शोभायात्रा
धार्मिक सणांच्या, राजकीय मिरवणूका
ढोल - ताशे कर्णकर्कश्य बाजे
टोप्या, फेटे, झेंडे, घोषणा
कोरे करकरीत स्वच्छ कपडे
कोरडे करकरीत उग्र चेहरे
गाड्या, गुलाल, देखावे, शोभा
रस्ताभर रांगोळ्या, वाहतूक खोळंबा
फटाके, भाषणे, झिंदाबाद, जय हो
फोटो, व्हिडियो, बातम्या
गोड गोड छान छान
मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा
यदा यदा हि धर्मस्य..................