चटके

Submitted by जयदीप. on 6 January, 2014 - 06:22

मी कोणाला सांगत नाही
माझे कोणी ऐकत नाही

कसा हसू ते सांग मला तू
माझे रडणे संपत नाही

आत्ता येतो सांगुन जातो
तो मदतीला परतत नाही

मलाच घ्यावे विकत अता मी
इतकी माझी ऐपत नाही

चटके बसले तेव्हा कळले
जगणे गंमत जंमत नाही

-जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता येतो सांगुन जातो
तो मदतीला परतत नाही<<< टू गूड!

मलाच घ्यावे विकत अता मी
इतकी माझी ऐपत नाही<<< काँप्लेक्स! (असे शेर फार आवडतात)

चटके बसले तेव्हा कळले
जगणे गंमत जंमत नाही
छान.

मलाच घ्यावे विकत अता मी
इतकी माझी ऐपत नाही
हा ही मस्तच… खयाल थोडा पॉलिश केल्यास आणखी मजा येईल.
जसे 'सानी' मध्ये इतकी ऐवजी 'इतकीही' असे काही आल्यास मिसऱ्यात अजून बोच व्यक्त होईल.
'अता' शब्दाचे प्रयोजन ही फारसे स्पष्ट होत नाहीये.

शुभेच्छा.

धन्यवाद ...
शेरा बद्दल अधिक:
=======================
मलाच घ्यावे विकत अता मी
इतकी माझी ऎपत नाही
======================

यातला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वेचायचा प्रयत्न मी केला होता.
आजकाल सहसा मी 'च' चा वापर टाळतो. पण इथे मला तो योग्य वाटला.

मला आयुष्यात जे करायचं होतं ते करायला मिळालं नाही (मी करीयरचं बोलतोय :))

ज्या क्षेत्रात काम करतोय ते आवडत नाही. पोटासाठी चालू आहे. मन वजा. म्हणून असं वाटतं की स्वत:ला विकत घ्यावं..म्हणजे मग मला जे करायचं ते करता येईल.

इथे 'अता' चा वापर मला योग्य वाटला...कारण तो उपाय योजना म्हणून केला आहे...

उदा. ''अता असं करून बघ...कोडं सुटतंय का...'' असं आपण म्हणतो ..ना?

पण.....

इतकी माझी ऐपत नाही..इतकीही असं वापरलं मी मला स्वस्त. म्हणल्यासारखं होईल..ते मलाम्हणायचं नाही.विकत घ्यायची गोष्ट करतो तेव्हा Present Value of Future Cash Inflows at discounted rates ..good enough to safeguard my household exp. atleast..काढायला हवी..जी आजच्या Standard of life नुसार खूप आहे...
म्हणून 'इतकीही' वापरलं नाही.

हुश्श्.

शशांकजी, अरविंदजी...
धन्यवाद... Happy

मलाच घ्यावे विकत अता मी
इतकी माझी ऐपत नाही >>> मस्तच

मलाही वैभव फाटक सारखेच वाटले पण तुमचे स्पष्टीकरण पण आवडले...

मी कोणाला सांगत नाही
माझे कोणी ऐकत नाही>>>>>>>> माझ्यासाठी लिहीली का?:फिदी:

आवडली. इटुकली पिटुकली आहे, पण मस्त आहे.

आख्खीच्या आख्खी आवडली. शेरातिल खयाल अन मांडणी अतिशय खुलत चाललीय वरचेवर.

लगे रहो !

-सुप्रिया.