प्रेम
माझ प्रेम तू कधी जाणलाच नाही...
तू काही येत नाही
रात्रीच्या अंधारात
जेव्हा मी तुझी वाट बघतो
चांदणंही झोपी जातं, पण तू काही येत नाही.
कधी कधी
चंद्र हळूच विचारतो
अजून किती वाट बघणार?
तोही क्षितिजापार निघून जातो, पण तू काही येत नाही.
बेभान हा वारा,
घोंगावत रुंजी घालतो
थोडासा थबकून कानोसा घेतो,
तोही आसरा शोधतो, पण तू काही येत नाही.
झाडाची पालवी
पडता पडता विचारपूस करते
पानगळ संपली,
वृक्षाला नवी पालवी फुटली, पण तू काही येत नाही
संपणारे श्वास माझे
संपता संपता हृदयात तुझा शोध घेतात
आता श्वासही संपत आले
आणि हृदयही शांततय, पण तू काही येत नाही
तू येत नाही,
पण तुझ्या आठवणी साथ सोडत नाहीत
आता स्मरणशक्तीही दगा देते
काय तुझ्या मनात?
माझी झोप उड्वुन, निजली तु सुखात
आता तरी सान्ग राणि, काय तुझ्या मनात?
नजरेस नजर मिळता, खुदकन हसलीस
मी थाम्बलो तिथेच, तु मात्र निघुन गेलिस
हो नाही म्हनता म्हनता, अधुरीच राहीलि बात
आता तरी सान्ग राणि, काय तुझ्या मनात?
गुलाबाचे फूल दिले, घेवुन तु गेलिस
आत्ता नाही नन्तर, उत्त्तर देते म्हटलीस
उत्तराची वाट बघत, मी अडकलोय प्रश्नात
आता तरी सान्ग राणि, काय तुझ्या मनात?
माझी झोप उड्वुन, निजली तु सुखात
आता तरी सान्ग राणि, काय तुझ्या मनात?
स्वप्न, ती आणि स्वप्नातला मी!
स्वप्नांच्या जगात माझ्या एक फुलांची बाग होती
बागेतल्या त्या कट्ट्यावर फक्त तुझीच मला साथ होती
हातात घेवून तुझा हाथ तिथे कविता मी करत होतो
तुझ्याच प्रेमात ग सजणी वेड्यासारखा मी झुरत होतो
तू स्वप्नातही मला अचानकच सोडून जायचीस
वेड्या ह्या जीवाला माझ्या, एकाकी सोडायचीस
घाबरलेल मन माझ तुला शोधत फिरायचं
थकून भागून बिचार मग एकटच रडायचं
स्वप्नातही कधी तू माझी न झालीस
एकट्याला टाकून मला दूरदेशी गेलीस
दूरदेशीच्या राजकुमारात तू अस काय ग बघितलंस
तुझ्याच ह्या प्रतिबिंबाला अस का ग रडवलस???
आजही तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर शाबूत आहेत
परतीची वाट कधीच नसते रडून मला सांगत आहेत
खुशाल राख व्हावे...
मी बघतो रोज तिला, असा जगण्यासाठी ।
नि जगतो रोज असा, तिला बघण्यासाठी ॥
लावून आग गेला तो पाऊस आठवांचा ।
सर एक पुरे डोळ्यांना सुलगण्यासाठी ॥
बघते मला अशी ती बघण्याचसाठी आता ।
अन माझ्याचपासूनी मी विलगण्यासाठी ॥
शापीत या जिण्याला उःशाप हाच व्हावा ।
अंती तिने असावे, मला बिलगण्यासाठी ॥
मिठीत विद्युल्लतेच्या लाभे काय वटाला ।
खुशाल राख व्हावे कुणी उमगण्यासाठी ॥
तुझी नी माझी प्रीत सख्या...
गाठ माझ्या पदराची तुझ्या उपरण्याला पडली
सप्तपदी चालताना तुझ्यासवे नजर माझी झुकली
लग्नमंडपी शोभा होती परी मनी माझ्या भीती
अनोळखी या नात्याला कशी मी समजू प्रीती
गाली होता विडा परी नयनी माझ्या अश्रू
अंतरपाट मधे स्थिर आणिक समोर उभा तू
हाती पुष्पमाला अन कानी घुमती अष्टके
जन्माचा जोडीदार कसा तू हे पडले मोठे कोडे
पाठवणीची घडी ती मज कठीण बडी जाहली.
माया आई-बाबांची डोळ्यातून वाहली
श्वास माझा अस्थिर होता अन ऊर भरूनी आला
मज न्याहाळूनी हात तू माझ्या हातावरी ठेवला
तुला जपेन असेच निरंतर हे स्पर्शातूनी बोललास
पाणावल्या डोळ्यात तू माझ्या प्रथम सामावलास
नाव तुझे घेऊन सासरचा उंबरठा ओलांडला
अशीच येशील तु जेव्हा..
अशीच येशील तु जेव्हा
माझीच फक्त होऊन ये
प्रेम करताना माझ्यावर
विसर जगाचा तुला होऊ दे.
अशीच येशील तु जेव्हा
मनात तुझ्या माझं प्रेम राहु दे,
येशील जेव्हा मजजवळ तु
मिठीत तुझ्या मला सामावुन घे.
अशीच येशील तु जेव्हा
अश्रुनां घरी ठेऊन ये,
बरोबर आणायचेच असेल तर
माझ्यावरील प्रेमाला बरोबर घेऊन ये.
अशीच येशील तु जेव्हा
जगाला सगळ्या कळु दे,
माझ्यावर प्रेम करतेस तु
जगातील प्रत्येकाला समजु दे.
धडधड... धडधड... धडधड... भाषा प्रेमाची
माझा अबोला आणि
तुझी अखंड बडबड
मी बोलावं म्हंटल तर
नुसती धडधड... धडधड... धडधड...
म्हंटलं लिहावी एक कविता
यमका वृत्तात जुळवून धड
आणि पान भरुन उतरवली
धडकत्या हृदयाची धडधड... धडधड... धडधड...
कवितेतून बोलावं तर
तिथेही तिच गडबड
पानभर लिहीलं होतं
नुसतं धडधड... धडधड... धडधड..
असा कसा गं मी? न लिहीता येतं
न बोलता येतं धड
तू नसलीस की तडफड
तू असलीस की धडधड... धडधड... धडधड..
माझी धडधड कविता
तू धडाधड वाचलीस
मला वाटलं तू हसशील
पण तू तर चक्क लाजलीस... धडधड.. धडधड.. धडधड
वाटलं बुक्का मारुन छातीत
बंद करवी ही धडधड
तू हसुन लाजलीस ?
