शेवटचा प्याला

Submitted by शाबुत on 27 March, 2014 - 07:51

माणूस बदलता असतो... म्हणजे जो तो काल होता, तो आज राहत नाही.... आज आहे तसा उद्या राहणार नाही. एवढी साधी व्यवहारिक बाब आपण लक्षात घेत नाही... आणि आपल्याला त्या माणसाचा जसा भूतकाळात अनुभव आला त्या प्रकारचे लेबल त्याला चिटकवून मोकळे होतो... खरं माणसाला ओळखण्यात इथचं मोठी चूक होते.

शांतीचा दारुड्या नवरा रोज संध्याकाळी दारू पिवून घरी यायचा... घरात आला की थोडाफार धिंगाना घालायचा... जमलंच तर शांतीला एखादी ठेऊन द्यायचा... त्याच्या पोरांनाही याचं काही वाटत नव्हतं कारण लहानपणा पासून ते हेच पाहत आले होते. तसचं रोजचं भांडण म्हटल्यावर शेजारच्या लोकांना या गोष्टीची सवय झाली... तेव्हा ते ह्या भांडणाचा उपयोग करमणुकीसाठी करत होते... आणि आपल्या बायकोला म्हणत होते की “बघ आम्ही त्याच्यासारखी पिऊन धीगानां तर घालत नाही.”

शांतीच्या नवऱ्याच्या डोक्यात एक दिवस एकदम प्रकाश पडला आणि त्यानं दारू पिणं अचानक सोडलं. तो हुशार होता म्हणून त्यानं एका बाबाचा गंडा हातात बांधला, कारण दारू का सोडली म्हणून त्याला लोकांना काहीतरी सांगावं लागणार.... हे त्याला आधीच माहित होतं.

आता शेजाऱ्याची खूपच पंचाईत झाली कारण तो दारुड्या आहे आणि आम्ही पीत नाही म्हणून चांगले आहोत...या त्यांच्या भावनेला खीळ बसली. शांतीनं आता शांत बसायला हवं होतं... पण आपल्या नवऱ्याने दारू सोडली हे वास्तवच तिला मान्य होत नव्हतं... कारण आपल्या जीवनात असंही काही घडू शकतं याचा तिनं कधी विचारच केला नव्हता. खरं तर तिला आता करमत नव्हतं म्हणुनच ती नवऱ्याला सतत आठवण करून द्यायची की तुम्ही दारू पिले की असे करायचे...तसे करायचे. आपल्या नवऱ्याच्या जुन्या गोष्टी ती शेजाऱ्याना सांगायची... पुढे या सगळ्यावर कळस म्हणजे शेजारीही म्हणायला लागले की “हातात गंडा बांधल्याने कोणाची दारू सुटत असते?”

एकदा मन घट्ट करून ठरविलं की तुम्ही काहीही करू शकता... शांतीच्या नवऱ्याला अशा बोलण्याचा खूपच त्रास व्हायचा तेव्हा तो घराबाहेर पडायचा आणि एक लांब चक्कर मारून यायचा. पाच-सहा महिने असेच गेले... एवढं बोलूनही हा परत दारू पीत नाही म्हटल्यावर बोलणाऱ्या लोकांची तोंड अखेर थांबली... आणि त्याची दारू कायमची सुटली.
.... तेव्हा जिवनात बदल कधीही घडविता येऊ शकतो, त्यासाठी तयार रहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो... खुपच पावरफुल गंडा.....!
पिने वालो को पिने का जैसे बहाना चाहिये.... वैसे छोडने को भी चाहिये!

साती,

गंडा उगीच म्हणून बांधला होता.

>> त्यानं एका बाबाचा गंडा हातात बांधला, कारण दारू का सोडली म्हणून त्याला लोकांना काहीतरी सांगावं
>> लागणार.... हे त्याला आधीच माहित होतं.

तरीपण गंड्याने पावर दाखवली असं म्हणायचंय का तुम्हाला? बघा हं अंधश्रद्धेला प्रोत्साहन देताय! Wink Proud

आ.न.,
-गा.पै.