काव्यलेखन

घुसमटल्यावर वारा येतो !

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 January, 2014 - 13:11

अतोनात तिटकारा येतो
घुसमटल्यावर वारा येतो !

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो

त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

मिटवत जाते एक समस्या
प्रत्यय तोच दुबारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

-सुप्रिया.

माय-लेकी ....

Submitted by पुरंदरे शशांक on 7 January, 2014 - 06:02

माय-लेकी ....

भातुकली भातुकली अस्ते काय ??
चूल बोळकी अजून काय काय ??

गंम्मत तुझ्या लहान्पणाची
सांग ना आई, जरा जराशी ...

बार्बीसारखी अस्ते का ठकी ?
खेळत होता आणि कोणाशी ?

डोळे पुस्तेस का गं बाई ?
आठव्ली का तुलाही आई ?

ये माझ्या मांडीवर टेक जराशी
म्हणेन मी अंगाई येईल तश्शी ....

"आहेस माझी गुणाची खरी
झालीये माझीच आई आजतरी.."

शब्दखुणा: 

मातीमोल

Submitted by समीर चव्हाण on 7 January, 2014 - 02:18

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 

भीक....

Submitted by जयदीप. on 6 January, 2014 - 22:13

भीक मागणे जमले नाही
चोरी करणे जमले नाही

जे गेले ते माझे नव्हते
माझे बनणे जमले नाही

मीच टाळले वाद मनाशी
मला भांडणे जमलेनाही

कशास माझे पोट दुखावे?
पेसे चरणे जमले नाही

तशीच आलो सोडुन गर्दी
खोटे रमणे जमले नाही.....

================
लिहीत गेलो शेर जरी मी
गझल बनवणे जमले नाही
================

-जयदीप

स्त्रीजन्म

Submitted by गौरव पांडे on 6 January, 2014 - 08:52

जरा होता मोठी | तिची चिमुकली पाऊले |
वाटेवरी आले | काटे अनेक ||
नव्या जाणिवांचे | उमलते फूल |
तारुण्याची चाहूल | स्वप्नवेडी ||
मुखवट्याची माणसे | भेटती चौफेर |
जगण्याभोवती फेर | वासनांचे ||
ओल्या हळदीचा | मीलनाचा सोहळा |
सोसते गर्भकळा | माऊली उद्याची ||
सोडुनिया स्वसुख | संसारी रमते |
सौख्याचे भरते | अंगणात ||
ऐसा वात्सल्याचा झरा | भरुनी वहावा |
संपन्न व्हावा | स्त्रीजन्म ||
- गौरव पांडे

चटके

Submitted by जयदीप. on 6 January, 2014 - 06:22

मी कोणाला सांगत नाही
माझे कोणी ऐकत नाही

कसा हसू ते सांग मला तू
माझे रडणे संपत नाही

आत्ता येतो सांगुन जातो
तो मदतीला परतत नाही

मलाच घ्यावे विकत अता मी
इतकी माझी ऐपत नाही

चटके बसले तेव्हा कळले
जगणे गंमत जंमत नाही

-जयदीप

जरासा हर्ष झाला

Submitted by निशिकांत on 6 January, 2014 - 03:44

मोरपंखी आठवांचा स्पर्श झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

ब्रह्मकमळासम तुझे येणे क्षणाचे
दरवळाने धुंदते अंगण मनाचे
साजरा हा सोहळा प्रतिवर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

ते तुझे असणे नि नसणे खंत नव्हती
आठवांची तर कधीही भ्रांत नव्हती
तुजमुळे या जीवनी जल्लोष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

शांत झालो आठवांच्या वादळाने
भागते तृष्णा कधी का मृगजळाने?
स्वप्न, वास्तव जीवनी संघर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

बरळतो माझ्या मनाला वाटते ते
बोलशी तू तोलुनी जे शोभते ते
मुखवटा फसवा तुझा, आदर्श झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

समिकरण मी मांडता नाना प्रकारे

कवडसा

Submitted by मुग्धमानसी on 6 January, 2014 - 02:18

होय होता तोच माझ्या मन्मनीचा आरसा
पण अचानक जाहला होता जरा अंधारसा

कोण कुठले पिस हिरवे उमटूनी बसले तिथे
मी इथे रुतले तरिही उमटला नाही ठसा!

दिवस होते ओलसर अन रात्रही गंधाळशी
त्या ऋतूचा व्हायचा होताच मज आजारसा...

रे हसा भरपूर अन् थट्टा करा माझी अशी
फसवले मज निमिष तो होता सुगंधित धुंदसा!

बंद नेत्रांनी तुला मी शोधणे नाही खरे
डोळसांचा यापुढे घेणार आहे मी वसा...

कुंद ओले दमट नाते सडून जाण्याआत रे
सार पडदे उजळूदे अंतरात सुंदर कवडसा!

शब्दखुणा: 

''तितका तितका''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 5 January, 2014 - 22:55

जितका जितका रडतो आहे
तितका तितका घडतो आहे

हृदयाची तर राख जहाली
शब्दांतुन धडधडतो आहे

हुलकावत सुख पळते, लपते
दु:खाला सापडतो आहे

लांघत गेलो खड्डे ,खळगे
हमरस्त्यावर अडतो आहे

इच्छा गोठुन गेल्या,आता
थंडीने कुडकुडतो आहे

तुटले स्पंदन..तुटले बंधन
माझा मी हुंदडतो आहे

असला नसला तरिही ‘’कैलास’’
फरक कुणाला पडतो आहे?

--डॉ.कैलास गायकवाड

चांदण्यांनो ...

Submitted by Kiran P. Joshi on 5 January, 2014 - 03:34

भारली जणु तिच्या स्मृतींनी खेळणारी ही हवा
चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

मौनात गेले पक्षीगण सारे, नि:शब्द झाल्या दाही दिशा
थंडावली चाल पाना-फुलांची, सुस्तावली आज सारी निशा
कुणी न येथे निरोप सांगण्या, तुम्हीच माझे दूत व्हा...!

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

सांगून टाका तिला एकदाचे, गुपीत सारे माझ्या मनाचे
भेटुनी गेली ती मला जे,उपकार सारे त्या त्या क्षणांचे
रोखुनी टाका पळ विरहाचे, छळ मनाचा थांबवा...!

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

चढेल लाली गालावरती तिने हे सारे ऐकता
म्हणेल मजला ठाऊक सारे तुम्हे कशास हे सांगता?

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन