त्रास देत होतं. पण ती थाम्बली नसती. तशी जायची घाई नव्हती. पण तरी ती गेली असती. त्याची पर्वा न करता. त्या दिवशी वर्गातून गेली तशीच.

===================================================

अख्खं कॉलेज धुंडाळून सुद्धा ती त्याला दिसली नाही. शेवटी त्याने असिफ़ला विचारलं. "यार तुझे प्रिया पता है?"
असिफ़ कॉलेजचं वर्तमानपत्र होता. "कौनसी प्रिया? यहापे सात प्रिया है और उनमे से एकभी तुम्हारी category की नही है" असिफ़ने शान्तपणे सिगरेट सुलगावत सांगितलं.
"असिफ़, मे कोई girl frined नही ढुढ रहा हू. I just want to talk to her. Priya Kulkarni " रेहानने सांगितलं.

"क्या?" आता असिफ़ उडाला.
"रेहान, मेरी बात मान, वो लडकी पागल है. उसके पागलपन के किस्से सबको पता है."
"मतलब?" आता मात्र रेहानची उत्सुकता ताणली गेली. बावळट आहे हे कळलं होतच पण पागल?
"रेहान, मतलब ये के वो पागल है."
"असिफ़, बात को ऐसे घुमा मत. साफ़ बता"
आता असिफ़ रंगात आला. त्याची Q&A ची स्टाईल होती.
"रेहान, मुझे बता ये लडकीको देखके क्या लगता है? LEts say Financial Condition "
रेहानने जरा मेमरीवर जोर दिला. तिचे ड्रेस तर एकदम सिम्पल होते. रोज एकच चप्पल असायची. म्हणजे घरची परिस्थिती बेताची असावी. रेहान काही बोलणार तेवढ्यात असिफ़ला परत सूर सापड्ला. " middle class लगती है ना.. रेहान ये लडकी का बाप लाखो का मालिक है. ये अकेली बेटी है. सुना है के बहोत होशियार है, एकदम scholar पर पिछले साल घरसे भाग गयी थी. बाप पकडके वापस लेके आया. लेकीन क्यु भागी थी किसिको नही पता."
आता मात्र रेहानला मजा वाटली. अवघी चाळीस किलो वजनाची, चष्म्यावरच्या नाकाचं वजन नाही पैलवत अणि चक्क पळून जाते. त्याला आठवलं त्याने घरातून हॉस्पिटलमधून पळून जण्यासाठी किती प्लान्स केले होते. पण पळाला मात्र एकदाही नाही. मग हिने असं का करावं?
"रेहान, आज भी अगर कोई उससे अच्छेसे बात करता है ना तो ये लडकी मुह फ़िराके चल देतीहै. पुरे गाव मे किसिसे नही बात करती. भूल जा उसकी बात. बीअर मारेगा?"

त्या दिवशी तो विषय त असाच राहिला. नन्तर तो विसरूनही गेला की आपल्या वर्गात एक अशी मुलगी आहे, ती लेक्चरला आली नाही आणि तसा तो तरी कुठे regular होता.
==================================================

असच एके दिवशी बाईकवरून भटकत होता. रात्रीचे दहा साडेदहा झाले असतील. रस्ता सुनसान होता. त्याने गाडी आडवळणाने घातली. सगळे याला भुताचा माळ म्हणयचे. पण ज्याचा देवावर विश्वास नाही. त्याचा भुतावर काय डोम्बल असणार. इथे आल्यापासून हा एक त्याचा favourite spot होता. मस्त स्ट्रीट लाईट्स होते आणि शान्तता होती. छान वाटायचं इथं आल्यावर शाळेत असतानापण तो असाच एका टेकडीवर जायचा. एकटाच. आणि ऐकाय्चा खामोशी की आवाज. त्याने बाईक स्टेंडवर लावली. थोड्या अन्तरावर कुणीतरी आहे असं त्याला वाटलं. तो पुढे चाल गेला. ती बसली होती. प्रिया....
आणि तिच्या पुढ्यात होतं एक अर्धवट चित्र. तिचा हात रंगाने माखला होता. लाम्बसडक केस पाठवर मोकळॅ होते, त्यातले थोडेसे हवेने उडतहोते. पण तिला भानच नव्हतं. चान्दण्याखाली पाठमोरी बसलेली ती स्वत्: एक चित्र वाटत होती.
तिला बहुतेक चाहुल लागली असावी. तिने पाठी वळून पाहिलं.
"आज लवकर आलास?" तिने घड्याळाकडे पाहत विचारले.
"आं?" तो भाम्बावला.
परत ती हसली. चान्दण्यात सुद्ध त्याला तिच्या गालावरची खळी दिसली.
"जल्दी आ गये. रोज तो बारा बजे आते हो."
हिला आपलं टाइम टेबल कसं काय माहित?
तिने तिचं रंगाचं सामान आवरायला सुरुवात केली.
"हाय i am rehan " त्याला बोलायला काहिच सुचत नव्हतं,
i know माझ्य्यच class मधे आहेस ना?
बर बाय. एवढं बोलून ती चालायला लागली.
wait, can i drop u? how u will go?
खरं तर त्याला तिचं घर कुठे आहे ते बघायचं होतं. पण त्याला पूर्ण खात्री होती की ती नाही म्हणेल.
ठिक आहे ती म्हणाली.

ती बाइकवर त्याच्या पाठी बसली. त्याला सहज चेष्टा करायची लहर आली. "ठीक से पकडके बैठना. I drive very fast "

तिने हाताचे तळवे त्याच्या चेहर्‍यापुढे धरले.. लाल निळे. " your shirt is expensive. चालेल?"

आता रेहानला काही बोलताच येईना. खरं तर तिथेच थांबून त्याला तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या. पण नको, ही बया पागल आहे असं म्हणतात. त्याने बाईक चालू केली.

"इतनी रात को यहा क्या कर रही थी? डर नही लगता?" त्याने विचारलं.

ती खळखळून हसली. "डर, किसका? अख्ख्या गावात लोक मला घाबरतात."

तो चमकला. "इथून राईट मार." तिने त्याला सांगितलं.

" your painting is good. I like abstract style " तो सहज बोलायचं म्हणून बोलला.
" Thank You " तिनं शान्तपणं सांगितलं.
"घर कहा है तुम्हारा" त्याने विचारलं. "चलो बताती हु"

त्यानन्तर त्याचं बोलणंच खुंटलं, मस्त वारा सुटला होता. आता भुताचा माळ पाठी पडला. तिचं occasionally राईट लेफ़्ट एवढंच बोलणं सुरू होतं. तशी त्याला गावाची अजून माहिती नव्हती. आणि हा तर एकदम अनोळखी रस्ता लागला. कुठच्या कपारीत राहते ही असा विचार सुरू होता तेवढ्यात ती म्हणाली. "रेहान लेफ़्ट मारना."

"बास इथे या गेटसमोर थांबव. thanks Bye " एवढं बोलून ती उतरली.

तिने बंगल्याच्या गेटमधून आत जाताना पाठी वळून पाहिलं आणि हसली. तेच ते लहान मूलवालं smile . तो चमकून बघतच राहिला. रात्री अकरा वाजता ही मुलगी त्याच्या बाईकवरून लिफ़्ट घेऊन अर्धं गाव फ़िरवून त्याच्याच बंगल्यात गेली होती.
=============================================

आता मात्र रेहानला काहीच सुचेना. त्याने बाईक गेटमधून आत घातली. दरवाजा उघडाच होता. तो आत गेला.
दादी सोफ़्यावर बसली होती. दादाजी खुर्चीवर बसून कसलतरी जाडजूड पुस्तक वाचत होते. आणि प्रिया.. ती कुठे होती?

"आ गये बेटा, आज जल्दी आ गये." दादाजी पुस्तकातून मान वर न करता म्हणाले.

"दादी, एक लडकी आयी थी यहा पे, प्रिया.. कहा है." रेहान दादीजवळ बसत म्हणाला.

"यहा है," प्रिया किचनमधून हात पुसत बाहेर आली. "दादी, तुझा हा नातू वेडा आहे, मला विचारतो, तुझं घर कुठाय?"

दादाजीनी पुस्तकातून डोकं वर काढलं, आणि ते मनमुरादपणे हसले.

"रेहान, मी तुझ्या घराच्या पाठी राहते. गडगा ओलांडला की माझं घर. रोज पाहते मी तुला पण तु तुझ्याच तन्द्रीत असतोस."

" listen priya, my marathi is not that much clear, OK? I have never seen u around"
प्रियाने दादीकडे पाहिलं. त्या दोघीही हसतच होत्या. आता मात्र रेहानला वाटलं की त्याला खरंच वेड लागलंय. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव तिने ओळखले.
" dont get so confused. have ur dinner. we will discuss then Ok? "

काय ओके ते त्यालाहि कळलं नाही. पण ती दादीला मदत करायला किचनमधे गेली. दादाजीनी पुस्तक बंद केलं. "गोड छोकरी आहे. हम अकेले रहत्ते है, तो रोज आती थी. दादी की तो सहेली हो गयी है."

"पहले कभी नही देखा घर मे" रेहान म्हणाला.
"हा, अब कॉलेज जाती है, पढाई भी तो होती है"
"दादाजी, आपको पता है वो मेरे क्लास मे है."

तेवढ्यात प्रियाने किचनमधून आवाज दिला. "रेहान, चलो, टबल लगाओ."

एवढ्या अधिकाराने तर त्याला त्याच्या आईने ही कधि सांगितलं नसतं. "तुला माहितीय रेहान, दादी तुझ्यासाठी थांबली जेवायची. तसं मी तिला कित्यकदा सांगितं असं कुणासठी थंबू नको. पण ऐकतच नाहि. इतके दिवस मी यायचे जेवायला. पण तू आल्यापासून कधी जमलंच नाही." ती वर्षाची ओळख असल्यासारखी बोलत होती.

रेहानला आता थोडा धीर आला. तशी तिच्या हातातला चाकू पाहून भिती वाटली पण तो काकडीसाठी हे कळल्यावर तो जरा हुशारला.
"कॉलेजमे कभी बात नही की आपने?" त्याने खवचटपने विचारलं.
"लेकीन मे तुमसे बात करू ही क्यु? क्या काम रहता है?" तिने काकडीचा जीव घेत विचारलं.
"काम तो कुछ नहि रहता, पर तुम कॉलेजमे रहती हो क्या?" त्याने खुर्चीवर बसत विचारलं.

तिने हातातली काकडी खाली ठेवली. चाकू तसाच होता. ती किन्चित पुढे वाकली. तो जरा घाबरला. तिने त्याच्या कानाजवळ ओठ नेले आणि हलकेच पुट्पुटली, "कमसे कम असिफ़ के साथ बैठके मनोरमाबार मे बैठके बीअर तो नही मारती."

त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या नज़रेतला अर्थ स्पष्ट होता. मी कधीपण तुझी वाट लावू शकते.

तेवढ्यात दादी आली. अख्खं डिनरभर तो गप्प बसून होता. खरं तर त्याला कुणी बोलायचा चान्स दिलाच नाही.

प्रिया मात्र अखंड बडबडत होती. दादा-दादीना तिच्या बडबडीची सवया असावी. कॉलेजातले सगळ्या प्रोफ़ेसरची नक्कल करून झाली. एवेढंच काय पण देशपांडे रेहानला वर्गात "युवराज" म्हणून कसा चिडवतो हेही सांगून झालं.

रेहान confused होता. कुणीही झालं असतं म्हणा. करण प्रियाची कॉलेजमधली image तिच्याविषयी चालणारे समज आणि असिफ़ने दिलेली माहिती हे सगळं समोरच्या प्रियापेक्षा खूप वेगळं होतं. पण आता त्याला काही जाणून घेण्याची घाई नव्हती. जर तिचं आपल्याघरी इतकं येणं ज़ाणं असेल तर त्याला त्याच्या प्रश्नाची उत्तर आज ना उद्या मिळणारच होती.

जेवण झाल्यावर तो टीव्ही बघत बसला. साडेअकराझाले असतील. दादाजीनी त्याला प्रियाच्या घराविषयी थोडी माहिती दिली. ती एकटीच मुलगी आहे. वडिल IAS Officer आहेत. इथे दोन वर्षापुर्वी आले, वगैरे वगैरे.

प्रिया दादीला मदत करत होती. सगळं आटोपून ती बाहेर आली. "बाय दादाजी. गूड नाईट, रेहान." ती निघाली.
"मी सोडू का?" त्याने विचारलं.
"नको" ती म्हणाली. आणि गेलीसुद्धा.
इतक्या रात्री हिचे आईवडील हिला बाहेर पाठवतात कसे हा प्रश्न त्याला पडला.

तो त्याच्या बेडरूम मधे आला. त्याच्या बेडवर एक पेंटिग ठेवलं होतं. अजून ओलं. लाल निळ्या रंगातलं.
रेहान त्या पेंटिंगकडे बघत होता. कितीवेळा त्याने घर बदललं. देश बदलला. पण हे पेंटिंग कायम त्याच्या बेडरूममधे राहिलं.
==================================================

"कॉफ़ी बना रही हो या शाम का खाना?" त्याने हाक मारली.
किचनमधून तिचा आवाज आला. "उठो और ब्रश करो नही तो कॉफ़ी नही मिलेगी.."
छे! आता उठणं भागच होतं.
तो बाथरूममधून बाहेर आला, तेव्हा breakfast तयार होता. french toast and coffee
"आजकल अच्छा बनाने लगी हो, its eatable " त्याने तिला डिवचलं.
ती शान्त बसलेली त्याला कधीच आवडायची नाही.
रेहानने परत तिच्याकडे पाहिलं. किती बदलली होती! काळ एवढ्या पटपट जातोय हे मानायला त्याचं मन तयार नव्हतं. पण बाहेरून प्रिया कितीही बदलली तरी प्रिया अजूनही होती तशीच होती. पागल...
त्याचं त्याला हसू आलं.
"एकटाच का हसतोय? माहितेय ना एकटं हसणार्‍या मुलाला वेडा म्हणतात."
"एकटं हसणार्‍या मुलाला वेडं म्हणतात की नाही ते माहित नाही, पण एकटं असणार्‍या मुलीला मात्र म्हणतात. पागल." तो म्हणाला.
" बदमाश " तिने त्याला मारण्यासाठी हात उगारला.
त्यानं तो हात धरला. आणि तिला ओढलं, स्वत्:च्या मिठीत घेतलं, गेलेल्या रात्रीच्या आठवणी परत जागवण्यासाठी आणि आज तिला थांबवण्यासाठी......त्याचा एक प्रयत्न..

==================================================

दुसर्‍या दिवशी अम्मीचा फ़ोन आला. मुबईला ये म्हणून तसं urgent नव्हतं. पण तिला त्याला पाहायचं होतं. अम्मीला येणं शक्य नव्हतं म्हणुन त्यालाच बोलावलं, त्याने दादाजीना विचारलं, तर तेही म्हणाले जाऊन ये एक दिवस.

पहाटेच त्याची ford Ikon घेऊन तो रवाना झाला. मात्र निघताना ते पेंटिंग त्याने आठवणीने घेतलं. अम्मीला gift देण्यासाठी.

खरं तर घरी जाणं हा त्याच्या द्रुष्टीने सगळ्यात वैतागवाणा प्रकार. ज्या माणसाचं तोंड बघणं त्याला अशक्य होतं त्याच्याच घरी जाणं, म्हणजे त्याच्या सहनशक्तीची परिक्षा होती. पण नाईलाज होता, ज्याच्याशी वैर होतं, तो रेहानच्या आईचा नवरा होता. त्याला बाप म्हणणं त्याने केव्हाच सोडलं होतं.

नशीबाने या वेळेला काही राडा झाला नाही. बाप दिल्लीला गेला होता. तरी तिथं राहणं त्याला कठीणच पडलं असतं, दुपारून तो बान्द्र्याला त्याच्या घरी पोचला. त्याच्या आवडीचं जेवण तयारच होतं. सन्ध्याकाळी सगळ्या बहिणीना घेऊन shopping झालं. परत रात्री driving करायचं आणि पहाटेपर्यंत पोचायचं असं त्याने ठरवलं होतं. पण अम्मी ऐकायला तयार नव्हती. अजून एक दिवस थांब हाच एक लकडा लावला होता. पण दादाजीचा फ़ोन आला. आणि या धर्मसंकटातून त्याची सुटका झाली.

रेहानला खरं तर या सर्वाशी संबंध तोडून दूर कुठेतरी जायचं होतं. तसा त्याने मनाशी कित्यकदा निश्चयही केला होता. पण दरवेळेला त्याच्या मार्गातला एकच अडसर होता. अम्मी. paralysis होऊन अंथरूणाला कायमची खिळलेली.

निघताना त्याने ते पेटिग परत घेतले. का ते त्यालाच कळलं नाही. तरी बडी दिदिने विचारलं का?
तो म्हणाला"सोचा था अपने drawing room मे लगायेंगे. लेकीन यहा के interiors के साथ match नही होता. दादा के घर मे ही ठीक कै. "
तिने विचारलं किसने बनाया?
त्याच्या नकळत तो म्हणाला "दोस्त ने"

हायवेवर गाडी भन्नाट सोडल्यावर त्यालाच हसू आले.
कोण कोठची पोरगी दोनदाही धड भेटली नाही आणि आपण तिला "दोस्त" बनवलंसुध्हा... too fast Rehaan, slow down."

==================================================
गावाला आल्यानंतर दोन तीन दिवस प्रिया दिसलीच नाही. तिच्या मामाकडे गेली होती म्हणे. रेहाननेही नियमितपणे कॉलेजात जाणं सुरू ठेवलं. त्याला शक्य तितक्या लवकर दाखवून द्यायचं होतं की तो व्यवस्थित राहू शकतो. दादाजीच्या या शिस्तवाल्या कचाट्यातून त्याला बाहेर पडायचं होतं. पण एक अर्थाने इथे बरं सुद्धा वाटत होतं. इथे कसलीच कटकट नव्हती. कसलीच भिती नव्हती.

bio चं लेक्चर नुकतंच संपलं होतं, नंतर english होतं. हा तास रेहान मस्त enjoy करायचा. कारण विषय त्याच्या द्रुष्टीने अजिबात कठीण नव्हता. उलट मजा वाटायची. तेवढ्यात प्रिया वर्गात आली. काळी जीन्स आणि व्हाईट टॉप. खाली मान घालून. ती आल्या आल्या वर्गातली टारगट मुलानी काहितरी comments मारल्या. काय ते नक्की त्याला कळलं नाही.

पण ती शांतपणे मागच्या बेन्चवर जाऊन बसली. त्याने तिला हाय केलं. तिने ओळख नसल्यासारख. त्याच्याकडे पाहिलं. रेहान चिडला. काय खेळ चालू आहे त्याला अजून कळलं नव्हतं. उत्तर सापडतं म्हणे-म्हणेपर्यंत प्रश्न पाठलाग करायला लागायचे. अर्थात हे त्याच्या बाबतीत कायमचं होतं.

रेहानने मनोमन निश्चय केला आज, आता या क्षणापासून तिचा विचार पूर्ण पणे सोडायचा. असिफ़ बरोबर म्हणतो, ती वेडी आहे. आपल्याला काय जगात मुलीची कमी नाही. ही कोणी त्रिलोकसुन्दरी नाही लागून गेली. मनामधे का कोणास ठाऊक तिच्याबद्दल एक सॉफ़्ट कॉर्नर तयार झाला होता. कुठेतरी त्याला वाटत होतं की ती जाणून बुजून एकटी नाही आहे. तिला एकतं टाकण्यात आलय. पण आजचं तिचं हे वागणं त्याला अपमानास्पद वाटलं.

English लेक्चर नेहमीसारखं झालं, पण त्याचं पूर्ण लक्ष तिच्याकडे होतं. लेक्चर संपलं, पाटीलमेडम वर्गाबाहेर पडल्या, तशी प्रिया पण बाहेर पडली. वर्गाच्या दारापर्यन्त गेली. आनि तिने पाठी वळून त्याच्याकडे पाहिलं, वर्गात कुणाला कळं पण नाही पण तो काय अते समजला. किती अर्धा सेकंद ही तिने पाहिलं नसेल, पण त्याला त्याच्या प्रश्नाची अर्धी उत्तरं मिळाली. ती वर्गाबाहेर पडली. तोही निघाला.

ती कट्ट्याजवळच्या झाडाखाली थांबली होती. अच्छा, म्हणजे रेहान येईल याची तिला पूर्ण खात्री होती. रेहान तिच्याजवळ गेला. तसा तो अजून चिडलेलाच होता. पण ती मात्र शान्त होती.
"मला वाटलंच तू येशील." ती म्हणाली.
"समझके क्या रखा है तुमने मुझे?" तो जराशा रागात म्हणाला.
" what do you mean? " ती उद्गारली. आता मात्र रेहानला खात्री पटली.

इतके दिवस त्याने कुणाला सांगितलं नव्हतं, पण आज त्याला कळलं होतं, त्याने कितीही प्रयत्न केला तरी जे व्हायचं ते घडलंच होतं. त्याच्या बापाची दुसरी बायको त्याच्या जीवावर उठली होती. तिने त्याच्या अम्मीची जागा तर घेतलीच होती, पण आता मात्र ती त्याला मारणार होती. तिच्यापासून वाचवण्यासाठी तर दादाजी त्याला इथे घेऊन आले होते.

पण तिने इथेही सगळ्याना मात दिली होती. त्याच्या आधीच तिने त्याला मारायला म्हणूउन कोणाला तरी पाठवलं होतं. हीच प्रिया काल चाकू घेऊन उभी होती. आणि आज तर तिने त्याला मारण्याचा पूर्ण निर्धार केला होता. कुठचाही क्षणी तिने वार केला असता, त्या आधी त्याला काहीतरी करणं भाग होतं. काय केलं पाहिजे?

तिने त्याच्याकडे पाहून smile दिलं, तेच ते लहान मूलवालं. त्याच्या डोक्यातला विखार वाढत गेला. " dont get so angry " ती म्हणाली.

छान! मी तुला मारून टाकते; तू चिडू नकोस. आता मात्र हे सगळं सहन करणं कठीण झालं. त्याने तिचा गळा धरला. ती ओरडली. आसपास कोणीही नव्हतं. अंगातली सगळी शक्ती वापरून त्याने तिचा गळा दाबला. साली समजते कोण स्वत:ला. तिचा श्वास घुसमटायला लागला. जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. किती वेळ चालला असती ही धडपड.. एक मिनिट.. दोन मिनिटे.. त्याच्या पावणेसहा फ़ूट उंचीला आणि आडदाड बांध्याला तशीही ती मुकाबला करू शकली नसती.

बास आज हा खेळ कायमचा संपवायला हवा. त्या बाईने खूप प्रयत्न केले मला मारायचे, पण आता नाही.

प्रिया मरत होती. श्वासा-श्वासासाठी झगडत होती. आणि त्याक्षणी पाहत होती.... रेहानच्या डोळ्यातला शुध्द वेडेपणा... पागल....

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही डोळे मिटून पडून होती. किती सुन्दर वाटत होती ती! तिचे केस अस्ताव्यस्त पसरले होते. त्याने ते हाताने नीट केले. तिच्या मानेवरती त्याच्या रानटी प्रेमाची खूण उठली होती. त्याने हलकेच तिच्या मानेवरून हात फ़िरवला.
"क्या इरादा है?" तिने त्याला विचारलं. डोळे उघडण्याची तसदी न घेता.
"तुम्हे हमेशा के लिये यही रोकने का" त्याने उत्तर दिलं.
प्रियाने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं.
"एक विचारू तुला?" ती म्हणाली. तो काहीच बोलला नाही. विषय कुठे चाललाय याची अर्थातच त्याला पूर्ण कल्पना होती. "डॅडी को फ़ोन किया था?" त्याने विचारलं, त्याला विषय टाळायचा होता.
"परवा त्याचाच आला होता. जाम खुश होता तो." ती बोलली.
"साला शादी के बाद बदलही गया है, मुझे फ़ोन नही किया और तुम्हे करता है."
"तो तुम क्यु गुस्सा हो रहे हो? मुझे तो डॅडी फ़ोन करेगा ही ना?" तिने त्याला मुद्दाम अजून चिडवलं.
"दोस्त तेरा है या मेरा, आने दे उसे हनिमून से वापस, फ़िर देख लुंगा," रेहान म्हणाला.
"क्या करोगे?"
"त्याचा गळा धरून विचारेन. तुला पोरगी पटवताना माझी मदत लागते. आणि शादी के बाद प्रियाला फ़ोन करतो?" तो म्हणाला.
ती हसली, मनापासून. "रे, डॅडीला मी तुझ्या सोबत असल्यावर त्याच्या जीवाला काय घोर लागतो ते तुला कसं कळणार. म्हणून फ़ोन कर्रून विचारतो मी जिवंत आहे की नाही म्हणून, नाही तर तू एखाद्या दिवशी....."
"प्रिया. प्लीज, i dont want to talk about it " रेहान खिडकीतून बाहेर बघायला लागला.
त्या आठवणी सुध्दा नकोशा वाटतात... आपण असं वागलो होतो, ही जाणीवच त्याला अस्वस्थ करायची.
प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "रेहान, मुझे जाना है"
तो अजून खिअडकीबाहेरच पाहत होता "मै नही जाने दूंगा"
प्रियाला काय बोलायचं ते सुचेना. "डेडी को फ़ोन करे?" तिने विचारलं.
"कोई फ़ायदा नही, त्याने फ़ोन switch off केला असेल." रेहान म्हणाला. "आदत है सालेको. जब जरूरत हो तो नही मिलेगा"
"मी असं नाही म्हणणार. साला जब जरूरत थी तब वही तो आया था, नाही तर त्या भिंतीवर जिथे माझं पेंटीग आहे ना तिथी माझाच हार घातलेला फ़ोटो असता"
"आणि मी असतो एखाद्या मेटल हॉस्पिटलमधे"
प्रियाने रेहानकडे रागाने पाहिलं, आणि ती हसली. तो पण. त्या दोघाच्या हसण्याचा आवाज अख्ख्या घरात भरून राहिला.

===============================================
"रेहान छोड उसे... क्या कर रहा है.. तुझे मेरी कसम. छोड उसे..." असिफ़ ओरडला.

असिफ़ रेहानला शोधत होता. तो वर्गात नाही म्हटल्यावर त्याला जास्त काळजी वाटत होती. तेवढ्यात त्याला प्रियाच्या ओरडण्याचा आवाज आला. तो धावत कट्ट्याकडे आला. एकतर दुपारी बाराची वेळ. त्यात कॉलेजच्या पार दुसर्‍या टोकाला कुणीच नसायचं.

त्याने येऊन रेहानचा हात धरला. अंगातली सगळी शक्ती पणाला लावून रेहानला ओढलं. पण रेहानच्या डोक्यात वेड संचारलं होतं. जवळ जवळ पाच मिनिटाच्या झटापटीनंतर त्याने रेहानला पाठी खेचलं. असिफ़ने रेहानला जोरात थप्पड मारली.

"मार डालेगा क्या तू उसे?" असिफ़ ओरडला. प्रिया हमसून हमसून रडत होती. त्यातच खोकल्याची उबळ आली. असिफ़ने तिला खाली बसवलं. तिच्या बॅगमधून पाण्याची बाटली काढली. पण तिने घेतली नाही. तिचा चेहरा घामाने डबडबला होता.

रेहान कट्ट्यावर बसला होता. शून्यात नजर लावून. एव्हाना आपण काहीतरी भयानक करतोय याची जाणीव त्याला झाली होती. असिफ़चं त्याच्याकडे लक्ष गेलं.
"मार देता क्या उसे? क्या कर रहा था तु?" असिफ़ ओरडला.
रेहान काहीच बोलला नाही.
"अबे, साले, तेरेको ना पागलखाने मे ही रखना चाहिये था. रहम किया तुझपे उन लोगो ने. मा मर रही है उसकी तुझे खबर नही. कब तक बुढे दादा पे बोझ बनेगा. तू खुद क्यु नही मर जाता. सबको चैन मिलेगा.." असिफ़ बडबडत होता.

"असिफ़... " प्रियाने त्याला आवाज दिला.
त्याने तिच्याकडे पाहिलं, "प्रिया, चलो घर चलते है. घरीच सांगून टाक. त्यांना काय करायचं ते करू देत. मूर्ख. मॅड." असिफ़ म्हणाला.

"असिफ़... अब बस करो, " प्रिया म्हणाली. ती उठून रेहानच्या जवळ आली. त्याच्या बाजूला बसली. रेहानचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. तिने रेहान्चा चेहरा हातात घेतला. आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. रेहानने परत नज़र फ़िरवली.
"का केलंस असं?" ती म्हणाली.
"तू काय बोलते त्याच्याबरोबर. वो पागल है. हॉस्पिटल मे रखा था उसे चार साल. वापस तिथेच जाईल आता." असिफ़ म्हणाला.

"रेहान Look at me and say why you did this? " प्रियाने परत विचारलं.

रेहानने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं.
"तुम मुझे मारना चाहती हो..." तो कसंबसं म्हणाला.

"हा, और कोई काम नही है ना सबको, तुम्हे मारने के अलावा.. चलो प्रिया.. वरना पता नही ये पागल क्या कर देगा." असिफ़ अजून चिडलेलाच होता. आणि मनातून घाबरलेला पण. रेहान तर्‍हेवाईकपणे वागेल हे त्याला माहीत होतं, पण तो एवढा हिंसक होईल हे मात्र वाटलं नव्हतं.

"असिफ़, प्लीज. रेहान सांग मला. तुम्हे क्यु लगता है के मे तुम्हे मारने वाली हु..." प्रियाने परत विचारलं.

रेहानने असिफ़कडे एकदा पाहिलं आणि म्हणाला, " I am sorry. "

आता मात्र असिफ़चा संयम सुटला. "प्रिया. घर चलो." तो निर्धाराने म्हणाला.

रेहानला काय बोलायचं ते सुचेना. प्रिया म्हणाली, "रेहान, मे तुम्हे नही मारना चाहती. जानते हो क्यु? क्योकी मे तुम्हारी दोस्त हु.. और दोस्त कभी धोका नही देते. "

"तुम मेरी दोस्त हो?" रेहानने अविश्वासाने विचारलं.

"और नही तो क्या..." प्रिया म्हणाली. असिफ़ला काय बोलायचं ते कळेना. "अरे, मे तो भूल ही गया था. प्रियाजी आप भी तो रेहान की category मे आती है ना. तुमको कभी पागलखाने मे नही रखा... लेकीन चलने दो.. आपके दोस्ती के किस्से चलने दो. जब खतम हो जाये तो मुझे बुलाना कफ़न दफ़न का बन्दोबस्त करने"...

"असिफ़.. कितना बोलते हो तुम? बाबा, आज तू होतास म्हणून मी वाचले. Thanks " प्रिया म्हणाली.

असिफ़ पुढे आला. त्याने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. Mention Not " तो म्हणाला. "चलो, मे तुम्हे घर छोडता हु.."

"असिफ़, यार will you ever forgive me? " रेहान म्हणाला.
" no, never... " असिफ़ म्हणाला...
प्रियाने त्या दोघाकडे पाहिलं. आणि ती उठली. "असिफ़, मेरी एक बात मानेगा?" ती म्हणाली.
"बोलिये"
"तू आज के बाद ये बात किसीसे नही कहेगा..."
"कौन सी बात.." असिफ़ चमकला..
"यही जो अभी हुई. never mention it "
रेहान आता बर्‍यापैकी सावरला होता.

"प्रिया, what are you talkng? " तो स्वत्:च आश्चर्यचकित झाला.

पण अजून प्रिया काय चीज आहे ते कुठे त्याला कळलं होतं. ती असिफ़जवळ गेली. "असिफ़, मैने उस आदमी को कभी नही देखा जिसने मुझे पैदा किया... लेकीन आज उसे देख रही हू जिसने मुझे जिंदगी दी है.. तुला या नात्याची कसम.. कधीच कुणाला सांगू नकोस. जे काही घडलं त्यात रेअहानची चूक नाही. मला त्याच्याबद्दल सगळं माहित आहे. असिफ़ तो आजारी आहे. त्याला मदतीचि गरज आहे. आणि आज जर आपण असं वागलो तर तो पुन्हा आयुष्यात कधीही कुणावरही विश्वास ठेवणार नाही." असिफ़जवळ बोलायला शब्दच नव्हते.
तिने रेहानकडे पाहिलं.
"रेहान, promise me , तू पुन्हा असं वागणार नाहीस..."
रेहानने त्या दोघाकडे पाहिलं. तो कदाचित खरंच वेडा असेल. पण याक्षणी तो खूप भाग्यावान होता. कारन इथे आज त्याला दोन दोस्त मिळाले होते... जे आयुष्यात त्याला प्रत्येक वळणावर साथ देणार होते.

===============================================

रेहान, प्रिया आणि असिफ़... कॉलेजातल्या सगळ्या प्रोफ़ेसराच्या रागाचं एकमेव कारण बनत चालले. क्लासमधे कधीच नसायचे. आणि जर कधी असलेच तर नुसती मस्ती करायचे. प्रियाला हसता येतं, हे बहुतकाना पहिल्यादा समजलं. असिफ़ म्हणजे कॉलेजचा मजनू होता.. किती मुली फ़िरवायचा ते त्यालाच आठवायचं नाही.. पण रेहान...

रेहान इतके दिवस जितका शांत होता तितकाच आता बोलत होता. अख्खं कॉलेज नुसतं बघत असायचं. आणि प्रिया चक्क मुलाच्या केंटीनमधे बसून रेहानला मराठी शिकवायची. आजूबाजूचे नुसते बघत बसायचे.

त्या दिवशी देशपांडेचा क्लास होता. जायचं की नाही यावर चर्चा झाली आणि नाणे फ़ेक करून हे त्रिकूट वर्गात आलं. अर्थात उशिरा...

"या युवराज... बर्‍याच दिवसानी उगवलात..." स्वागताचा गजर झाला..

प्रिया पाठच्या बेंचकडे चालली होती.."काय कुलकर्णीबाई... आज तुम्ही पण का...? चला वर्ग तरी भरल्यासारखा वाटेल आज.."

असिफ़ नेहमीसारखा सगळ्यात आधी जाऊन बसला सुद्धा.. त्याचं हे एक मजेदार होतं.. तो कधीच कुठच्या भानगडीत सापडायचा नाही.

रेहान पाठी जाऊन बसला. सरांनी कुठचंतरी गणित सोडवायला दिलं. तो वहीत लिहत होता.. एवढ्यात सर त्याच्या बेंचपाशी आले.

तरी त्याने लक्ष दिलं नाही.. "जमलं का?" सरानी विचारलं...
"नाही.. घरचे बघतायत अजून.. जमलं की सांगतोच तुम्हाला"

अख्ख्या वर्गात जो हशा पिकला की विचारायची सोय नाही.

लेक्चर संपल्यावर प्रिया आणि असिफ़ बाहेर आले.
"रेहान, साले मान गये तुझे.. क्या जवाब दिया तुने उसे.. " असिफ़ म्हणाला. "चल इस बात पे celebration करते है.. तू पिया को घर छोड के आ.. i will see you at the same spot "

"मै क्यु घर जाऊ? मै भी आऊगी.." प्रिया म्हणाली..
"प्रिया, मै मनोरमा जा रहा हू.. इसलिये" रेहान उत्तरला.

"तिथे काय बोर्ड लिहिलाय priya is not allowed मी येणार,,,"

"बीअर घेणार?" असिफ़ने विचारलं,

प्रियाने रेहानकडे पाहिलं, तो गालातल्या गालात हसत होता.
" yes.. " प्रिया म्हणाली...

" Thats like my friend " रेहान म्हणाला....

===================================================

दिवस कसे पाखरासारखे उडत होते. रेहान आता बर्‍यापैकी शांत झाला होता.

एके दिवशी तो आणि प्रिया कॉलेजजवळच्या टेकडीवर बसले होते. असिफ़ आज आला नव्हता.
रेहान प्रियाला हॉस्टेलच्या आठवणी सांगत होता.

" You know what, मला हॉस्टेल कधीच आवडलं नाही, पण त्याच्यापेक्षा ते हॉस्पिटल जाम वैतागवाणं होतं"
"Hospital? "
"वही जगह जहा मैने चार साल बिताये.."
"तुला काही आठवतं का रेहान त्यावेळचं?"
"म्हणजे काय? i was there for schizophrenia, not for memory loss... "

प्रिया काहीच बोलली नाही. इतक्या दिवसात पहिल्यादा त्याने त्याच्याबद्दल सांगितलं होतं.

"प्रिया, चुप क्यु हो गयी,, say something "
तिने त्याच्याकडं पाहिलं. सुर्याची तिरपी किरणं त्याच्या गालावर पडली होती. त्याचे भुरे केस अजूनच सोनेरी वाटत होते. आज त्याच्या डोळ्यात एक चमक होती. एक विश्वास होता.

"रेहान, क्या हुआ था तुम्हे?" तिने विचारलं.
"झूठ मत बोलो. तुम्हे मेरी सारी रामकहानी पता है."
"हा, पण मला ती तुझ्याकडून ऐकायची आहे.."
तो शांत बसला. काहीतरी विचार करत. तिने दूर आकाशातल्या ढगांकडे पाहिलं, ते पण सोनेरी दिसत होते.

रेहानने सिगरेट काढली. दोन चार मिनिटे अशीच शांततेत गेली.
"प्रिया, My father is responsible for this " रेहान म्हणाला.
तिने वळून त्याच्याकडं पाहिलं. तो पण त्याच ढगाकडे बघत होता.
" I was born after five daughters, can you imagine?" तो पुढे म्हणाला. "माझा जन्म ही माझ्या अम्मीसाठी सगळ्यात मोठी test ठरली. घरातला खूप लाडला होतो. अब्बाचा पण. दिदीनी तर मला अम्मीपेक्षा जास्त सांभाळलं. माझी अम्मी तर मी जन्मल्यापासून आजारीच होती. "

मी sixth मधे होतो. अब्बानी ठरवलं, मला डेहराडूनला पाठवयचं. घरातले सगळे नको म्हणाले, पण अब्बानी कुणाचंच ऐकलं नाही.हॉस्टेल माझ्यासाठी शिक्षा होती, कारण मी खूप मस्ती करायचो आणि पनिशमेंटही खूप घ्यायचो. But somehow i adjusted there, मी tenth नंतर घरी परत आलो. समरमधे एक महिना यायचो पण तेव्हा सगळे दिवस गडबडीतच जायचे My result was good, so there was no problem in my 11th admission."

"किती टक्के पडले तुला?"

"खरं सांगू? ७८%. आता कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून मी ४५% सांगतो. प्रिया, I wanted to be a fashion designer, family tradition i guess. " पण तसं कधीच झालं नाही. अम्मीला paralysis होऊन सहा महिने झाले होते. तीकायमची अंथरूणाला खिळली. पण मग माझ्या अब्बानी तिला सगळ्यात मोठी सजा दिली. मला आल्या दिवसापासून माहित होतं, की अब्बा बाहेर कुठेतरी.... but he married that bitch and brought her home.. माझ्या अम्मीच्या घरात...."

त्याने हातातली सिगरेट दूर भिरकावली.
"मग काय झालं?" प्रियाने विचारलं.

" Have you ever been to boys hostel? " त्यानं अचानक विचारलं. तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून त्याला मजा वाटली.

" I know, but just wondering. तुला माहितिये what we used to discuss most प्रेम, love, and more than anything else you know it... ... मी सोळा वर्षाचा होतो. सगळं समजत होतं मला. ती बाई फ़क्त अब्बाची चादर होती. पण तिने माझ्या अम्मीची जागा घेतली. she was 25 years old माझ्या बडी दिदीपेक्षा एका वर्षाने लहान. Everyone expected me to adjust with her, i could not. तिची जागा या घरात कधीच नव्हती. माझ्या अब्बांनी माझ्या अम्मीचा नुसता छळ केला. फिजिकल, मेंटल टॉर्चर...."

"रेहान, शांत हो." प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. संतापाने तो थरथरत होता.

"प्रिया, मी कसा शांत राहू... डोळ्यांसमोर सर्व घडत होतं. अब्बांनी बाहेर काही केलं अस्तं तरी परवा नव्हती. पण लग्न करून घरी आणणं.. ईट वॉज टू मच फॉर मी.... मी जास्तीत जास्त घराबहेर राहायला सुरूवात केली. हातात पैसा होता. त्यामुळे सगळया गोष्टी मिळत गेल्या. कशाचीच किंमत वाटेनाशी झाली. दिदी अम्मी दादी सगळ्याना माझी काळजी होती. मला कुणाचीच नव्हती. पण बात एवढी वाढलीच नसती जितकी वाढली. जर त्या दिवशी मी घरी थांबलो नसतो"

"म्हणजे?"

"बकरी ईद जवळ आली होती. मी कॉलेजवरून घरी आलो, तर सगळे shopping ला गेलेले. अम्मी झोपली होती. साजिदा तिच्या रूम मधे टीवी बघत बसली होती. तिला मी कधीच नातं दिलं नाही. कायम मुद्दाम नावाने हाक मारायचो.. मी आल्याचं पाहून ती बाहेर आली. घर मे नौकर थे, पर इसको दिखाना था कि उसे मेरी कितनी फ़िकर है. मेरी खातिरदारी मेरेही घर मे कर रही थी.. हरामजादी. मला तिचा नौटंकीपणा कधीच पसंद नाही पडला. The way she used to look at me.... i could sense the invitation, I decided to go out of home. I was in my room, she came......
i will not give you the details,, but we..... .."

"छी! रेहान" प्रिया उद्गारली...
"छी क्या उसमे. उसको शरम नही थी.. लेकीन उसके बाद बात मेरे हाथ से फ़िसलती गयी. सबको ये पता था की आय हेट हर. पण हे नंतर सगळं दुहेरी चालू झालं पर ये सब कुछ मुझसे बर्दाश्त नही हुआ...मला असलं नातं कधीच नको हवं होतं. मी घर सोडून पळून जायच्न ठरवलं पर तभी मुझे फ़ूड पॉईजन हुआ. कशामुळे माहित नाही तेव्हाच मला समजून गेलं... पण आता मला कळलं होतं की ती मला मारणार आहे. सगळीकडे तीच दिसायची. मी घर सोडून मित्राच्या रूमवर गेलो. तर ही तिथे पण पोचली. प्रिया, मी दिवसभर लपून बसायचो. Now i know those were my hallucinations, but even today they seem so real to me. मी स्वत्:च्याच जगात खेचला जात होतो. अख्खा दिवस शराब, सिगरेट आणि माझी भिती. हळू हळू घरच्याना समजलं, पण कोणीच accept करायला तयार नव्हतं की मला त्रास होतोय. त्यातच साजिदाने मी तिच्यावर रेप करायचा ट्राय केला असं सांगितलं. i was going thru hell. When treatment started, i requested my doctor to shift me in the hospital. I was cured one year ago. but i wanted to stay there whole life. ती जागा सेफ़ होती. पण दादाजी मला इथे घेऊन आले. and rest you know..."

प्रियाने त्याच्याकडं पाहिलं, किती सहजपणे त्याने हे सगळं सांगितलं. पण हे इतकं सोपं नसतं हेही तिला ठाऊक होतं. कदाचित चार वर्षापूर्वी रेहान ज्या उंबरठ्यावर उभा होता; तिथेच ती आज उभी होती. तिचा भूतकाळ तिला असंच आयुष्यभर छ्ळत राहणार होता का?

"काय बघतेस?" त्याने विचारलं.

तिच्या डोळ्यासमोर त्याचं एकटेपण तरळून गेलं. वर आकाशात ते सोनेरी ढग आपापसात मिसळत होते. ती रेहानकडे पाहत होती. तो तिच्या डोळ्यात शोधत होता... स्वत्:ला.......
==================================================

"रे, असं नको ना बघूस.." प्रिया म्हणाली...
"का?"त्याने नजर न हटवता विचारलं.
"तुला कुणी सांगितलय की तू नालायक आहेस म्हणून..."
"अब्बा कायम म्हणतात.. कधी कधी i think माझं नाव रेहान नाही.. नालायक आहे.." तो म्हणाला...

प्रिया खिडकीच्या जवळ उभी होती. या घरातली तिची सगळ्यात आवडती जागा. तो तिच्या जवळ आला. तिच्या केसाची एक बट त्याने हलकेच तिच्या गालावर आली होती. त्याने ती पाठी केली.

तिने वळून त्याच्याकडे पाहिलं.
"रे, मला निघायला हवं."
तो काहीच बोलला नाही.
"मी पुढच्या संडेला नक्की येईन.. नाहीतर आपण जायचं का बाहेर कुठे?"
"प्रिया, तुम मत आना.." रेहान निर्धाराने म्हणाला.
कारण तिलाही ठाउक होतं. पण त्याने कितीही येऊ नको म्हणून सांगितलं असतं तरी ती आलीच असती... नसती आली तर तो तिच्याकडे आला असता.....
तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला.
"मेसेज है.." तो म्हणाला...
त्याने मोबाईलवर पाहिलं.. आणि मोबाईल बेडवर टाकला....

"नाझिया.. है ना?" तिने विचारलं.
================================================

अकरावीची final exam झाली. आणि रेहान दिल्लीला गेला. त्याला तिथल्या एक fashion institute मधे प्रवेश मिळाला होता.
तसा त्याला तो मुंबईतही मिळाल असता, पण त्यानेच घराबाहेर राहणं पसंत केलं होतं.

दादाजी आणि दादी खूप खुश होते. असिफ़ मात्र खूप काळजीत होता. "रेहान ठीक राहशील ना..." तो सारखा विचारत होता.

प्रियाला मात्रा आता चिंता नव्हती. गेल्या सहा महिन्यात तो खूपच बदलला होता. आणि आता तो नीट वागेल याची तिला खात्री होती.

जसाजस जायचा दिवस येत गेला तसा रेहान गुमसुम झाला. त्याला प्रियाला बरंच काही विचारायचं होतं. सांगाय्चं होतं, बोलायचं होतं. अजून कितीतरी प्रश्नाची उत्तरं अधूरी वाटल्यासारखी होती. त्याची ही अस्वस्थता असिफ़ने हेरली.
"रेहान, जादा सोच मत." तो म्हणाला.
पण तसं करणं शक्यही नव्हतं. काहीतरी पाठी राहून गेलय याची जाणीव त्याला सतत होत होती.

रेहान्चीइ अपेक्षा होती की तिने त्याला थांबवावं.. त्याला वाटत होतं, की ती त्याच्या प्रेमात पडलीये. पण प्रिया मात्र तसं काही दाखवत नव्हती..
प्रिया हे पहिल्या दिवशी त्याच्यासाठी जेवढं गूढ होतं.. तितकंच आजही होतं.

रेहानची सगळी पकींग प्रियानेच केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिची गडबड चालू होती.

"रेहान, अजून काही घालायचं राहिलय का बघ.. नाहितर पुढच्या आठवड्यात दादी येतील.. त्याच्यासोबत पाठवून देते.."

"प्रिया, I want to talk to you" रेहान म्हणाला.
"लवकर बाबा उशीर होतोय तुला" प्रिया म्हणाली.
"प्रिया, मला नाही माहित आपण पुन्हा परत केव्हा मिळणार?"\
"मिळणार नाहि भेटणार.."
" oh forget that.. you still remain my friend.. yes or no.? "
"रेहान, एक सांगू तुला? आपण परत भेटू की नाही हा प्रश्न तुला पडातोय.. मला नाही.. कारण काही झालं तरी मी तुला भेटणार आहे.. Thats my friendship "
" friendship or love? त्याने विचारलं.
ती चमकली. " What do you mean by this?"
" you love me?"
"no"
ती रूमच्या बाहेर निघाली. त्याने तिला अडवलं. "मला माहित आहे की you love me "
"रेहान, हाथ छोडो माझं तुझ्यावर प्रेम नाही..."
"तो फिर क्यु तुम मुझसे..... "
"बात करती हू. तुम्हारी हर बात मानती हू. का मी तुला एवढं समजून घेते? का मी तुझे सगळे नखरे सहन करते? हेच विचारायचं आहे ना?" तो काहीच बोलला नाही.

" I am glad that you asked me at least today. रेहान, मी promise केलं होतं की तुझी मी काळजी घेईन. It was not personal. I was getting paid for it. गिनके पैसे लिये है मैने तुम्हारे दोस्त बनने के.. अजून काही माहिती हवी असेल तर विचार तुझ्या अब्बाला. त्यानेच तर विकत घेतलय मला..."

काय बोलायचं हे त्याला सुचेना..
त्याने प्रियाचा हात सोडला. ती तिथच उभी होती. त्याला वाटलं की त्याच्या डोक्याच्या ठिकर्‍या होतील. प्रियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हलकेच आपले ओठ त्याच्या कानाजवळ नेले. ती हलकेच काहितरी पुटपुटली. आधी अर्धा सेकंद ती काय म्हणाली हे त्याला कळलंच नाही. ती परत म्हणाली...."एप्रिल फ़ूल" आणि रूमचा बाहेर पळाली....

आता त्याला उलगडा झाला. त्याला स्वत्:लाच हसू आलं. त्याचा प्रश्न तिने अप्रिल फ़ूल म्हणून घेतला. आणि इत अकंच नाहीतर उलटं त्यालाअच फ़सवं.

प्रिया हे इतक्यात सुटणारं कोडं नव्हतंच मुळी.... पण कुणालाहि न लक्षात येणारी एक गोष्ट त्याला समजली होती.
तू आता पूर्णपणे बरा झाला होता. यामधे तसं बघायला गेलं तर प्रियाचं योगदान काहीच नव्हतं. पण रेहानला वाटलं की तो बरा झालाय ते प्रियासाठी.

तो निघताना तिच्या डोळ्यात हलकंच पाणी आलं.
"प्रिया, मुझे फ़ोन करना.." एवढंच तो म्हणाला.. आणि निघाला.

गावाबाहेर गेल्यानंतर त्याला वाटलं अशीच गाडी परत घ्यावी आणि तिला घेऊन यावं.. ती आली असती त्याच्याबरोबर? कुणास ठाऊक?

रेहानच्या डोळ्यासमोर प्रिया दिसायला लागली. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण ओझरायला लागला. तिचं त्याला समजावणं, तिचं हसणं.. "बाबा" म्हणणं, पहिल्याना बीअर घेताना केलेला कडवट चेहरा. त्याच्या हातातली सिगरेट फ़ेकून देणारि ती... प्रिया.. त्याने गाडी थांबवली.. ती आपल्या प्रेमात पडलीये... wrong Rehaan.. You are in love

इतके दिवस आपण एकत्र होतो.. तेव्हा का नाही तिला सांगितलं हा प्रश्न त्याचा त्याला पडला. कदाचित तू रागावून निघून गेली असती.. कदाचित ती हो म्हणाली असती... कदाचित..

मात्र आता आयुष्याचे मार्ग बदलले होते. नव्हे,, त्यानेच बदलले होते. काय गरज होती त्याला इतक्या दूर जाण्याची?

त्याने गाडी सुरू केली आणि भरधाव सोडली.. मुंबईकडे... पण तो लवकरच परत येणार होता. तिला भेटायला. पण यावेळेला तो काही बिगडा शहजादा बनून येणार नव्हता.. काहितरी बनून येणार होता.

मुंबईवरुन तो लगेच दिल्लिला गेला. तिथलं कॉलेज सुरू झालं.
मधे फ़क्त एकदाच प्रियाचं मेल आलं होतं... बरा अहेस ना म्हणून.. त्याने ही तिला reply केला.. पण त्यानंतर तिचं मेल आलंच नाही..
बारावीच्या अभ्यासात असेल.. तिला यावेळेला चांगले marks मिळवायचे होते... का.. ते त्यालाही ठाऊक नव्हतं.
कधी कधी त्याला आश्चर्य वाटायचं.. तिच्याबद्दल आपल्याला जास्त काहीच माहित नाही.. एकदा फ़क्त तो तिच्या आईला भेटला होता. बाबाना एकदाही नाही...

हळू हळू इथल्या कॉलेजात तो रमत गेला आणि मागच्या सर्व आठवणी पुसट होत गेल्या. फ़क्त प्रिया सोडून.. तसं काही तो मुद्दाम तिची आठवण काढायचा नाही... उलट तीच यायची रोज रात्री.......
त्याच्या स्वप्नात

==================================================

मीटिंग संपली आणि ती तिच्या डेस्कवर आली. मोबाईल उचलून पाहिलं तर एकाच नंबरावरून तीन मिसकॉल होते. नंबर अर्थातच ओळखीचा होता.

खरंतर सध्या फ़ोन करणं गरजेचं होतं.. पण त्याहूनही तिच्यासाठी गरजेचं होतं दोन क्षण निवांतपणाचे. पण ते कधीच मिळणार नव्हते.

ती washroom मधे गेली. तोंडावर पाण्याचा हबकारा मारला... जरातरी fresh वाटलं. तिने आरशात आपल्याच प्रतिबिंबाकडे पाहिलं.

बघता बघता पाच वर्षे कशी गेली ते कळलंच नाही... कसं कळलं नाही.. हा प्रत्येक दिवस कसा गेला हे तिच्याशिवाय दुसर्‍या कुणालाच समजलं नसेल.

इथे उगवणारा प्रत्येक दिवस हे एक युध्द असतं. माणसाच्या या जंगलात ती हरवून गेली होती. अख्खा दिवस इथल्या शार्कपासून वाचवण्यात जायचा आणि रात्र जायची ती दुसर्‍या दिवसाची रणनीती आखण्यात..

सगळ्या नकोशा आठवणी पुसायचा खूप प्रयत्न चालू होता. पण जर सगळ्याच आठवणी पुसल्या तर शिल्लक काय राहणार होतं.
इतकी मोठी परिक्षा आपल्याला द्यायला लागेल असा विचार तरी कधी केला होता का आपण... the battle has begun just now..
बाहेर आली तोवर तिच्या नावाची बोंबाबोंब झाली होती..
लगेच कामाला लागायला हवं.
आता फ़ोन करणं शक्य नव्हतं. रात्री बघू.. तिने मनाशी विचार केला. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला... तिने पटकन उचलला.. कोण होतं हे तिला चांगलंच माहित होतं.
"काय झालं?" तिने विचारलं.
"तो मुंबईला येतोय.... पुढच्या महिन्यात.... कायमचा"
तिला काय बोलायचं ते सुचेना. एकीकडे तो परत येत होता. आणि दुसरीकडे भिती पण होती. समजा आपण भेटलो तर...
तिने फ़ोन कट केला.
तिच्या लढ्याचा हा दुसरा भाग होता. तिला लढण्यासाठी तयार होणं गरजेचं होतं..
पहिलापेक्षाही जोमाने कारण आता ही कसोटी फ़क्त तिची होती..
===============================================

आकाशात उडालेलं विमान जमिनीवर आलें आणि रेहानच्या मनाने परत भरारी घेतली. चार वर्षानी तो परत येत होता. स्वत्:लाच दिलेलं वचन पूर्ण करून.

एअर पोर्टवर त्याला भेटायला त्याच्या बहिणी आल्या होत्या.. पण त्याची नजर दुसर्याच कुणाला शोधत होती.
त्याच्या बहिणी दुसर्‍या गाडीत बसल्या आणि तो त्याच्या आवडत्या ikon मधे.
तो गाडीत बसला. आणि ड्रायव्हरकडे बघताच उडाला.
"असिफ़.."
" welcome back " असिफ़ म्हणाला.
"ये भी कोई मजाक का तरीका है... मुझे पता था तू जरूर आयेगा" रेहानने त्याच्या पाठीत धपाटा घातला.
"रेहान, मुझे पता था के तू मुझे ढुढेगा तो सोचा क्यु ना तुझे और थोडी तडपाऊ...." असिफ़ म्हणाला.
गाडिने एअरपोर्ट सोडलं आणि त्याच्या गप्पाना ऊत आला.
असिफ़ त्याला इथल्या सगळ्या बातम्या देत होता. रेहानच्याच कंपनीत तो कामाला लागला होता. नक्की तो काय काम करतो हे त्यालाही ठाऊक नव्हतं. पण रेहानच्या घरासाठी मात्र तो एक मोठा आधार बनला होता.
शेवटी रेहानने विचारलं..
"असिफ़... प्रिया की कोई खबर?"
"कौन प्रिया?"
" shut up यार. प्रिया अपनी कॉलेजवाली दोस्त.."
"वो जो अपने को ११ th मे मिली थी... सॉरी. उसकी कोई खबर नही. पागल थी वो. गाववाले कहते है के वो घर छोडके भाग गयी. क्यु किसीको नही पता.."
रेहान खिडकीतून बाहेर बघायला लागला. आतापर्यत त्याने जेव्हा जेव्हा असिफ़ला हा प्रश्न विचारला तेव्हा तेव्हा त्याला हेच उत्तर मिळालं होतं.
"रेहान, मेरी बात मान.. जादा सोच मत.. अब तक तो उसकी शादी भी हो गयी होगी." असिफ़ म्हणाला.
" I dont think so.." रेहान अजूनही बाहेरच बघत होता. "असिफ़.. मुझे यकीन है.. एक ना एक दिन वो मुझे जरूर मिलेगी.."
"हा, क्यु नही.. तब तक वो चार बच्चोकी अम्मा बन गयी होगी..."
"मोटी भी हो गयी होगी ना,..."
ते दोघं घरी पोचले तोपर्यंत प्रिया आता कशी असेल हाच विषय चालू होता.
तो घरी आला होता तेव्हा सगळ्याच्या चेहर्‍यावर पसरलेली काळजी स्पष्ट दिसत होती. आणि ही काळजी अब्बच्या तब्बेतीची नव्हती. रेहानच्या परत येण्याची होती.

तो अब्बाच्या रूममधे गेला. अब्बा झोपले होते. त्याच्या उशाशी तो शांतपणे बसून राहिला. त्याचे चाचा, दादा दादी अम्मी सगळे बघत राहिले. हाच रेहान अब्बाच्या सावलीशी सुद्धा नफ़रत करत होता. आज मात्र तो त्या द्वेषाच्या पलीकडे जाऊन पोचला होता. कुठेतरी मनातून त्याने अब्बाला माफ़ केलं होतं. त्याने हलकेच त्याच्या कपाळावरून हात फ़िरवला.

घरी उत्साहाला नुसतं उधाण आलं. रेहानची सगळ्याशी चेष्टा मस्करी सुरू होती. त्याच्या येण्यानं घरात एक चैतन्य पसरलं होतं. जेवायच्या वेळेला अब्बा उठून आले. हसता खेळता रेहान पाहून त्याना आज खूप बरं वाटत होतं. एका मोठ्या जबाबदारीतून ते मोकळे झाले होते.

साजिदा शॉपिंगला गेली होती.. रेहान येणार हे माहित असूनही. मुद्दामून. ती जेव्हा परत आली तेव्हा सगळे शांत बसले. रेहानकडेतर कुणी बघण्याचं सुद्धा धाडस केलं नाही. ती दरवाज्यात उभी होती. तिच्या कडेवर तिची छोटी निदा होती. तीन वर्षाची. साजिदा मनातून खूप घाबरली होती. त्याला शक्य तितकं टाळायचा तिचा प्रयत्न होता. त्याने ती आलेलं पाहिलं.
"आईये.. पहचाना हमे.." रेहान म्हणाला.
आणि त्याने निदाला उचलून घेतलं.
पलीकडच्या रूममधून अब्बा पाहत होते. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. असिफ़ बाल्कनीत बसून हे सारं पाहत होता. त्याने मोबाईलचा एक नंबर फ़िरवला....

===================================================

त्या दिवशी झोपायला जवळ जवळ दोन वाजले. त्याच्या रूमवर आल्यावर त्याने सगळ्यात आधी पेंटिंग़ लावलं. कदाचित ते इथून आता हलणार नव्हतं. रेहानने दिल्लीचा बेसिक डिप्लोमा पूर्ण केला आणि लगेच लंडनला Fasion Merchandising ला admission घेतली. आयुष्याची चार वर्ष फ़ुकट गेली होती त्यात अजून त्याला भर टाकायची नव्हती. कॉलेजमेधे असतानाच त्याने ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली होती. यापुढे इथेच राहून करीअर करण्याचा त्याचा विचार होता. घरचा बिझिनेस चाचानी आणि त्याच्या मुलानी सांभाळला असता.
तिथे सगळं कसं स्थिरस्थावर होत आलं होतं.

पण ठरवलेल्या गोष्टी कधी होत असतात का?
अब्बाना heart attack आला. बायपास सर्जरी वगैरे झाली. पण आता घरच्याना काळजी लागली. घरी परत ये असा लकडा सुरू झाला. तसा
तो परत आला नसत पण नेमकं रुबियाचं त्याच्या तिसर्‍या बहिणिचं लग्न ठरलं आणि रेहान परत आला.

इतक्या वर्षात काहीच बदललं नव्हतं. सगळं जसंच्या तसं होतं....

पण कुठेतरी मनाला एक रुख रुख लागून राहिली होती. काहीतरी राहुन गेलं होतं. काय ते त्यालाही आठवत नव्हतं... अचानक वीज चमकावी तसा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. पोचल्यावर फ़ोन करतो असं त्याने नाज़ला promise केलं होतं... त्याने लगेच तिला फ़ोन लावला. लाईन बिझी हिती. बिचारी.... त्याचा फ़ोन आल्याशिवाय तिला करमलं नसतं...

नाज़िया... खरंच या बायका कसं इतकं प्रेम करू शकतात त्याला आश्चय वाटायचं. त्यात नाझ म्हणजे खरोखर आश्चर्य होतं. तिला भेटून अजून सहा महिने सुद्धा झाले नव्हते. पण तिने त्याच्या आयुष्याचा पूर्ण ताबा घेतला होता.... अणि त्याने तो घेऊ दिला होता.

डोळ्यावर हळू हळू झोप यायला लागली. तरी पण पेंगुळल्या डोळ्यानी त्याने नाझचा नंबर ट्राय केला पण लागलाच नाही. त्याला कधी झोप लागली हे कळले पण नाही.

पण त्या रात्री जगाच्या दुसर्या कोपर्यात नाझिया वाट बघत होती रेहानच्या फ़ोनची. आणि रेहानच्याच शहरात प्रिया जागी होती येणार्या वादळाची चाहूल घेत
==========================================

रेहान नुसता मोबाईलकडे पाहत होता.
"कॉल करो उसे..." प्रिया म्हणाली...
"काही फ़ायदा नाही.. She will not answer... " रेहानने बेडवर बसत उत्तर दिलं.
प्रिया त्याच्या बाजुला बसली. रेहानने विमनस्कपणे बसून राहिला.
"प्रिया, उसे पता है के आज तुम यहा पे हो. मीच तिला सांगितलय."
"रे.. I can understand her.. "
" What? " रेहानने प्रियाकडं पाहिलं.. तिच्या डोळ्यात हलकंच पाणी होतं.. सकाळपासून ती अश्रूना परतावून लावत होती. रडणे हा तिचा स्वभाव नव्हता. कित्येकदा रेहानला वाटायचं की प्रियाने त्याच्या कुशीत हमसून रडवं आणि त्याने तिला शांत करावं.. तिची समजूत घालावी.. ती त्याची घालते अगदी तशीच..

त्याने तिचा एक अश्रू हलकेच बोटानी टिपला..
"रेहान... "तिचा आवाज गदगदून आला.
"प्रिया.. एक बात बोलू... Will you marry me? " त्याने तिच्याकडे बघत विचारलं..
ती हसली विषण्णपणे..
"शादी और तुमसे.. कभी नही..."
"सोच लो.. अच्छे खानदान से हू.. लाखोमे कमाता हू... जिंदगीभर खुश रखूगा तुम्हे.."
"रेहान, मजाक मत करो.. "
"मजाक नही कसम से.. हा.. सिर्फ़ एक बात से तुम्हे adjust करना पडेगा..."
प्रिया काहीच बोलली नाही.
"वो क्या है ना प्रिया..."
"रेहान, अब बस करो.. मुझे सब पता है और मेरा तुमसे शादी करने का कोई इरादा नही...."
ती उठली.. कित्येकदा रेहान अशी जीवघेणी चेष्टा करायचा.
त्याला पूर्णपणे माहित होतं की प्रिया त्याची बिवी कधीच होणार नव्हती.. पुढे गेलेला काळ परत खेचून आणता येत नसतो...
"रेहान.. भले लोकासाठी नसेल. पण माझ्यासाठी तर आपल्या दोघाचं लग्न केव्हाच झालंय.. तुझं आणि नाझियाचं लग्न व्हायच्या आधी...."

==================================================
अब्बा रेहानकडे नुसते बघत होते. त्यांच्या रूम मधे तो जमिनीवर बसला होता. पुढ्यात डिझाईन्स होती. सोबत लैपटॉपवर presentation चालू होतं. गेले दोन महिने खपून त्याने हे सगळं तयार केलं होतं. तो भरा भरा बोलत होता.. अब्बांचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं... डोळ्यासमोर दिसत होता तो रांग़णारा बोबडं बोलणारा रेहान...

"ठीक है?" त्याने विचारलं..
अब्बा भानावर आले.
"हा... रेहान .."
"अब्बा, सिर्फ़ एक प्रॉब्लेम है.."
तेवढ्यात असिफ़ आला.
"क्या चल रहा है..." त्याने रेहानच्या डीझाईन्स पाहिले. " Too good यार. रेहान तू तो साला मास्टर हो गया."
"असिफ़, इसमे से कौनसा तुम्हे पसंद है?" रेहानने त्याच्यासमोर काही डीझाईन्स धरली.
"रेहान, तु क्या पुछ रहा है मुझे ये तो wedding dresses है, एकदम मस्त.. सभी अच्छे है.. कोई एक चुनना मेरे बस की बात नही. चाचा आपको क्या लगता है?" असिफ़ने अब्बाना विचारलं.

"बेटा.. वैसे तो सभी अच्छे है. पर रेहान तुम किसी प्रॉब्लेम की बात कर रहे थे.."
"हा.. अब्बा.. डीझाईन्स से भी जरूरी है marketing. i am thinking of an entire campign for this collection
"कैसे करोगे?" असिफ़ने विचारलं.

रेहानने आसपासच्या बंडलातून तीन चार magazins ची कटींग काढले. \
"ये देख.. I want this model .. दुल्हन लगती है. जिस किसीने भी ये शूट किया है उसको पता है के वो क्या कर रहा है.. I like this camaighn. मुझे इसे copy नही करना है पर मेरे दिमाग मे जो भी है वो शायद यही लोग कर पायेंगे."

रेहान पुडएही बरंच काही बोलत होता.
असिफ़चं मात्र एकटक त्या चित्रातली मॉडेल बघत होता.
"असिफ़.. लक्ष कुठे आहे तुझं.. I m asking you something " रेहान ओरडला.

"रेहान, ये camapign का काम तू मुझे दे.. जैसे चाहिये वैसे रीझल्ट्स लाके दूंगा.. " एवढं बोलून त्याने ती सगळी कटींग्स उचलली. आणि तो निघाला सुद्ध.

"असिफ़.. यार बात तो सुन.." रेहानने पाठुन आवाज दिला. पण तो पर्यंत असिफ़ निघूनही गेला.

"अब्बा, ये लडका अजीब है ना?" रेहान म्हणाला.
पण अब्बा मात्र रेहानच्या डीझाईन्सकडे बघत होते.

======================================

प्रियाने केबिनम्धून बाहेर आली तीच मुळी वादळासारखी. तिच्या डोळ्यातून संताप धगधगत होता. वीरला तिच्याकडे पाहताच आत काय विषय झाला असेल याची कल्पना आली.
" cool down " तो म्हणाला.
"वीर.. हा माझा आणि माझ्या कामाचा अपमान आहे.. जर हेच सगळं करायचं असतं ना तर मी केव्हाच केलं असतं.." ती म्हणाली.
" He didnt mean it priya.. " वीर म्हणाला.
प्रियाने हातातली फ़ाईल टेबलावर आपटली.
"वीर, तो नालायक मला लोणावळ्याला येतेस का म्हणून विचारत होता.. तिथे काय मी राखी बांधेन ही अपेक्षा आहे का त्याची..तू त्याची बाजू घेऊ नकोस. तुम्ही सगळे पुरुष साले एकाच केटेगरीतले. कामाचे ना धामाचे. भाकरी खातात नेमाची.."
"प्रिया. शांत हो. त्याने तुला ऑफ़र दिली.. काही जबरदस्ती नाही ना केली.. We all know that he likes you.. probably he loves you.. " वीरने प्रियाला खांद्याला धरून खुर्चीवर बसवलं. तिचे विस्कटलेले केस सरळ केले.
"प्रिया. इतका राग येणं चांगलं नाही. या गोष्टी इथे चालतातच.. You have to adjust yourelf.."
प्रिया आता बर्यापैकी शांत झाली होती.
"वीर, एक वेळ अशी होती, की मला कुणीही काहीही म्हटलं तरी मी शांत असायचे.. माझ्या मेथ्सच्या टीचरने.. देशपांडे मला वर्गात कसाही बोलायचा आणि मी no reaction .. पण हल्ली तसं होत नाही.. "
वीर जाऊन कॉफ़ी घेऊन आला...
"कॉफ़ी घे. बरं वाटेल."
"थक्स..." ती म्हणाली.
तेवढ्यात केबिनमधून जतिन बाहेर आला. प्रियाचा बॉस.
"प्रिया. you have an assignment. Come to my cabin for discussion "
"येस सर.. " जतिन आत गेला. प्रियाने हातातला कॉफ़ीचा कप खाली ठेवला.
वीर अजूनही केबिनच्या दरवाज्याकडे पाहत होता.
"हा स्वत्: का बाहेर आला?" त्याने विचारलं.
"हे बघायला की मी त्याच्या ऑफ़िसची मोडतोड करतेय का.."
वीर हसला. "तुझा राग जितक्या लवकर येतो तितक्या लवकर जातो पण.. So new assighnment.. "
"...जिला मी नाही म्हणणार आहे.. " प्रिया म्हणाली. आणि केबिनमधे निघून गेली.

प्रिया केबिनमधे आली आणि शांतपणे बसली. जतिनने तिच्यासमोर एक फ़ाईल ठेवली. Interesting hai.. देख लो." तो म्हणाला.\
"मी ही असाईनमेंट करणार नाही." प्रिया फ़ाईलकडे पाहिलंसुद्धा नाही.
जतिन प्रियाकडे बघत होता. तिला जॉईन होऊन अजून पाच महिने सुध्दा झाले नव्हते. तरीही असा उद्दामपणा ती करू शकत होती.

"प्रिया, This is very unusual..different concept आहे. तूच तर म्हणाली होतीस ना की तुला वेगळं काहितरी हवय. दरवेळेला तेच दुल्हन आणि दिवाळी करून वैतागली आहेस म्हणून...." जतिन म्हणाला

"जतिन.. Thanks पण मला नाही करायचं."
आता मात्र जतिन वैतागला. का म्हणून आपण हिचं ऐकून घेतोय हेच त्याला समजेना.
"प्रिया, I am not asking you, I am ordering you... Go thru this file and understand the client requirements.. This is good for your career '
"जतिन.. मला माहित आहे की तू या कंपनीचा मालक आहेस. You dont have to remind me that.. पण मी खरं सांगतेय.. "
"या नकाराचं कारण कळेल?" जतिननं विचारलं.
"जतिन. पर्सनल आहे. दुसरं काही नाही.." प्रिया म्हणाली.
तुला सुट्टीची गरज आहे. जतिनच्या मनात विचार येऊन गेला. पण तसं म्हणाला मात्र नाही.. ही कालिकामाता केव्हा रुद्रावतार धारण करेल याचा भरवसा नाही.
सतत बारा तेरा तास दररोज ऑफ़िसमधे घालवून हिला काय मिळवायचं हा प्रश्न त्याला कित्येक वेळा पडायचा.
"जतिन, मी निघू?" प्रियाने विचारलं.
"हो... पण परत एकदा विचार कर " तो म्हणाला. प्रिया काहिच बोलली नाही. केबिनच्या दरवाजापर्यंत गेली आणि म्हणाली..
"जतिन, तू लोणावळ्याला नक्की जाऊन ये.. तुला सुट्टीची गरज आहे.."

ती केबिनबाहेर पडली जतिनला हसू आलं. तिचा सगळे नखरे सहन करून तिला नोकरीवर ठेवण्याइतका तो उल्लू नव्हता. प्रिया म्हणजे जीनीयस होती.. आतापर्यंत दिलेला प्रत्येक प्रोजेक्ट तिने successful केला होता.
अवघ्या सहा महिन्यात ती या कंपनीची ओळख बनली होती.
मिस प्रिया कुलकर्णी... Creative mind behind Mehta Advertising
ती बाहेर पडल्याबरोबर वीरने विचारलं "काय झालं?"
" nothing .. तुला ते घड्याळवाले माहितिये.. कुठचीतरी फ़्रान्सचे लोक आहेत.. त्याना त्याची घड्याळं भारतात विकायची आहेत. त्याचं केम्पेन आपण करतोय.." तिने सिगरेट पेटवत विचारलं...
"प्रिया, thats great yaar.."
"काय ग्रेट? मी करत नाही म्हणून आधीच सांगितलं ना.." ती म्हणाली.
"पण का?"
"कारण..... मी दुसर्‍या एका प्रोजेक्टची वाट बघतेय.. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि ग्रेट प्रोजेक्ट..." ती सिगरेटचा धूर सोडत म्हणाली.
"पण.. याच्यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं?" वीरने विचारलं.
"असू शकतं.. वीर... कधी कधी माझ्यासाठी माझ्याहीपेक्षा असं महत्वाचं काहीतरी असू शकतं"

======================================

प्रिया जे काही म्हणाली ते वीरला समजलं नाही. आणि हे बर्‍याचदा व्हायचं.. तिच्या वयाच्या बाकीच्या मुली जेव्हा बॉयफ़्रेन्डबरोबर डिस्कोत मजा मारायच्या, तेव्हा प्रिया कॉम्प्युटरवरती concepts बनवायची. कधीच गप्पाटपा टाईमपास नसायचा. ही मुलगी इतकं निरस आयुष्य का जगते तेच त्याला कळायचं नाही. पण तरी त्याला तिच्याबरोबर काम करायला आवडायचं.
आताही तो तिच्याकडे नुसतं बघत होता. ती मात्र नेहमीसारखी शांत होती. कुठला प्रोजेक्ट तिच्यासाठी महत्वाचा आहे तिलाच ठाऊक....
"वीर." प्रियाने त्याला आवाज दिला.
"काय?" त्याने विचारलं.
"अरे, असा हरवल्यासारखा का दिसतोयस? तुझा जतिन तुझ्या नावाने बोंब मारतोय." ती म्हणाली.
"प्रिया.. कधीतरी मुलीसारखी बोलत जा.."
" Oh Really,, Mr Veer, Mr Jatin is calling you for a meeting.." ती उपरोधिक स्वरात म्हणाली. That was terrible तो म्हणाला आणि जतिनच्या केबिनमधे गेला.
जतिन टेबलवर डोकं ठेवून बसला होता.
"जतिन.." वीरने हलके आवाज दिला. जतिनने वर पाहिलं.. एखाद्या युध्दात पराभूत झालेल्या सैनिकासारखा तो दिसत होता.
तो काहीच बोलला नाही. "जतिन.. हे काय चाललय तुझ?" वीरनं विचारलं. त्याच्या आवाजात एक काळजी होती.
"वीर, तूच सांग मला..." जतिन म्हणाला. वीर काहीच बोलला नाही. जतिनने ड्रॉवरमधून एक बॉक्स काढला. आणि वीरच्या हातात दिला. वीरने उघडून पाहिलं. आत एक हिर्‍याची चमचमती अंगठी होती..

"म्हणून मी तिला long drive ला येते का विचारलं. but she reacted like i wanted to use her.. वीर मला ती आवडते. मला लग्न करायचय तिच्याबरोबर.. ती जशी आहे तशी मला चालेल. तुला माहितिये ना मी drinks सिगरेट काहीही घेत नाही. पण तिने घेतलं तरी माझं objection नाही. मी तिला खूप खूश ठेवीन.. पण.. ती.... तिला माझी किंमत नाहिये.. i dont know why.....but she hates me.. "

वीरने हातातला बॉक्स टेबलवर ठेवला. जतिन म्हणजे खजिन्याची चावी होती. किती मुली त्याच्या पाठी लागल्या अहेत याची वीरला पूर्ण कल्पना होती.
"जतिन, मला नाही वाटत की प्रियाला तू आवडत नाहीस.... मी गेले सहा महिने बघतोय तिला. तिचं दुसरं कुठेही affair नाही. मी तिला बर्‍याचदा विचारलय. तिला तू आवडतोस.. पण फ़क्त collegue म्हणून बॉस म्हणून.." वीर म्हणाला..
"वीर, ती असं का वागते?"
"माहित नाही. जतिन.. एक सांगू.. चिडू नकोस" वीर म्हणाला.
"वीर, तू माझा मित्र आहेस, आतापर्‍यंत कधी चिडलोय का मी?"
"जतिन.. तिचा विचार सोड.." वीर म्हणाला. जतिन चमकला.
"का?" त्यानं विचारलं.
"जतिन, तुझ्या घरचे कधीतरी तयार होतील? आणि काय सांगणार आहेस तू त्याना? परवा तुझी आई आणि दिदी आले होते ऑफ़िसात.. प्रिया त्याच्यासमोर सिगरेट ओढत होती. जतिन.. प्रियासारख्या मुली लग्न करत नाहित.. आणि तुझ्या खानदानात तर बिल्कुल नाही."
"तू असं का म्हणतोयस?" जतिनचा स्वर दुखावलेला होता.
"कारण, मला तुझी काळजी आहे. तू या मुलीच्या पाठी लागून आयुष्य बरबाद करतोयस.. जतिन, तुला प्रिया आवडते हे मी समजू शकतो. कुठल्याही मुलासाठी ती परफ़ेक्ट आहे..बायको म्हणून नव्हे. तू विचार कर. ही मुलगी जर लग्न करून तुझ्या घरी आली तर तिथे adjust होऊ शकेल? आणि समजा जरी झाली तरी घरचे तिला समजावून घेतील?"

जतिन शांत बसला. वीर उठला.. त्याने जतिनच्या खांद्यावर हात ठेवला.. I hope you wil understand "

वीर जेव्हा केबिनच्या बाहेर आला तेव्हा प्रिया कॉम्पुटरवरती काम करत होती. सराईतपणे तिची बोटं की बोर्डवर खेळत होती. स्क्रीनवरची नजरदेखीइल न हलवता तिने विचारलं
"सांगितलस त्याला?"
"हो." तो म्हणाला.
" good " ती म्हणाली.
त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. इतका वेळ त्याने घेतलेला समजूतदारपणाचा बुरखा आपोआप गळून पडला "तू का करतेस असं? त्याने विचारलं.
"कारण मी त्याला खड्ड्यात पडण्यापासून वाचवतेय.." प्रिया म्हणाली.
वीरला या वादाचे पुढचे सगळे मुद्दे पाठ होते. कितीतरी वेळा त्याने प्रियाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रिया. ...

"प्रिया तू वेडी आहेस,,जतिनसारखा मुलगा तुला परत मिळणार नाही. पण प्रियाने काहीच reaction दिली नाही. ती अजूनही कामातच होती.

"तुला कसला मुलगा हवाय ते तरी मला कळू दे.. " वीर चिडून म्हणाला.

की बोर्डचा खडखडाट बंद झाला. फ़क्त एका सेकंदासाठी. आणि परत सुरू झाला. वीरने प्रियाकडे पाहिलं. इतक्या दिवसात वीरला पहिल्यादा तिच्या गालावरची खळी दिसली. कारण प्रिया हसत होती.....

=============================================

"अम्मी.. कैसी है..?" रेहानने हलकेच तिच्या कानात विचारलं. अम्मीने हसून त्याच्याकडे पाहिलं. समोर नाझिया बसली होती. डोक्यावरून दुपट्टा घेतलेली, लाजलेली. पहिल्यादा रेहानला तिला असं बघत होता. तिचे आईवडील, भाऊ आले होते. सगळं ठरत आलं होतं.. त्याचा आणि रुबियाचा निकाह एकाच दिवशी करायचा असं दादाजीनी सुचवलं होतं.
घरात सगळ्याना नाझीया आवडली होती. जरी लहानपणापासुन लंडनला राहिली तरी सगळ्या रुढी परंपरा तिला येत होत्या. अब्बा मात्र शांत होते. त्यानी काहिच प्रतिक्रिया दिली नाही.

संध्याकाळी रेहानने स्वत्:हुन विषय काढला.
"अब्बा, आप कुछ बोले नही..."
"किस बारे मे?"
"आपको नाझ कैसी लगी?"
"पसन्द तो काफ़ि अच्छी है तुम्हारी.. पर Are you sure that you want to spend your entire life with her?"

रेहान चमकला.."मतलब?"
अब्बानी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "बेटा, जो भी सोचना है अभी सोच लो. बाद मे तुम्हे पछताना ना पडे.."
"आपको नाझ पसंद नही.. है ना?"
"मैनि ऐसा तो नही कहा. बहोत अच्छी लडकी है..तुम्हे खुश रखेगी.. पर क्या तुम उसे खुश रख पाओगे?"
"आप क्या कह रहे हो..मुझे नही पता चल रहा है.."
"सीधी सी बात है बेटा, मैने जब तुम्हारी अम्मी को कबूल बोला था तब कभी नही सोचा था के उसे इतना दुख दूंगा. मै नही चाहता के मेरी गलतिया तुम दोहराओ. Marry Naaz only if you think she is your soulmate.."

रेहान बराच वेळ विचार करत होता. अब्बाना नक्की काय म्हणायचं होतं ते त्याला समजलं नाही. पण एक गोष्ट clear होती. अब्बाना हे लग्न मान्य नव्हतं.. आणि त्याचं कारण ते सांगणार नव्हते.

रेहानच्या लग्नाच्या तयारी सुरू झाली. असिफ़ मात्र हल्ली दिवस दिवस गायब असायचा. विचारलं तर "तुम्हारी ही campaign का काम कर रहा हू.. " असं म्हणायचा.

त्या दिवशी रेहान आणि असिफ़ आलेली गार्मेंटस बघत होते. तेवढ्यात असिफ़साठी landline वर फ़ोन आला. असिफ़ रूमच्या बाहेर गेला. रेहानला हे कलेक्शन आवडलं होतं.. कदाचित bridal असल्या मुळे असेल.....

असिफ़चा मोबाईल वाजला. रेहानने कुणाचा फ़ोन आहे ते पाहिलं. नाव नव्हतं. त्याने फ़ोन कट केला. दोन सेकंदानी परत वाजला. शेवटी वैतागुन रेहानने कॉल अटेंड केला.
"हेलो"
पलीकडून काहिच आवाज आला नाही.
"हेलो... कोई बात करना चाहता है?"
फ़ोन कट झाला. असिफ़ परत आल्या आल्या रेहान म्हणाला.. "असिफ़,तेरी किसी गर्लफ़्रेंड का फ़ोन था.. मेर्र आवाज पसंद नही आयी तो कट कर दिया.
असिफ़ने मोबाईलमधे नंबर पाहिला.
"रेहान, मुझे जाना है.."
"किधर?" रेहानने विचारले.
" campaign के लिये.."
"यार असिफ़, कभी हमको तो मिलाओ तुम्हारी इस टीम से.."
"जरूर रेहान. वक्त आने पर.."असिफ़ने त्याची बेग उचलली आणि तो निघाला.
रेहान परत त्याच्या कामात बिझी झाला.

=================================================

"असिफ़.. You are always late." प्रिया म्हणाली. निळी जीन्स आणि काळा शर्ट..लांबसडक केसाचा बुचडा आणि डोळ्यावर चष्मा
"अरे यार, आने तो दो पहले. वेलकम ही ऐसे करोगे तो क्या होगा?"
असिफ़ म्हणाला. त्याने आजूबाजूला पाहिलं. शूटची पूर्ण तयारी झाली होती. काळोखातली रूम एकाच कोपर्‍यात झगमगत होती.
"कौन करेगा?" त्याने विचारलं. ती केमेराची लेन्स adjust करत होती.
"मॉडेलके बारे मे पूछ रहे हो या फोटोग्राफ़र के बारे मे..." ती म्हणाली.
"प्रिया.. मुझे पता है के मॉडेल कौन है.."
"तो फ़िर क्यु पूछ रहे हो?" तिने त्याला चिडवलं.
बाजूच्या रूममधून मेक अप करून मॉडेल बाहेर आली. असिफ़ने तिच्याकडे पाहिलं. त्याला वाटलं त्याचं ह्रुदय उडी मारून बाहेर येणार.. आजच नव्हे तर जेव्हा जेव्हा तो तिला बघायचा तेव्हा हे असं व्हायचंच..
"पाखी.... गेट रेडी..." प्रियाने ऑर्डर सोडली.
असिफ़ आणि वीर एका कोपयात उभे राहुन शूट बघत होते. प्रिया खरं तर creative head होती. हे तिचं काम नव्हतं.. पण या असाईनमेंटमधे प्रत्येक काम प्रिया करत होती. जणू काही ही तिच्या स्वत्:च्या कंपनीची जाहिरात होती.

प्रियाने मोजून तीन शॉट्स घेतले आणि ब्रेक declare केला. बाकिच्या शूटला प्रिया एका तासात maximum शॉट्स घ्यायला लावायची पण इथे कसलीही तडजोड नव्हती. असिफ़ मात्र फ़क्त पाखीकडे बघत होता. अर्थात तिला याची जाणीव होतीच. तीही चोरून एखादा कटाक्ष त्याच्याकडे टाकत होती. तिच्या आईची नजर चुकवून.

"वीर, कैसे लगे शॉट्स?" प्रियाने त्याला विचारलं.

"प्रिया, शॉट्स मस्त होते. पण तू का करतेयस. we could have hired best photographer."
तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत हजर सुयाची धार होती.
"वीर, ही माझ्यासाठी नुसती असाईनमेंट नाही..."
"प्रिया, मला माहितिये की तू आणि असिफ़ कॉलेजमेधे एकत्र होता. त्याचं काम तुला पर्सनल वाटलं पाहिजे पण तो तर त्या पाखी भोवती फ़िरतोय." प्रियाच्या चेहर्‍यावर हसू फ़ुललं.
"वीर, तुझा घोटाळा झालाय. असिफ़ माझा फ़क्त मित्र आहे. आणि त्याला पाखीमधे interest आहे हे मलापण माहित आहे..."
"मग तरीही तू असं का करतेस? तुला जतिन नको, असिफ़ मित्र आहे. मग तुला काय अख्खं आयुष्य असंच घालवायचय?" वीर चिडला होता.
प्रियाने ओल्या रुमालाने चेहरा पुसला. असिफ़ आणि पाखी मोबाईल गेममधे गुंतले होते.

ती काहीच बोलली नाही. " next shot " ती ओरडली.
आणि परत कामात बिझी झाली. नेहमीसारखी.

==============================================

शूटचा रीझल्ट मस्त होता. जतिन तर एक एक फ़ोटोवर खुश होता. पाखी नुसती सुंदर दिसत नव्हती तर नवरी वाटत होती. प्रिया आता ब्रोशर डीझाईन करत होती.

"प्रिया,.."जतिनने तिला आवाज दिला.
"येस बॉस.." ती जागेवरून उठली.
"मला वाटतं आतापर्‍यंतच हे तुझं सगळ्यात एक्सलंट काम आहे. तुला कधी creative सोडावंसं वाटलं तर मला सांग. तुझ्यासाठी फोटोग्राफ़रची जागा ऑफ़र करेन.." जतिन म्हणाला.
" Thanks for this generous offer.." प्रिया म्हणाली आणि पाठी वळली.
"प्रिया.. ही मॉडेल आपल्यासाठी exclusive हवी. मी वीरला सांगतो तिच्या एजन्सीशी contact करायला."

"मला नाही वाटत ती अजून खूप दिवस या प्रोफ़ेशनमधे राहिल..." आणि प्रिया केबिनबाहेर पडली.

ही कायम असं अर्धवट का बोलते.. जतिनला प्रश्न पडला.

वीर फ़ोटो बघत होता. "प्रिया, पाखी आली आहे... तिच्या आईसोबत.. visitors मधे बसलेत. प्रियाने त्याच्याकडे डोळे मोठे करत पाहिलं. अर्थ सरळ होता..संकट अटळ आहे.
"म्हातारीला पैसे वाढवून हवे असतील.. दुसरं काय?"

पाखीची आई एखाद्या पोत्यासारखी सोफ़्यावर बसली होती. पाखीच्या चेहर्‍यावर टेन्शन होते.
"बोलिये.." प्रिया आत येता येता म्हणाली.
पाखीच्या आईने तिच्याकडे रागाने पाहिलं. "हमको ये contract नहि मंगता. cancel करो.."
प्रिया शांतपणे बसली.
"चाय कॉफ़ी ज्युस.. क्या लेंगे?"
"कुछ नही. हमको सारा फ़ोटो देदो... तुम्हारे साथ काम नही करने का." पाखीच्या आईच्या बोलण्यात बंगाली accent होता.
"आंटी, आपको पता है ना के ऐसा करना पॉसिबल नही है..." प्रिया म्हणाली.
"वो सब हमको नै मालूम. पाखी को फ़िल्मका ऑफ़र आया है. अब वो कोई थर्ड क्लास गार्मेंटस का फ़ोटो मे नही दिखेगी..." तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत समोरचा पाण्याचा ग्लास तिच्या तोंडावर रिकामा झाला होता.
प्रिया एक एक शब्द हळू हळू उच्चारत होती.
"इससे पहले के आप कुछ बोले और मेरा गुस्सा भडक जाये आप बाहर निकलो."
पाखीच्या डोळ्यात पाणी आलं होतं..
"प्रिया, प्लीज...." ती म्हणाली.
"पाखी, इनको बाहर जाने बोलो."
पाखी आईला म्हणली.."तु बाहरे बसो.."
पण तिला तवर सूर सापडला होता. ती पाखीवर ओरडली.
"चूप रह, तु निजाकू कणा भाभीछू......"
" ओ भाभी... हिन्दी मे बोलो. ओरिया मे नही. और बाहर निकलो." प्रियाने रूमचा दरवाजा उघडून धरला. पाखीची आई जागची हलली नाही.
"बा ह र.."
पाखी आता रडायला लागली होती. प्रियाने तिच्याकडे पाहिलं.
"पाखि, रोना मत... मस्कारा फ़ैल जायेगा.." ती म्हणाली.
"आंटी, security को बुलाऊ धक्का मारने के लिये.."
आता मात्र ढोलीचा नाइलाज झाला. आणि ती रूमबाहेर पडली.
"पाखी... चलो.." तिने आवाज दिला.
"आप बाहर रुको. मुझे उससे बात करनी है.. "आणि प्रियाने दरवाजा लावून घेतला.

पाखी हमसून हमसून रडत होती. प्रियाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. "अब बस करो.. लो पानी लो.. " प्रियाने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.
"प्रिया, मला आता नाही जगायचं.. "पाखी डोळे पुसत म्हणाली.
अवघी सतरा वर्षाची, काळ्या डोळ्याची पाखी पाहिल्यावर प्रियाला कायम वाटायचं हिचं एक मस्त पोर्ट्रेट काढावं...
प्रिया काहीच बोलली नाही. जगणं हा विषय तिच्या अखत्यारितला नव्हताच मुळी. तिला स्वत:ला तरी कुठं जगावंसं वाटत होतं. ...
पाखी हळू हळू शांत झाली. तिच्या रडण्याचा भर ओसरल्यावर प्रिया म्हणाली...
"कुठची फ़िल्म आहे?" पाखीला आधी नक्की काय ते समजेना.
"माहित नाही. कुठची तरी भोजपुरी आहे.. मा सगळं ठरवते."
तुला काम करायचं आहे का?" प्रियाने विचारलं.
पाखी खाली बघत होती. तिने हळूच नाही अशी मान हलवली. "का?" प्रियाने विचारलं.

"प्रिया, मला हे नाही आवडत. पण मा म्हणते इथे मला स्कोप आहे. मला शाळेत परत जायचय....."
"पाखी, एक सांगू.. तुझ्या आईचं बरोबर आहे. तुला खरंच इथे वाव आहे. जर नीट काम केलस तर टॉपला जाशील."
"पण मला काम करायचंच नाहिये.." पाखी म्हणाली.
प्रियाने परत तिच्याकडे पाहिलं. आणि ति क्षण दोन क्षण थांबली.
"तुला असिफ़ हवाय का?" तिने पाखीला विचारलं

पाखीने चमकून तिच्याकडे पाहिलं.
"माहित नाही.." ती एवढंच म्हणाली.
"पाखी, तुला काहीच माहित नाही हो ना..?"
"मला असिफ़ आवडतो. पण माझ्या घरी ते कधीच मान्य होणार नाही...:
"तू असिफ़शी बोललीअ आहेस या विषयावर.."
"नाही..."
"मी बोललेय. पाखी, मी असिफ़ला खूप वर्षापासून ओळखते. त्याचं आणि माझं नातं हे असं नाहि सांगता येणार.. पण कुठेतरी मी आणि असिफ़ एका बंधनाने बांधलो आहोत."
जे काही ऐकतोय त्यावर पाखीचा विश्वास बसत नव्हता.
"म्हणूनच पाखी मी असिफ़ला व्यवस्थित ओळखते. त्याने किती मुली फ़िरवल्या ते कदाचित त्यालाही ठाऊक नसेल. पण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच आज मी तुला विचारतेय. तुला काय हवय?"
"माहित नाही....."
"पाखी, मला हे उत्तर परत ऐकायचं नाहिये तुझ्याकडून.. "
"प्रिया, मला भिती वाटतेय... जर माझा निर्णय चुकला तर.."

प्रिया हसली.
"पाखी, तुझ्याएवढी मी होते तेव्हा मलाही हिच भिती होती. तेव्हा दुसरं कोणी नाही... पण असिफ़ काय म्हणाला माहितिये... प्रिया, निर्णय तुझा असू दे.. भले तो चुकला तरी चालेल. पण एक समाधान राहिल की निर्णय तुझा स्वत्:चा होता..."
"प्रिया, हे एवढं सोपं नाही. मा आणि घरचे सगळे माझ्यावर अवलंबून आहेत...मी इतक्या लवकर लग्नाचा विचार.... "
"एक मिनिट पाखी.. तुझा घोटाळा होतोय. मी तुला असिफ़ हवा का विचारलं लग्न करते का म्हणू नाही.."
"म्हणजे...?"
"पाखी, तुझं हे वय प्रेमात पडायचं आहे. लग्नाचं नाही. तुझ्यापुढ्यात एवढं चांगलं करीअर आहे..."
"तू सेम मासारखं बोलतेस.."
"हो.. पण माझ्या आणि तिच्यात फ़रक आहे तो intention मधे.पाखी.. ती फ़क्त तुझा विचार करतेय. मी तुझा आणि असिफ़ दोघाचा विचार करतेय... आणि मी तुला स्पष्ट सांगते. मला तुझ्यापेक्षा असिफ़ची काळजी आहे. मी त्याच्या आयुष्याचा खेळ नाही करू शकत. तो तुझ्यामधे गुंतत चाललाय. त्यामुळे तुला हे ठरवावंच लागेल की पुढे काय करायचय?"

"प्रिया.. एक विचारू.. तू कधी कुणावर प्रेम केलयस?"
प्रिया काहीच बोलली नाही.
"सॉरी, मी हे नको विचारायला हवं होतं...पण असिफ़ मला एकदा म्हणालेला प्रेम जर करायचं असेल ना तर प्रियासारखं कर.."
प्रियाने पाखीकडे पाहिलं. टेबलावरची पाण्याची बाटली उघडली. आणि त्यातलं पाणी तिने आपल्या हातावरुन सोडलं......
"पाखी. मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याला असं च सोडून दिलं.. अर्घ्य म्हणून......कायमचं.."

==================================================

"रे, भूक लागलीये.. काहीतरी बनव ना पटकन." प्रिया म्हणाली.
रेहान computer वरती डीझाईन बनवत होता.
"नोकर समझा है क्या मुझे? तुला भूक लागलीये.. तू बनव.."
"असं काय करतोस? मला किचनमधे काम करायला नाही आवडत, तरी ब्रेकफ़ास्ट बनवला ना मी?" प्रियाने त्याच्या गळ्यात हात टाकला.
"एहसान किया?" त्याने तिचा हात काढून घेतला. तिच्या चेहर्‍यावर रागाची एक लकीर आली. "ठीक आहे.. तू पण काहीकरू नकोस. मी पण काही करत नाही. बसते तशीच उपाशी..." ती चिडून म्हणाली. आणि हॉलमधे गेली.
रेहान तिच्या पाठून गेला. "आमरण उपोषण जिन्दाबाद..." त्याने तिला चिडवलं.
प्रियाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तो किचनमधे गेला आणि फ़्रीजमधून भाज्या काढायला सुरुवात केली.
"क्या बनाऊ..." त्याने मुद्दाम ओरडून विचारलं. प्रियाकडून काहीच उत्तर आलं नाही, तसा तो बाहेर आला. प्रिया सोफ़्यावर पाय घेऊन बसली होती. तो तिच्या बाजूला बसला...
"प्रिया, मैने पुछा क्या खाओगे?.."
"कुछ भी नही,.. मेरी भूक मर गयी.." तिने उत्तर दिलं.
"अरे, ऐसे कैसे मर गयी. चलो असिफ़ को फ़ोन करो..."
तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.. "असिफ़ को क्यु?"
एखादं मोठं रहस्य सांगितल्यासारखा आव आणून तो म्हणाला..
"क्यु कि असिफ़ कभी किसीको मरने नही देता.. टाईम पे पहुन्च जाता है.. याद है ना?" त्याने तिचा गळा धरला.
तिच्या चेहयावर हलकंसं हसू उठलं.
प्रियाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"रेहान.... मटर आलू की सब्जी बनाओ..." ती हलकेच पुटपुटली..
"प्रिया..इतने romantic मूड मे तुम्हे मटर याद आ रहे है?" त्याने तिची हनुवटी धरत विचारलं.
"याद तो मुझे बहोत कुछ आ रहा है..लेकिन फ़्रीज मे सिर्फ़ मटर है.." तिने तितक्याच सीरीयसली उत्तर दिलं..
"कठीण आहे.." असं म्हणत रेहान उठला आणि किचनकडे निघाला.

प्रकार: 

इतकि मेहनत करण्यापेक्षा .........आपण इथे लिहिणारच आहात... Happy
तसा ही मी आळशी या प्रकारात मोडतो..:खोखो:

मला वाटलं एक्दम वाचू नका म्हणजे तू पुर्ण दिलियेस पण पुर्ण वाचू नका असा सल्ला सहज देतेयेस म्हणून मी वाचायला घेतली
असो! इथे नाहीच पुर्ण केलीस तर जाऊन शोधेन जुन्या माबोत
पण प्लिज पुर्ण टाक तुच!
बाकी कथा नेहमी प्रमाणे मस्तच!

पुर्ण दिलियेस पण पुर्ण वाचू नका असा सल्ला सहज देतेयेस म्हणून मी वाचायला घेतली
>>म्हणूनच पूर्ण दिली नाही.काल इथे पेस्ट करायची म्हणून मीच वाचत असताना मीच गरगरले. Proud

असो. आता दुसरा भाग टाकलेला आहे.

शिवाय या कथेचा शेवट मी बदलत आहे. (ज्यांनी आधी वाचली असेल त्यांनी डायरेक्ट शेवट वाचायला हरकत नाही) धन्यवाद... Happy

आणि मध्यंतरी काय घडलं म्हणजे प्रिया-रेहान भेटल्यावर वगैरे ते लिहिलेलं आहेस का गं? प्रियाची बॅकग्राउंड, नंतरची ५ वर्षे तिने काय केलं वगैरे बद्दल पण वाचायला आवडेल..

शेवटचा पॅरा इटालिक्स का होत नाहीये?? Uhoh

प्रियाची बॅकग्राउंड, नंतरची ५ वर्षे तिने काय केलं वगैरे बद्दल पण वाचायला आवडेल..>>> जल्ला तेच तर कथा हाय. तेपण येतय. Happy

अगं हो गं.. तु आधी क्रमशः लिहिलं नव्हतं म्हणुन मला वाटलेलं कथा संपली म्हणुन.. आणि खरच आहे तुझं, ही कथा क्रमशःच वाचायला हवी Happy

वाचली, आवडली Happy झंझावात आहे एक ही प्रिया म्हणजे.. प्रत्येकीची मनातली एक मनस्वी, बंडखोर मुलगी.. Happy
पुढ आहे ना अजून? आणि व्हॉट अबौट मोरपिसे? :वाट पहाणारी बाहुली:

कथा छान चाललीये.
नाणे फ़ेक करून हे त्रिकूट वर्गात आलं. अर्थात उशिरा...>> इथे नाणेफ़ेक हवं का? (मी हा शब्द ऐकला नाहीये.) की सरळ छापा-काटा करुन असं? मला एक सेकंद कळंल नाही काय फेक(इंग्लिश मधलं :)) केलंय ते.

Pages