तुझा निरोप आला तेंव्हा मी पावसात चिंब भिजलेले होते!
तसेच ओलेते कपडे... निथळणारं अंग... आणि चिंब ओले केस...
तुझा प्रश्न जरा हळवासा...
’बरेच दिवस निरोप नाही... विसरलीस का मला?’ - अशाच काहिश्या अर्थाचा.
मी प्रसन्न हसले!
ओले केस पंचाने खसखसून पुसताना मनात आलं...
मला खरंच भिजवलं होतं पावसानं... की...
कि तुझ्या आठवानं?
आपल्या खुपश्या प्रश्नांची उत्तरं नसतातच एकमेकांकडे...
पण उत्तरादाखल धाडलेला माझा हा निःशब्दाचा निरोप... कधी पोचेल का तुझ्यापर्यंत?
....................नृत्य ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून आलेल्या आजपर्यंतच्या चित्रपटांतला मला एकही आता आठवत नाहीये. पण काल पाहिलेल्या 'रेमो डिसुझा' दिग्दर्शित, त्याच्याच डोक्यातनं आलेल्या कथेवर आधारीत, आणि प्रभू देवा (भारतीय मायकल जॅक्सन), गणेश आचार्य, केके मेनन, तसेच डान्स इंडीया डान्स या प्लॅटफॉर्ममुळे बर्याच लोकांना माहित असणार्या/नसणार्याही सर्वच्या सर्व नृत्य कलाकारांना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाची खासियत म्हणजे केवळ आणि केवळ नृत्य. हा चित्रपट पाहतांना, मला पहिल्यांदाच; नृत्य हे ही स्वत:ला अभिव्यक्त करण्याचं अत्यंत प्रबळ माध्यम आहे असं प्रकर्षानं जाणवलं.
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-१ इथे वाचा!
'हाय सडॅ! डू यू हॅव अ मोमेंट?'.. वेगवेगळे आकडे व आलेखांच्या डबक्यातून सदानं डोकं वर केलं. स्टुअर्ट केबिनच्या दारातून विचारत होता.
सदा: 'हो! हो! ये की. बोल काय म्हणतोस? कसं वाटलं तुला इथे?'
'हं! मी तेच बोलायला आलो होतो. तसं तुमचं ऑफिस अॅज सच, इज अॅज गुड अॅज एनी! पण खरं सांगायचं तर मला थोड्या गोष्टी खटकल्या. म्हणजे मला इथे येऊन तसे चार पाचच दिवस झालेत. काही फार नाहीत. ठाम मत बनवण्याइतके तर नाहीच नाही. पण म्हंटलं तुला आजच सांगावं.. कारण आता उद्या मी जाणार दिल्लीला आणि तिकडून परत घरी!'
मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगात आलेला. शाळेतल्या वयाची मुले वाड्या मागच्या मोकळ्या जागेत खेळत होती. कार्लेकरने चेंडू फटकावला तो वाड्याच्या मागच्या अंगणात टप्पा खाऊन कुठेतरी
दिसेनासा झाला. चेंडू शोधत शोधत मुले वाड्याच्या मागच्या भागात आली. चेंडू बाहेर पडलेला नव्हता. कदाचित पडवीत गेला असेल मुलांना वाटले. पडवी बंद होती पुढच्या बाजूला गज लावलेले होते.
आत अंधार होता. मिचमिच्या डोळयांनी मुले आत चेंडू दिसतो का ते पाहू लागली.
काय असेल रे इथे? ए कोण रहातं आणि ती चूल कोण पेटवत असेल. मुलांची हलक्या आवाजातली चर्चा.
काही व्यक्तिमत्वे असे काही दैवी देणे घेऊन आलेले असतात की त्यांच्या प्रतिभेसाठी आकाशाचा फलकही अपुरा पडतो. आपल्या कलेतून वर्तमान आणि भविष्यातील अगणित पिढ्यांचे सामान्य जगणे उजळवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. अशा लोकांची निर्मिती पाहून, तिचा आस्वाद घेऊन तृप्ती तर होतेच पण त्या प्रतिभेचे विशुध्द तेज अनुभवून आपले स्वतःचे जीवनही एक आनंदयात्रा बनून जाते. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अशा असामान्य दैवी प्रतिभावंतांच्या यादीत पु.ल. देशपांडे हे नाव येणारी कित्येक वर्षे तळपत राहील.
१.
..........भरधाव धावणार्या गाड्यांमुळे अंगावर उडणारे चिखलाचे पाणी चुकवत, पावसाच्या दिमाखदार तडाख्यापासून स्वतःला कसंबसं वाचवत, एका हाताने छत्री तर दुसर्या खांद्यावरची पर्स सांभाळत पदर गच्च लपेटून शेवटी तिने रस्ता ओलांडला...
ह्या सार्या कसरतीत तिची प्रसन्न अबोली रंगाची साडी मात्र पार गुडघ्यापर्यंत भिजली.. त्या लाडक्या साडीवर अवतरलेली चिखलाच्या थेबांची नक्षी निरखत ती बस स्टॉप वर पोहोचली...
तुरळक माणसं वगळता आज स्टॉप तसा रिकामाच. त्या पत्र्याच्या छपराखाली ती जरा विसावली, इथं उभं राहून फार पावसाचा मारा चुकत नसला तरी थेट डोक्यावर जलधारा येत नव्हत्या...
धिं धिं धिं धिं. घिन क धा. घिन क धा. घिन क धा.... ढोलकीचा ठेका चालू होता. रेश्मा आणि मयुरी ठेक्यावर नाचत होत्या. तेवढ्यात 'आजा रे ssss तू ही रे ssss तेरे बिना मे कैसे जिऊं" रेश्माचा मोबाईल पुन्हा वाजला. नाच थांबला. ढोलकीची लय तुटली.
'एक मिनीट गं आक्का.'
अग ये रेश्मे काय चाललया काय तुजं? नाचाया उबी राहिलीस का बोलाया ग? अशानं कुटं नाच हुतूया काय्? फेकून द्ये तो मोबाईल".