नातीगोती

मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

जोशी आणि जोशीण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

(सायोने आज आठवण करुन दिली यांची किती दिवसांनी! म्हणून मग हलवलं त्यांना तिकडून इकडे :P)

---------------------------------------------------------------------------------

प्रकार: 

मम आत्मा गमला..२

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मम आत्मा गमला..१
***********

एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. "अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं! हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. " म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.

प्रकार: 

मम आत्मा गमला..१

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्‍यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले.

प्रकार: 

देणार्‍याचे हात घ्यावे...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली.
"त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई."

प्रकार: 

मुलांसाठी नोकरी/व्यवसायात केलेला बदल

Submitted by me_surabhee on 11 August, 2008 - 00:30

मी सुरभी. व्यवस्थापन शास्त्रातली मास्टर्स पदवी घेतलीये. एका MNC मध्ये उच्च पदावर २/३ वर्षे नोकरी केली. नवरा software engi तो ही एका MNC मध्ये आहे. कामाच्या निमीत्तानी दोघेही १२/१३ तास घराबाहेर असायचो.

मुलांमधे संगिताची आवड आणि जोपासना

Submitted by दाद on 3 August, 2008 - 20:56

संगिताची आवड - माझा अत्यंत आवडीचा विषय.
माझ्याबाबतीत, माझ्या भावाच्या बाबतीत आणि माझ्या लेकाच्या बाबतीत काय उपयोगी पडलं ते सांगणार आहे इथे.
त्याआधी हे ही सांगणं आवश्यक की माझा भाऊ उत्तम हार्मोनियम, तबला, बासरी वाजवतो. त्यापैकी फक्त तबला थोडाफार शिकलाय.
मी तबला वाजवते (बहुतेक बर्‍यापैकी Happy ), हार्मोनियम शास्त्रोक्त गायकाला साथ करता येईल इतपत. तबल्याच्या योगे ढोलकी आणि ढोलक सारखी वाद्य वाजवता येतात. भावालाही.

मुलांचे संगोपन याबद्दल पूर्वी झालेली चर्चा

Submitted by webmaster on 11 July, 2008 - 00:01

Pages

Subscribe to RSS - नातीगोती