"वेगळं व्हायचय मला", असं ठणकावून सांगत वेगळी चूल मांडणाऱ्या सुवर्णाचं गृहप्रवेशाचं आमंत्रण फोनवरून आलं. सुवर्णाने आयुष्यात कधीही, किमान पंधरा मिनिटे बोलल्याशिवाय कधी फोन खाली ठेवला नाही. परवाही तसच झालं. साधं गृहप्रवेशाचं आमंत्रण, अर्धा तास काढला. तिचा स्वभाव आधीपासून माहित असल्याने तिचा फोन म्हटलं की आमचे हे सुध्दा अर्ध्या-एक तासाची निश्चिंती झाली असं म्हणत पुस्तकात डोकं खूपसून बसतात. तेवढीच माझी बडबड ऐकावी लागत नाही . सुवर्णा हे तसं अजब रसायन आहे. पटलं तर अगदी जीवापुढे करणार नाही पटलं तर जीव गेला तरी ढुंकूनही नाही बघणार. टोकाची मनस्वीता हा स्वभावातला दोष असतो.
मंदा बऱ्याच दिवसांनी भेटली. प्रेमविवाह केल्यापासून ती एवढी खूष होती की विचारू नका. मनासारखा जोडीदार मिळाला होता. दोघेही कमावती होती. सगळं हेवा वाटावा एवढं सुरळीत चाललेलं. पण जेंव्हा भेटली तेंव्हा तिचा मूड काही ठीक नव्हता.
"तो कसं असा वागू शकतो?"
"काय झालं?"
"एवढा सुशिक्षित, सो कॉल्ड सभ्य, मी....."
"अगं नीट सांग काय झालं"
नंतर तिनं जे सांगितलं त्याने मी हादरूनच गेले. वरवर दिसणार सौख्य हे दूरून दिसणाऱ्या डोंगराएवढच साजरं होतं.
आपल्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात. फक्त माणसच भेटतात असं नाही तर त्यांचे अनुभवही भेटतात. तो अनुभव आपल्या अनुभवांशी, विचारांशी पडताळून पाहण्याचा मोह आवरू म्हणता आवरत नाही. माझ्या सारख्या स्त्रिया टिव्ही मालिका बघतात तेंव्हा नेमकं काय बघतात? अनेक पुरुषांचं टिपिकल उत्तर असेल भरजरी साड्या व भरजरी भानगडी. स्त्री ही मुळातच संवेदनशील असल्याने, ती त्या मालिकेमधल्या पात्रांशी समरस होते. त्यांचे प्रोब्लेम्स तिला आपले वाटतात. समरस व्हायला संवेदनाच असून भागत नाही, वेदनाही असावी लागते.
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे, नाव कमवावे असे वाटत असते आणि असे सामान्यतः घडतही असते. पण ज्योतीताईंच्या बाबतीत उलटे झाले. दीपाने आपली आई,ज्योतीताईंना शिकविले ते मोठे होण्यासाठी किंवा नाव कमाविण्यासाठी नाहीतर त्यांना त्यांच्या नातवाला योग्य प्रकारे शिकविता येण्यासाठी. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या वेळेला त्या वयाच्या अश्या टप्प्यावर होत्या की पूर्वीच्या बायकांप्रमाणे हातात जपमाळ ओढत रामराम करत बसण्याच्या किंवा आजच्या काळाप्रमाणे भिशी पार्ट्या, महिला मंडळ किंवा आपले छंद जोपासण्याच्या. ज्योतीताईंचे सुखी चौकोनी कुटुंब. सचिन व दिपा अपत्ये.
पंधरा दिवसांपूर्वी घरात एक छोटे मांजर आले. साधारण दोन एक महिन्याचे असावे. आमच्या पूर्वीच्या मांजराने नवा घरोबा केला असल्याने या नव्या जिवाला आनंदाने ठेऊन घेतले.
मांजर अगदी घरचेच झाले आहे. व्य्वस्थीत खाते, खेळते आणि माझ्याबरोबरच झोपते. स्वतःची स्वच्छ्तही छान राखते. घरच्या एका कोपर्यात त्याने त्याची सोयही केलेली आहे. इतरत्र कोठे घाण करत नाही.
हे ते आमचे गोड बाळ...

पहिला मुदा : घरात आइ आनि वडिल आहेत, नवरा असतोच. ते कहितरि ठरवितात अनि नेहमि प्रमाने बाय्कोला ग्रुहित ढरतात. बास झालि सुरुवत. ..... पअन हे अस का होत. नेहमिच बायकाना क ग्रुहित धरतात ? का त्यान अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?
कदाचित बर्याच जनिना हा प्रश्ना पडतो? आनि पुधे काय ? बाय्कोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करव, नोकरि सम्भलवि, पाहुने आलेकि त्यान्च पहवा, अनि एवधा करुनहि कोनिच विचार्नार नाहि, का तर बायको म्हनुन ??????? का हूत असेल हे सगल ? आज स्त्रि समानता असताना हि परिस्थिति ??
कॉलेज सुरु झाल्यापासून सगळ्यात सुखाची गोष्ट होती म्हणजे रोज ज्या बस नि मी जायचे त्या बस चा थांबा घरासमोरच होता..बस यायच्या आधी २ मिनिट खाली पळायच आणि बस पकडायची..सगळा कसं सोप्पं होतं! जेंव्हा जेंव्हा मी सकाळी 7 वाजता जायचे तेंव्हा साहजिक च बस ला गर्दी असायची..ऑफिस, शाळेतली मुलं त्यांच्या आया, सकाळच्या शिफ्ट चे कामगार इ. पण त्या बरोबर गर्दी असायची ती म्हताऱ्या अज्ज्यांची! ! मला नेहमी प्रश्न पडायचा कि या सगळ्याजणी एवढ्या सकाळी सकाळी जातात कुठे? थोड्या दिवसांनी लक्षात आलं कि किराणा समान, ताजी भाजी आणायला जातात बऱ्याच जणी, आणि काहींना ताजा ब्रेंड हवा असतो !
"... मी सिडनीत कामासाठी येणारय... भेटायला जमेल?" म्हणालास. नुस्तीच नेटवरली पत्रं भेट आपली. मला धास्तीच जास्तं. नकोच वाटलं प्रत्यक्षं भेटणं. आडाखे चुकले तर वाईट वाटण्याइतकेही आपण मैत्रं नव्हतो... तरीही. (नथिंग अबाऊट यू... इट्स, मी.)
तुझं तेव्हा येण्याचं बारगळलं... पण मी फारसा प्रतिसाद दिलाच नव्हता हे तुझ्या लक्षात आलं का रे?
पुन्हा एकदा तूच नेट लावलास. तुझं लिहिलेलं वाचून माझे "यत्किंचित अभिप्राय" अन मी लिहिलेलं वाचून तुझे "किंचिततरी अभिप्राय" इतक्या जुजबी भांडवलावर, प्रत्यक्षं भेटीचं आवताण... पुन्हा एकदा तुझ्याचकडून. ह्यावेळी वरमून मी कबूल झाले.
आबुचं कशातच लक्ष लागत नव्हत....गेला अर्धा तास हातातल्या पुस्तकाचे एक पानही तिने उलटले नव्हते...एरव्ही पुस्तक हातात आले कि पूर्ण वाचल्याशिवाय ती ते खाली ठेवत नसे, अगदी नाईलाज झाला तरच ती ते बाजूला ठेवत असे पण आज ती त्या रुममध्ये काय शहरातच नवीन होती, तिथे कुणीही तिच्या ओळखीचं नव्हत, तिच्या कडे वेळच वेळ होता, पुस्तक वाचण्यापासून तिला कुणीही अडवणार नव्हत पण तिचं चित्त दूर कुठेतरी कुणाच्यातरी आठवणीत गेलं होतं....तिला तिचा ऑफिस मधला पहिला दिवस आठवला..मि.विल्सन, तिचे बॉस, त्यांनी आबुची बोर्डरूम मध्ये सगळ्यांशी ओळख करून दिली, बहुतेकांनी तिचं स्वागत खूप प्रेमाने केलं.
गाडीच्या मागच्या काचेतून आईचे गोट्याकडे लक्ष होते. गाडीकडे अगतिकपणे पाहणाऱ्या गोट्याकडे पाहून आईचे मन गलबलले, तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या...पुढच धूसर होण्याआधीच तिने स्वतःला सावरल आणि एक मोठा श्वास घेऊन समोरच्या रस्त्यावर नजर स्थिर केली.....रोज तिच्या मनाची अशीच अवस्था होत असे, रोजच्यासारखे आजही तिच्या मनात आले कि गाडी परत फिरवावी आणि मागे जावे....पण मग त्याने काय होणार? गोट्याची शाळा सुरु होईल मग आपण तिथे थांबून काय करणार?