आपल्या सर्वांच्याच घरात कधी कधी कोणत्या न कोणत्या प्रकारचा समारंभ आयोजित करण्याचा प्रसंग येतो. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, वास्तुशांती, उदघाटन असे कितीतरी समारंभ आपण साजरे करीत असतो. आपल्या आनंदात आपले नातेवाईक, हितचिंतक, मित्र-मैत्रिणी इ. सहभागी व्हावेत, अशी त्या मागील मुख्य भावना असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनांत कित्येक वेळा जवळच्या नातेवाईकांची अथवा मित्रांची वर्षांनुवर्षे भेट होत नाही, या निमित्ताने ते भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. नवीन ओळखी होतात, माणसं जवळ येतात, नाती अधिक घट्ट होतात.
अचानक एखादा गुप्त धनाचा साठा समोर यावा आणि त्यातल्या रत्नजडीत दाग-दागिन्यांनी डोळे दिपून जावेत तशी अवस्था एकदा आचर्य प्रल्हाद केशव अत्रे यांची झाली होती. त्याला कारणही तसेच होते. आपल्या अशिक्षित आईच्या तोंडून ऐकलेल्या काव्य रचनांच्या हस्तलिखिताची वही भीतभीतच अभिप्रायासाठी सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या समोर ठेवली होती.
वेळ रात्रीची . जेव्हा सगळं जग निद्रेच्या उंबरठ्यावर डोलत असतं तेव्हाची असावी बहुतेक. दिवसभर सिलिकॉन व्हँलीच्या वाटा तुडवून आम्ही आमच्या पार्किंग लॉटमध्ये शिरत असतो. बाहेरच्या थंड हवेच्या अस्तरात लपेटलेली रात्र हलकेच चढत असते. इतक्यात गुलाम अलींच्या मधाळ स्वरात पुढची गझल सुरु होते. त्या सुरांचा अंमल हलके हलके चांदण्याबरोबर पसरू लागतो. अनेक वार ऐकूनही पुन्हा एकदा भोवतालच्या जगाचं भान हरपतं आणि एक अनोखी दुनिया जागी होऊ लागते ...
' फ़ासले ऐसेभी होंगे यह कभी सोचा न था ।
सामने बैठा था मेरे और वोह मेरा न था.....।'
आज एक डिसेंबर .आणखी एक महिना संपला आणि नवीन सुरु झाला. तसा सगळा नेहमीचाच खेळ. अगदी लाडक्या किशोरकुमारचे ते रेडिओ सिलोनने अजरामर केलेले गाणे 'खुश है जमाना आज पहिली तारीख है' प्रथम गुणगुणून मग ऐकून झाले. बघता बघता शेवटचा महिना आला देखील असे स्वतः ला बजावून झाले. आता आज काहीतरी कागदावर उतरवावे म्हणजे मग मनास थोडे बरे वाटेल असा स्वसंवाद झाला.
"तुला फक्त माझं लोणचं आवडतं का?"
"तुझं नाही, तू केलेलं! तुझं लोणचं तुझ्या नवर्यानं घातलंच आहे"
"हं! चल रुग येईल"
"सव्वा बारा ना?"
"हो पण पावणे बारा होऊन गेले की आता?"
"चला... ... आता का?... आता का अडवतीयस?"
"आय कान्ट हॅव सरप्राइझेस"
"म्हणजे?"
"तू अगदी या क्षणाला उठशील असे वाटत नव्हते. पण स्वार्थ उरकलाय म्हणा आता तुझा"