क्षण

तुझ्या कवितेचा क्षण ..

Submitted by vaiddya on 4 January, 2011 - 04:15

तुझ्याबद्दल एखादी
मस्त कविता
करायला भाग पाडणारा,
तुझ्यावरच्या प्रेमाने अनिवार
ओथंबलेला,
अफाट प्रेमाने तुडुंब वाहणारा
असा प्रत्येक क्षण ..
तू समोर नसतानाच
का येतो ?

गुलमोहर: 

क्षणिक

Submitted by भाऊ नमसकर on 6 September, 2010 - 00:45

क्षणांचं खरंच या लक्षणच खोटं
ओढ किनार्‍याची कसली नाही
किनार अस्तित्वाच्या असली तरी
त्याचीही याना क्षिती नाही
पुढच्याच्या हातात सोपवून सारं
व्हायचं माहित पटकन पसार
तरी पण
त्यातला एखादा असतोही उत्कट
उजळून टाकतो आयुष्यच सारं
अन बेसावधही असतो क्षण एखादा
उधळून टाकायला नीटनेटकं सारं
सारवलेल्या कोर्‍या जिंदगीवर
पेरतच जातात हे रांगोळीचे कण
साकारतंय त्यातून चित्र कसं
पहायला याना फुरसद नाही
बघेल पुढचा काय ते म्हणत
शेवटच्या क्षणावर सोपवतात सारं
आणि मरणाच्या उंबरठ्यावरच्या
जिंदगीच्या कुठल्यातरी
अडखळतो शेवटचा तो क्षण
घेऊन मग क्षणभंगुरतेचा झाडू
होतो पुसूनच सारं टाकायला आतूर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"एका क्षणाची भेट....."

Submitted by पार्थ देसले on 18 August, 2010 - 12:25

Couple_in_love_by_fajridet.jpg

एका क्षणाचीच भेट
वाटे पहाट जाहली
तू जाताच प्रिये
सूर्य अस्ताला गं जाई

तुझ्या एका भेटीनं
होई काळीचेही फुलं
तू जाताच प्रिये गं
होई माझंही निर्माल्या

अशी तुझीचही भेट
लाभो मला जन्मोजन्मी
माझ्या मीपणाचीच मला
मग जाणचं न राही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - क्षण