नमस्कार,
हा माझा पहिलाच लेख. मला अजिबात लिहता येत नाही पण खुप दिवसांपासुन मनात काहीतरी साचलय ते लिहतेय. व्याकरण, लेखनात खुप चुका असतील पण मोठ्या मनाने माफ करा व माझी कळकळ समजुन घ्या. माझ्या नात्यातली एक स्त्री तिची ही कहाणी तिच्या शब्दात.....
माझ्या नवर्याचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. त्याच सगळीकडुन खुप कौतुक होत आहे. तसा हा त्याचा दुसरा सिनेमा, पहिला त्याने एक तो छोटा सिनेमा असतो ना तो बनविला होता. त्याला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी - हिंदी कलाकारांसोबत फोटो, खुप नाव झालं आणि आता हा मोठा सिनेमा बनविला आहे त्यांनी. लोकाकंडुन ऐकते, टीव्हीवर बघते सगळे खुप कौतुक करत्यात म्हणतात एक वेगळा सिनेमा आहे, विचार करायला लावणारा आणि दिग्दर्शक म्हणुन माझ्या नवर्याचं तर किती कौतुक पण या सगळ्यात मी कुठे आहे?
घरात आम्ही ४ बहिणी २ भाऊ आई-वडिल असा परिवार. आमची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांनी आम्हाला अक्षर ओळ्ख होईल एव्हढं शिकवलं. म्हंजे पुढे आम्हीच शिकलो नाही आणि त्यांनी बळजबरी केली नाही.
थोडी अल्लडच होते जेव्हा घरच्यांनी लग्न लावून दिले याच्यासोबत. लग्न होवुन नव्या संसारात नांदु लागली. घरकामाची सवय तर होतीच त्यामुळे सासरी सगळे करु लागली. सासरची मंडळी खुष होती. नव्या नवलाईचे दिवस कसे आनंदात निघुन गेले. नवरा अजुन शिकत होता म्हणुन तो बाहेरगावी राहु लागला. गावात सगळ्यात जास्त शिकलेला आणि अजुनही शिकतोय म्हणुन कोण अभिमान होता मला माझ्या नवर्याचा. या अभिमानापुढे त्याचं दुर राहणं ही खुपत नव्हत मला. तसा तो येऊन जाऊन असायचा पण हळुहळु अभ्यास, परीक्षा या कारणांनी तही कमीकमी होत गेले.
नंतर समजले कि तो सिनेमा कसा बनवायचा हे शिकतोय. काय मज्जा वाटली मला. अरे वा आता माझा नवरा सिनेमा बनविणार मग त्यात हिरोहेरोईनी असणार, मी त्याच्यासोबत शुटींग बघायला जाणार, त्यांना भेटणार आणि गावातल्यांसमोर मी उगाचच भाव खाणार पण त्याच्या जगात मला स्थानच नव्हते. आता त्याला मी अडाणी वाटु लागली. माझ्यासोबत राहण त्याला आवडेनास झालं, त्याला माझी लाज वाटु लागली. तो घरी येईनासा झाला आला तरी मला टाळत होता. माझ्या घरातल्यांनी विचारले असता मला घट्स्फोट हवा असे सांगितले.
त्याच्या उच्चशिक्षणाने आमच्यातील अंतर एव्हढे वाढविले की आता ते कमी होणे शक्य नव्हते. आज आमच्या लग्नाला १२-१३ वर्षे झाली असतील पण आम्ही संसार केलाच नाही. मुलं होत नाही म्हणुन मला लोक वांझोटी बोलुन थकले त्यांनाही खर कारण समजल असेल. आता मी आईकडे राहते, भावाचा संसार सांभाळते. नवर्याबद्द्ल काही समजेल म्हणुन पेपर वाचते, टिव्ही पाहते. त्याचं होणार कौतुक मनात आनंद आणि डोळ्यात पाणी घेऊन पाहते. तो क्धीतरी येऊन मला घेऊन जाईल ही आशापण नाही कारण तो आता दुसरीसोबत राहतो हे समजलय मला.
मी त्याच्यावर तेव्हढ्च प्रेम करते जेव्हढं मी लग्न झाल्यावर त्याच्या सहवासात असताना करत होते. त्याच्या शिक्षणाच्या ओढीपुढे त्याला ते दिसले नसेल पण मी ही त्याच्यावर कधी बायकोशाही गाजवली नाही. नेहमी त्याला पाठिंबा दिला. पण आज मी कोण आहे? आज मी नवर्याने टाकलेली बाई म्हणुन जगतेय. दिवसभर आनंदाचा मुखवटा घालुन रात्री उशी भिजवितेय. स्वत:ला प्रश्न विचारतेय 'यात माझी काय चुक'?
माझ्या घरच्यांनी मला शिकविले नाही ही माझी चुक? कि मला शहरातील मुलींसारखे छान वागता / बोलता येत नाही ही माझी चुक? कि तुला लग्न जमविताना मी आवडले की नाही हे कुणी विचारले नाही ही माझी चुक? कि लग्नानंतर तुला सर्वस्व अर्पण केले ही माझी चुक? कि तुझ्या शिक्षणाला पाठिंबा दिला ही माझी चुक? कि तुझ्या बाहेरगावी राहण्यास विरोध नाही केला ही माझी चुक?
आता माझ्याच घरात भावा-वहिनींनी मन सांभाळत आश्रीतासारखं आयुष्य काढायचं आणि रोज स्वतःला विचारायचं ' यात माझं काय चुकलं?
हा सगळा विचार करताय तुम्ही
हा सगळा विचार करताय तुम्ही हीच काय ती चूक!
जिथे स्वतःची काहीच चूक नसते तिथे "माझी काय चूक" हा विचार करत बसणं आणि ते उशा वगैरे भिजवणं हीच चूक!
मूव्ह ऑन!
स्वतःला सिद्ध करा... दुसर्या कोणापाशी नाही तुमच्या स्वतःपाशी....
स्वतःच्या मनातलं स्वतःचं स्थान खूऊऊऊऊऊऊप उंचीवर पोहचेल असं स्वतःसाठी काही तरी करा.
गुंतवून घ्या स्वतःला कशात तरी आणि एक दिवशी उठाल आणि आरश्यात पहाल तेंव्हा स्वतःलाच वाटेल की येस मी करून दाखवलं!
असलं काही करावसं तुम्हाला आत्तापर्यंत वाटलं नाहीये हीच तुमची चूक आहे
भूतकाळ आपल्या हातात नसतो तेंव्हा त्याला जोरदार किक मारून दूऊऊऊऊऊऊर फेकून द्यावं.
नव्याने सुरूवात करा सगळ्याची!
ऑल द बेस्ट
रिया +१ >>माझ्या घरच्यांनी
रिया +१
>>माझ्या घरच्यांनी मला शिकविले नाही ही माझी चुक? कि मला शहरातील मुलींसारखे छान वागता / बोलता येत नाही ही माझी चुक? कि तुला लग्न जमविताना मी आवडले की नाही हे कुणी विचारले नाही ही माझी चुक? कि लग्नानंतर तुला सर्वस्व अर्पण केले ही माझी चुक? कि तुझ्या शिक्षणाला पाठिंबा दिला ही माझी चुक? कि तुझ्या बाहेरगावी राहण्यास विरोध नाही केला ही माझी चुक?>>
ह्या बाईंच्या माहेरची परिस्थिती माहिती नाही पण तिथून थोडातरी पाठिंबा असला तर त्यांनी आता अजून शिकावं. त्यांच्या नवर्यानी आयुष्यात कष्ट केले आणि जे काही यश मिळवलं त्याचा जर त्यांना आनंदच असेल, तर आता त्याला सोडून स्वतःच्या आयुष्यात पुढे जावं. वर लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना स्वकर्तुत्वानेच द्यावी लागतील. आपले शिक्षण कमी, आपण शहरातल्या मुलींसारख्या 'छान' नाही, हा न्युनगंड दूर होण्यासाठी पुढील शिक्षण हाच एक उपाय आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवायची ओढ व जिद्द असेल तर भूतकाळ मागे ठेवायला लागेल.
मी सांगतोय ते सगळं बोलायला सोपं आहे आणि प्रत्यक्ष करायला खूप अवघड, ह्याची मला कल्पना आहे. पण प्राप्त परिस्थिती मधे मला तरी हाच उपाय दिसतो. पुण्यातील 'कर्वे स्त्री शिक्षण संस्था' व त्यासारख्या अजून काही संस्थाकडून त्यांना मदत मिळू शकते. शुभेच्छा..
कोणाबद्दल आहे याचा अंदाज
कोणाबद्दल आहे याचा अंदाज (त्या दिग्दर्शकाचं नाव दिलं नसलं तरी) बांधता येतो. समाजातल्या जातीव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या व उपेक्षितांवर, खालच्या जातीतल्या लोकांवर अन्याय कसा होतो याबद्दल चित्रपट बनवणाऱ्या या माणसाने स्वत:च्या बायकोवर असा अन्याय केलाय हे वाचून आश्चर्य वाटलं.
अर्थात, सगळेच काही न्यायमूर्ती रानडे होऊ शकत नाहीत ज्यांनी अजाण, न शिकलेल्या मुलीशी मनाविरुध्द लग्न करावं लागल्यावर तो राग तिच्यावर न काढता तिला पत्नी म्हणून सर्व अधिकार दिले आणि उच्च शिक्षण देऊन तिच्यातून एक कर्तबगार कार्यकर्ती घडवली. आणि हे सगळं ’अन्याय अन्याय’ असं आकांडतांडव न करता शांतपणे केलं.
रिया, चौकट राजा तुमचं म्हणणं
रिया, चौकट राजा तुमचं म्हणणं १००% मान्य.
मीही तिला हाच सल्ला दिला पण वयाची तिशी पार केल्यावर आपण शिकू शकतो हेच तिच्या कल्पनेपलिकडे आहे. ज्या गोष्टींवर आपण सहज उपाय काढु शकतो त्यावर ही गावातील लोक कधी विचारच नाही करु शकतं. इथे मुलीचे लग्न झाले की तीला परकी माननात. त्त्यातल्या त्यात तिच्या आईने तिला परत माहेरी आणले हेच मोठे समाधान. नातेवाईकांचा एकुण सुर पण आता काय करायचे शिकून असाच आहे. तिला या सगळ्यातुन बाहेर काढण्याऐवजी त्याने हिला कसे फसविले, तो कसा चुक, त्याला माफ नाही करायचा अशा निरर्थक चर्चा करत राहतात. ती एकटी संपुर्ण आयुष्य कसे काढणार असे सगळे बोलतात पण तिच्या पुनर्विवाहाबद्दल कुणीच काही बोलत नाही जणु मुलीच पुन्हा लग्न केले तर आकाश कोसळेल.
त्याच्याबद्दल मला एक दिग्दर्शक म्हणुन आदरच आहे पण वेदिकाने म्हंटल्याप्रमाणे समाजातल्या जातीव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या व उपेक्षितांवर, खालच्या जातीतल्या लोकांवर अन्याय कसा होतो याबद्दल चित्रपट बनवणाऱ्या या माणसाने स्वत:च्या बायकोवर असा अन्याय केलाय याच आश्चर्य वाटतं.
पण हेही तेव्हढच खर की सगळेच काही न्यायमूर्ती रानडे होऊ शकत नाहीत. इथे मी हे सर्व लिहले कारण खुप दिवस मला खुप अस्वस्थ वाटत होतं. कोण बरोबर कोण चुक हे कळत नव्हतं. मी स्वतःला त्या दोघांच्याही ठिकाणी ठेऊन पाहिले आणि मला दोघे आपआपल्या ठिकाणी योग्यच वाटले. शेवटी आपण माणुस आहोत आणि चुका या माणसांकडुनच होणार आणि माणसंच त्या माफ करू शकणार.
बघु, मी तिला माझ्यापरीने जेव्हढे शक्य आहे ते समजाविण्याचा प्रयत्न करेन. तुमचे मेसेज नक्कीच तिच्यापर्यंत पोहचवेन. धन्यवाद सर्वांचे.
>>हा सगळा विचार करताय तुम्ही
>>हा सगळा विचार करताय तुम्ही हीच काय ती चूक!
ये हुई ना बात! नवरा गेला सोडून तर 'जा उडत' म्हणावं! He doesn't deserve you. उलट आपण पेटून 'दाखवतेच तुला आता मी काय होऊ शकते' असं म्हणून नव्या उमेदीने आयुष्याची सुरुवात करावी. ह्या बाईने त्याची आठवण काढत कुढावं अशी त्याची लायकीच नाहिये.
>>वयाची तिशी पार केल्यावर आपण शिकू शकतो हेच तिच्या कल्पनेपलिकडे आहे
चूक, एकदम चूक. त्या बाईला सांगा की माणूस एकदा ठरवलं की कधीही शिकू शकतो. फक्त मनाचा निश्चय करायची गरज आहे.
पुनर्विवाहाचा विचार करण्याऐवजी आधी ह्या बाईने स्वतःच्या पायावर उभं रहावं. शिकावं आणि नोकरी करावी. पुढ्चं पुढे.
पुनर्विवाहाचा विचार
पुनर्विवाहाचा विचार करण्याऐवजी आधी ह्या बाईने स्वतःच्या पायावर उभं रहावं. शिकावं आणि नोकरी करावी. >+१
आँ !!!! हिंदू बाईने उशा
आँ !!!! हिंदू बाईने उशा कशाला भिजवायच्या? फ्यामिली कोर्टात जा, अर्धी इस्टेटही घ्या, घटफोटही घ्या.. मग निवांत धुरळा खाली बसला की दुसरा नवरा पकडा. कायदा आहे, त्याचा उपयोग काय मग? उठा, कामाला लागा,
>>>पुनर्विवाहाचा विचार
>>>पुनर्विवाहाचा विचार करण्याऐवजी आधी ह्या बाईने स्वतःच्या पायावर उभं रहावं. शिकावं आणि नोकरी करावी. पुढ्चं पुढे.<<< +१
>>>आँ !!!! हिंदू बाईने उशा कशाला भिजवायच्या? फ्यामिली कोर्टात जा, अर्धी इस्टेटही घ्या, घटफोटही घ्या.. मग निवांत धुरळा खाली बसला की दुसरा नवरा पकडा. कायदा आहे, त्याचा उपयोग काय मग? उठा, कामाला लागा,<<<
मनात आणल तर स्त्री काहीही करु शकते. जे झाल॑ ते जर परत जुळुन येणार नसेल तर वरिल उपाय अगदी योग्य आहे.
र्॑जना आणि रविन्द्र महाजनी या॑चा एक मराठी चित्रपट आशाच आशयाचा आहे. त्यात र्॑जना स्वतच्या पायावर उभी राहते आणि आपणही गावाकडिल असलो तरी कुठेही कमी पडणार नाही हे नव-याला दाखवुन देतात. अशा आशयाचे अजुनही चित्रपट असतिल ते आपल्यासाठिच प्रेरणा देणारे बनवले आहेत असे समजावे आणि स्वताला बदलुन टाकावे. आज बरेच असे कोर्स आहेत जे आपल्याला परवडणारे असे असतात. असाच एखादा कोर्स करुन आधी नोकरी मिळवा.
अजुन एक दुस-या विवाहासाठी वयाचे ब्॑धन नसते. दुस-या विवाहास थोडा विल॑ब झाला तरी चालेल. पण आपण जे होईल त्या परिस्थितिला तो॑ड द्यायला समर्थ आहोत हे आधी मनात पक्क करा. कदाचित कुणी असा भेटुनही जाइल जो तुम्च्यावर खुप प्रेम करणारा असेल.तरी समाज काय म्हणेल याचा जास्त विचार नकरता आपल्याला कशात समाधान मिळेल त्या प्रमाणे वागावे समाज दोन्हि॑कडुन नावे ठेवणारा असतो.
वरच्या सगळ्यांना पूर्ण
वरच्या सगळ्यांना पूर्ण अनुमोदन.
पंजाब/ हरयाणा का उत्तर प्रदेशातल्या दोन आज्ज्या ७० नंतर रायफल शूटिंग शिकून मेडल मिळवू शकतात तर आपण का नाही. टी व्ही वर सुद्धा दाखवतात त्यांची जाहिरात.
शिकून आणि स्वतःचं ग्रूमिंग करून इतकं मोठं व्हायचं की तोच नवरा माझ्यासाठी काम कर असं म्हणत समोर आला पाहिजे. जिद्द पाहिजे बस्स. (आखिर क्यों आठवतोय?)
Riya tumche vichar vachun
Riya tumche vichar vachun khoop changle ahet
माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व
माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व दाखव, स्वताला सिद्ध कर, अगदी नवर्यानेच बोटे तोंडात घालायला हवी हे सल्ले सदर महिलेची कुवत तितकी आहे की नाही हे न बघता किंचित फिल्मी वा भावनेच्या पहिल्या भरात आलेले वाटतात. नाही जमत प्रत्येकाला हो, प्रत्येकात एक हिरो लपलेला नसतो.
कायदेशीर कारवाईचा सल्ला मात्र योग्य, पण तिथे कोणी पाठीशी उभे राहणे गरजेचे. अन्यथा या आधीही त्या बाईला हे सल्ले मिळाले असतील पण ते करने तिच्याने झाले नसावे. कदाचित यामागे प्रेमही असेल वा एक वेडी आशाही असावी की कधीतरी सारे सुरळित होईल. पण तसे होण्याची शक्यता नाही हे इतरांना दिसत असेल तर आधी ब्रेनवॉश करने गरजेचे.
"समाजातल्या जातीव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या व उपेक्षितांवर, खालच्या जातीतल्या लोकांवर अन्याय कसा होतो याबद्दल चित्रपट बनवणाऱ्या या माणसाने स्वत:च्या बायकोवर असा अन्याय केलाय हे वाचून आश्चर्य वाटलं" ----
वेदिका यांच्याशी सहमत.
पण आश्चर्यापेक्षा जास्त वाईट वाटले.
नाही तुला ती आपल्या योग्यतेची वाटत तर काही हरकत नाही, मन मारून संसार करून नाही सुखी होऊ शकत कोणीही. पण लग्न तर केले आहेस ना, जबाबदारी घेतली आहेस ना, मग वेगळे होताना किमान तिच्यावर उश्या भिजवायची वेळ येऊ नये हि काळजी घेतली गेली पाहिजे होती.
माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व
माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व दाखव, स्वताला सिद्ध कर, अगदी नवर्यानेच बोटे तोंडात घालायला हवी हे सल्ले सदर महिलेची कुवत तितकी आहे की नाही हे न बघता किंचित फिल्मी वा भावनेच्या पहिल्या भरात आलेले वाटतात. नाही जमत प्रत्येकाला हो, प्रत्येकात एक हिरो लपलेला नसतो. >> +१ धन्यवाद अभिषेक.
ती झगडणार्यांपैकी नाही म्हणुन तर तिच्याबद्दल वाईट वाटते.
र्॑जना आणि रविन्द्र महाजनी
र्॑जना आणि रविन्द्र महाजनी या॑चा एक मराठी चित्रपट आशाच आशयाचा आहे. त्यात र्॑जना स्वतच्या पायावर उभी राहते आणि आपणही गावाकडिल असलो तरी कुठेही कमी पडणार नाही हे नव-याला दाखवुन देतात. >>>मुंबईचा फौजदार बहुतेक
स्वताःच काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत . देवही त्यालाच साथ देतो जो प्रयत्न करतो . त्यांच्या मानसिक उभारीसाठी आधी प्रयत्न करणे गरजेचे आहे . त्याना जवळच्या लोकांनी समजावून सांगितले पाहिजे . उगीचच आगीतून उठून फुफाट्यात पाडण्यात काय अर्थ आहे . दुसरे लग्न करून नांदणे सोपे नाही. तेथे जास्तच तडजोडी कराव्या लागतात . अशी उदाहरणे पहिली आहेत . विचार पूर्वक योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे .
अभिषेकदादा, सगळ्यांना ठरवलं
अभिषेकदादा, सगळ्यांना ठरवलं की सगळं जमतंच!
आणि स्वतः मूव्ह ऑन होणं इतकंही अवघड नाहीये.
स्वतःच्या मनातुन स्वतः विषयीच्या सहानभुतीचं ओझ फेकून दिलं की सहज जमतं सगळं!
अभिषेकदादा, सगळ्यांना ठरवलं
अभिषेकदादा, सगळ्यांना ठरवलं की सगळं जमतंच!
>>>>>
सगळंच नाही तर काहीतरी जमतंच असे वरचे वाक्य हवे.
आणि इथे ते जे काहीतरी जमणे पुरेसे आहे की नाही हे मॅटर करते.
तू बहुतेक स्वताच्या त्या बाईच्या जागी ठेऊन विचार करताना स्वताला रिया म्हणूनच ठेवत असशील आणि इथेच चुकतेयस.
माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व
माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व दाखव, स्वताला सिद्ध कर, अगदी नवर्यानेच बोटे तोंडात घालायला हवी हे सल्ले सदर महिलेची कुवत तितकी आहे की नाही हे न बघता किंचित फिल्मी वा भावनेच्या पहिल्या भरात आलेले वाटतात. नाही जमत प्रत्येकाला हो, प्रत्येकात एक हिरो लपलेला नसतो.<<<
मला हेच लिहावेसे वाटत होते. ह्याचा अर्थ असे सल्ले देणार्यांचा विरोध करायचा होता असे नव्हे, पण प्रत्येक माणूस असा लढू वगैरे नाही शकत असे म्हणायचे होते.
माफ करा पण लग्नाच्या इतक्या
माफ करा पण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर तुम्हाला हे सगळं जाणवतंय याचं आश्चर्य वाटतंय. इतकी वर्ष तुमचा नवरा घरी येत नाही, भेटत नाही, बायकोचा योग्य तो दर्जा देत नाही हे कळायला इतकी वर्ष लागली? तुम्हाला नक्की कशाचा त्रास होतोय याचा ही विचार करा.
>>टीव्हीवर बघते सगळे खुप कौतुक करत्यात म्हणतात एक वेगळा सिनेमा आहे, विचार करायला लावणारा आणि दिग्दर्शक म्हणुन माझ्या नवर्याचं तर किती कौतुक पण या सगळ्यात मी कुठे आहे >> या वाक्यामूळे मी हे लिहिलंय.
बाकी दोन व्यक्ती लग्न करतात, पण त्याच बरोबरिने त्या वाढत असतात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून. त्यामूळे एखादी व्यक्ती आणि तिचे चॉईसेस आजपासून दहावर्षांनी पण तेच असतील असा दावा करणं चूक आहे. तुमचं एकतर्फी प्रेम आहे, मान्य. पण गाडीला दोन चाकापैकी एकच असेल तर काही उपयोग नसतो. सर्व ताण त्या एकाच चाकावर येतो.
या ना त्या परिस्थितीत स्वतःला अॅडजस्ट करतच असतो आपण, मग थोडी उभारी धरून तुम्हाला आयुष्यात काय हवय याचा एकदा उघड्या डोळ्यानी आणि डोक्याने पण विचार करा.. मार्ग आपोआप सुचतील. त्या माणसाला मोकळीक हवी असेल तर देऊन टाका त्याने दोघेही सुखी रहाल. कागदावर सहया झाल्या की मनंही जोखडातून आपोआप मोकळी होतात. आणि नवे मार्ग सुचतात आपोआप. आपण ओलरेडी लग्नात्/बंधनात आहोत हे फिलिंग दुसरा कोणताही विचार करू देत नाही.
@ वेदिका - तो माणूस कोण आहे याचा अंदाज तुम्ही स्वतःशी बांधला असेल तर तो इथे जाहिर करण्यात तुम्हाला काय मिळालं? तुमच्या वाक्यांवरून ज्यांना अंदाज नसेल त्यांना ही हिंट मिळाली असेल आता...
माणूस प्रसंगानुरूप बदलतो. आपण
माणूस प्रसंगानुरूप बदलतो. आपण त्यांना धीर आणि पाठिंबा दिला पाहिजे. मुळूमुळू रडत राहून सुद्धा काय हाती लागतय? थोडा काळ मुळूमुळू रडणं ठिक आहे महिना दोन महिने सहा महिने पण नंतर तरी त्यातून बाहेर पडायचे प्रयत्न केले पाहिजेत. "आता माझं कसं होणार" ह्या प्रश्नाचं उत्तर रडून नाही मिळत. आणी रडून रडून आणि आता माझं कसं ह्याचा विचार करून जे डिप्रेशन येतं त्याला दूर करायला मग औषधाम्चा आधार घ्यावा लागतो.
गावी आहे ना मग बचत गटात भाग घ्यायचा. तिथल्या बायकाच जास्त चांगल्या सपोर्ट करतील आपण शहरातल्या बायकांपेक्षा. (कदाचित त्यांनी अशा केसेस आपल्यापेक्षा जास्त पाहिल्या असतील, कदाचित त्यांनी तिच्यासारखा विचार केला असेल. आपण तिच्यासारखं आणी तिच्याइअतकं हतबल फील नसेल केलं कदाचित.)
<<नाही तुला ती आपल्या योग्यतेची वाटत तर काही हरकत नाही, मन मारून संसार करून नाही सुखी होऊ शकत कोणीही. पण लग्न तर केले आहेस ना, जबाबदारी घेतली आहेस ना, मग वेगळे होताना किमान तिच्यावर उश्या भिजवायची वेळ येऊ नये हि काळजी घेतली गेली पाहिजे होती.>> हे पटलं आणी पटलं नाहीसुद्धा. म्हणजे त्या माणसाने ही सिच्युएशन जास्त मॅच्युअरली हँडल करायला हवी होती. पण तरीही त्या मुलीने आशा लावून ठेवली असेल आणि तिला पूर्वी मिळालेल्या हिंटस तिने समजून घेतल्या नसतील तर कोण काय करणार? (माझा असा सलज आहे ह्या गोष्टी ओव्हरनाईट होत नसतात. हिंटस मिळत असतात. आपण त्या ओळखायला हव्यात.)
@ वेदिका - तो माणूस कोण आहे
@ वेदिका - तो माणूस कोण आहे याचा अंदाज तुम्ही स्वतःशी बांधला असेल तर तो इथे जाहिर करण्यात तुम्हाला काय मिळालं? तुमच्या वाक्यांवरून ज्यांना अंदाज नसेल त्यांना ही हिंट मिळाली असेल आता...
हे लक्षातच आलं नाही माझ्या. माफ करा. पुढच्या वेळपासून नक्की लक्षात ठेवीन. मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. आणि तुम्ही ॲडमिन असाल किंवा इतर कोणी ॲडमिन हे वाचत असेल तर हे उल्लेख असलेल्या सर्वांच्या पोस्ट एडिट कराव्यात ही विनंती.
>>माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व
>>माफ करा, पण उठ लढ कर्तुत्व दाखव, स्वताला सिद्ध कर, अगदी नवर्यानेच बोटे तोंडात घालायला हवी हे सल्ले सदर महिलेची कुवत तितकी आहे की नाही हे न बघता किंचित फिल्मी वा भावनेच्या पहिल्या भरात आलेले वाटतात. नाही जमत प्रत्येकाला हो, प्रत्येकात एक हिरो लपलेला नसतो.
हिरोगिरी करायला कोण सांगतंय? कर्तुत्व दाखव म्हणजे एखाद्या कंपनीची सीईओ हो असं नाही. पण एखादा कोर्स करुन, मग तो शिवणाचा का असेना, नोकरी मिळवून किंवा खाणावळ चालवून सुध्दा, स्वत्:च्या पायावर उभं राहणं जमेलच जमेल. १०१% जमेल. तेही कर्तृत्त्वच आहे. नुस्तं रडत बसलं तर मात्र काहीही होणार नाही. आणखी काही वर्षांनी पश्चात्ताप मात्र होईल.
खुप वाईट वाटलं वाचुन...
खुप वाईट वाटलं वाचुन...
जोडीदारापैकी एकाला संसार हवाय आणि एकाला नकोय अशी विचित्र परिस्थिती ...
चुक कोणाची यात? ज्यांचे लग्न झाले त्यांचा जोडीदार निवड, लग्नाचे वय, लग्नासाठीची मानसिक तयारी इत्यदी महत्वाच्या बाबींवर काहीच कंट्रोल नव्हता हे दिसतेय लिखाणावरुन. अशा वेळी दोघांच्या विचारांमध्ये पडलेल्या फरकामुळे एकमेकांना दुरावलेल्या दोघांपैकी कोणाला चुक ठरवणार ? जिच्याशी आता त्याचे विचार जुळत नाही अशा स्त्रीला केवळ बायको आहे म्हणुन त्याने संसार धकवुन नेणे दोघांसाठीही कितपत आनंदाचे? तिच्या बाजुने विचार केला तर असा संसारही तिने आनंदाने केला असता असे वाटतेय, पण मग त्याचे काय? त्याला समविचारी जोडीदार हवा असल्यास त्याने का म्हणुन अशा संसारात राहावे? लग्नानंतरची परिस्थिती पाहता हे लग्न त्याच्यावरही लादले गेलेय.
तिची आजची मानसिक अवस्था लक्षात घेतली तर त्याने विभक्त होताना तिच्यासाठी काहिही केले असते तरी रात्री उशी भिजवण्यापसुन तिची सुटका झाली नसती.
जो संसार तिचा कधी नव्हताच त्यामध्ये आपले काय चुकले हा विचार करत बसण्यापेक्षा एका दु:स्वप्नातुन आपण आता जागे झालोत असा विचार करुन पुढचा विचार केलेला बरा.
ही अशी लग्ने अपवाद नाहीयेत, खुप पाहायला मिळतात आणि केवळ आता लग्न झालेच आहे तर काय करणार असा विचार करुन लोक आयुष्यभर धकवुनही नेतात....
स्वप्ना_राज +१ मलाही हेच
स्वप्ना_राज +१
मलाही हेच म्हणायचं होतं. जे जमेल ते करावं पण स्वयंसिद्ध व्हावं.
तुमचा अभिषेक : प्रत्येक वंचित स्त्री कोणीतरी महान होऊ शकत नाही हे मान्यच आहे. पण जमेल तेवढं शिकुन, जमेल ती नोकरी करून ह्या आत्ताच्या परिस्थितीवर मात तर करू शकते ना? कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधे अशी काही उदाहरणं बघायला मिळतील.
गावतल्या बचत गटाचाही पर्याय छान आहे पण तिथे ओळखीच्याच बायका भेटत असल्यामुळे अवघडलेपणा येऊ शकतो असं वाटतं.
बाकि "असं काही करून दाखवावं कि तो नवरा परत नाक घासत येईल" वगैरे कल्पना जरा अती आहेत. तो गेला त्याच्या कर्मानी. आणि घटस्फोट वगैरे कोर्ट कचेरीत चालु राहील. त्यावर अवलंबून न रहाता स्वतःच स्वतःची मदत केली पाहिजे. पुनर्विवाहचा विचार सुद्धा खुपच चांगला आहे.
निल्सन - त्यांच्या घरचे नुसतेच आल्या परिस्थितीला दोष देत बसले आहेत हे दुर्दैवी आहे. घटस्फोटा बद्दल बोलायच्या निमित्तानी त्यांना मॅरेज काऊन्सिलर कडे घेऊन गेलात तर ते समुपदेशन करू शकतील. त्याचा फायदा होईल कदाचित.
<<"असं काही करून दाखवावं कि
<<"असं काही करून दाखवावं कि तो नवरा परत नाक घासत येईल" वगैरे कल्पना>> नवरा नाक घासत संसारासाठी येईल असं नाही. पण काही गोष्टीसाठी मदत मागायला तर येऊ शकतो. जगात कोणाला कोणाची गरज कधी पडेल माहित नाही.
अशी मोठी मोठी स्वप्न पाहिली तरच काहीतरी अचिव्ह होतं.
अंह गल्लत होतेय, मी कोणाच्या
अंह गल्लत होतेय, मी कोणाच्या `कर्तुत्व दाखवा' या वाक्याचा तसेच सोबतीला दिलेल्या महान उदाहरणांचा शब्दशा अर्थ घेतला नाहीच आहे. तर जेमतेम पातळीवरचीच कर्तबगारी डोक्यात ठेऊन माझीही पोस्ट टाकलीय. पण ते देखील जमणे हि आदर्श स्थिती झाली. मुळात तो स्पार्क अंगातच असावा लागतो, भले सुप्तावस्थेत का असेना.
आणो हो, शिवणाचा कोर्स करणे किंवा खानावळ चालवणे... प्रश्न तिच्या चरितार्थाचा आहे का? किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित आहे का? पहिल्या पोस्टमधून क्लीअर होत नाही.
अर्थात स्वकमाईने एक स्वाभिमान अंगी येतो, पण तो ही पर्टिक्युलर केस मध्ये अॅप्लिकेबल असेल तरच.
स्वतःच्या मनातुन स्वतः
स्वतःच्या मनातुन स्वतः विषयीच्या सहानभुतीचं ओझ फेकून दिलं की सहज जमतं सगळं! >>> रिया प्रचंड अनुमोदन.
खरं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारचं अपयश येतं, त्यावेळी आपण काय शोधतो, ते अधिक महत्त्वाचं. सहानुभूती/ रडायला खांदे मिळणे हे सगळ्यात सोपं, त्यामुळे जास्तीतजास्त लोकं तिकडेच वळतात, अन तेच मन खच्ची करतं.
आणि कमी शिकलेली वगैरे फालतु लेबल्स आहेत. सिंधुताई सपकाळांवरचा चित्रपट बघितल्यावर एक बाई काय करु शकते, याचं प्रत्यय येतं. आणि त्यांचं एक नाव आपल्याला माहीती आहे, इतर अनेक स्रिया आहेत, ज्यांची नावेही माहिती नसतील.
राहिला प्रश्न नवरा कोण आहे, वगैरे. तो महत्त्वाचा नाही. तो दुसरा कोणी असता, तरी काय फरक पडला असता?
आता प्रश्न एकच दिसतोय मला, रडत रडत जगायचं की आनंदाने, ते ठरवणं त्या बाईच्या हाती आहे. नाहीतर सहानभुती दाखवुन दरवाजे बंद करणारे लोकं जगात कमी नाहीत.