असंबद्ध कविता

आमचा ठराव

Submitted by महेश on 26 October, 2016 - 13:47

आम्हीच आमुच्या काळजाशी
भलता ठराव केला Wink

हाती जे जे लागेल ते ते
वाचायचा सराव केला Uhoh

खरडले काही बाही अन्
शब्दांचा भराव केला Happy

सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका... (एक अत्यंत टुकार गद्यकविता)

Submitted by चैत रे चैत on 4 December, 2012 - 11:48

सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका...

रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.
तेवढ्यात त्याला चौथी 'ई'च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'
म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...

-- इतरत्र पूर्वप्रकाशित
Subscribe to RSS - असंबद्ध कविता