कलिंदनंदिनी

बंध- कलिंदनंदिनी वृत्त

Submitted by चिन्नु on 22 April, 2019 - 22:07

अनाद आर्त साद ही, कशास आत्म ध्यास हा,
न मन पुरे न जन पुरे, कसा पुरेल श्वास हा?

नभात खेळ रंगतो, धरा तुझीच बावरी,
अचूक पेरशी कसा, चराचरात भास हा?

अरूप तू, अनंत तू, तरी तुलाच भाळते,
अरूप रूप देखण्या, अथांग रे प्रयास हा

अदेहदेहि धारणे, तुझ्या क्रिडा युगंधरा!
तुझेच नाम जोडता, अतूट हो समास हा!

नकोच ही अलौकिके, नकोत बंध पाश ही,
अमोघ प्रीत 'मल्लिका', न बंध- बंध खास हा!

माझी बाळी :)

Submitted by शेळी on 8 August, 2012 - 13:01

कलिंदनंदिनी वृत्तातली पहिलीच बाल- गझल.... माझ्या बाळासाठी ... Happy

तुझे लहान ओठ का खट्याळ होत फाकती
बघून आज स्तब्ध मी तुझ्या नव्या करामती

दिव्यादिव्यात पेटली कितीतरी निरांजने
शशी रवी तुझ्यासमोर रोज होत आरती

तुला दिलाय जन्म मी कि तू मला , न आकळे
तुझ्यासवे मलाच बाल्य लाभले शरारती

कणाकणात जाणवे तुझाच स्पर्श रेशमी
चिऊ मन्या तुझ्याचभोवती हसून नाचती

Subscribe to RSS - कलिंदनंदिनी