गद्यलेखन

चारचौघी - २

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2013 - 06:13

पहाटे पाचपर्यंत पिझाचे अवशेष उरलेल्या डिशेस तश्याच विखुरलेल्या अवस्थेत पडून राहिल्या. चर्चा संपतच नव्हती. एरवी दहा वाजता पेंगून झोपणारी निली स्वतःच पूर्ण जागी होती, एवढेच नाही तर चर्चेचा केंद्रबिंदू होती. सहा महिने एकत्र राहूनही आजवर बाकीच्या तिघींना हे माहीत नव्हते की निली तिच्या पूर्वायुष्यात कोणत्या दिव्यातून गेलेली आहे.

नीलाक्षीच्या 'आय वॉन्ट टू बी रेप्ड' या विधानाने पसरलेला सन्नाटा हळूहळू विरत गेला तो तिच्याच बोलण्यामुळे. कुठेतरी हरवल्यासारखी निली बोलत राहिली. स्त्री जगतातील असहाय्यता किंवा विवशता त्या रूममध्ये चर्चारुपाने व्यापून राहिलेली होती.

शब्दखुणा: 

रहस्य भाग १

Submitted by बेधुंद on 9 January, 2013 - 03:00

डॉ.देसाई आपल्या अलिशान दालनात आरामखुर्चीत बसले होते .मुंबईच्या फोरेन्सिक प्रयोगशाळेची सुत्रे नुकतीच त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.एका कर्त्बगार व्यक्तीकडे ही जबाबदारी आल्याने तेथील व्यवस्थेत एक प्रकारची नवीन उर्जा संचारली होती.या आधीचे तेथील प्रमुख देखील अत्यंत नावाजलेले फोरेन्सिक तज्ञ होते पण ते सेवानिव्रुत्त झाले आणी जबाबदारी डॉ.देसाईंकडे सोपविण्यात आली.खरे तर ही प्रयोगशाळा पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोयी सुविधांच्या बाबतीत मागासच होती पण सगळया अड्चणींवर मात करुन तेथील तज्ञ आपले काम चोखपणे बजावत होते.प्रयोगशाळेत विविध प्रकारचे विभाग होते ज्यात वेगवेगळे तज्ञ काम करीत होते ,त्यात पिण्याच्

शब्दखुणा: 

साक्षात्कार

Submitted by श्रीराम-दासी on 7 January, 2013 - 05:42

साक्षात्कार!

जगता जगता अगणित वेळा माणसाच्या आयुष्यात साक्षात्काराचे प्रसंग येतात. दैनंदिन जीवनात येण्यार्‍या सर्वसाधारण अनूभुतींना साक्षात्कारचे नाव दिले तर हा शब्द, त्याचा अर्थ, आणि त्या अर्थाचे गांभीर्य हे सगळंच अगदी बोथट होऊन जाईल. पण तरीही.. खरोखरच ज्याला ’साक्षात्कार’ म्हणता येईल असं आपल्या आयुष्यात कितीदा घडतं?

शब्दखुणा: 

दुनियादारी ! दुनियादारी !!

Submitted by सागर कोकणे on 4 January, 2013 - 09:43

दुनियादारी हे एक व्यसन आहे.

दुनियादारी म्हणजे तरुणाई ! दुनियादारी म्हणजे प्रेमभंग ! दुनियादारी म्हणजे अतूट मैत्री ! दुनियादारी म्हणजे कोमेजलेले बालपण ! दुनियादारी म्हणजे नियतीने केलेली फसवणूक ! दुनियादारी म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण !

शब्दखुणा: 

आपले ब्रह्मांड - लेख

Submitted by बेफ़िकीर on 3 January, 2013 - 01:13

आपले छंद या मासिकात हा लेख प्रकाशित झाला. त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे देत आहे.

-'बेफिकीर'!

====================================

माणूस स्वतःच्या आयुष्यात इतका गुरफटलेला असतो की त्याला याचेही भान राहात नाही की त्याचे आयुष्य क्षणभंगुर आहे. जेथे स्वतःच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेविषयीचेच भान नाही तेथे आपल्या विश्वात, या ब्रह्मांडात काय चालले आहे व का चालले आहे याचे भान कुठले असायला.

"ते" - ४

Submitted by मुरारी on 3 January, 2013 - 00:58

भाग १: http://www.maayboli.com/node/38066
भाग २: http://www.maayboli.com/node/38133
भाग 3 : http://www.maayboli.com/node/39907

'जयदीप .. हो जयदीपच. तू परत आलायस इथे , माझा अजूनही विश्वास बसत नाहीये . दत्त दत्त '

शब्दखुणा: 

नेमकं तेव्हाच.....

Submitted by मुग्धमानसी on 3 January, 2013 - 00:29

नेमका तेव्हाच संचारतो काळोख दिवसाच्या अंगात!
नेमका तेव्हाच एकमताने ठराव पास होतो ढगात... कि आता बरसायचं आहे...
अगदी तेव्हाच लख्ख कोरडं रहायचा निश्चय केलेल्या मला... चिंब चिंब भिजवायचं आहे!

हळवेपणाची कात टाकून खंबीर व्हायचं ठरवते... नेमकी तेव्हाच कातरवेळ होते
मग आकाशात रंग... गार गार वारे...
पानांची सळसळ... अंगावर शहारे...
बुडणारा सूर्य... गळणारं पान...
परतणारे पक्षी... सुटलेलं भान...
तशातच नेमकी कुठलीशी आठवण...
आणि मघाच्या निश्चयाची सपशेल बोळवण!!

भास हे भासच असतात.
झोपल्यानंतर होऊ लागले तर त्याला स्वप्न म्हणतात...
आणि जागेपणी होऊ लागले तर त्याला तंद्री म्हणतात...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन