गद्यलेखन

२०५० मध्ये जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या असतील?

Submitted by बोबो निलेश on 19 February, 2014 - 10:59

ज्ञान जालावर वाचलेला एक चित्तवेधक लेख. असं खरंच होईल का?
त्याचा सारांश अनुवादाच्या रुपात - खास माबोकरांसाठी -

एंगको नामक भाषांच्या भवितव्याविषयी अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलनुसार शतकाच्या मध्यापर्यंत(२०५०) जगात खालील पाच भाषा सर्वाधिक बोलल्या जातील.
१) चायनीज (मॅन्डरीन)
२) स्पॅनिश
३) इंग्लिश
४) हिंदी - उर्दू
५) अरेबिक

२०५० पर्यंत सर्वात जास्त स्पॅनिश बोलणारे लोक अमेरिकेत असतील.

शब्दखुणा: 

अन्या - १४

Submitted by बेफ़िकीर on 19 February, 2014 - 05:09

आपण कोण आहोत या विषयावर इतका विचार करायची वेळ अन्यावर आजतागायत आलेली नव्हती. आई भूक लागली की झुरळे शोधून खायची. बाप दारू पिण्यापुरता जागा असायचा. आपण कोणी झोपडीबाहेर फेकलेले अन्न खाऊन किंवा अन्न चोरून जगायचो. रानोमाळ भटकायचो. स्वच्छतेचा गंधही नव्हता. कोणीही यावे आणि कान पिळावा किंवा चार दणके देऊन थाटात निघून जावे अशी आपली अवस्था होती. दुबेच्या कोंबडीवर आपली वाईट नजर पडली आणि दुबेने आपल्याला सडकावून काढले. मग आपण पळ काढला. मग तालुक्याला गेलो. चिटभर किरकोळ चमत्कार दाखवून जनतेला नादी लावले. बघता बघता इतके मोठे झालो की आता आपल्यालाच हे खरे वाटत नाही आहे.

शब्दखुणा: 

तानाजी..

Submitted by बागेश्री on 19 February, 2014 - 03:14

...तो एकटाच होता, त्या रस्त्यावर! भरदूपारचं डांबर वितळवणाऱ्या उन्हात आणखी कुणी बाहेर असण्याची शक्यताही कमीच.

चढावर सायकल जड जाऊ लागली तसा तो पायउतार झाला, आता एका हाताने सायकलचं एक हँडल धरून मागे कॅरियरला लावलेला पत्रांचा गठ्ठा त्याने एकसारखा केला, उन्हाने रापलेल्या चेहऱ्यावरची घामाची धार निपटून काढली, सायकल रेटत चाल सुरूच होती, त्याच्या चपलांची करकर वगळता सारं निश्चल. मधूनच एखादी टिटवी वातावरणाची शांतता भेदत शांत होत होती. ओठांवरची कोरड जीभ फिरवूनही शमेना..

माझी मैत्रीण

Submitted by दिव्यश्री. on 18 February, 2014 - 06:56

माझी मैत्रीण ,जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली ,आधार दिला, मला समजून घेतेलं आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या प्यांटवाल्यांची आई ,अर्थातच माझ्या सासूबाई. Happy

अतिशय प्रेमळ ,नेहमी गोड बोलणाऱ्या ,कोणालाही कधीही न दुखावणार्या अशा माझ्या सासूबाई, सौ.सुमती. जेंव्हा माझ लग्न ठरलं होत तेंव्हाच मला त्यांच्या स्वभावाची प्रचीती आली होती.त्याचं आयुष्य एका खेड्यात गेल. त्यांनी नेहमीच प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारली .कधीही कोणती तक्रार नाही अगदी नशिबाविषयी सुद्धा .मला त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट ,त्या कायम हसतमुख असतात . Happy

ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १५

Submitted by स्वप्ना_राज on 18 February, 2014 - 00:13

'बाईची जात' म्हणजे काय ग आई?

'बाई' म्हणजे सरस्वती असणं
लग्नाच्या बाजारातलं रंगरुपाच्या भावातलं विकणं
'बाई' म्हणजे काली असणं
स्वत:च्याच घरात सातच्या आत असणं
'बाई' म्हणजे लक्ष्मी असणं
सासरच्यांसाठी फक्त धनाची पेटी असणं
'बाई' म्हणजे सगळ्यांचा विचार करत बसणं
स्वार्थ नावाच्या पापापासून पूर्णपणे मुक्त असणं
'बाई' म्हणजे होम मिनिस्टर असणं
दाराबाहेरच्या पाटीवर नावसुध्दा नसणं
'बाई' म्हणजे नुसतं शरीर असणं
मनाचं मात्र असून कोणालाही न दिसणं
'बाई' म्हणजे आई, मुलगी, बायको, बहिण असणं
नात्यापलीकडच्या नरांना नुसती मादी दिसणं
'बाई' म्हणजे युगायुगांचं कोडं असणं

स्वप्न आणि वास्तव - भाग १

Submitted by बोबो निलेश on 17 February, 2014 - 22:05

मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले.

शब्दखुणा: 

माझं काय चुकलं?

Submitted by निल्सन on 17 February, 2014 - 07:29

नमस्कार,
हा माझा पहिलाच लेख. मला अजिबात लिहता येत नाही पण खुप दिवसांपासुन मनात काहीतरी साचलय ते लिहतेय. व्याकरण, लेखनात खुप चुका असतील पण मोठ्या मनाने माफ करा व माझी कळकळ समजुन घ्या. माझ्या नात्यातली एक स्त्री तिची ही कहाणी तिच्या शब्दात.....

शब्दखुणा: 

ॲडम, इव्ह आणि सफरचंद … पण किंचितसे किडलेले !!

Submitted by SureshShinde on 16 February, 2014 - 14:28

ॲडम, इव्ह आणि सफरचंद … पण किंचितसे किडलेले !!

adamEvefreesmall.jpg

"डॉक्टर, गेले सहा दिवस मी आजारी आहे."

अंतरपाटातील अंतर

Submitted by Anvita on 16 February, 2014 - 01:03

मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन