गद्यलेखन
मुलांना घरातील कामाचे पैसे...?
सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात घरात."
शून्य प्रहर
पैसा आणि पोट...
रात्र चढलेली. मुंबई परतीच्या प्रवासाला लागलेली. सकाळी रेल्वेतून उतरणाऱ्या गर्दीचे लोंढे आता रेल्वेत चढण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेच्या तयारीत. मीही याच गर्दीतला एक. रांगेतून चालणाऱ्या, पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकत चालणाऱ्या मुंगीसारखा. पुढचा थबकला तर थबकायचं. नाही तर चालत राहायचं. आसपास काही वेगळं जाणवलं, तरी तिकडे बघायचं नाही..
कारण, वेळ नसतो. गाडी चुकली, तर पुढे बस चुकते. मग स्टॉपवर रखडावं लागतं. सगळंच वेळापत्रक कोलमडतं.
त्यापेक्षा, आसपास न बघितलेलंच बरं.
सिग्नल ची झांसीराणी....
मला आठवतंय...फस्ट इयर चा शेवटचा पेपर होता त्या दिवशी..ताई घ्यायला आलेली..मी स्कुटी च्या मागल्या सीटवर बसून पेपर चेक करत होते (पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका बर का....नागपूर युनिवर्सिटी ला एकदा बदनामी चा डाग लागलेला असला तरी उत्तर पत्रिका नाही दिली आमची आम्हाला तपासायला त्यांनी कधी आणि हो हि खंत नाही बर का...:D ) दोन सिग्नल पार करून तिसर्या कुठल्याश्या मोठ्या सिग्नल वर गाडी थांबली होती....तेवढ्यात सायकल वर एक मुलगी शेजारी आली अगदी त्वेषात येउन सायकल वरून उतरली....सायकल stand वर लावून झपाझ
आवाहन (कविता पाठवा) : कै. सुचेता जोशी स्मृतीप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा...
नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४थे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास १५० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन असे विषय गेले तीन वर्ष दिले होते.
भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू
पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्या नेत्याचे भय असते.
ओळख खिलाडूवृत्तीची
टी.व्ही. या रोगाची लागण आयुष्यात लवकर झाली. काकाने १९८४ साली पहिला टी.व्ही. घरात आणला. 'क्राऊन'च्या त्या छोटेखानी मॉडेलने थोडक्या काळातच घरा-दाराचा कब्जा घेतला. मोठ्यांना सिनेमे-मालिका (आतासारख्या संथ चालणार्या नव्हेत!) यांची पर्वणी होती. छायागीत, चित्रहारच्या टायमिंगनुसार कामे होऊ लागली. मी लहान असल्याने मालिका वगैरेतले फारसे कळत नसे, फक्त 'फिर मिलेंगे ...हम लोग' म्हणणारा अशोक कुमार आणि त्यातली नन्हे, बडकी, लल्लु अशा आडवळणी नावाची पात्रे थोडी लक्षात आहेत.
प्रतारणा....
हो, मी प्रतारणा करतेय.
तुझ्याशी, त्याच्याशी, तिच्याशी, आई- बाबांशी, समाजाशी - नाही.
तर 'आयुष्या', तुझ्याशी!
जन्म झाला, पहिलावहिला श्वास घेताना माझ्या हाताची कोवळी बोटे तुझ्या कणखर हातात गुंफली.... अपार विश्वासाने. शेवटाच्या श्वासालाच ही पकड सुटेल, गृहीत धरलं असावं..
मी तुझ्यापेक्षा लहान, सर्वार्थाने! तू मोठा, सर्वार्थाने.
आणि म्हणूनच तू माझ्याही नकळत हात सोडवून घेऊन माझं बोट धरलंस.... ताबा घेतलास.
आता तू नेशील तशी निघाले..
माझ्या वाटा, माझ्या इच्छा, माझं जगणं, माझे बेत... नव्हतेच कुठे!
परत का आलात?
सध्या मी माझं भारतातील "फॉर गुड" आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मला "भारतात परत का आलात?" हा प्रश्न हमखास विचारला जातो. याला बरीच वैयक्तिक आणि नॉट-सो-वैयक्तिक करणं आहेत. त्यातील दुस-या श्रेणीतील सगळी महत्वाची आणि पहिल्या श्रेणीतील एकच मी सांगणार आहे
चारचौघी - १५ (अंतिम भाग)
'चारचौघी' ही कादंबरी या भागाद्वारे समाप्त होत आहे. मायबोली प्रशासन, प्रतिसाद व प्रोत्साहनदाते आणि वाचक यांचा मी ऋणी आहे. वकुबानुसार जमेल तशी लिहिली आहे. काही गोष्टी पटल्या नसल्यास किंवा चुकल्या असल्यास कथानकाच्या गाभ्याकडे अधिक मन वळवावेत इतकी विनंती करू शकतो.
मनापासून धन्यवाद!
-'बेफिकीर'!
==================
Pages
