मी म्हणे एक जनावर आहे. माझा मालक मला प्रेमानं शिक्र्या म्हणतो, रागवला तर भिक्र्या म्हणतो.. पण त्यानं काही फरक पडत नाही कारण मालक म्हंटला कि त्याला सगळे अधिकार मिळालेले असतात, मारण्याचे...कुरवाळण्याचे...
तर महत्वाचं म्हणजे मी एक मानाचं जनावर आहे. आमच्या इथं एक फार मोठा देव आहे. त्याला खूप गर्दी होते त्यावरुन तो खूप मोठ्ठा देव असावा. त्या देवाच्या यात्रेला खूप लोक जमतात. मला त्या यात्रेत देवाच्या गाडीला जोडलेलं असतं. माझ्याशिवाय दुसरं कुणी तिथं जोडत नाहीत. तो आमचा मान आहे. माझ्या आधी माझ्या बा ला जोडायचे. माझा बा फार हाल होउन मेला...
देवाच्या यात्रेत खूप सारे रंग उधळतात. मला दिसेनासं होतं. मग मी धडपडतो. तर मला चाबकानं हाणतात. माझ्या ढुंगणात काठीनं ढोसतात.मग मी अजूनच गडबडतो. फार मारतात मग! तुम्हाला असं ढोसलं तर चालू शकाल सरळ?? जनावरानं माणसांना प्रश्न नसतो करायचा.. जनावरं बोलत नाहीत. माणसं फार बोलतात...
देवाच्या गाडीसमोर माणसं धिंगाणा घालतात...नाचतात..ढोल, ताशे, झांजा, डिजे... मला त्या आवाजांनी बिचकायला होतं. वेडीवाकडी माणसं नाचताना पाहून मलाही नाचावंसं वाटतं. मी तसा प्रयत्न केलाच तर असतोच बांबू माझ्या पेकाटात. वर जनावर उधळलं म्हणून माझ्या गळ्यात नाहीतर पायात मोठा ओंडका बांधतात. दुसर्याला ताब्यात ठेवण्याच्या किती कला माणसांना येतात??
यात्रेआधी मला स्वच्छ अंघोळ घालतात. मला रंग फासतात. त्या रंगांनी फार खाजतं. पण जनावरांनी तक्रार नसते करायची. मला खूप खायला घालतात. तेव्हाच मला कळतं कि आता देवाच्या यात्रेसोबत माझी मरण यात्रा निघणार आहे. माझ्या अंगावर रंगीत कपडे चढवतात. मग मी सुंदर दिसतो म्हणे ! जनावराला बळंच कपडे चढवणारी माणसं बायांची कापडं का उतरवतात काय माहीत?...
लोक येतात. देवाचं थोडंतरी दर्शन व्हावं म्हणून दंगा करतात. मग देव नाही दिसला तर निदान देवाचं जनावर तरी म्हणून मला स्पर्श करतात. अंगठ्या, घड्याळं, बांगड्या, नखं टोचत रहातात. मी आपला पापण्यांची संथ उघडझाप करीत हे सारं सहन करतो...
पहाटे कधीतरी यात्रा संपते. मग मला देवाबाहेर कोपर्यात बांधतात. पाणी देतात. खायला देतात. अंधार असतो. हा शांत अंधार मला फार आवडतो. मला ह्या अंधारात देव भेटतो. मग छान झोप येते. आता काही दिवस तरी माझी सुटका झालेली असते.
शेती , स्वयंपाकघर, शाळा, गाड्या, ट्रॅक्टर सगळं एवढं आधुनिक झालेलं असताना देवाच्या गाडीला मात्र जनावरंच बांधतात. देवाला टेक्नॉलॉजी चालत नाहीत का? बरं जाउ दे, असले प्रश्न विचारले कि म्हणतात, 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा...', एवढा घोडा झालाय तरी...', माजलाय रेड्यासारखा..', कुत्रा कुठला!', '
गाढव आहे नुसता...'
म्हणून मी तमाम जनावरांची आब सांभाळत शांत राहतो..
मी मानाचा असल्यानं मला दुसर्या जनावरात मिसळू देत नाहीत. दिवसभर साखळ्यांनी बांधलेलं असतं. सकाळ संध्याकाळ फिरवुन आणतात पण नाकातुन दोरखंड घालून......
मी एकटा असतो. खूप लोक मला बघायला येतात. चार, आठ आणे, खोबर्याचे तुकडे माझ्यावर फेकतात.
दुखतं.. पण... गड्याहो, मी मानाचा आहे ना!
चला आता जरा झोपतो. उद्या तिकडे देवीची यात्रा आहे, तिथलं नेहमीचं जनावर हाल होउन मेलं. तिथंच कुठंतरी त्याचं उरकलं म्हणे. तर त्या जागेवर मला जायचं. येतो बरं का.
हम्म.. जनावरानं निरोप घेण्यासाठीसुद्धा वळून पहायचं नसत ना... जातो मी.....
मी एक जनावर...
Submitted by पल्ली on 30 December, 2013 - 10:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निशब्द.........
निशब्द.........
छान लिहिलं आहेस. कटू सत्य
छान लिहिलं आहेस. कटू सत्य आहे, अगदी विचार करायला लावणारं.
....
....
(No subject)
भिडण्यासाठी आणि भिडण्यासारखंच
भिडण्यासाठी आणि भिडण्यासारखंच लिहिलंय.. आणि भिडलं खरंच..
विचार करायला लावणारं लेखन!
विचार करायला लावणारं लेखन!
(No subject)
<< आणि भिडलं खरंच.. >> १००%
<< आणि भिडलं खरंच.. >> १००% सहमत.
" परवां मिरवायला नेलं मला जत्रेला. तिथं चुलत भाऊ दिसला . कपाळावर टीळा. गळ्यात भलामोठ्ठा हार.
जवळ गेलो तर त्येचा एक डोळा फुटलेला, अंगावर हळद भरलेल्या जखमा !' अरे, 'झुंजी'तला चँपियन झालोय आतां. गेल्या झुंजीत मरतां मरतां वांचलो आणि जिंकलो. आतां सातार्याचा कुणी दांडगा येणार आहे झुंजीसाठी. बहुतेक शेवटचीच असेल माझी ती झुंज !!' . मनांत म्हटलं , आपण माणसांचा तरी मार खातो; पण आपल्याच जातभाईंकडून जीवघेणी मारहाण किंवा त्यांच्याच पोटात शिंगं खुपसायचं पाप तरी नाही आलं आपल्या वाटेला !! "
(No subject)
(No subject)
(No subject)
अत्यंत सुंदर मांडले गेले
अत्यंत सुंदर मांडले गेले आहे.....
यावर कविता अथवा गझल झाली पाहिजे नक्कीच
आभारी मंडळी... पाषाण रोडला
आभारी मंडळी... पाषाण रोडला गणपतीत असा एक बैल जोडलेला मी खूप जवळून पाहिला. ट्रॅफिक जाम झाल्यानं मी अगदी त्याच्या चेहर्या जवळ थांबले होते.. तो गुलाल, आवाज, बिभत्स नाच मला सहन होत नव्हता.. त्या बैलाच्या डोळ्यात वेदना, करुणा, अगतिकता दिसल्यासारखे वाटले. मला त्या जनावराची भिती वाटण्याऐवजी अतीव कीव आली... मग हे लिहिलं........ नंतर टिळक रोडला हत्ती गणपतीच्या मिरवणूकित मात्र श्री गजाननाचा रथ सारे भक्त ओढीत होते आणि कुठलाही बिभत्सपणा नव्हता, लयीत ढोल, ताशे,... शिवाय गुलाल नाही हे सारं पाहून बरं वाटलं... अभिनंदन आणि धन्यवाद त्या मंडळाचे....
(No subject)
छान लिहलय!
छान लिहलय!
(No subject)
>>जनावराला बळंच कपडे चढवणारी
>>जनावराला बळंच कपडे चढवणारी माणसं बायांची कापडं का उतरवतात काय माहीत?...<<
हा ना! आन सोता बी अंगभर कापड घालत्यात.
छान लिहलय...
छान लिहलय...
निशब्द................!!!
निशब्द................!!!
(No subject)
आभारी
आभारी