पूर्वार्ध : http://www.maayboli.com/node/39766
( हा उत्तरार्ध लिहिताना माझी इतिहासकाराची कवचं काढून ठेवली आहेत; म्हणून ही कथा. या सर्व लिखाणासाठी केवळ माझी आई, मामा, मावशी यांच्या आठवणीच मदत करू शकल्या. कोणतेच लेखी पुरावे नाहीत. त्यामुळे याला मी लेख नाही म्हणु शकत. अन मग कथा लिहायची तर त्याचे काही नियम, काही सवलती मी स्विकारले, घेतल्यात. आशा आहे तुम्ही समजून घ्याल.
( माझी आजी, माझ्या आईची सावत्र आई म्हणजे सौ. सुधा प्रधान ( पूर्वाश्रमाची वत्सला गुप्ते) हिची कथा मी लहानपणापासून आईकडून ऐकत आले. तिच्या आयुष्यातल्या अनेक घटना सर्वसामान्य स्त्री पेक्षा खूप वेगळ्या. त्या सगळ्यांसमोर मांडाव्या वाटल्या. म्हणून हे लिखाण. यातल्या महत्वाच्या ठळक घटना जशाच्या तशा मांडल्या आहेत. माझी आई, मोठा मामा यांनी त्या आपल्या आठवणींतून सांगितल्या आहेत. १९४८ मध्ये स्त्री मासिकासाठी तिची मुलाखत श्री. दि. बा. मोकाशी यांनी घेतली होती. ऑगस्ट १९४८ च्या स्त्री मासिकात ती छापून आली होती.
......................ओढणी ...................
ट्रेनची चौथी सीट पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर 'एक गड' जिंकून 'एक योद्धा' आल्याच्या
अविर्भावात मी चाळीत प्रवेश केला....
चाळीच्या दाराशी लोकांची गर्दी दिसली."मी 'चौथ्या सीटची लढाई' जिंकली हि खबर चाळीत पण पोहोचली कि काय?".
हे लोक माझी आता आरती ओवाळणार..."यावे यावे राजे....आप आई बहार आई....."
पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कुणी ढुंकूनही पाहिले नाही माझ्याकडे....मग मात्र मला थोडा संशयच आला....
आम्हा चाळीतल्या लोकांना जरा सवयच असते गर्दी करायची.
माझा आणि आपल्यापैकी बहुतांशी स्त्रियांचा विश्वास आजही कुटुंबव्यवस्थेवर टिकून आहे. मतभेद, मनभेदांचं प्रमाणही कमी नसेल, पण ते कुटुंबव्यवस्था संपुष्टात यायला लागली आहे ह्या विचाराप्रत येण्याएवढं नाही. संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.
"प्रत्येक वेळी मीच का म्हणून माघार घ्यायची"
मोबाइलमधून जो तारस्वरात प्रश्न आला तो मेंदू भेदून ह्या कानापासून त्या कानापर्यंत झिणझिणला. विचारणारी अर्थातच माझी मैत्रिण पार्वती. "सखी पार्वती अंबिके" मधली नव्हे. ही आधुनिक युगातील पार्वती. खात्यापित्याघरची देहयष्टी. देहयष्टीला साजेसाच निसर्गदत्त खणखणीत आवाज. चिडली की तो मूळ आवाजाच्या कितीपट होइल हे काय घडलय ह्यावर अवलंबून असतं.
"वेगळं व्हायचय मला", असं ठणकावून सांगत वेगळी चूल मांडणाऱ्या सुवर्णाचं गृहप्रवेशाचं आमंत्रण फोनवरून आलं. सुवर्णाने आयुष्यात कधीही, किमान पंधरा मिनिटे बोलल्याशिवाय कधी फोन खाली ठेवला नाही. परवाही तसच झालं. साधं गृहप्रवेशाचं आमंत्रण, अर्धा तास काढला. तिचा स्वभाव आधीपासून माहित असल्याने तिचा फोन म्हटलं की आमचे हे सुध्दा अर्ध्या-एक तासाची निश्चिंती झाली असं म्हणत पुस्तकात डोकं खूपसून बसतात. तेवढीच माझी बडबड ऐकावी लागत नाही . सुवर्णा हे तसं अजब रसायन आहे. पटलं तर अगदी जीवापुढे करणार नाही पटलं तर जीव गेला तरी ढुंकूनही नाही बघणार. टोकाची मनस्वीता हा स्वभावातला दोष असतो.
मंदा बऱ्याच दिवसांनी भेटली. प्रेमविवाह केल्यापासून ती एवढी खूष होती की विचारू नका. मनासारखा जोडीदार मिळाला होता. दोघेही कमावती होती. सगळं हेवा वाटावा एवढं सुरळीत चाललेलं. पण जेंव्हा भेटली तेंव्हा तिचा मूड काही ठीक नव्हता.
"तो कसं असा वागू शकतो?"
"काय झालं?"
"एवढा सुशिक्षित, सो कॉल्ड सभ्य, मी....."
"अगं नीट सांग काय झालं"
नंतर तिनं जे सांगितलं त्याने मी हादरूनच गेले. वरवर दिसणार सौख्य हे दूरून दिसणाऱ्या डोंगराएवढच साजरं होतं.
आपल्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात. फक्त माणसच भेटतात असं नाही तर त्यांचे अनुभवही भेटतात. तो अनुभव आपल्या अनुभवांशी, विचारांशी पडताळून पाहण्याचा मोह आवरू म्हणता आवरत नाही. माझ्या सारख्या स्त्रिया टिव्ही मालिका बघतात तेंव्हा नेमकं काय बघतात? अनेक पुरुषांचं टिपिकल उत्तर असेल भरजरी साड्या व भरजरी भानगडी. स्त्री ही मुळातच संवेदनशील असल्याने, ती त्या मालिकेमधल्या पात्रांशी समरस होते. त्यांचे प्रोब्लेम्स तिला आपले वाटतात. समरस व्हायला संवेदनाच असून भागत नाही, वेदनाही असावी लागते.
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे, नाव कमवावे असे वाटत असते आणि असे सामान्यतः घडतही असते. पण ज्योतीताईंच्या बाबतीत उलटे झाले. दीपाने आपली आई,ज्योतीताईंना शिकविले ते मोठे होण्यासाठी किंवा नाव कमाविण्यासाठी नाहीतर त्यांना त्यांच्या नातवाला योग्य प्रकारे शिकविता येण्यासाठी. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या वेळेला त्या वयाच्या अश्या टप्प्यावर होत्या की पूर्वीच्या बायकांप्रमाणे हातात जपमाळ ओढत रामराम करत बसण्याच्या किंवा आजच्या काळाप्रमाणे भिशी पार्ट्या, महिला मंडळ किंवा आपले छंद जोपासण्याच्या. ज्योतीताईंचे सुखी चौकोनी कुटुंब. सचिन व दिपा अपत्ये.
पंधरा दिवसांपूर्वी घरात एक छोटे मांजर आले. साधारण दोन एक महिन्याचे असावे. आमच्या पूर्वीच्या मांजराने नवा घरोबा केला असल्याने या नव्या जिवाला आनंदाने ठेऊन घेतले.
मांजर अगदी घरचेच झाले आहे. व्य्वस्थीत खाते, खेळते आणि माझ्याबरोबरच झोपते. स्वतःची स्वच्छ्तही छान राखते. घरच्या एका कोपर्यात त्याने त्याची सोयही केलेली आहे. इतरत्र कोठे घाण करत नाही.
हे ते आमचे गोड बाळ...
