दगडावर कोरलेले क्षण..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

माझ्या ब्लॉगवर चार एक वर्षांपूर्वी लिहीलेली पोस्ट... फार रँडम आठवणी आहेत. Happy

गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! Happy

 • अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो क्षण! एकदम लाडाने उठवायला सुरवात व्हायची! काहीतरी लाडीक बोलत बसायचे.. तेव्हा मी जागी असूनही पडून राहायचे.. पण आपोआप एक हसू फुटायचे आणि मग आई बाबांना समजायचे की मी जागीय! Happy तरीही मी पुढे लोळत पडायचे.. मग त्या लाडाची जागा आधी ४-४ दा हाका मारण्यात, नंतर ओरडण्यात .. क्वचित एखाद्या धपाट्यात व्हायची! Happy काहीही असलं तरी तो क्षण मला खूप आवडायचा! तसेच दादा उठवायला आला की तो प्रथम माझ्याबरोबर झोपून टाकायचा, आणि मग १५ मिनिटांना उठून पायाला ओढून रेल्वे रेल्वे खेळून उठवायचा! ते ही भन्नाट!
 • शाळेत असतानाची हिवाळ्यातली सकाळ.. ती कडाकडा दात वाजवणारी थंडी मला अजुनही आवडते.. (तिचा कितीही त्रास झाला तरी!)
 • लहानपणी मामा अमेरिकेतून पेपरमेट्सची पेनं आणायचा ढीगभर! त्याचा तो गुळगुळीत आणि स्लीम स्पर्ष अजुन हातात आहे! परवा मुद्दाम जाऊन घेऊन आले पेपरमेट! i just love those pens!
 • सातवीत असताना वर्गात पहीली आले होते .. बहुतेक शैक्षणिक वर्षांत एकदाच झाले असेल असे! Happy
 • आठवीत असताना लोखंडे बाईंनी सायन्सचा धडा वाचून अवघड स्पेलिंग्स लिहून आणायला सांगितली होती.. (सेमी-इंग्लिश तेव्हापासूनच चालू होते ना.. जाम अवघड वाटायचे सायन्स इंग्लिशमधून .. पण नंतर मराठीतून वाचल्यावर कळले.. इंग्लिशमधूनच बरेय!) सर्व वर्गाने बरेच लिहीले होते.. माझी वही कोरी.. तीच बाईंनी बघितली! चिडून पुढे बोलवले.. आणि मिसलेनिअसचे स्पेलिंग विचारले! ते पर्फेक्ट सांगता आल्यावर झालेला त्यांचा चेहरा! तसेच त्याचबरोबर आठवणारी आठवण म्हणजे त्या सेमिस्टरला सायन्समधे पहीली आलेली मी! LOL.. याचीही कधीच पुनरावृत्ती झाली नाही! Happy
 • आनंददायक नाही! पण ९वी १०वी ही निरस वर्षं होती , हे ही आठवते लगेच!
 • १०वी मधे मात्र जेव्हा माझ्या दातांचे ब्रेसेस काढले तेव्हा फुटलेले हसू! अवर्णनिय होते! तोंडात दातच नाहीत की काय असं वाटलं होते!
 • ४-५वी पासून सुरू झालेले बॅडमिंटन! PYC, डेक्कनच्या ग्राउंडवर मारलेल्या वॉर्मअपच्या फेर्‍या! त्यानंतर झालेल्या बॅडमिंटनच्या मॅचेस.. आणि ९०% वेळा जिंकणारी मी! ते दिवस मी कधीच विसरू शकणार नाही! मी कोणीतरी बेस्ट आहे हे फिलिंग त्याकाळात खूप मिळाले!
 • ४थीत झालेली लक्षद्वीपची ट्रीप! तिथल्या अरबी समुद्रात शिकलेले पोहणे!
 • नंतर सुरू झाले स्विमिंगचे दिवस! उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज सकाळी ७-८ भरपूर पोहण्याच्या लॅप्स करून,पोटात भुकेचा डोंब घेऊन घरी यायचे.. झोपाळ्यात बसून ठकठक-चंपक-किशोरच्या साथीने ऑम्लेट आणि मॅन्गो मिल्कशेप चापायचे ते क्षण!!
 • बाबांना कधी चुकुनमाकून कॅरममधे हरवले असेल, तर तो क्षण!
 • आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांच्या प्रॅक्टीस सेशन्स! ऍक्चुअल गणेशोत्सव!
 • इंजिनिअरिंगला जाम त्रास देत असलेला क्रिटीकल झालेला ऍप-मेक सुटला तो आख्खा दिवसच ! Happy
 • थर्ड इअरनंतर मात्र पीएल्समधे MIT library च्या पायर्‍यांवर बसून केलेला जीवतोड अभ्यास! स्वीटीबरोबरचा अभ्यास! रात्री फोनवरून मैत्रिणींबरोबर केलेला अभ्यास! तेही दिवस अफलातून! पहील्यांदाच जिगर्सच्या वाटेला न जाता, रेफरंस बुक आणून, नोट्स काढून वगैरे केला होता अभ्यास!
 • डिस्टींक्शन हुकल्याने झालेली निराशा! सर्व जग चांगले मार्क्स पडले म्हणून कौतुक करत होते.. तर मी लिटरली निराश होते!
 • नंतरचा जॉबसाठीचा वाईट्ट स्ट्रगल!
 • इन्नीआज्जीच्या घरच्या लाल-वेल्वेटच्या दुलईत दुपारी झोपणे!
 • आज्जीनीच शिकवलेल्या कविता..
 • दादाने घेतलेले माझे फिजिक्सचे बौद्धीक! :(((
 • रात्री गार्डन कोर्टमधले जेवण.. त्याहीपेक्षा तो माहौल!
 • माझी रोजची कॉलेजमधली एन्ट्री! Lol जीन्स, क्रीम जॅकेट, क्रीम साईड बॅग, आणि डाव्या हातात काळे हेल्मेट! Happy i used to feel like i am a hero! please note not heroine! a hero ! Lol
 • आयुष्यात जेव्हा जेव्हा (आणि त्या वेळा कमीच आहेत!) मला दादागिरी करता आली! Happy उदाहरणार्थ : SE ला NCPL नावाच्या प्रॅक्टीकलला मी जी सुटायचे प्रोग्रॅम्स करत, तो स्पीड, माझी विचारशक्ती, ग्रास्पींग पॉवर.. मलाच खरं नाही वाटत.. रीना मॅडम म्हणायच्या क्लासच्या जरातरी बरोबर राहा! नेक्स्ट सेमचे प्रोग्स आताच करणार का? :">
 • स्वीटी, स्कुटी अन मी.. अशक्य फिरलो.. पालवी मधे किती चहा ,दुर्गाची कोल्डकॉफी ढोसलीय कल्पना नाही! इंजिनिअरिंगच्या त्या रखरखाटातले छान क्षण!
 • वेताळ/हनुमान/ARAI/लॉ-कॉलेजची टेकडी ! मैत्रिणींबरोबर गप्पा मारत टेकडी चढून वरच्या खडकावर बसून, समोरच कलत जाणारा सूर्यास्त बघायचा! आणि..
 • नेहेमीचा आणि आजन्म आवडीचा क्षण राहील तो म्हणजे पहीला पाऊस, पहीला ’तो’ मातीचा वास.. त्यापुढे सारं फिक्कं!

अजुन खूप खुप्प आहेत! पण कसं सगळं लिहीणार.. त्याहीपेक्षा ते आठवणार? त्यामुळे इथेच बास करते.. यातही जमतील तशा ऍडीशन्स होतीलच याची खात्री! Obviously.. Life does not stop surprising you with those moments.. you just have to notice them! Happy

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

omg!! किती फास्ट रिप्लाय! वाचलेस ना नक्की?>>>>>>>>. हो गं वाचता वाचता मला माझ्या लहानपणीची दॄष्य दिसु लागलेली.....मम्मी ने उठवल्यावर इथे तिथे लोळत सरकणे ,,,, पहिले उठवणे प्रेमाचे, मग सक्तीचे मग धपाट्याचे वगैरे फार मस्त.... Happy

मस्त लिहील आहेस.;आधी लाड लाडात उठवण आणि मग धपाटा . हे एकदा तरी सगळ्यांच्या बाबतीत होत असेल Happy

बस्के, गार्डन कोर्ट्वरचं रात्रीचं जेवण - कुणाबरोबर ते नाही लिहिलेस Happy
तिथला माहोल फार्रच सही असायचा पण. पूर्वी तो भाग गावाबाहेर होता पार. त्यामुळे अजूनच मस्त वाटायचे तिथे. आता माहित नाही. कारण आता तो भाग भरवस्तीचाअ, गर्दीचा झालाय.

कूल! Happy

मस्तच बस्के Happy

खरंच असे क्षण कधी न विसरणारे असतातच पण मधूनच ध्यानीमनी नसताना डोळ्यांसमोर येतात तेव्हा खूप भारी वाटते Happy

"दिल चाहता है, हम ना रहे कभी यारों के बिन" एकमेकांच्या आवाजात आवाज मिसळून गाणारा ७-८ मित्रमैत्रिणींचा घोळका. नुकतंच कॉलेज संपवलेला. गळ्यात गळे, हातात हात. गाण्यासाठी अन मूडसाठी परफेक्ट लोकेशन- चापोरा फोर्ट, गोवा. तोच जिथे या गाण्याचं शुटिंग झालंय. संध्याकाळचा मावळता सूर्य, सोनेरी-केशरी-जांभळं आकाश, नजर पोचेल तोवर विस्तारणारा निळा-राखाडी समुद्र अन दाट हिरवाई, ७-८ वेगवेगळ्या पर्फ्युम्सचा एकत्र heady सुवास, निरव शांततेत चापोरा फोर्टच्या खडबडीत भिंतीवर बसून सुरु असलेला हसण्या-बोलण्याचा खळखळाट. हळूहळू सुर्य लाटांत दिसेनासा झाल्यावर अचानक झालेल्या अंधारात अचानक शांत झालेले आवाज. क्वचित एखादा अश्रु, पुढच्या inevitable ताटातुटीच्या कल्पनेमुळे, भविष्याच्या अनामिक भितीमुळे का एक स्वप्नवत प्रवास संपल्याच्या जाणीवेमुळे?

थँक्स सर्वांना! Happy

नताशा मस्तच! लिही अजून. Happy
मैत्रेयी, कोणाबरोबर जाणार! आईबाबा!! (पण लग्न ठरल्यावर गेले नवर्‍याबरोबर एकदा! ) Happy
पण मस्त माहौल. पूल शेजारचे टेबल मिळाले की अजुन छान वाटायचे. सगळं पुणे दिसायचे. कधी फायरवर्क्स व्हायचे! बॉलरूम डान्ससाठी जागा होती तिथे. लै रोमँटीक प्रकरण होते. आता मुळात ते लांब, स्पेशल ठिकाणी चाललो आहोत असं नाही वाटत. ते कसंही झाले तरी माझ्या डोक्यातली इमेज तशीच राहील त्याची! Happy

बस्के, मस्तच आहेत आठवणी!

आजच दुपारी 'चंद्रभागेच्या तीरी.......विठ्ठल विठ्ठल जयहरी' (गायक - विठ्ठल उमप?) हे गाणं ऐकताना सकाळी अकरा पाचला ला सुरु होणार्‍या कामगार सभेची आठवण, शाळेची तयारी, आईच्या हातचं गरम-गरम जेवण! अशा क्रमाक्रमाने आठवणी येत गेल्या!

बस्के, भारी लिहिलंयस. Happy

जिगर्स <<< ओये.. या जिगर्सची सुरुवातीला खूप चीड यायची. एकही उत्तर धड वाटायचे नाही. सगळे वरवर वाटायचे पण आजूबाजूची सगळी दुनियाच जिगर्समय झाल्याने मीपण झालो. Proud परिक्षेआधी शेवटच्या क्षणी ही वरवरची उत्तरं चाळायला कामी यायची.

आणि ती दुसरी एक सिरीज होती - फॅनॅटिक्स. पण ती पहिल्या दोन सत्रांसाठीच होती. तिसर्‍या सत्रातल्या काही विषयांकरता पण होती बहुतेक. आणि दुसरी एक 'स्टुडंट्स सिरीज'!

Happy
वत्सला, मस्तच! Happy

गजानन, Happy तुम्ही स्कॉलर दिसता! Proud मी एका विषयाची पुस्तकं सुद्धा न आणता फक्त जिगर्स वगैरे आणून अभ्यास केला होता सुरवातीला. Uhoh
अजुन एक सिरिज होती बहुतेक. पण नाव नाही आठवते अजिबात!

थँक्स परत एकदा! Happy

बस्कू गोडच लिहिलंस हं!
काही आठवणींबरोबर काही चित्रंही येतात डोळ्यासमोर आणि अगदी बुडून जायला होतं. या आठवणी अगदी मनात पक्क्या बसलेल्या असतात.

Pages