चिरकाल...

Submitted by Anvay on 7 December, 2012 - 07:46

"अरे उठ आता...किती वेळ झोपणार आहेस? आज ऑफिस आहे माहित आहे ना..."
आईच्या आवाजाने तन्मय जागा झाला तर पाहतों आई समोरच उभी
. "अग...आज फार थडी वाजतेय...पुरता गारठलोय मी..आज ऑफिस नको .."
तन्मायचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत आई म्हणाली "वर्षाच्या बारा महिन्यांपैकी सहा महिने तर थंडीनेच कुडकुडतो. काही विशेष थंडी नाही आज. जा ऑफिसला. घरी राहिलास तर दिवसेभर आळशासारखा झोपून राहशील ."

आता मात्र ऑफिसला जाण्यावाचून पर्याय नव्हता. कसेतरी घाईत आवरले.तोंडावर पाण्याचा शिद्कारा केला तरी झोप काही जात नव्हती. गडद तपकिरी आणि

त्याल निळी कडा असलेले ते चमकणारे डोळे सोडले तर चेहरा पूर्णच सुस्तावलेला. घाईत आवरून आणि नेहमीच आपले जर्कीन अंगावर चढवून तन्मयची स्वारी ऑफिसला निघाली.

ऑफिसमध्येही आज तन्मायचे मन रमत नव्हते. सकाळपासून सर्दीने हैराण झालेला, त्यात मित्रांनी बाहेर जेवायला बोलवले तेंव्हा बरे वाटत नाही हे सांगितल्यावर तेच नेहमीचे बोल ऐकावे लागले. " तुझे नेहमीचे नखरे असतात. नाजूक आहे नुसता तू. कडक उनात तुझी स्कीन जळते पुरळ उठतात, आणि बाकीच्या वेळी कधी सरडे तर कधी ताप"

पण आता हे बोलणे ऐकण्याची सवय झाली होती. पण आज जरा जास्तच अस्वस्थ वाटत होते.कसेतरी दिवसाचे काम आटोपून तो घरी निघाला. घरी पोहचल्यावर त्याचा चेहरा पाहूनच आईला कळले की आज जरा जास्तच झालाय. "अरे, झोप आता जरा म्हणजे बर वाटेल. आणि सुटी घे हवी तर उद्या" आईचे हे बोलणे चालू असतानाच तो आपल्या रूमकडे वळला आणि दार बंद करून झोपून घेतले.

आईलाही हा सवयीचा भाग माहित होता आणि हेही माहित होते की आज स्वारी न जेवताच झोपणार होती
..........................

सकाळी जरा उशिरानेच जग आली होती. आळसावलेल्या अवस्थेतच तन्मय दरवाजा उघडण्यासाठी बेडवरून उठला खरा पण त्याच्या शरीरात तरण राहिले नव्हते ...दोन पाऊले चालताच अचानक गार गरल्यासारखे झाले आणि ....
काय चालू आहे ह्याचे भानच नव्हते. फक्त आपण कुठे तरी खोल काळोख्या दरीत पडत आहोत हीच एक जाणीव होती. प्रकाश हळू हळू लोप पावत होता. एका अंतहीन गर्तेत जात असल्याचा तो भास आणि सुटकेसाठी केलेले विफल प्रयत्न. आता तर प्रकाश अंधुक झाला होता आणि प्रकाशाचा शेवटचा ठीपकाही नष्ट होणार , पूर्ण ताकदीनिशी उठण्याचा प्रयत्न केला आणि ...
डोळे उघडले तेंव्हा तन्मय जमिनीवर पडलेला होता
....इकडे तिकडे एकदा बघून घरीच असल्याची खात्री केल्यानंतर तन्मायचे लक्ष घड्याळाकडे गेले ...अवघ्या मिनिताभारापुर्वी तप अंथरुणात होता आणि आता असे वाटते की एक मोठा कालखंड उलटलाय त्या गर्तेत ...
पण लवकरच भानावर येत
, ते एक स्वप्न होते हे कळल्यावर तो स्वताशीच हसला आणि उठून दरवाजाकडे जाऊ लागला. पण एक फरक मात्र होता . चेहऱ्यावर ओशालेपणा ऐवजी उत्साह दिसत होता. कोणी पहिले तर विश्वास ठेवला नसता की हा एक दिवसापूर्वी आजारी होता ....
दरवाजा उघडून तो बाहेर आला आणि अवरु लागला
. आई स्वयान्पाक्घारातच होती. भराभर आवरून ऑफिसला जायला निघाला पण आज काहीतरी वेगळे वाटत होते खास. "अरे बरे वाटत नसेल तर सुटी घे, तेवढाच आराम मिळेल" हे आईचे बोलणे ऐकताच बोलला "आता बर वाटतय आणि तू आज एवडे ओरडून का बोलतेय. मला हळू आवाजात बोललेले पण ऐकू येतेय"
"अरे मी ओरडून नाही बोलताय. " हे बोलणे पूर्ण होण्याच्या आत तन्मय घराबाहेर पडला होता.

त्याच्या इतक्या वेगात जाणार्या पाठमोर्या देहाकडे बघत आई विचार करत होती
...आज ह्याला झालाय काय ?
...............................

आज झालंय तरी काय? असा विचार करतच तन्मय ऑफिसमधून घरी येत होता. सगळच जरा विचित्र वाटत होते. सगळ्यांचे आवाज मोठ्याने ऐकू येणे आणि अगदी गर्दीतल्या कोलाहलातही आवाज स्पष्टपणे समजणे आणि हालचालींचा वेग तर असा काही वाढला की अचानक जाणवू लागतेय की आपण फारच चपळ आहोत. आणि ऑफिसमधल्या कामाचा आजचा वेग तर अंगांत काही संचारल्यासारखाच होता. हे सर्वे कमी की काय आता ह्या समोरून येणाऱ्या सुंदर मुलीकडे बघितल्यावर तर ही जाणीव कहरी की काय की आपलाच भास ....अगदी तिच्या हृदयाचे ठोके पण स्पष्ट ऐकू येताहेत....सगळाच जरा विचित्र घडतंय आज....
घरी आल्यावर नेहमीप्रमाणे आवरून जेवण घेतले. तोपर्यंत ह्या दिवसभरातले विचार मागे पडले होते. आणि नेहीप्रमाणे जेवल्यानंतर थोडाच वेळात झोपण्याचीही सुरुवात झाली ..
दिवस सरत होते. आता हा वेगळेपणाही रोजच्या आयुष्याचा एक भाग झाल्याने त्यातही नवलाई उरली नवती. पण काहीतरी आपल्यात विशेष बदल झालंय ह्याची तन्मयला जाणीव होतीच. शेवटी जाणीवा ह्या ही मनाचा एक भाग आणि जाणीवेतून त्याविषयी उत्स्कुकता निर्माण होणे ओघाने आलेच. त्याने ही उत्स्कुता शमविण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला. आपल्या बदलांच्या संदर्भातील अनेक
गोष्टी पडल्ताळून पाहिल्या. त्यातल्या एका पुस्तकाने त्याचे लक्ष्य वेधले आणि एक मनात एका वेगळ्याच वादळाने ठीमान घालायला सुरुवात केली...त्या पुस्तकात वर्णन होते एका वेगळ्याच शक्तीचे, प्रवृतीचे ...रक्तपिपासुंचे अर्थात vampires .........
त्यातल्या वर्णनाशी मिळतेजुळते हे बदल...आणि तो हृदायची धड धड ऐकू येण्याचा भास आणि ती विचित्र जाणीव , एक अनामिक आकर्षण ....रक्ताचे ......
ह्या कल्पनेनेच त्याला घाम फुटला. सरळ सगळी पुस्तके बंद करून झोपून घेतले..
...........................................

तसेही ह्या नव्या बदलांचा त्याच्या आयुष्यात काही विशेष काही उपयोग नव्हता. आणि ह्या कोणाला कसलीच जाणीव नसल्याने आयुष्यही सरळच चालू होते. आता जवळपास सहा महिने झाले होते ह्या सर्व गोष्टीना, एवाना तर तन्माय्नेही ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे सोडून दिले होते.
आजही मित्राच्या इंगेज्मेंटची पार्टी होती आणि त्यात ऑफिसमधून निघायलाच उशीर. निघताना सदाच्या गाडीवर निघाला. पार्टीत काय नेह्मीप्रमानेच्च उशीर झाला, जेवण संपवून निघायलाच साडे अकरा झाले. सदाच घरी सोडणार होता पण तीच एक काळजी होती कारण त्याचे बाईक चालवणे म्हणजे काय हे तन्मयला चांगलेच माहित
होते. आताही भरधाव वेगात तो बाईक चालवत होता. महामार्गावरून जाताना रस्त्यावर लाईट पण नव्हते. तरी हा आपल्याच धुंदीत गाडी चालवतोय आणि बडबडतोय. " मजा आली रे पार्टीत आणि बर्याच दिवसांनी सगळे भेटलो. अरे तू तिला ओळखले का ...."
आणि पुढचे शब्द अर्धेच राहिले. अचानक वळणावर एक तृच्क समोरून येताना दिसला आणि गाडीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक जोरात दाबल्याने गाडी सरळ घसरत गेली. पण काय घडले ह्याची जाही मला पूर्ण जाणीव होती की सर्वे स्लो मोशन मध्ये घडत वा माझ्या हल्चीचा वेगच इतका होता काय माहित ...चपळाईने मीसावरलो पण गाडीसाहित फरफटत जाणारा सदा दिसला.. क्षणातच मी त्या गाडीपासून त्याला खेचले...अंधारत काहीच दिसत नवते ....फक्त एक जाणीव जी तीव्र झाली होती ....एक आवाज जो ऐकू येत होता आणि एक रंग जो डोळ्यासमोर दिसत होता ...लाल ...रक्ताचा लाल रंग ...मी जोरात ओरडलो ...माझ्या हातांवर पडलेले रात्काचे थेम बघून ...तपकिरी रंगाच्या डोळ्यात लाल छटा उमटली होती.....
आणि आता टिकणार होती चिरकाल .....!!!!

स्तब्ध झाले मन..
गोठला काळ ...
गोठल्या भावना...
चिरकाल ...चिरकाल ..!!!
...........................................

दोन दिवसानंतर ...
हॉस्पिटल मधून बाहेर पडताना तन्मयला डॉक्टरांचे बोल आठवत होते . 'आता काळजी करण्याचे काही कारण नाही. लवकरच बरा होईल तो. फक्त डोक्याला आणि हाताला थोडा मार लागला आहे. पण तू एक मात्र चांगला केलेस ह्याला हॉस्पिटलमध्ये लवकर आणलेस. अजून पाच - एक मिनिटे उशीर झाला असता तर अती राक्त्सत्र्त्वाने केस हाताबाहेर गेली असती..."

पुन्हा तेच दृश त्याच्या डोळ्यसमोर येत होते, ' रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सदा. क्षण..दोन क्षण वाट पहिली त्याने पण कुठलीच गाडी येत नसल्याने , सदाला तसेच पाठीवर उचलून तोनिघाला. त्यावेळेस आपला वेग किती होता हे समजणे अवघड आहे आता ...पण ज्या चपळाईने आपण ते अंतर गाठले आणि पुढे असलेल्या हॉस्पिटलमध्ये सदाला दाखल केले ते फक्त आपल्यालाच माहित आहे...

शेवटी काय कुठली ही शक्ती किंवा वेगळेपण असल्यची जाणीव आपल्याच मनात होते आणि ती चांगली किंवा वाईट हेही आपलेच मन ठरवण्याचा प्रयत्न करते. पण प्रत्यक्षात असलेलेली शक्ती चांगली किंवा वाईट कधीच नसते...ती चांगली किंवा वाईट ठरते ती आपण घेतलेल्या निर्णयांनी....
आणि ह्या शक्तीपेक्षा ही जाणीव चिरकाल टिकणे महत्वाचे असते ...'

........................................................
........................................................
-अन्वय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्वायलाईट चा अवतार की काय? सीरीज लिहिणार का ट्वायलाईट सारखी? Wink
पुलेशु.

शुले च्या चिक्कार चुका आहेत. वाचताना अडकायला होतंय. Sad