आम्ही तिघी

Submitted by आस्वाद on 16 October, 2013 - 16:39

आज पासून एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. घराच्या उबदार, सुरक्षित वातावरणातून नव्या, अनोळखी जगात पाऊल ठेवत होती मी. उद्या पासुन माझी नौकरी चालू होणार होती. त्यासाठी आई बाबा मला सोडायला आले होते मुंबईला. एका मोठ्या सॉफ्टवेर कंपनी मधे सॉफ्टवेर इंजिनियर म्हणून माझ selection झाल होत.

मनातून प्रचंड भीती वाटत होती. या कॉर्पोरेट वर्ल्ड मधे सगळे कसे असतील? माझा निभाव लागेल की नाही? धाकधुक होत होती. या सगळ्यात एकाच चांगली गोष्ट ही होती की सुरुवातीला ट्रेनिंग पीरियड होता 3 महिने. आणि या 3 महिन्यात कंपनीचा हॉस्टेल मिळणार होत राहायला. त्यामुळे मुंबई सारख्या शहरात पहिल्याच दिवशी राहण्याची सोय झाली होती.

माझ्या रूम वर अजुन दोघी जणी राहणार होत्या. त्यातली एक माझ्याच गावाची मराठी मुलगी होती. प्रीति. प्रीतिनी ओळख झाल्यावर सांगितल की हॉस्टेल वर ९0% south indian मुली आहेत. फक्त खालच्या फ्लोर वर एक मराठी मुलगी आहे. आम्ही तिला भेटायला खाली गेलो. आम्हाला पाहून तिला अगदी आनंदाच भरत आल. ती कोल्हापूर जवळच्या एका छोत्त्या गावातून आली होती. पूजा. तिला भेटून आम्ही आमच्या रूम वर आलो. मेस मधून आलेला डॅब्बा खाताना आईच्या हातच जेवण आठवल. डोळ्यातून येणारा पाणी आवरून मी जेवून घेत्ल.

कोणीच कोणाशी काही बोलत नव्ह्त. विचित्र ताण आला होता सगळ्यांच्या मनावर. एकमेकींना गुड नाइट करून आम्ही झोपायला गेलो. उद्या सकाळी आई उठावणार नव्हती. आपापल उठून, आवरून, सगळे डॉक्युमेंट्स घेऊन नवीन विश्वात पदार्पण करणार होतो. कित्ति tension! विचार करता करता मला झोप लागली, एवढ्यात बेल वाजली. मी दार उघडून पाहिल तर एक काळिसावळी, काटकुळी मुलगी उभी होती दारात. 'My Bag?' मी समोर ठेवलेली bag तिला दिली. 'Thanks' म्हणून ती निघून गेली. मी परत झोपायला आली. 5 मिनिट्स मधे परत बेल वाजली. वैतागून मी परत दार उघडल. परत तीच मुलगी! आता काय हवाय हिला? तर ती चक्क हिंदी मधे बोलू लागली. 'आप कल कितने बजे उतोगे?' ती. '6 बजे' मी. 'प्लीज़ आप मुझे भी उठादोगे क्या? actually, मेरे मोबाइल की बॅटरी डाउन हो गायी है और मेरे भैीय्या के पास मेरा चारजर रेह गया है. मेरे पास और कोई अलारम भी नाही है.' ती एका दमात बोलून गेली. मी पण हसून तिला होकार दिला. थॅंक्स'', म्हणून ती निघत होती. मी पटकन तिला विचारला, 'रूम नंबर? और आपका नाम?' 'पायल, रूम नंबर 602'. परत परत thanks म्हणून ती निघून गेली. मी पण पहिल्याच भेटीत सकाळी उठवायची जबबदारी टाकणार्‍या मुलीला हसत झोपी गेले.

क्रमश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks

Nice start Happy