निरंजनाची कविता
झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना |
शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद|
निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा ||
झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना |
शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद|
निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा ||
हिमालय. त्याचं वेड लागतं.
नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.
अनुष्काबद्दल आलेला लेख. आई म्हणून जरा भाव खाऊन घेत्ये!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/22...?
मुळात फुलपाखरू हा अत्यंत नाजूक जीव. या जिवाच्या निकटच्या सहवासात अत्यंत सावधपणे राहावं लागतं. फुलपाखरांविषयी उत्सुकता असलेले अनेकजण असले, तरी त्याविषयी संशोधन करणारे कमीच. याच क्षेत्रात सध्या अत्यंत महत्त्वाचं काम करत असलेली तरुणी म्हणजे अनुष्का रेगे.
आसावरी चिपळूणकर
आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो.
खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं...
इतकं कशाला झाकोळायला हवं
माझ्या नसण्याने?
मला शोध ना..
इथं, तिथं,
फुललेल्या रानफुलात,
कोमेजल्या निर्माल्यात.
दवानं भिजलेल्या रानात,
अंगार ओकणार्या वाळवंटात.
पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात,
कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही.
निळ्या मुक्त आकाशात,
अन् करड्या फांदीवरल्या
हळूच डोकावणार्या, बंदिस्त
चार काड्यांच्या घरट्यातही.
जन्म मृत्यूच्या उत्सवात,
आणि निराकार निर्गुणात.
वार्याच्या सळसळीत,
हवेच्या झुळुकीत,
जीवघेण्या वादळात,
नि:शब्द, नीरव शांततेत,
न सरत्या कोलाहलात.
हास्याच्या लकेरीत,
पापणीआडच्या पाण्यात.
पहा नीट एकदा,
कदाचित सापडेनही
तुझ्या मनाच्या एखाद्या,
दीपज्योति: परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापं, संध्यादीप नमोsस्तुते...
अनुश्काने लिहिलेला लेख. http://www.kikasbirdclub.org/2012/10/04/heronry/
अनुश्काला, माझ्या लेकीला, पक्षीनिरिक्षणाची आवड आहे. सुरुवातीला ती श्री. किरण पुरंदर्यांबरोबर शिकायला जात असे, आता जवळपासच्या पक्षी निरीक्षण सहली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करते. त्यांनीच तिला लिहिण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि तिचा हा पहिला लेख.
रक्तगंधानुलिप्तांगम् रक्तपुष्पै: सुपूजितम्|
गणपती बाप्पा मोरया! विघ्नविनाशक मोरया!
सर्व मायबोलीकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा
येते म्यां जाऊन
तंवर नीट र्हावा
गप्पागोष्टी करताल
माजीबी याद काडा
*
दूरची हाय वाट
चाल व्हनार इक्ती
कुडी अक्षी गळनार
मन भिर्र पाखरावानी!
*
आन्भव जगायेगळे
पदरी मीबी बांदीन
सूर्य बगीन, चंद्र बगीन
आभाळ माथा धरीन
*
आसंल कदी चांदनी
सोबतीला येकुलती
वाटंल तिला बगून
कश्शी माझ्याच लेकीवानी!
*
गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
न्हेमीच जपीन मनात
मपली शिरीमंतीची लेनी
*
वाट चालता चालता
दिस सरुन जात्याल
मुक्कामाला सोबतीनं
अल्लाद आनून सोडत्याल
*
जसा सरंल प्रवास
समदं रितं रितं वाटंल
धा दिशांमदून कसा
बांध मनाचा फुटंल
*
पुन्ना कधी, केव्हा, कुटं
बगायाला ह्ये गावंल?
बंगलोरमध्ये माझ्या वृद्ध नातेवाईकांसाठी रक्तदात्यांची नितांत आवश्यकता आहे. दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागत असल्याने पर्यायी डोनर द्यावा लागतो आणि असे कोणी रक्तदान करु शकत असल्यास कृपया मला नाव व नंबर कळवाल का? आम्ही डेटाबेस बनवत आहोत व जशी गरज लागेल तसे फोन करुन तुमची उपलब्धता वगैरे पाहून तुम्हांला फोन करु शकू.
कुठे लिहायचे कळाले नाही म्हणून इथे रंगीबेरंगीवरच लिहिले. काही माहिती असेल, कोणी मित्र मैत्रिणी बंगलोरमध्ये असतील, रक्तदान करु शकत असतील, इच्छु़क असतील, तर कळवू शकलात तर बरे होईल.
विपूमध्ये कळवू शकता.
धन्यवाद.