गद्यलेखन

काल आणि आज

Submitted by सुनीता करमरकर on 21 October, 2013 - 06:51

एक दिवस मी रोजच्या सारखी ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट बघत रस्त्यावर थांबले होते. समोरून एक काका आणि एक तरुण मुलगी रस्ता ओलांडून आले. ती मुलगी माझ्या जवळ येऊन थांबली आणि मला विचारू लागली कि अमुक एका ठिकाणी जाण्यासाठी इथून बस मिळेल का? मी म्हटले कि इथून तिथे जाण्या साठी बस तर नाही मिळणार पण सहा आसनी रिक्षा मिळेल. रस्त्यात एका ठिकाणी उतरून मग दुसरी रिक्षा बघावी लागेल.

मग रिक्षा कुठे थांबतील, वगेरे चौकशी तिचे वडील करू लागले. थोडे काळजीत असतील असे वाटले.

शब्दखुणा: 

काबीज...

Submitted by भानस on 20 October, 2013 - 11:10

अहोरात्र ओसंडून वाहत असलेली लोकल तिच्या नसानसातही सकाळ-संध्याकाळ रक्तासोबत समांतर वाहत असे. किती कप्प्यात विभागलो गेलोय आपण. पोळं वाढत चाललंय. आडवंतिडवं फुगत चाललंय. पोळ्यातले काही कप्पे मधानं भरलेले तर काही कोरडेठाक. मुंगीही विन्मुख फिरावी इतके रिकामे! स्वतःचा एक कप्पा. आई-बाबा, तो, पोरं,... दुसरा कप्पा. एक कप्पा घराचा. एक माणसांचा... तिच्या माणसांचा... त्याच्या माणसांचा... कालांतराने आपल्या माणसांचा. एक कप्पा आठवणींचा, तिच्या खास आवडीचा. एक ऑफिसचा. अजून एक या सगळ्याच्या आनुषंगिक फिरणार्‍यांचा. पुढला लोकलचा. नववा.....छे! क्रम चुकतोय ! कितीतरी गोष्टी राहिल्यात...

चूक कोणाची? - भाग २

Submitted by वेल on 18 October, 2013 - 05:48

कथा अप्रकाशित करीत आहे. कथा पूर्ण लिहून मगच प्रकाशित करेन.

आधुनिक सीता - १७

Submitted by वेल on 17 October, 2013 - 06:10

भाग १२ - http://www.maayboli.com/node/45579
भाग १३ - http://www.maayboli.com/node/45598
भाग १४ - http://www.maayboli.com/node/45630
भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696
भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780

*******************************************************************************************

आम्ही तिघी

Submitted by आस्वाद on 16 October, 2013 - 16:39

आज पासून एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. घराच्या उबदार, सुरक्षित वातावरणातून नव्या, अनोळखी जगात पाऊल ठेवत होती मी. उद्या पासुन माझी नौकरी चालू होणार होती. त्यासाठी आई बाबा मला सोडायला आले होते मुंबईला. एका मोठ्या सॉफ्टवेर कंपनी मधे सॉफ्टवेर इंजिनियर म्हणून माझ selection झाल होत.

समुद्रकिनारा (भाग ३)

Submitted by नंदिनी on 15 October, 2013 - 02:16

आश्रमापाठीमागच्या बागेमधे मी अभ्यास करत बसले होते. कुण्या पाटणकर नावाच्या माणसाची ही आंब्याची बाग होती. ऑक्टोबर महिना चालू होता. नुकताच पावसाळा संपल्याच्या हिरव्याशार खुणा अजून सगळीकडे पसरल्या होत्या. रविवारचा दिवस होता. माझी बीजगणिताशी थोडी खटपट चालू होती. साईन कॉस वगैरे जरा जास्तच त्वेषात लढत होते. वर्गात अजून शिकवलं नव्हतं. पण सर शिकवेपर्यन्त थांबण्यापेक्षा आपलं आपण समजून घेता आलं तर बरं कारण गणित हा माझा नंबर एकचा शत्रू होता. भाषा इतिहास भूगोल कधी समजायला अडचण यायची नाही, पण गणित विद्न्यान हे मात्र गेल्या जन्माचे वैरी होते माझ्या.

दामिनी

Submitted by सुचेता जोशी on 13 October, 2013 - 18:32

नो नो सर ! वुई मस्ट हॅव टू टेक सम लिगल अ‍ॅक्शन."

रागाने लालेलाल झालेला चेहरा, हाताच्या मुठी टेबलाच्या काचेवर त्वेशाने आपटण्याचा अविर्भाव, केबिन बाहेर पोहोचणारा चढता आवाज हा अन असला तिचा अवतार गेल्या दहा एक वर्षात प्रिंन्सिपलसरच काय पण शाळेतल्या कुणाही विद्यार्थ्यांनी, मावश्यांनी, शिपायांनी, बस ड्राईव्हर्सनी, कँटीनच्या आंटींनी, शिक्षकांनी कुण्या पालकांनीही चुकूनही कधीही पाहिलेला कुणालाही आठवत नसावा.

दामिनी दिपक दंडवते
बी. एस. सी. बी. एड. मॅथ्स टीचर !
लॉरेन्स ईंटरनॅशल स्कूलची ६वी 'ब' ची वर्गशिक्षिका !

आधुनिक सीता - १६

Submitted by वेल on 13 October, 2013 - 00:46

भाग ११ - http://www.maayboli.com/node/45523
भाग १२ - http://www.maayboli.com/node/45579
भाग १३ - http://www.maayboli.com/node/45598
भाग १४ - http://www.maayboli.com/node/45630
भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696

*******************************************************************************************************************

मी रफिकच्या आयुष्यात राहायचा कधी विचार केला होता की मी इथे अडकले, मी स्वतःलाच विचारलं.

वीरुचे बसंतीस ई-मेल

Submitted by अमेय२८०८०७ on 12 October, 2013 - 23:42

फ्रॉम : वीरुटायगर@जयवीरु.कॉम
टू : बसंती१२३धन्नो@लीलामौसी.कॉम
--------------------------------------------------------------------------

प्रिय बसंती,

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन