गद्यलेखन
आमचे गोंय (भाग ८) - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य
मन मानसी..
"जरी रोज कितीही बोललो तरी मला नाही वाटत आपलं हितगुज कधी संपेल.. मी चंचल, हळवा, हसरा, लाजरा आणि वाटलं तर तितकाच शांत, सुधीर, गंभीर आणि खंबीरही आणि तू अगदी माझीच प्रतीकृती आकाशीचा चंद्र प्रत्यक्षपणे पाहणाऱ्याला तू दिसावस आणि नदीच्या पाण्यातून पाहणाऱ्याला मी दिसावं इतकाच काय तो फरक..
आनंदाचे डोही...
इडली ऑर्कीड आणि प्रकाश वाटा
मागच्या महिन्यात दोन पुस्तक एका पाठोपाठ वाचली. योगायोगाने दोनीही आत्म-कथा , फारच भिन्न शेत्रात काम करणाऱ्या लोक्कांचे.
चारचौघी - ९
ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य
चारचौघी - ८
मला खुप आवडते त्याचे जगणे...
मला खुप आवडते त्याचे जगणे...
तो जगतो म्हणजे कधीही फक्त जिवंत नसतो... फक्त श्वास घेत नसतो...
तो खरोखर जगतो!
त्याच्याही जगण्याला आकार-उकार, काना-मात्रा, वेलांट्या वगैरे सगळं आहे. तुम्हाला आम्हाला असतं तसं.
त्याच्याही जगण्याला आहेच की दुःखाची किनार, सुखाची झालर... वगैरे वगैरे..
पण तरिही त्याचं जगणं उन्हात चमकणार्या भरजरी वस्त्रासारखे सुंदर वाटते...
आणि माझं जगणं त्याच्या जगण्यापुढे एखादा मलमलीचा तुकडा सावलीत वाळत घातल्यासारखं... स्वच्छ, शुभ्र,... पण तरिही त्याला भरजरीची सर नाही!
कुठून आणत असेल तो ही उर्जा?
कुठून शिकला असेल तो हे... जगणे?
एक गाणं...
मी क्षणा क्षणावर कोरत जाते एक गाणं...
शब्द कुणीतरी कानात सांगत जातं. चालही कुणीतरी आधीच ठरवलेली.
ताल, सूर, लय, ठेका... माझ्या मालकीचं काहीच नाही!
मी फक्त लिहीत जाते...
एक एक क्षण... भिरभिरत निसटणारा...
शिताफीनं पकडते अन् कोवळ्या नाजूक नखांनी एक एक शब्द त्यावर कोरत जाते.
काही क्षण निसटून जातात...
काही क्षण तुटतात, फाटतात, मिटतात, नासतात..
एवढं नुकसान गृहीत धरलंच पाहीजे नाही का?
पण तरिही... न थकता...
मी माझं गाणं पुरं करायच्या मागे लागते.
किंवा कुणीतरी त्याचं गाणं माझ्यामार्फत पुरं करायच्या मागे लागतो.
सुंदर आहे! खरोखर फार सुंदर आहे!!
Pages
