संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे.
रोगाचा जागतिक इतिहास
नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात.
या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे.
.......
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||
आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||
कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||
शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो.
माझी 17 नोव्हेंबर 2018 ला सिझेरियन डिलिव्हरी झाली. Ivf प्रेग्नेंसी 38 आठवडे पूर्ण झाल्यावर 3.4 kg चं सुदृढ व गोंडस बाळ जन्माला आले.प्रेग्नेंसी मधले सगळे रिपोर्ट व सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल होते. पण त्याचे वजन करताना आणि क्लीन करताना लक्षात आलं की त्याचा श्वासांचावेग जास्त आहे. आणि तो निळा पडू लागला. लगेच त्याला ऑक्सिजन वर तासभर ठेवण्यात आलं व तो नॉर्मल झाला. आमच्या कडे दिल्या नंतर तो पुन्हा निळा पडू लागला व डॉक्टरांनी त्याला icu मध्ये शिफ्ट केलं जिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुरुवातीला त्याचा श्वासाचा वेग 100 होता. ह्यात 3 शंका होत्या
1. हृदयाचे त्रास
भाग १ : इथे आहे: https://www.maayboli.com/node/65454
**************************************************************************************************
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
वयोगट ०-१ वर्षे : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात !
आजारपणात काय खावे आणि आणि काय नको हा प्रश्न नेहमीच पडतो. काय खाल्ले की त्रास होतो, काय खाणे चांगले, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाला चव नसताना काय घश्याखाली उतरू शकते. शेवटी अपराधी पोटाची भूक तर भागवलीच पाहिजे. पण काही पदार्थ ईतरवेळी अत्यंत आवडीचे असूनही आजारपणात तोंडाला चव नसल्याने खावेसे वाटत नाहीत, किंवा खावेसे वाटले तरी सर्दी ताप खोकल्यात चालत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे आजारपणात खायचे पदार्थ ठरलेले असतात. तेच या धाग्यावर लिहायचे आहेत. कदाचित हे पदार्थ व्यक्तीपरत्वे बदलतील. एकाचे दुसर्याला चालणार नाहीत. पण चालले तर लोकांना चार अतिरीक्त पर्याय मिळतील.
आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मिळालीच पाहिजे अशी गोष्ट कोणती? क्षणाचाही विचार न करता या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे – ते म्हणजे ऑक्सीजन (O2) ! पर्यावरणातील O2 आपण श्वसनाद्वारे फुफ्फुसांमध्ये घेतो. आता हा O2 शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवण्याचे काम एक वाहतूकदार करतो आणि तो आहे हिमोग्लोबिन. हे एक महत्वाचे प्रथिन असून त्याचा कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट लालपेशी. लाल रंगाच्या या प्रथिनामुळेच त्या पेशी आणि पर्यायाने आपले रक्त लाल रंगाचे झाले आहे.
मी केलेली मदत : गॅसवर ठेवायला, उतरायला , फोटो काढायला आणि इथे लिहायला मी मदत केली.
बशीत काढून घेणे इ. त्याने केले आहे, त्यामुळे इथला प्रमाण आणि फोटो यांची सांगड घालू नका.
लागणारा वेळ : १० ते १५ मिनिटे
साहित्य : लिंबू - १/२
जिरेपूड : १/४ चमचा
काळं मीठ(नसेल तर साधं मीठ चालेल) : १/४ चमचा
साखर : १/४ चमचा
मित्रांनो इथे तुम्हाला पुण्यातील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढे लिहा. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.
पहिल्या पानावरची माहिती--
१) डॉ. मिलिंद मोडकांकडे (Orthopedic) मी वर्षभर उपचार घेत होतो कारण माझा गुडघा/पाय चालताना लपकायचा आणि मला नीट चालता यायचे नाही. असे वाटायचे काहीतरी भाग सरकला. पण आता माझा पाय पुर्ववत छान झाला. खूप चांगले प्रख्यात डॉक्टर आहेत. जर ते दीनानाथ मधे नसतील तर थेट त्यांच्या क्लिनिक मधे जाता येईल. त्यांच्या क्लिनिकचा पत्ता असा आहे:
Address:
Yogesh Hospital,