धडधड... धडधड... धडधड... भाषा प्रेमाची

Submitted by सत्यजित on 14 February, 2012 - 13:40

माझा अबोला आणि
तुझी अखंड बडबड
मी बोलावं म्हंटल तर
नुसती धडधड... धडधड... धडधड...

म्हंटलं लिहावी एक कविता
यमका वृत्तात जुळवून धड
आणि पान भरुन उतरवली
धडकत्या हृदयाची धडधड... धडधड... धडधड...

कवितेतून बोलावं तर
तिथेही तिच गडबड
पानभर लिहीलं होतं
नुसतं धडधड... धडधड... धडधड..

असा कसा गं मी? न लिहीता येतं
न बोलता येतं धड
तू नसलीस की तडफड
तू असलीस की धडधड... धडधड... धडधड..

माझी धडधड कविता
तू धडाधड वाचलीस
मला वाटलं तू हसशील
पण तू तर चक्क लाजलीस... धडधड.. धडधड.. धडधड

वाटलं बुक्का मारुन छातीत
बंद करवी ही धडधड
तू हसुन लाजलीस ?
की लाजुन हसलीस ? कळेना धड... धडधड... धडधड... धडधड...

म्हणालीस, जे रोज ऐकत होते
ते आज वाचलं सुद्धा..
आणि हृदयाचा ठो़का चुकला
न मारताच गुद्दा ... बंद... धडधड... ... ...

हृदयाची ही भाषा
हात हाती घेताच कळते
ज्यांचे ठोके जुळतात
त्यांचे हृदयही जुळते... पुन्हा धडधड.. धडधड... धडधड

प्रेम व्यक्त करायला
ऐकवावी फक्त धडधड
असते तीही कविताच
व्याकरण जरी नसेल धड... धडधड... धडधड.. धडधड..

-सत्यजित

Great Happy

धडधडतय.
असा मी असामी
विषपेलाही प्यालेला
असामी कसा मी
बायकोला भ्यालेला.

व्वा सत्यजीत .... मस्तच.....
"माझी धडधड कविता
तू धडाधड वाचलीस" इथपासून कवितेने घेतलेलं वळण एकदम छान वाटलं.