एखाद्या विशिष्ट आर्थिक, सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेली कोट्यावधी माणसे प्रयत्न करून, संधी शोधत आणि मिळवत आपला स्तर उंचावण्यात बहुतांशी आयुष्य व्यतीत करतात. कोणी सहस्त्राधीश असतो त्याला लक्षाधीश व्हायचे असते, लक्षाधीशाला कोट्याधीश! कोणी सफल होते, कोणी असफल तर कोणी अर्धवट सफल!
पण जो माणूस जगात नसता तरी चालला असता असा होता, ज्याला काहीही आर्थिक, सांस्कृतीक, बौद्धिक अथवा सामाजिक पार्श्वभूमी नव्हती, ज्याला जग एक अन्नपदार्थ चोरणारा द्वाड पोरगा म्हणून ओळखत असे आणि जो येताजाता प्रत्येकाचे फटके खात असे, तो माणूस आज अश्या पदाला पोचलेला होता की धड त्याच्या विरुद्ध बोलताही येत नव्हतं आणि त्याच्या बाजूने व्हायचं तरी भय वाटत होतं. आज तो अश्या स्थितीत होता की त्याच्या अंगुलीनिर्देशावर एखादा कायमचा गायब झाला तरी समाजाने अवाक्षर काढले नसते. आज तो अश्या स्तरावर होता जिथे शासकीय वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते, समाजातील महात्मे, पैसेवाले आणि जनसामान्य ह्या सगळ्यांच्या मते तो वंदनीय होता. आज त्याला उद्देशून थोर समाजसुधारक, अध्यात्मिक गुरू, बाबा, महाराज, स्वामी, त्यागी विचारवंत, निरपेक्ष वृत्तीने जगाच्या भल्यासाठी झटणारा महात्मा आणि तरुण तेजस्वी अवतारी पुरुष अश्या उपाधी मुक्तहस्ते उधळल्या जात होत्या.
हे त्याने कसे जमवले होते? प्रयत्न? अगदीच क्षुल्लक प्रयत्न केले असतील त्याने! जवळपास नाहीतच. संधी? त्याला आलेल्या संधींसारख्या किंवा अधिक फलदायी अश्या शेकडो संधी आजूबाजूच्या कित्येकांना आपापल्या आयुष्यात आलेल्या होत्या. संधींचे सोने करणे? त्याचा वकूबच नव्हता एखाद्या संधीचे सोने करण्याचा! ना शिक्षण, ना संस्कार, ना भांडवल ना आधार! सातत्यपूर्ण मेहनत? त्याने आजवर दुसर्यासाठीच काय, स्वतःसाठीही इकडची काडी तिकडे हालवलेली नव्हती. स्वतःचे पोट भरण्यासाठी केलेल्या क्लृप्त्या सोडल्या तर! त्याग? त्याच्याकडे त्याग करायला काही नव्हतेच. नशीब? नशिबाने त्याला वेळोवेळी हात दिलेला होता हे खरे, पण त्या प्रत्येकवेळी तो कचाट्यात सापडलेला होता आणि नशिबामुळे सुटलेला होता. नशिबाने त्याला श्रीमंत वगैरे केलेले नव्हते. भामटेपणा? तो एक भामटा आहे हे विधान असत्य ठरवणार्या हजारो बाबी लोक पुराव्यासकट दाखवू शकत होते आणि तेही स्वतःहून! त्याला स्वतःला काहीच सिद्ध करावे लागत नव्हते. अजातशत्रू असणे? त्याला एखाद्या पुढार्यापेक्षा अधिक शत्रू होते. तल्लख मेंदू? एखाद्याच्या शेतातील वांगी किंवा एखाद्याच्या अंगणातील कोंबडी कशी मिळवावी ह्यापलीकडे त्याचे विचार धावू शकत नसत.
मग हे पद त्याने कसे मिळवले होते?
उत्तर अतिशयच अजब होते. चक्रावणारे होते. खोटे ठरावे असे वाटावे असे होते. पण खरे होते. दुर्दैवाने......तेच उत्तर खरे होते.
तो त्या पदाला पोहोचावा ही त्याच्या स्वतःपेक्षाही समाजाची इच्छा होती. समाजाला त्या पदावर बसलेला एक माणूस हवा होता. समाजातील प्रत्येक थराला स्वतःच्या भिन्नभिन्न कारणासाठी तेथे एक व्यक्ती हवी होती.
पोलिसांना 'शोध घेतला, धाड टाकली पण हरकतपात्र असे काही मिळाले नाही' असा रिपोर्ट देऊन पैसे खाऊन त्या पैश्यातील एक मोठा वाटा वरच्यांना पाठवता यावा ह्यासाठी त्या पदावर एक माणूस हवा होता. ज्याच्या शब्दावर समाजाचे मन भरवसा ठेवते त्याला त्याच्याच तोंडून सरकार दरबारातील नोकरशहांना सूचना द्यायला लावून विविध प्रकल्प आपल्याला हव्या त्या भागात आणता येतील ही इच्छा मनी धरणार्या स्थानिक पुढार्यांना त्या पदावर तो असायला हवा होता. त्याचे सर्व प्रकारचे चोचले पुरवले की त्याच्या वलयांकित साम्राज्यात आपल्याला प्राप्त झालेल्या परक्या वलयामुळे आपलेही चोचले पुरवून घेता येतात हे माहीत असणार्यांना त्या पदावर तो असायला हवा होता. आपला नालायक आणि स्वार्थी बाप लवकर मेला तर वाड्यावर आणि वीर गावावर आपली सत्ता येईल हे माहीत असलेल्या सुकन्याला त्याच्याकडून बाप मारला जावा म्हणून तो त्या पदावर असायला हवा होता. नवर्याने टाकलेल्या रतनला माहेरी आणि सासरी कोणीच विचारत नसल्याने आणि ह्या निवासात अचानक देवीपद प्राप्त होण्याची चिन्हे दिसल्यामुळे तिलाही तो त्या पदावर असायला हवा होता. उरले कोण? हुकुमशहा झाले, नोकरशहा झाले, पुढारी झाले, कायद्याचे रक्षक झाले आणि गावाचे मालक झाले! आता उरली भोळीभाबडी जनता! दगडाच्या मारुतीला तेल वाहून गोंधळलेल्या मनस्थितीत जगण्यापेक्षा धडधडीतपणे समोर दिसणार्या आणि सर्वांकडून पूजल्या जात असलेल्या जिवंत अवताराची पूजा केली तर वाईट काय? तसाही तो वाईट काय करतो? दर्शन देतो, दत्ताचे नांव घेतो, दत्ताचा जप स्वतः करतो, आपल्याला करायला सांगतो, गाव झाडायला स्वतः उभा राहतो, महिलांसाठी भगिनी केंद्र उघडतो, मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू करतो, अडीअडचणीला मदत करतो, रोगराई जावी म्हणून झटतो, अधूनमधून चमत्कारही दाखवतो आणि एवढे करून स्वतःहून काही विशेष मागत नाही. मग अजून काय हवे? सगळंच तर चांगलं आहे की?
'आपण पुन्हा वीर गावातच पोचलो' हे समजल्यावर शुद्धीवर आलेली एडामट्टी मणी पुन्हा बेशुद्ध झाली आणि तिचे मुटकुळे बायकांनी निवासात आणून ठेवले. तिला निवासात ठेवणे धोक्याचे आहे हे जाणवताच अन्याने तिला रतनच्या घरी, म्हणजे बागघरात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार एडामट्टी मणीला बागघरात हालवण्यात आले. दुपारचा सर्व विधी आणि महिला केंद्राचे उद्घाटन वगैरे यथोचित पार पडल्यावर अन्या आणि रतन बागघरी आलेले होते. सुकन्याच्या वाड्यावरील एक कुत्रे सुरक्षा रक्षक म्हणून अंगणात मोकळे सोडलेले होते. नरसू आज बागघरावर ड्युटीवर होता. रतनच्या सेवेत रुजू असणारी एक इठा नावाची आजीही तेथेच होती. आत्ता बागघराच्या आतल्या खोलीत अन्या आणि रतन ह्या दोघांच्या मधोमध एडामट्टी मणी बेशुद्धावस्थेत झोपलेली होती आणि तिच्या श्वासांबरोबर वरखाली होणार्या तिच्या बोचर्या यौवनाकडे नजर खेचली जाऊन अन्या निश्चलपणे बसून विचार करत होता.
आपण कुठे होतो, कसे होतो, इथे कसे आलो, आता ह्यातून सुटका का नाही, आपण आपल्याला हव्या त्या स्थितीत आहोत की इतरांना! वगैरे वगैरे! कोणतेही शिक्षण वा संस्कार झालेले नसल्याने त्याची विचार करण्याची प्रक्रिया मुळातच प्रतिक्रियात्मक आणि विस्कळीत होती. पण त्यातही त्याच्या लक्षात हे प्रकर्षाने आलेले होते की आपण आत्ता जे काही आहोत ते तसे असणे ही आपल्यापेक्षाही आता इतरांच्याच गरजेचे झालेले आहे. आणि त्याला नेमके तेच डाचत होते.
आपल्याला हे सगळे असे नको होते हेच आपल्या इतक्या उशीरा लक्षात येणे त्याचे त्यालाच आवडलेले नव्हते. कठपुतळी बनून आपण कधी नाचू लागलो हे समजत नव्हते. अन्नाला मौताज असताना आपण स्वच्छंदी वार्यासारखे कुठेही भटकायचो. आता आपण करत असलेली प्रत्येक कृती, उच्चारत असलेला प्रत्येक शब्द लोक निरखून निरखून तपासत आहेत हे त्याला जाणवले. किती नाजूक अवस्था आहे ही, अन्याच्या मनात आले. समाजातील प्रत्येक घटकाला आपण हवे असलो तरी प्रत्येकाची कारणे वेगळी आहेत. आणि सर्वांना ह्या जागी कोणीतरी असायला हवे आहे कारण ह्या जागी असलेला माणूस जनसामान्यांच्या विचारांवर प्रभाव टाकतो. जोपर्यंत जनसामान्य आपल्या बाजूने आहेत तोपर्यंतच हे पुढारी, हे खोटे संतमहात्मे आणि सरकारी अधिकारी आपल्या बाजूला राहणार हे अन्याच्या आता लक्षात आले. सर्वात महत्वाचे काय तर समाजातील सामान्य लोकांच्या मनात असलेली आपली प्रतिमा डागाळता कामा नये. ती रोज कालपेक्षा अधिक उजळायला हवी, उजळतच जायला हवी. तिच्यावर कलंक लागला तर ही सामान्य जनता तर आपल्याला कच्चे खाईलच, पण त्यावेळी ह्या बाकीच्या शक्तीशाली घटकांपैकी एकहीजण आपल्या पाठीशी नसेल. सगळे हात वर करून मोकळे होतील. थोडक्यात काय, तर ह्या स्थानावर त्यांना एक व्यक्ती हवी आहे हे नक्की, पण ती व्यक्ती जर खोटी निघाल्याचे समजले तर हेच लोक आजवर त्या व्यक्तीचा घेतलेला फायदा विसरून त्या व्यक्तीला नेस्तनाबूत करायला एका पायावर तयार होतील. त्यांना ती व्यक्ती त्यांच्या स्वार्थासाठी हवी आहे. तूर्त ती व्यक्ती आपण आहोत. त्यामुळे आपली प्रतिमा आणि आपला होऊ शकणारा फायदा ह्या दोन्ही बाबी सतत उंचावायला हव्यात. उद्या आपल्याजागी तिसराही कोणी आलेला त्यांना चालू शकेल. कोणी नाहीच आले तरीही आपल्यालाच मारून आपलीच समाधी बांधून पुन्हा आपल्याच नावाने ते फायदा उपटतही राहतील. पण आपण स्वतः मात्र कस्पटासमान राहू.
हे सगळे मला हवे होते का? मला दोनच गोष्टी हव्या होत्या. काम न करता फुकट खायला मिळणे आणि तरीही जगाने सलाम झोडणे! दोन्ही आता होत आहे, पण ते होण्यासाठी जी जबरदस्त किंमत आपण आत्ता मोजत आहोत किंवा ते होण्यासाठी ज्या घातक पातळीवर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत तेथून माघारही शक्य नाही आणि एखादी चूक समाजाला मान्य होणेही शक्य नाही.
पण मग ह्या सर्वात मी का सापडावे? मी वाईट काय केले? समाजाला फसवले की मी अवतार आहे. पैसे लाटले. रतन नावाच्या परक्याच्याच बायकोबरोबर शरीर संबंध ठेवले. आज ह्या मुक्या मुलीवर जबरदस्ती करायला गेलो. पोलिसांना सगळे खरेखुरे न सांगता पैसे चारून परत पाठवले. वीर गावात बिबट पालन केंद्र होणे सुयोग्य असताना ते तावडे पाटलाच्या घशात घातले. मशालकरचा घात होण्यास सर्वथा कारणीभूत ठरलो.
पण हे सगळे, ह्यातल्या कित्येक गोष्टी कित्येकजण बिनधास्तपणे करतात त्यांना काय होते? त्यांना कुठे प्रतिमा जपावी लागते? प्रतिमा डागाळली तरी त्यांचे काय बिघडते? तशीही कुठे प्रतिमा डागाळते? आपण रतनवर जबरदस्ती केली नव्हती. ह्या मुलीवर करायला गेलो तर त्या पापापासून सुदैवानेच दूर राहिलो. तालुक्याच्या गावी बिबट पालन केंद्र होण्यात गैर काहीच नाही, वीरगावाच्या तुलनेत!
कित्येकांना रोजगार मिळाले आपल्यामुळे! इग्या आणि पवार ह्यांनी मूर्खपणा केला नसता तर आज पैशात लोळत असते. कित्येक लोक आपल्या मुलांना संस्कार वर्गाला पाठवू लागले. कित्येकांनी हातात खराटा धरला आणि गावाची साफसफाई सुरू केली. कित्येकजण नुसते बोंबलत फिरायचे ते जपजाप्य करू लागले. मशालकर आपल्यामुळे खपला असला तरीही तो मेल्याचा अप्रत्यक्ष फायदा सगळ्या गावालाच झाला.
मी चांगला की वाईट? की दोन्ही? मग दोन्ही असणे मलाच का निषिद्ध? बाकीची सर्व माणसे थोडी चांगली आणि थोडी वाईट अशी असू शकतात तर मी एकट्यानेच पूर्ण चांगलेच असावे हा नियम केवळ मी ह्या पदावर असल्यानेच मला लागू होतो ना? पण मग मी कुठे म्हणालो होतो की मला हे इतके इतके मोठे ठरायचे आहे?
जर मी ह्या पदावर असणे ही गावाची गरज आहे, तर माझ्याही काही गरजा आहेत. त्या गरजा चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही आहेत. आयुष्यात कधीही माझ्या आश्रमावर धाड पडली तर धाड टाकणार्यांची तोंडे कायमची बंद होतील इतकी लाच देता येईल एवढे धन मला हवे आहे. बदनामीच्या भीतीमध्ये ह्या पदावर का राहावे मी? मशालकर सगळ्या गावाच्या आणि कायद्याच्या नाकावर टिच्चून एकाच घरात दोन बायका ठेवून पुन्हा बाहेर रंगढंग करतो तर मी तर तरुण आहे. मला तर कितीतरी अधिक स्त्रियांकडून ते सुख हवे आहे. माझे शरीरही माणसाचेच आहे. वनस्पतीही जिवंतच असतात आणि प्राणीही! मला मांस खावेसे वाटले तर गैर काय? मला प्यावेसे वाटण्यात गैर काय? ज्या माणसामुळे पन्नासएक व्यसनाधीन माणसे सुधारून पुन्हा आयुष्यात आली तो रोज पिऊ लागला तर गावकर्यांचे काय बिघडले?
पण नाही. हे भोळे गावकरी हे सहन करू शकणार नाहीत. त्यांच्या मनात दत्ताच्या खालोखाल असलेले आपण हे असले प्रकार करूच शकत नाही.
ह्याचाच अर्थ असा, की आपल्याला एक समांतर यंत्रणा राबवावी लागणार आहे. विश्वासातील अशी एक दहा पाच माणसे ठेवावी लागणार आहेत. दोन तीन जणांनि सतत आपली प्रतिमा कशी उजळेल ह्याकडे बघावे. दोघातिघांनी आपले चोचले पुरवले जातील आणि तेही बिनबोभाटपणे हे बघावे. दोघातिघांनी आपल्याला शारीरिक संरक्षण देऊ करावे. त्या बदल्यात त्या सगळ्यांना आपण पैसे देऊ, त्यांचे आयुष्यभराचे कल्याण करू.
जर अवघ्या समाजाला ह्या जागेवर नगास नग म्हणून एक व्यक्ती हवीच आहे आणि जर ती व्यक्ती मीच आहे तर मग माझ्याही गरजा ह्या समाजाने बिनबोभाटपणे पुरवाव्यात!
अन्याच्या मेंदूचा भुगा होत होता हे विचार करताना! त्याला ह्या अश्या तर्कसुसंगत पद्धतीचे विचार करता येत नव्हते, पण मनात येत होते ते सगळे हेच, असेच होते. आणि त्याबाबत तो अधिकाधिक ठाम होत चाललेला होता.
आठ वर्षांपूर्वी ज्याच्या आईबापांचा अर्वाच्य शब्दात उच्चार केल्याशिवाय ज्याला हाकही मारली जायची तो मुलगा आज दोन चार गावांनी मिळून त्या गावांचा सर्वेसर्वा बनवून ठेवला होता. एक कणाहीन समाज प्रयत्नवादातील मेहनतीला वैतागून सोप्या पर्यायाकडे अगदी नैसर्गीकपणे वळलेला होता. त्यात प्रत्येकाचाच तात्पुरता का होईना फायदा होता. अनेकांचा कायमस्वरुपी फायदा होता. ती व्यक्ती त्या पदावर असण्यास लायक ठरण्यातही समाजाचा फायदा होता आणि ती व्यक्ती लायक नाही हे सिद्ध होण्यातही! गंडग्रस्त, भयग्रस्त, भ्रामक समजुतींत रमणारा आणि शॉर्टकट्सवर निस्सीम प्रेम करणारा आपला अडाणी, असंस्कृत आणि नालायक समाज आता आनंदात होता. बेडकांना ओंडका मिळालेला होता, फरक इतकाच होता की ओंडका काही राजा वाटत नाही अशी तक्रारसुद्धा करायची त्यापैकी कोणाला इच्छा होत नव्हती. ह्याबाबतीत बेडकांपेक्षाही माणूस मागासलेला होता हे वास्तव चकीत करणारे होते.
स्त्रीकडे मान वर करून बघणार नाही अशी घोर प्रतिज्ञा मनोमनच सकाळीच केलेल्या अन्याला मणीच्या छातीची ती संथ आणि लयबद्ध हालचाल जीवघेणी वाटत होती. रतनच्या लक्षात सारे काही येत होते, पण कित्येक दिवसांनी आजच अन्याने तिला जवळ केलेले असल्याने आजच पुन्हा बिनसायला नको म्हणून ती गप्प बसलेली होती.
एडामट्टी मणी कोण असावी ह्यावर आता विचार करण्याची अन्याला गरज भासत नव्हती. ती का पळाली हेच गावाला माहीत झालेले नव्हते. किंबहुना, ती पळालेली होती हेच अन्या आणि नरसूशिवाय कोणालाही माहीत नव्हते, रतनलाही! त्यामुळे आता ती शुद्धीवर आली की तिची 'वासलात' कशी लावायची इतकेच अन्याला पाहावे लागणार होते. त्याचे त्याला टेन्शन नव्हते. 'एक अशी अशी मुकी मुलगी होती, ती अचानक गायब झाली आणि दुपारी पुन्हा उगवली, शुद्धीवर आली ते बोलायलाच लागली आणि नंतर रात्रीच्या वेळी पुन्हा गायब झाली' ही थिअरी त्याने तयार ठेवलेली होती.
रतन अन्यापेक्षाही पोचलेली होती. अन्याच्या तेजस्वी, धारदार डोळ्यांच्या आत प्रवेश करून तिने केव्हाच त्याच्या मनाचा जणू आढावा घेतलेला होता. इतक्या दिवसांनी मिळालेला हा एकांत अन्याने वाया घालवू नये अशी तिची इच्छा होती. पण अन्याची नजर मणीवर खिळलेली होती. रतन मनातून खवळलेली होती. आणि त्यातच त्या शांततेचा भंग करत अचानकच अन्याने तोंड उघडले. अन्याचे बोलणे जेव्हा संपले, तेव्हा रतन अवाक झालेली होती. हा कालचा पोरगा इतका सखोल विचार करू लागला असेल आणि त्याच्याकडे इतकी बंदिस्त योजना असेल ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. त्याची योजना ऐकून रतनला घाम फुटलेला होता. निश्चल बनली होती ती!
"अगर एक औरत अपनी इज्जत गवाये तो समाज उसे दोबारा स्वीकार नही करता! उसी तरहा अगर एक साधू अपनी साधूता गवाये तो वो जीनेलायक नही रहता! उसे समाज नष्ट कर देता है! अज हम उस पद पर पहुंच गये है, जहा कोईभी आम आदमी हमारी प्रतिमापर सवाल उठासकता है! किसीकाभी दिल कर सकता है के इस साधूको बदनाम करे, कमसेकम उसे बदनाम करनेकी धमकी देकर उससे धन निकाले! ऐसे लोगोंसे कतई डरते नही हम! लेकिन भोली जनता किसकी सुनेगी इसका किसीको अंदाजा नही हो सकता! हमे इस समाजमे सुधार लाना है! अध्यात्मकी और ज्यादासे ज्यादा लोग खींचे आये यही हमारी सदिच्छा है! दत्तमहाराज हमसे यही कार्य चाहते है! इसिलिये उन्होने तुम्हे हमसे मिलवायाभी है! तुम्हे अचरज होगा की आज अचानक हमे तुम्हारी याद क्यूं आयी! आज नही, हमे तुम्हारी हर दिन, हरदम याद आती थी! अगर हम अवलिया बाबा है तो तुम हमारेलिये जन्मी हुवी मायादेवी हो. अगर हम साधकोंको सादगीकी तरफ, त्यागकी तरफ, अध्यात्मकी तरफ जानेका संदेसा देते है तो तुम उनके मनमे संसारके प्रती, अपने परिवारके प्रति, अपने धनके प्रती निष्ठा और प्रेम जगाती हो! ये दोनोही रास्त अलग अलग दिशाके है जरूर, लेकिन इन्ही रास्तोंके बीच जो विचारोंकी लडाई होती है उससे इन्सानका सद्सद्विवेक जागृत होता है! किस हदतक संसारमे मन लगाये और कहांसे अध्यात्मके रास्तेपर मूडे ये इन्सान खुदबखुद सोचने लगता है! लेकिन इसमे उस दिन व्यत्यय आया जिस दिन लाहिरी महाराज और तुम इसी कमरेमे ऐसी हालतमे पाये गये जिस हालतमे तुम पायी जाना तो कोई खास बात नही क्युंकी तुम तो होही मायादेवी! लेकिन उस हालतमे लाहिरी महाराज पाये जाना ये तुम्हारे और उससेभी अधिक हमारे प्रतिमाके लिये बडाही हानिकारक बनसकता था! हम डण्ड तो देना चाहते थे लाहिरी महाराजको! लेकिन अगर सिर्फ लाहिरी महाराजको डण्ड देते तो मुमकिन था की वे गावके लोगोंके सामने जाकर ये कहे के क्युंकी हमारे और तुम्हारे बीच कुछ ऐसावैसा है हम उन्हे निकाल रहे है! हमने तुम्हेभी डण्ड दिया ये देखकर उनकी जुबान न चल पडी! उसके बाद कई दिन तुम्हे यहा अकेलेमे रखनेका आदेशभी हमहीने दिया था! वजह यह थी के गावको यूं न लगे के मशालकरकी मौत और लाहिरी महाराजके निकलजानेके बाद हम एकसाथ रहने लगे, जिसका कुछ गैर मतलब निकालके कोई हमपर कीचड उछालसके! हम खोजमे थे इक ऐसे दिन के, इक ऐसे मौकेके जब हम तुम्हे बडी इज्जतके साथ वापस बुलालें और उसमे न तुम्हे ऐतराझ हो न किसी गाववाले को और न ही सुकन्याताईको! आज तुम्हारे हाथोंमे महिला केंद्र सौपते हुवे हमने यह मिसाल गांवके सामने रख्खी है के देवी जिस कार्यके लिये हमारे साथ थी, वह कार्य अब आरंभ हो चुका है! लेकिन ये कार्य बहुत आगे ले जाना है! इसलिये जरूरी है के हम एक दुसरेका साथ निभाये! आखिर हमे इन्सानका देहभी मिला है! तो उसकीभी जरूरते पुरी करना हमारा कर्तव्यही है! इसलिये धन कमाना, खाना खाना, वस्त्र पहनना, निवासमे रहना यह सब हमारेलिये जरूरी है! लेकिन हमारे कार्यको व्यापक बनाना है! वीरगावके बाहर मीलोंतक हमारे नाम पहुचने चाहिये!"
"आजसे हम तुम्हे अपना सबसे निजी सहकारी घोषित कररहे है! कलही यह घोषणा गावमेभी की जायेगी! हमारी सुरक्षा, हमारी प्रतिमा, हमारा धन इन तीन चीजोंका रक्षण तुम करोगी! मतलब, हमारी पूरी मायाका रक्षण तुम, मायादेवी बनकर करोगी! यह करनेके लिये तुम्हे अपनी प्रतिमा, अपना खुदका रक्षण और अपने धनकाभी रक्षण करना पडेगा! इसलिये हमे दस बारा रक्षकोंकी जरूरत होगी! कलसे तुम्हारेलिये निवासके बगलमे एक कमरेकी तैय्यारी शुरू हो जायेगी! आज, इसी वक्तसे, जितना तुम हमे सुरक्षित रख्खोगी, उतनीही सुरक्षित तुम रहोगी! अगर हमारी सुरक्षामे कही कमज्यादा हो गया तो उसका सीधा असर तुमपर होगा!"
"हमारी सारी कामनाये पूरी करनेकी जिम्मेदारी अब तुम्हारी है! हम अपनी कामनाये सिर्फ तुम्हीको बताया करेंगे! उन्हे अन्जाम देनेका काम तुम्हे करना पडेगा!"
"और एक आखरी बात! ध्यानमे रहे, के हम है, इसलिये तुम हो! अगर हम नही तो तुमभी नही रहोगी! लेकिन अगर तुम नही रहोगी, तोभी हम तो रहेंगेही रहेंगे! इसलिये, एक बारभी नजरअंदाज न होने देना हमारी सुरक्षाको! इसके बदलेमे तुम्हे माया मिलेगी, भक्ती मिलेगी, धन मिलेगा! और अगर कही गलती हो गयी, तो अन्जाम तो तुम जानतीही हो"
"तो कलसे कामपे लग जाओ, एक समुह बनाओ लोगोंका, जो पुरी निष्ठा हमारीही चरणोंपर रख्खेंगे! समझरही हो?"
भयाने निश्चल झालेल्या रतनने उठून अन्याच्या पायावर डोके ठेवले आणि काकुळतीला येऊन म्हणाली......
"म्हाराज, यापुडं तुमच्याचसाठी जगील मी, तुमच्याचसाठी मरील!"
रतनच्या मनावर चांगलीच दहशत पसरलेली आहे हे बघून मनातच सुखावलेल्या अन्याने चेहर्यावरील कठोर भाव तसेच ठेवत मनातच लाहिरीने शिकवलेल्या हिंदीचे आभार मानले.
भ्याड समाजाला हवा असलेला एक नामधारी दैवी अवतार आज कुठे स्वतःच्या भविष्याबाबत काही ठाम योजना करू लागला होता. आजवर स्वप्नातही पडू न शकणारी स्वप्ने आता शक्य कोटीतील वाटू लागली होती. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सातार्याबद्दल वाटणारी भीती मनातून दूर जाऊन आता त्याजागी एक निराळीच इच्छा निर्माण झाली होती, की वर्षभरात सातार्यात बस्तान बसवायला हवे. आपल्या नुसत्या हवाल्यावर लोकांची कामे व्हायला हवीत. आपले नुसते दर्शन घ्यायला धनाच्या राशी ओतल्या जायला हव्यात. आपला हात अंगावरून फिरावा म्हणून स्त्रियांनी आपल्या चरणाशी लोळण घ्यायला हवी. एक वेळ अशी येईल, जेव्हा ह्या रतनदेवीला आपण लाथ मारून हाकलले तर हा समाजही तिला तशीच लाथ मारेल. मात्र तोवर तिचा संपूर्ण उपयोग करून घ्यायला हवा.
निराळ्याच स्वप्नांनी आणि योजनांनी भारलेले आपले तेजस्वी डोळे समोरच्या भिंतीवर रोखून अन्या बघत असतानाच एडामट्टी मणीचे डोळे खाडकन् उघडले. ते पाहून रतनच काय, अन्याही चरकला.
एडामट्टी मणी पडूनच दोघांकडेही तीक्ष्ण नजरेने पाहात होती. काही असले तरी अन्याला आज पहाटेच्या त्या जखमेची भयानक आठवण होतीच. वास्तविक त्याला असे वाटत होते की ह्या मुलीला भयंकर अद्दल घडवावी, पण ती कोण आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून येथे आलेली आहे हे समजून घेईपर्यंत तो शांत राहणार होता.
पण काही क्षण तसेच गेले आणि मणीच्या तोंडातून ते शब्द आसूडासारखे बाहेर पडले......
"एका मुलीच्या बांगडीच्या सेफ्टी पीनने झालेल्या जखमेला घाबरून ओरडणारा भ्याड महाराज तू, तुझी कीर्ती दूर पोचवायला ही एकटी रतन कशी पुरायची रे?"
हे ऐकून संतापलेली रतन उठली आणि मणीकडे धावणार तोच अन्याने रतनला दाबून धरले. अन्याही भयंकर संतापलेला होता. त्याचा अजिबात विश्वास बसत नव्हता की ती जखम एका साध्या पिनमुळे झालेली आहे. तरीही तत्क्षणी त्याबाबत न बोलता त्याने एडामट्टी मणीला विचारले......
"कहना क्या चाहती हो तुम?"
मणी उठून बसली. दिवसभराचा उपास, श्रम आणि ताण चेहर्यावर आणि शरीरावर स्पष्ट दिसत होता तिच्या! तरीही भेदक डोळे करून ती म्हणाली......
"जर पैसे आणि संरक्षण मिळणारच असेल......तर मी तरी इथून कशाला जाऊ? ...... आजपासून आपण तिघे"
एक गहन शांतता! चार भेदक डोळे दोन भेदक डोळ्यांवर रोखले गेलेले! कित्येक क्षण तसेच! शेवटी त्या चार डोळ्यांनाच त्या दोन डोळ्यांचा भेदकपणा सहन झाला नाही आणि ते झुकले! ते चार डोळे झुकले, तसे मात्र ते दोन डोळे हासरे झाले.
कोणालाही दुसर्या कोणावरही विश्वास ठेवावासा वाटत नव्हता. कोण कोणाला फसवत आहे हे आता कोणालाही समजत नव्हते. पण तीनही डोक्यात एक विचार मात्र नक्की होता, की तिघे एक झाले तर काहीतरी अजबच होणार होते. आणि नेमका हाच विचार, डोक्यातील इतर सर्व विचारांचा निचरा करत होता. तात्पुरते तरी डोके बधीर करत होता. स्वतःकडे आकर्षून घेत होता.
प्रथम अन्याच्या चेहर्यावर हसू फुटले. मग एडामट्टी मणीच्या! आणि शेवटी रतनच्या!
एक अजबच गूढ वातावरण निर्माण झाले त्यामुळे त्या खोलीत! निष्ठा तपासून घ्याव्याच लागणार होत्या येत्या काही दिवसांत! प्रत्येकाच्याच, प्रत्येकालाच! पण तोवर असे भासवणे हिताचे होते, की पूर्ण विश्वास ठेवला गेलेला आहे.
सावकाश मणी उठली. रतनकडे पाहात डोळा मारून बाहेरच्या खोलीत निघाली. रतनने चुटपुटत लाजून अन्याकडे पाहिले. आणि अन्या रतनला म्हणाला......
"जाओ बाहर जाके सोजाओ रतन! ये लडकी और कहांकहां काटती है देखना चाहते है हम आज"
चेहर्यावरील झपाट्याने बदलत्या हावभावांचा अन्याला पत्ताही लागू न देता वरवर समाधानी भासत रतन दरवाज्यातून बाहेर गेली आणि मणीने दाराला आतून कडी घालत हासत हासत स्वतःच्या मनगटावरची सेफ्टी पीन काढून फेकून दिली.
तीन मनांची ती भयानक केमिस्ट्री! अन्या, ज्याला फुकटच समोर आलेले सुख उपभोगायची घाई होती आणि त्यानंतर येत्या काही दिवसांत त्या मणीच्या निष्ठा तपासायच्या होत्या. रतन, जिला बाहेरच्या खोलीत पाय टाकताना संताप अनावर झालेला होता, पण चेहरा अजिबात बदलता आलेला नव्हता! आणि मणी?
रानावनात दिवसभर चालून सतरा ठिकाणी फाटलेला टॉप काढून अन्याच्या चेहर्यावर भिरकावतानाच तिने एका कोपर्यात पडलेला एक विळा पाहून ठेवलेला होता.
==================
-'बेफिकीर'!
अरे वा अन्या आला!! वाचते आता
अरे वा अन्या आला!!
वाचते आता
अन्या...याही भागात
अन्या...याही भागात धुमाकुळ्...सही.
वा, आला नवीन भाग, आता
वा, आला नवीन भाग, आता वाचते...
खुप मस्त... धमाल!!!
खुप मस्त... धमाल!!!
बाप रे ! ़ केवढ्या बेमालूम
बाप रे ! ़ केवढ्या बेमालूम पणे परकाया प्रवेश केलाय अन्याची व्यक्तिरेखा साकारताना , ग्रेट !!
क्या बात है बेफि!!
क्या बात है बेफि!!
वाचली
वाचली
वा मजा आली ईतक्या दिवसांची
वा मजा आली
ईतक्या दिवसांची वाट पाहाण्याची मेहेनत सफल झाली
आता अन्या मरतोकी काय याची ऊस्तुकता लागून राहीलीये
देव अन्याचे रक्षण करो बेफींन पासुन
वा मस्तच हा भाग!
वा मस्तच हा भाग!
धमाल भाग !!
धमाल भाग !!
पुढचा भाग क्धी येणार?
पुढचा भाग क्धी येणार?
आज पुन्यांदा वाचला हा भाग
आज पुन्यांदा वाचला हा भाग बेफी या अन्याचे मरण निश्चीत करायचे का नाही या संभ्रमात दिसताय
का लवकर संपवण्या साठी मारुन टाकणार आहात अन्याला:(
http://www.esakal.com/Tiny.as
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=Z64KH
-गा.पै.
काय भन्नाट कथा आहे हो
काय भन्नाट कथा आहे हो गामा
धन्यवाद लिंकबद्दल!
अनेकदा असे वाटते की आपण जे लिहितो ते फार वरवरचे असते. समाजातील वास्तव त्याहीपेक्षा खूप गंभीर आणि अविश्वसनीय असते. आपण ते लिहू शकत नसतो, स्पर्शू शकत नसतो कारण आपण त्या परिस्थितीत राहिलेलो नसतो. आपण ज्या परिस्थितीत राहतो त्यात लिहिण्यासारखे फार काही नसते.
ही चंद्रभागाची कहाणी सर्वच दृष्टींनी चकीत करणारी आहे.
हम ह्या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चनच्या तोंडी रजनीकांतला उद्देशून एक संवाद आहे. हा संवाद चित्रपटाच्या शेवटी शेवटी आहे. अमिताभ रजनीकांतला सांगतो:
तू तुझे पोलिसी प्रशिक्षण पुस्तके वाचून आणि अभ्यास करून मिळवले आहेस. मी माझे प्रशिक्षण त्या गुन्हेगारांमध्ये माझे बालपण प्रत्यक्ष व्यतीत करून मिळवले आहे. तुझ्या परिवाराला बख्तावरपासून सोडवून आणण्याचे काम तू किंवा तुझी पोलिस फौज करू शकत नाही. ते काम फक्त मी करू शकतो.
'अन्या' या कथेला प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! पुढील भाग लिहिणे मला काही आजारपणामुळे शक्य होत नव्हते, आता लवकरच लिहिण्याचा प्रयत्न करेन.
-'बेफिकीर'!
बेफिकीर, सर्वप्रथम तुम्ही
बेफिकीर,
सर्वप्रथम तुम्ही खडखडीत बरे व्हावे म्हणून शुभेच्छा!
तुम्ही म्हणता तशी आपली आयुष्ये फार मर्यादित आहेत. त्यातल्यात्यात तुम्ही चार गावं तरी फिरलेले आहात. तुमचे अनेक वाचक तर तेव्हढंही फिरलेले नाहीत. तर अशा वाचकांना तुम्ही जी प्रतिमासृष्टी उभी करता ती भावते. तुम्ही ती प्रत्यक्ष जगलात की नाही ते पाहायला वाचकाकडे वेळ वा इच्छा नसते. स्वत:ला तो अनुभव येतोय ना मग आस्वाद घेऊया की, तर अशी काहीशी विचारसरणी असते.
त्यामुळे तुमचं तुम्हाला आवडणारं लेखन आणि वाचकांना आवडणारं लेखन यांत सदैव फरक असणार आहे. लिहावं ते कोणासाठी हा प्रश्न केव्हानाकेव्हा प्रत्येक लेखकाला पडतोच. तुम्हाला त्याचं यथोचित उत्तर मिळो!
आ.न.,
-गा.पै.
Get well soon
Get well soon
बेफी लवकर बरे व्हा
बेफी लवकर बरे व्हा
बेफी, गेट वेल सुन
बेफी, गेट वेल सुन
अरे बेफि काय झालं? लवकर बरे
अरे बेफि काय झालं? लवकर बरे व्हा.
लवकर बरे व्हा व भरपुर लिखाण
लवकर बरे व्हा
व
भरपुर लिखाण करा...
बेफीकिर राव, लवकर बरे व्हा!!
बेफीकिर राव,
लवकर बरे व्हा!! चंद्रभागाची कहाणी वाचुन मला 'सनम' ची आठवण झाली. मी आपणांस विनंती करतो कि जमल्यास 'अन्या' बरोबर 'सनम' दे़खिल पुर्ण करा.
धन्यवाद!!!!!
.
.
गेट वेल सुन बेफीजी
गेट वेल सुन बेफीजी
बेफिकीर जी पुढील लेखन कधी
बेफिकीर जी पुढील लेखन कधी वाचायला मिळेल अमी खूप उत्सुक आहोत पुढील लेख वाचण्यासाठी .
बेफिकीर रावः Hope you are
बेफिकीर रावः
Hope you are feeling better now!!
आम्ही पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
धन्यवाद!!!!
खुप वाट पाहतोय
खुप वाट पाहतोय बेफिजी........... प्लिज भाग लवकर टाका