सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.
कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.
इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.
ही १८९७ सालची गोष्ट आहे. हिवाळा संपत आला असूनही रात्री बोचरी थंडी पडत असे व सकाळी धुके! अशात एका भल्या पहाटे होम्स ने मला गदागदा हलवून उठवले. त्याने हातात धरलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्याच्या चेहर्यावरची उत्सुकता बघूनच मला समजले की काहीतरी खास बात आहे.
"चल, वॉटसन, चल!" तो ओरडला, "पटकन कपडे बदल आणि माझ्यासोबत चल."
दिवाळीपूर्वीचा आठवडा. थंडीनं जोर पकडलाय आणि वातावरणात उत्साहाच्या जणू रांगोळ्या घातल्या जातायत, आशेचे आकाशकंदील झगमगतायत. अशातच एका मित्रानं नेहेमीचाच प्रश्न विचारला,
“काय मग यंदा तुमची दिवाळीची खरेदी?”
सोमवार सकाळ नेहमीची जशी असावी तशीच होती, शनिवार रविवार केलेल्या मस्तीने आलेली सुस्ती उतरत नसते आणि त्या सुस्तीतही लोकल पकडून ऑफिसला पोहोचायचं असतं.
लोकल, म्हणजे कथा नक्कीच मुंबईतली असणार. हो बरोबर, मुंबई लोकल आणि घाई, मुंबईला जर ही री ओढली नसती तर ते पुणं झालं असतं. बाकी मुंबई आणि पुणं ह्या शहरविशेषांमध्ये जाणवण्यासारखा फरक हाच आहे की मुंबईत लोकल्स आणि पुण्यात दुचाकी वहाने! असो, तर सांगायचा मुद्दा हाच की दिवस काही तसा खास नव्हता.
[ लग्न-२ म्हटल्यावर "दुसरं लग्नं वाटतं..हे..हे..हे.." असले चावट विचार तुमच्या मनात आले असतील ! पण तसं काही नसुन, ही पहिल्या लग्नाचीच दुसरी गोष्ट आहे. ऐतिहासिक संदर्भासाठी इच्छूकांनी येथे जावे.]
दुपारची वेळ होती. उन्हाचा चटका वाढला होता. भाजी बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. बायजा आपल्या भाजीपाल्याच्या दुकानावर बसली होती. पालेभाज्या वाळू नयेत म्हणून मधून-मधून त्यावर पाण्याचा शिडकावा करीत गिऱ्हाइकांची वाट बघण्यात वेळ चालला होता. अलीकडेच बायजाने नगरपालिकेकडून भाजी बाजारात हा आठ-बाय-आठचा गाळावजा ओटा भाड्याने घेतला होता. बायजाचे आता बरे चालले होते. शेजारीच म्हादबाचा गाळा होता. चांगला पोरगा होता बिचारा. वेळीकाळी बायजाला त्याचा आधार असायचा. बायजा म्हादबाला म्हणाली, " म्हादबा, आज काय धंद्याचं खरं दिसत न्हाई बुवा".
मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.
गणपतीच्या दिवसात बाजारात गेलो तेव्हाचे प्रसंग. घरातून बाहेर पडताना बायकोने, " अहो, जरा केवडा, लाल फुलं, दूर्वा वगैरे घेऊन या अस बजावलं आणि... नुसते भटकून येऊ नका अस प्रेमाचा सल्लाही देण्यास ती विसरली नाही. लोकांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढत मी वेगवेगळी फुलं, भाज्या बघत बघत जात होतो. खरंतर मी केवडाही शोधत होतो. केवडा विकणारी एकच बाई दिसली. पण तिच्या भोवती बिलकुल गर्दी नव्हती. पुढे पाहिल्यावर काही भय्येही हातात केवडे घेऊन विकताना दिसले. हल्ली कोणीही काहीही विकतो.