काव्यलेखन

श्रावण आला

Submitted by Sangeeta Kulkarni on 7 December, 2012 - 13:07

-श्रावण आला-

भिजऱ्या आषाढlला निरोप देत श्रावण येतो
श्रावण म्हणजे उत्साह चैतन्य
मानवाच्या मनात झिरपणारा
वयाची मर्यादा आड येऊ न देणारा
हातपाय पसरून विसावलेला
पावसाच्या गंधात न्हाऊन निघणारा
मनातही खेळ रुणझुणत राहणारा
कवितांच्या सरी facebook वर बरसात राहणारा
भावाबहिणीच्या नात्याचे अस्सल रंग दाखविणारा
श्रावणात इंद्रधनुष्याची कमान क्षितिजावर उमटविणारा
अस्सल गर्भरेशमी हिरवा रंग तसाच ताजा दाखविणारा .....

शब्दखुणा: 

लंडन ऑलिम्पिक

Submitted by Sangeeta Kulkarni on 7 December, 2012 - 13:02

-लंडन ऑलिम्पिक-

लंडन आणि ऑलिम्पिक हे समानार्थी शब्द बनलेत
जगातील सर्व रस्ते, विमानमार्ग, जलमार्ग त्या दिशेने वळलेत ll
विविध वर्णांचे लोक एकमेकांत वर्तुळा प्रमाणे गुंफले
जसा ऑलिम्पिकचे वर्तुळ मिरवणारा लंडनचा टॉवर ब्रिज ll
जगभरातले खेळाडू एकत्र आलेत
विश्वबंधुता, समानता, एकता ह्यांची शिकवण देत आलेत ll
कोण हरणार कोण जिंकणार हे कोणालाही माहित नाही
पण त्या निमित्ताने परस्परांची कला संस्कृती भाषा -
यांचा गोफ गुंफण्याची संधीही सोडत नाही ll

शब्दखुणा: 

कोणावाचुन आडत नाही

Submitted by निशिकांत on 7 December, 2012 - 00:09

खुशाल चेंडू जगात कोणी
कोणासाठी थांबत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

गतकालाचे सोनेरी क्षण
आठवतो अन् गुदमरतो मी
आयुष्याच्या सायंकाळी
इतिहासातच गुरफटतो मी
वर्तमान वांझोटा आहे
विशेष कांही घडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

टोच नसावी तरी टोचते
काळजास का शल्य एवढे?
कुणी न उरले, उडून गेले
जीवनात जोडले जेवढे
एक कवडसा उजेडही पण
देव अताशा धाडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे
कोणावाचुन आडत नाही

खचून गेलो कष्ट करोनी
रोज कमवण्या दोन भाकरी
धीर द्यावया कुणी म्हणाले
जीवन आहे एक लॉटरी
वाट पाहिली युगेयुगे मी
कधी निघाली सोडत नाही
चंगळवादी जगी कुणाचे

विरहोत्सुकता

Submitted by रसप on 7 December, 2012 - 00:07

अर्ध्यात संपतो येथे
प्रत्येक डाव दैवाचा
जो कमी हारतो थोडा
आणतो आव जेत्याचा

नियतीचे प्यादे होउन
माझ्याशी जेव्हा भिडलो
माझ्या डोळ्यांच्या देखत
मी अनेक वेळा हरलो

जखमाही माझ्या साऱ्या
भळभळणे विसरुन गेल्या
एकट्याच वाटा माझ्या
भरकटणे विसरुन गेल्या

तूही जा सोडुन आता
मी थांबवणारा नाही
ह्या अपूर्ण डावासाठी
मी तळमळणारा नाही

स्वप्नांनी मला शिकवली
नात्यांची क्षणभंगुरता
मी जपतो मनात माझ्या
सवयीने विरहोत्सुकता

सत्तेची लॉटरी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 December, 2012 - 12:39

सत्तेची लॉटरी
ज्या कुणा लागली
दुनिया लुटली त्याने सारी

करतो सलाम
आम्ही सारे षंड
हसरे थोबाड तया पुढे

मागे देऊ शिव्या
बोटे सारी मोडू
हिम्मतीचे गांडू
ऐसे आम्ही

विक्रांत तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in/

दोस्त

Submitted by Vishal Kulkarni 005 on 6 December, 2012 - 11:35

-दोस्त-

ईवलीशी अत्तराचि कुपी
दुःखावरची हळूवार जादुची झप्पी
न दिसणारा हातामधला हात
सुखदुःखात नेहमीच साथ
तु असल्यावर अवघं जीवन व्हावं गाणं
नेहमीच साठी तुझीच साथ...

शब्दखुणा: 

नभ राहते उदास ..

Submitted by कमलाकर देसले on 6 December, 2012 - 10:17

नभ राहते उदास ..

जीवा नको ना घेवूस ,विचारांचा गळफास ;
तुझा स्वामी नाही त्याचा , होतो कशाला तू दास ?

तुला आराम मिळेल , अशी सांगतो मी कथा ;
कान उघडे ठेवून ,तूच ऐक मित्रा स्वत:
महानायकाचा बघ , कसा विकास,विलास

काळ्या पांढर्‍या मेघांची , होते आकाशात गर्दी ;
कधी सुखाचा पाऊस , कधी वादळाची वर्दी ..
सारे नभात घडून , नभ राहते उदास ..

बदनामीचा उन्हाळा , धूळ उडते नभात ;

शब्दखुणा: 

नाते आपले (दोन online मैतरांचे)

Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 6 December, 2012 - 04:37

माहित नाही काय नाते आहे आपले
प्रेम मैत्री याच्या पलीकडले

मनातील असाच काहीतरी शोधत असलेले
कुठल्या site वर, कसे मित्र आपण भेटलेले

नाही प्रत्यक्षात पण नेहमीचे झालेले
जेवणापासून मनापर्यंत, share केलेले

नाही लावत अर्थ काही, जरी शबरीची बोर खाल्ले
माणूस म्हणून या जगात, वाटतात कुणी आपले

नकोस वाटून घेऊ वेगळे शब्द मला सुचलेले
हेच तर नाते आपले, निरपेक्ष पणे जपलेले

घन सावळ सावळ रुसला

Submitted by -शाम on 5 December, 2012 - 10:05

घन सावळ सावळ रुसला
दूरात जाउनी बसला
विनविले किती सांजेने
दे निरोप हसुनी मजला

ती वदली वेड्या दोस्ता
हा एकमार्गी रे रस्ता
ठरलेले येणे जाणे
हे जीवन प्रवास नुसता

हे कळून ना कळणारे
का गुंतत जातो सारे
भेटीत विलगण्याचेही
क्षण दडले असती ना रे

उजळोनी मन गाभारा
क्षण साधावा मिळणारा
अंधारच नात्या मधला
ठरतो नाते गिळणारा..

नाहीच मेळ अपुलाही
मी असली अन् तू असला
घन सावळ सावळ रुसला
घन सावळ सावळ रुसला

..........................................शाम

पाणी

Submitted by विजय दिनकर पाटील on 5 December, 2012 - 04:51

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन