ही कथा माहेर मासिकाच्या फेब्रूवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. मायबोलीवर पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल माहेर मासिकाचे आभार.
=================================================
रात्रीचे नऊ वाजले असावेत. खरंतर मला भूक लागली होती पण माझ्या टीममेट्सचे ड्रिंक राऊंड्स अजून काही संपले नव्हते. हॉटेलमधल्या त्या मंद प्रकाशात मला का कुणास ठाऊक अजूनच उदास वाटत होत.. तसं उदास व्हायचं काहीच कारण नव्हतं. पण तरीही..
"रिया, चल ना." मी पुन्हा एकदा रियाला आवाज दिला. कुणाशी तरी फोनवर बोलण्यात ती गुंग झाली होती. हातानेच खूण करून तिने मला "दोन मिनिटे" असे सांगितले.
नव्या युगाचा सैनिक असल्याने, संवेदना बधीर करणारा वेग हे माझ्याही आयुष्याचे लक्षण ठरले होते. जलदगती मार्गावरून पुढे जात असताना चिंतन, आत्मपरीक्षण या सारख्या बोचऱ्या गोष्टींना आपण 'विचारपूर्वक' बाजूला टाकतो. कधीमधी आनंद - दुःखाचे टोलनाके लागतात पण त्या क्षणांनाही आपण टोल चुकता करावा तेवढीच किंमत देतो. इच्छित स्थळी पोचण्याचा ध्यास घेतल्याने प्रवासातली खुमारी अनुभवता येत नाही आणि मुक्कामाचे स्थळ आहे तरी कोठे? या अनादि प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने, प्रवास चालू ठेवण्याला पर्याय नाही, अशा चमत्कारिक चाकोरीत आयुष्य पिळून निघते, रस ठिबकत राहतो.
पात्रांचा गोंधळ नको म्हणून संदर्भासाठी फॅमिली ट्री काढलंय. नवीन वाचणार्यांच्या पण गोंधळ नको म्हणून.
गोजरबाई
।
शेवंताबाई
।----------------------------।
चंदाबाई ताराबाई (मानलेली मुलगी) --- ( रेश्मा, अशोक)
।
प्रेमाबाई
।
मयुरी, दिपक
इंटर नेटच्या कृपेमुळे बहुतांशी लेखकांचे लिखाण ई - बुक स्वरूपात उपलब्ध झालेले आहे. विमानाच्या/रेल्वेच्या प्रवासात 'आय पॅड' अथवा 'नोटबुक' वर अनेक लोकांना अशी पुस्तके वाचताना पाहतो. काही पुस्तके मीही 'नोटबुक' वर घेऊन ठेवलेली आहेत पण खरे सांगायचे तर मला अशा ई - बुक्सचे वाचन फारसे भावत नाही. याचे कधी कधी मला आश्चर्य वाटते कारण एक तंत्र म्हणून मी इंटर नेटच्या अगदी कह्यात गेलेला माणूस आहे. बँकेचे व्यवहार, तिकीट आरक्षण, बिलांचा भरणा आणि किरकोळ खरेदी यांसाठी मी या माध्यमाचा भरपूर वापर करतो. बारीक सारीक माहितीसाठी यावरच विसंबून असतो.
दिनांक : १३ - ०२ - २०१३
क्षण - कथा
क्षण - कथा अर्थात सध्या सर्वत्र , किंबहुना पाश्चात्य देशांमध्ये जास्तच लोकप्रिय होत असलेला नवीन कथा-प्रकार , Flash Fiction अथवा Micro Fiction या नावाने सर्वत्र परिचित .
जाणत्या वयापासून अवती भवतीच्या बऱ्या- वाईट घटनांच्या जाणिवा मनात घर करायला लागतात. मनाचे असंख्य पापुद्रे आणि स्तर अशा अनुभवांनी भरून जायला सुरुवात होते. त्या - त्या वेळी लक्षात आले नाही तरीही अंतर्मन अशा लक्षणीय गोष्टींचा संग्रह करीत असते. अवचित त्या गोष्टी नवीन संदर्भाने सजग मनासमोर येतात आणि त्यांच्या झळाळीने पुन्हा एकदा लख्ख प्रकाश पडतो. काही मळभ आलेले असेल तर ते दूर होते, डोळ्यात पाणी येते खरे पण आसू हलकेच पुसले की नवीन वाट दिसू लागते, काही प्रश्नांचा उलगडा झाल्यासारखे वाटते.
या कादंबरीच्या शेवटच्या तीन भागांपैकी हा पहिला भाग आहे. वाचकांचे व प्रतिसाददात्यांचे, तसेच मायबोली प्रशासनाचे मनापासून आभार मानतो.
=========================
मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकर्त्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोटाळत राहिलं.
घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."