गौरव पांडे

ग्रेस यांस ....

Submitted by गौरव पांडे on 9 January, 2014 - 12:34

‘कावळे उडाले स्वामी..’ म्हणत ,
तू कवितेच्या अनवट वाटेवर केलेली शब्द्फुलाची उधळण
डोळ्यांत साठून राहिली आहे अजून...
तू दु:खाचा महाकवी असशीलही,
पण तुझ्या कवितेत आत्मशोधाचा , कारुण्याचा
रक्तगंधाचा दिवा जागत राहिलाय अजून....
‘चर्चबेल’च्या निनादात ‘ओल्या वेळूच्या बासरी’चे सूर शोधणारा
तू एकटाच असशील..
महाकवीची मिजास जपत,
उभ्या आयुष्याचं एकटेपण साजरं करणारा
तू एकटाच असशील..
प्रतिभेच्या पूजेसाठी लौकिकाचे अस्तर झुगारणारा
तू...
दुर्बोधतेच्या वाळवंटात कवितेची बेसरबिंदी लपवणारा
तू...
संध्याकाळच्या कातरवेळांत, उडून गेलेल्या कावळ्यांत,
रुणझुणत्या नुपूरांत, वाहून जाणाऱ्या पाण्यात,

स्त्रीजन्म

Submitted by गौरव पांडे on 6 January, 2014 - 08:52

जरा होता मोठी | तिची चिमुकली पाऊले |
वाटेवरी आले | काटे अनेक ||
नव्या जाणिवांचे | उमलते फूल |
तारुण्याची चाहूल | स्वप्नवेडी ||
मुखवट्याची माणसे | भेटती चौफेर |
जगण्याभोवती फेर | वासनांचे ||
ओल्या हळदीचा | मीलनाचा सोहळा |
सोसते गर्भकळा | माऊली उद्याची ||
सोडुनिया स्वसुख | संसारी रमते |
सौख्याचे भरते | अंगणात ||
ऐसा वात्सल्याचा झरा | भरुनी वहावा |
संपन्न व्हावा | स्त्रीजन्म ||
- गौरव पांडे

Subscribe to RSS - गौरव पांडे