ठकू आज शाळेतून आल्यावर काय काय केलंस?
आधी जेवले, मग नंदा मावशीनी मला झोपायला सांगितलं. पण झोपच येत नव्हती.
मग?
मग ना, आम्ही गच्चीवर गेलो. पतंग उडवायला. पण नंदामावशीला बाबासारखा उंच पतंग उडवताच येत नाही.
हा हा, अगं नंदा मावशी एवढीशी आहे. ती बाबासारखी उंच असती तर तिला पण जमलं असतं.
मग आम्ही दोन काठ्या एकमेकींना जोडल्या. आणि ना, त्या पुढच्या काठीला असं वाकडं काहीतरी लावलं.
काय? आकडा?
हो! आकडाच! मग आम्ही खळदकर आज्जींच्या झाडाच्या कै-या पाडल्या.
ठकू, तुला कितीवेळा सांगितलंय, त्यांना हात लावायचा नाही म्हणून!
माणूस बदलता असतो... म्हणजे जो तो काल होता, तो आज राहत नाही.... आज आहे तसा उद्या राहणार नाही. एवढी साधी व्यवहारिक बाब आपण लक्षात घेत नाही... आणि आपल्याला त्या माणसाचा जसा भूतकाळात अनुभव आला त्या प्रकारचे लेबल त्याला चिटकवून मोकळे होतो... खरं माणसाला ओळखण्यात इथचं मोठी चूक होते.
आई मी गोरी आहे का गं?
ठकू, अभ्यास झालाय का तुझा सगळा? असले प्रश्न विचारण्यापेक्षा होमवर्क संपव.
पण आमच्या वर्गातली ती आसावरी आहे ना, ती म्हणाली की ती सगळ्यात गोरी आहे.
आई, गोरं असणं म्हणजे काय?
म्हणजे रंग उजळ असणे.
म्हणजे?
म्हणजे त्वचेचा रंग पांढरा, गुलाबी असा असणे.
मग मी नाहीये गोरी. माझा रंग तर बेसनाच्या लाडूसारखा आहे.
आहेसच तू आमचा लाडू!
आई, माझा रंग असा का झाला?
अगं, तू झालीस तेव्हा किनई डॉक्टर कॉफी पीत होते. आणि तू त्यांच्या कॉफीच्या भांड्यात पडलीस. बुदुक करून!
आं! आई खरं खरं सांग ना! मी का नाही आसावरी सारखी गोरी? तुला माहितीये, तिचे डोळेपण असे हिरवे हिरवे आहेत. आवळ्यासारखे!
एखाद्या विशिष्ट आर्थिक, सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेली कोट्यावधी माणसे प्रयत्न करून, संधी शोधत आणि मिळवत आपला स्तर उंचावण्यात बहुतांशी आयुष्य व्यतीत करतात. कोणी सहस्त्राधीश असतो त्याला लक्षाधीश व्हायचे असते, लक्षाधीशाला कोट्याधीश! कोणी सफल होते, कोणी असफल तर कोणी अर्धवट सफल!
एक कातर सायंकाळ ....
कामानिमित्त जेव्हाकेव्हा ऑफिसमधे सायंकाळनंतरही थांबणे होते तेव्हातेव्हा सूर्य अस्ताला जात असताना ऑफिसमधल्या बंद खोलीत मला बसवत नाही, मनाला भुरळ घालणार्या अशा संध्याकाळी मी जरा पाय मोकळे करायला बाहेर जातोच जातो. एकतर माझ्या ऑफिसच्या आसपासचा परिसर अनेक झाडांमुळे शोभिवंत असा आहे आणि सायंकाळी तो अगदीच वेगळा भासतो.... तिथे काही काळ घालवल्यावरच परत कामाला सुरुवात करता येते...
माझ्या वडिलांनी स्थापन केलेली शाळा- महाराष्ट्र विद्यालय, ही मध्य प्रदेशातील १९३५ साल पासून सुरू आहे.
गेल्या दोन दशका पूर्वी शाळेनी मराठी माध्यम विद्यार्थ्यांच्या आभावामुळे काढून केव्ळ हिंदी आणि इंग्रजीतून सुरू ठेवल आहे. खंत असली तरि शाळेचे विद्यार्थी देशभर पस्रलेले संघटित होऊन मराठी माध्यम पुन्रजिवीत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संघटनेला भरपूर प्रतिसाद आहे; केवळ पुण्यात ३०० माजी आजवर तीनदा एकत्र आले आहेत आणि हजारवर माजींचे संपर्क साधले गेले आहेत. गेल्या १२ जानेवारीला झालेल्या सम्मेलना निमित्त मी लिहिलेल्या आठवणीं खाली देत आहे. कदाचित आवडेल वाटले म्हणून-------
शाळा - चार भिंतींच्या पलिकडची
काका, मला s s वाचवा हो …… कथा काकांच्या काकदृष्टीला कळलेल्या करपल्लवीची !

अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...
"तुकाराम बोल्होबा अंबिले" या नावाचा कोणी येक या सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील देहूग्रामी होऊन गेला.
सद्यकाळात हाच तुकाराम "संतश्रेष्ठ तुकाराम महाराज" यानावाने ओळखला जातो त्याच्याच जीवनझुंजीची गाथा समजून घेण्याचा हा एक अल्पसा, बालकवत प्रयत्न - या झुंजाचे वर्णन शब्दात करु शकणे हे जिथे अवघड तिथे या झुंजाची सखोलता कोणाच्या सहज ध्यानी येईल हे तर अजून अवघड - कारण ही झुंज अगदी जगावेगळीच होती, त्या झुंजीची महता सांगायची तर ती पार आकाशाहून थोर झालेली आहे एवढेच म्हणता येईल ......
गुंतता हृदय हे ....

पुण्याच्या शुक्रवार पेठेतील "श्री शिवाजी मराठा हायस्कूल' ही एक जुनी व नामवंत शाळा. मी याच शाळेत शिकलो. शिक्षणमहर्षी गुरुवर्य श्री.बा.ग.जगताप यांनी ही शाळा नव्वद वर्षांपूर्वी सुरु केली. गुरुवर्यांच्या कुटुंबाशी माझे गेली तीस वर्षे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जुळलेले. त्यांच्या अनेक आरोग्यविषयक समस्या मी हाताळल्या.
त्यातील असाच एक अविस्मरणीय प्रसंग.....