गद्यलेखन

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

Submitted by किंकर on 6 June, 2013 - 00:01

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून….

'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत.

साडे अठरा हजार फूटांवरचं एक फूट....... !! (Unforgettable Ladakh)

Submitted by रसप on 4 June, 2013 - 01:09

'सुमूर' गावातली मॉनेस्ट्री पाहून आमची क्वालीस डिस्किट नदीच्या आजूबाजूच्या रेताड वाळवंटातून काढलेल्या डांबरी रस्त्याने कॅम्पकडे निघाली. आमचा रस्ता पर्वतातून उतरला होता आणि पर्वताकडेच चालला होता. ह्या मधल्या काही किलोमीटरच्या पट्ट्यात डिस्किट नदी आणि तिचं वाळवंट.

शब्दखुणा: 

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (?)

Submitted by आशयगुणे on 2 June, 2013 - 14:51

"जामिनाचे पैसे कोण भरतय?" पोलिसांनी मला विचारले.
"मी", मी उत्तर दिले.
पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. " कोण लागतो हा तुमचा?" मला प्रश्न विचारला गेला.
"मित्र ", मी उत्तरलो.
" जरा समजावा तुमच्या मित्राला", पोलिस ऑफिसर म्हणाले.
मी पैसे भरले, सही केली आणि जग्या बाहेर यायची वाट बघू लागलो.

You can not change your fate, NO MAN CAN ( लघुकथा )

Submitted by यःकश्चित on 2 June, 2013 - 05:05

You can not change your fate, NO MAN CAN

==========================================================

तो त्याच्या खोलीतून जवळपास ओरडतच बाहेर आला. खोली कसली, प्रयोगशाळाच होती ती. गेल्या ४ वर्षांपासून कसल्याश्या संशोधनात तो गुंतला होता. त्याची ती चार वर्षांची मेहनत आज फळाला आली होती. ते ओरडणंच सर्व काही सांगत होतं.

kathaस्वप्नांच्या पलीकडले १

Submitted by shilpa mahajan on 1 June, 2013 - 08:49

स्वप्नांच्या पलीकडले १

लहानपणा पासून मला पुराण वस्तू संशोधना विषयी एक वेगळेच आकर्षण वाटत आले आहे . संधी मिळाली रे मिळाली की मी जुने किल्ले , गुंफा , मंदिरे अशा जागांना भेट देत असे . मी नजीबाबाद ला असतानाची गोष्ट , कुणाकडून तरी कण्व मुनींच्या आश्रमा बद्दल कळले . झाले ! माझी उत्सुकता जागी झाली . आम्ही तिघा चौघांनी त्या जागेला भेट देण्याचा कार्यक्रम ठरवला .

शब्दखुणा: 

पण आज ती वैतागलेली होती!

Submitted by आर.ए.के. on 28 May, 2013 - 03:13

पाssssरब्रम्ह परमेश्वर, पाssssरब्रम्ह परमेश्वर, तूम सबके स्वामी,
ओsssम जय जगदीश हरे...!

झाड

Submitted by मी मुक्ता.. on 27 May, 2013 - 10:45

एक होतं अरण्य. त्या अरण्यात एक झाड होतं.. खरंतर फुलझाड... इतरांपेक्षा सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलं येणारं.. ऋतूचक्राच्या अखंड चाललेल्या प्रवासात टप्याटप्याला फुलांनी मोहरणारं.. बहराच्या ऋतूची वाट बघणारं.. बहराची कारणं शोधणारं.. आसुसून बहरणारं..
दरवर्षी पाऊस पडायचा.. मग शरदाचं चांदणं न्हाऊ घालायचं.. शिशिर यायचा पानगळ घेऊन.. आणि वसंताच्या चाहुलीबरोबरच झाड भरुन जायचं फुलांनी.. त्याच्या खास सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलांनी.. हळू हळू गळून जायची सगळी पानं.. उरायची ती फक्त फुलंच.. अशा वेळी झाडाचा रुबाब बघण्यासारखा असायचा.. समाधानाने अजूनच फुलून यायचं झाडाचं मन अशा वेळी..

शब्दखुणा: 

गंध दरवळला मनी

Submitted by गंधा on 26 May, 2013 - 05:56

आज दुपारी घरची आठवण आली आणि माझे डोळे पाणावले. आणि काय योगायोग तेवढ्यात मोबायिल वाजला म्हणून पाहू लागले तर गंधालीचा मिस-कौल आला होता. हे पाहून मला खूप बर वाटले होते. गांधली माझी जीवा-भावाचीच म्हणा ना तशी मैत्रिण.फार वर्षाची नव्हे तर सहा महिन्यांच्या कालावधीत अतूट मैत्री ठेऊन जपणारी अशी.

शब्दखुणा: 

जात.

Submitted by महाश्वेता on 23 May, 2013 - 22:13

नमस्कार मायबोलीकरांनो.
आज मी माझी पहिली कथा ईथे प्रकाशित करीत आहे.

''तु जे सांगतो आहेस ते अतिशय बरोबर आहे पण.....''
''पण काय''
''शेवटी जात आडवी येते.''
राकेशला हे ऐकुन धक्काच बसला.
आपला बाप जो समाज सुधारायच्या गप्पा मारतो त्याच्या तोंडून ही भाषा!
मग बाकिच्यांना बोलुन काय उपयोग
राकेश तावातावात नलिनीकडे गेला.
''नलिनी तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?''
''आता जीव दिला तर तुला कळणार आहे का कि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते!''
''तर मग नलू जर आपल्या प्रेमात जातीचा एकच अडथळा असेल तर मि आजपासुन माझी जात सोडली.''
''मग मीपण आजपासुन माझी जात सोडली, कारण तुझ्या प्रेमासमोर माझी जात काही नाही.''

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन