ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.
२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.
भाग १० - http://www.maayboli.com/node/45475
भाग ११ - http://www.maayboli.com/node/45523
भाग १२ - http://www.maayboli.com/node/45579
भाग १३ - http://www.maayboli.com/node/45598
भाग १४ - http://www.maayboli.com/node/45630
*************************************************
आजीच्या शिकवणीची आठवण आल्याने माझं मन जागृत होत आहे त्याला पुढचा रस्ता मिणमिणत्या प्रकाशात का होईना दिसत आहे ह्याची जाणीव मला होऊ लागली होती. आणि त्याक्षणी मी ठरवलं हा जो वेळ मिळतो आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्यायचा, स्वतःच्या उन्नतीसाठी, सरिता साठी नव्हे तर सरिताच्या जन्माला आलेल्या ह्या शरिरात राहाणार्या 'मी'साठी.
मी फातिमाची वाट पाहात बसले. थोड्या वेळाने ती आली एक बॅग घेऊन. त्या बॅगेत मी हॉस्पिटलमधून वाचायला घेतलेली सगळी पुस्तकं होती. फातिमा ती पुस्तकं कपाटात ठेवू लागली. मी तिला थांबवलं तिला खूणेने सांगितलं की मी करेन हे काम. ती हसली आणि मागे फिरली. मी तिला हाक मारून थांबवलं, विचारलं "फातिमा, कॅन यु गिव्ह मी टी विथ जिंजर?" तिने होकारार्थी मान हलवली आणि एक मोठ्ठं स्मितहास्य करून ती बाहेर गेली. मी ती पुस्तकं मी मला हवी तशी लावायला सुरुवात केली. आणि मला हवं असलेलं पुस्तक हातात आल्यावर मी ते घेऊन पलंगावर बसकण मारली. The Interpersonal Theory of Psychiatry. हे पुस्तक मला कदाचित माझी वाट दाखवू शकलं असतं. इथून सुटका होणार नसली तरी रफिकशी कसं वागायचं पुढे जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच्या घरच्यांशी कसं वागायचं ह्याचा अंदाज मला ह्या पुस्तकामुळे येईल असं मला वाटत होतं. चहा झाला. पुस्तकात डोकं घालून बराच वेळ गेला. फातिमा चक्कर टाकायला आली.मला वाटतं तेव्हा टी.व्ही. चालू नव्हता त्यामुळे ती मी नक्की काय करत आहे ते पाहायला आली असणार. मी तिला खूणेनेच विचारलं किती वाजले. ती पट्कन बाहेर जाऊन घड्याळ घेऊन आली आणि माझ्या शेजारी ठेवलं. माझ्या प्रत्येक प्रश्नाला हिच्याकडे उत्तर कसं असतं मला प्रश्न पडला. घड्याळाला अलार्मची सोय होती. हे अधिक चांगलं होतं. जेवणाची वेळ होत आली होती. फातिमाने मला विचारलं "लंच?" फारशी भूक लागली नव्हती. तिला नको म्हणून सांगितलं. तिने मला जेव्हा जेवायला हवं असेल तेव्हा तिला नुसती हाक मारायला सांगितली. मीदेखील तिचे आभार मानून तिला हो म्हणून सांगितलं.
बर्याच दिवसांनी पुस्तक वाचत होते. खूप हलकं वाटत होतं. थोड्या वेळापूर्वी सुचल्याप्रमाणे मेडिटेशन करायचं ठरवलं. मग हेही आठवलं मेडिटेशन जास्त इफेक्टिव्ह होण्यासाठी शरीर थोडं थकायला हवं होतं आणि थोडी भूक देखील लागायला हवी होती. लक्षात आलं इथे आल्यापासून व्यायाम योग सगळच बंद झालं होतं. तसं सुद्धा सुदॄढ मन सुदॄढ शरीरात राहतं असं आजी म्हणायची. आत्ता ह्या वयातसुद्धा आजी योगासनं करत असे. खाऊन तसा थोडा वेळ झाला होता, योगासनांसाठी वॉर्मअप करायला सुरु केले. मन त्यातच रमत गेलं. सर्वात शेवटी सूर्यनमस्कार करून शवासन करत असताना पुन्हा फातिमा आत आली.मी शवासनातून उठेपर्यंत ती थांबून राहिली होती. कदाचित मी काय करते आहे हे पाहायला आली असेल. ती सारखी सारखी माझ्यावर लक्ष का ठेवत होती अचानक इतक्या दिवसांनी? मी तिच्याकडे बघून हसले. आणि तिला सांगितलं मी अजून अर्ध्या तासानंतर जेवेन. तीदेखील समाधानाने परत गेली. खूप खूप मो़कळं वाटत होतं मेडिटेशन करताना मनात पुन्हा एकदा विचारांची गर्दी झाली. त्या विचारांच्या गर्दीतून स्वतःच्या मनाला बाहेर काढताना आज खूप वेळ लागला. साहजिक होतं हे एवढं सगळं होऊन गेल्यावर मी पहिल्यांदाच मेडिटेशन करत होते.
मेडिटेशन झालं आणि मी रफिकने आणून दिलेला आयपॉड चालू केला. हे सगळे श्लोक ऐकत असता फातिमा जेवण घेऊन आली. जेवणात पराठे आणि छोले होते. का कोण जाणे मला जेवण खूप मसालेदार वाटलं. कदाचित मन हलकं झाल्याचा परिणाम असेल. पूर्ण दुपार श्लोक ऐकत विचार करत बसले होते.
संध्याकाळी रफिक आला. बुद्धीबळ शिकवायला.
मी धीर करून त्याला म्हटलं, "रामण्णाला जेवण थोडं हलकं बनवायला सांगता येईल का? "
"हलकं म्हणजे?"
"म्हणजे थोडं तेल आणि तिखट आणि मसाले कमी शिवाय जमलं तर थोडं सात्विक."
"अग, सांगतो की, पण तू हे घाबरत का विचारत आहेस? अजून काही हवे आहे का?"
"आणि मला एक डायरी आणि पेन किंवा पेन्सिल मिळेल का?"
"नाही."
"प्लीज. विश्वास ठेव माझ्यावर, मला कळून चुकलय मला आयुष्याच्या शेवटापर्यंत इथेच राहायचं आहे. मी कोणालाही चिठ्ठी किंवा पत्र काहीही पाठवणार नाहिये, मला लहानपणापासून डायरी लिहायची सवय आहे. तू वाचू शकतोस."
"टॅबवर तुला नोट्सचं अॅप्लिकेशन चालू करून देतो."
"चालेल. आणि आयपॉडवर स्पीकर मोड नाहीये ना? मला श्लोक स्पीकर्वर ऐकायला जास्त आवडेल."
"ठीक आहे. टॅबवर ऐक. सगळं टॅबवर कॉपी करून देतो. अजून काही"
"हरकत नसेल तर मला दोन मराठी पुस्तकं हवी होती."
"कोणती?"
" दासबोध आणि ज्ञानेश्वरी."
"अग तुला मी श्लोक ऐकायला आणून दिलेत. आता काय इथे हिंदू धर्माचे क्लास सुरू करणार आहेस का?"
"सॉरी. माझा तसा हेतू नव्हता. मनाला शिस्त लावायला. . तुझ्या आयुष्यात राहावं लागणार हे सत्य स्वीकारायला. तुझ्या आयुष्यात राहयचं असेल तर तुझ्या घरच्यांशीदेखील पुढे मागे जुळवून घ्यावं लागणार त्याकरता मनाला वळण लावायला. "
रफिकने माझ्याकडे संशयाने पाहिलं.
"असं संशयाने नको पाहूस. माझा पासपोर्ट तुझ्याकडे आहे. मी इथून बाहेर पडू शकत नाही मला माहित आहे. आलेल्या परिस्थितीला शरण जाण्यापलिकडे माझ्या हातात काहीही नाही. चिडचिड करत झगडत त्या परिस्थितीचा बळी होण्यापेक्षा शांतपने त्या परिस्थितीला शरण जावं असं मला वाटू लागलं आहे."
"म्हणजे नक्की काय करणार आहेस."
"माहित नाही. पण सर्वात प्रथम मी इथे अडकले आहे त्याबद्दल जी चिडचिड होत होती तिला थांबवणार. त्यानंतर मन शांत करणार. मग पुढचा विचार करेन."
"आत्ता सुद्धा भरपूर विचार केला आहेस असं दिसतय."
"भरपूर वेळ आहे हातात दुसरं काय करणार? मला मिळतील ना ती पुस्तकं?"
"ऑनलाईन मिळाली तर डाऊनलोड करतो नाहीतर मागवतो. मागवायला लागली तर थोडा वेळ लागेल. पण काय ग, तू पहिल्यापासून अशी धार्मिक आहेस का?"
"धार्मिक नाही पण देव मानते. हेही मानते की देवाचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. हेही मानते की धर्म म्हणजे आपली जगण्याची पद्धत."
"मला पटतय की तुला निवडून मी चूक नाही केली. मला अंदाज होताच तू हुशार आहेस."
"मला निवडून म्हणजे?"
"नाही काही नाही" रफिक गडबडून म्हणाला आणि बुद्धीबळाला सुरुवात झाली.
आता मात्र माझा दिवस मी प्लान केला होता खूप व्यवस्थित. उठले की मेडिटेशन. मग योगासने, प्राणायाम. मग आंघोळ वगैरे आवरणे. नाश्ता करणे त्याचसोबत श्लोक ऐकणे. त्यानंतर सायकॉलॉजीची आणलेली पुस्तके वाचणे. नोट्स काढणे. जेवणे मग थोडा वेळ डुलकी काढली की पुन्हा मेडिटेशन, मग दासबोध वाचणे. संध्याकाळचं जेवण मी लवकर जेवायला सुरुवात केली होती. त्यामुळे रफिक येण्यापूर्वी माझं जेवून होत असे. मग रफिक कडून बुद्धीबळ शिकणे आणि रात्री परत सगळे श्लोक ऐकणे, डायरी लिहिणे आणि झोपणे. एक कटाक्ष पाळत होते. रोज होणार्या सगळ्या गोष्टी मी डायरीमध्ये लिहायचे, पण भविष्याचा मी विचार काय करत होते ते कधीही लिहिलं नाही.
साधारण महिना असाच गेला. मी आता माझी बुद्धीबळ विद्यार्थ्याची भूमिका बदलून बुद्धीबळ खेळू लागले होते. मात्र खर्या सफाईने मला बुद्धीबळ खेळता येत नव्हतं. बुद्धीबळ खेळण्यात एक फायदा होता. रफिकसोबत जास्त वेळ घालवता येत होता. तो कसा विचार करतो हे कळून घेण्याचा प्रयत्न करता येत होता. पण अजून तरी काही फायदा झाला नव्हता. त्याची बॉडी लँग्वेज समजून घेणं इतकं सोपं नव्हतं स्वतःचे विचार तो फारसे व्यक्त करत नसे.
अजूनही मला कायम इथेच राहयचं आहे ह विचार मला पचलाच नव्हता. त्यामुळे पुढे काय ह्याचा विचार माझं मन सतत करत असे. अशीच पुस्तकं वाचताना एक माहिती मिळाली, आपण जसा विचार करतो आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याप्रमाणे गोष्टी घडतात. आपण सतत जी गोष्ट नाकारत असतो त्या गोष्टीदेखील होतात कारण आपलं मन सतत त्याच गोष्टी पाहात असतं चित्रांच्या स्वरूपात, त्याला हो नाही कळत नाही. त्याला कळतात फक्त चित्र. म्हणजे मला जर लाल रंग नको असेल तर मी लाल रंग नको म्हणून काही फायदा नाही, मला लाल रंगच दिसणार त्याऐवजी मला कोणता रंग हवा ह्याचा विचार करून तो रंग पाहाणं आणि अशाप्रकारे लाल रंग स्वतःपासून दूर करणं जास्त सोपं आणि अचिव्हेबल असतं.
जर असं असेल तर मग मी रफिकच्या आयुष्यात राहयचा कधी विचार केला होता की मी इथे अडकले, मी स्वतःलाच विचारलं.
क्रमशः
पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45780
(No subject)
वा, वा! दोन-तीन ठिकाणी
वा, वा! दोन-तीन ठिकाणी वेगवेगळी वळणं दिसली मला आजच्या भागात. बघूयात कशी काय पुढे जातेय कथा.
changalich pudhe jat ahe
changalich pudhe jat ahe katha navin bhagachi vaaaat pahatoyyy pan jara motha bhag dya
छान!
छान!
(No subject)
aajicha bhag pan khup
aajicha bhag pan khup avadala.
खुप छान !!
खुप छान !!
हा भाग मस्तच झालाय
हा भाग मस्तच झालाय
वा.. हा भाग पण एकदम मस्त...
वा.. हा भाग पण एकदम मस्त...
छान चालूये कथा
छान चालूये कथा
कथानायिकेमधील पॉझिटिव्ह बदल
कथानायिकेमधील पॉझिटिव्ह बदल अगदी डिटेल्ड घाई न करता मांडले आहेस. आणि मामींनी म्हटल्याप्रमाणे २-३ ठिकाणी (कथा वळण घेइल याचे) अस्पष्ट संकेतही आले आहेत. पण मांडणी मस्तच. लिहीत राहा. उत्सुकता वाढतेय.
पुढच्या भागाची तयारी करते
पुढच्या भागाची तयारी करते आहे. तोपण असाच छान होईल आणि तुम्हाला आवडेल असे वाटते.
वल्लरी मस्तच्...पुढ्चा भाग
वल्लरी मस्तच्...पुढ्चा भाग आला आहे का इतकेच बघायला सध्या माबो वर येतेय. छान लिहित आहेस. ऑल दी बेस्ट. लवकर लवकर भाग टाक पुढचा.
मला मजा येते आहे हे वाचायला.
मला मजा येते आहे हे वाचायला. सुरुवातीला जरा कंटाळवाणं वाटलं पण आजचा भाग वाचून पुढे काय होणार ही उत्सुकता वाटते आहे.
वल्लरी मस्तच्... khupach
वल्लरी मस्तच्...
khupach chan
वल्लरी , मस्तच गं!!!!!
वल्लरी , मस्तच गं!!!!!
मस्तच!
मस्तच!
वल्लरी मस्तच्...पुढ्चा भाग
वल्लरी मस्तच्...पुढ्चा भाग आला आहे का इतकेच बघायला सध्या माबो वर येतेय. छान लिहित आहेस. ऑल दी बेस्ट. लवकर लवकर भाग टाक पुढचा. +१
वल्लरी मस्तच झाला आहे भाग ...
वल्लरी मस्तच झाला आहे भाग ... खूप छान. पुढचे भागपण लौकर टाका.. तुमच्या लेखनाची उत्सुकतेने वाट पाहतो आम्ही
Sahich. Very very curious to
Sahich. Very very curious to read further.
Vidya.
छान चाललय लौकर टाका पुढचा भाग
छान चाललय लौकर टाका पुढचा भाग
छान भाग!
छान भाग!
वा.. हा भाग पण एकदम मस्त...
वा.. हा भाग पण एकदम मस्त...