काहीच्या काही कविता

टाटा मात्र नॉनो ची खिडकीही उघडत नाही ...

Submitted by संदीप आहेर on 26 January, 2012 - 23:49

हीरोचे अडले काहीच नाही
होंडा जरी नवे दालन बांधू पाही

शोधीत राहतो मी बुलेट संगीत कायम
गीत तीचे सुरु होता कानावर हात कायम

ब्रम्हांड मानते ती, मी मॅकेनिक नि पेट्रोलपंप
सार्‍या प्रदक्षिणाही त्या भोवतीच करते

रंगते इंडियन मेडची चर्चा ती
रॉक १०० सांगून कैक मुद्दे हमखास टाळतो मी

रागात मस्तकावर आभाळ महिन्द्र घेऊ पाही
टाटा मात्र नॉनो ची खिडकीही उघडत नाही

मूळ प्रेरणा : विजय दिनकर पाटील यांची सहज सुंदर कविता, http://www.maayboli.com/node/32169

रागवू नये.

शब्दखुणा: 

अंगत पंगत

Submitted by असो on 25 January, 2012 - 08:51

क्षण दो क्षणांची साथसंगत
जमवा हसरी अंगतपंगत
हे क्षण जाता उरते काय
घ्या जगून क्षण भंगुर रंगत

सोपे किती हे सूत्र सुमंगल
कळते परि का घडते दंगल
शब्द शस्त्र का येती परजत
कसली अंगत कसली पंगत

क्षण दो क्षणांची साथसंगत
जमता पंगत जाते रंगत
षडरिपुंची सोड ना संगत
जमवा हसरी अंगतपंगत

अनिल

खिडकीत येत नाही टाटा करायला ती

Submitted by मंदार-जोशी on 25 January, 2012 - 06:24

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
येत असावा महान कंटाळा,
किंवा असावी सर्दी तिला!

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'कॉफी' उडून जाता
असेल टाकला चहा

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
किरणांनी भाजले का
सूर्याच्या तिला?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दीर्घाचा र्‍हस्व होता...
का राग राग करते?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
खावी बिस्कीटे कशी?
- प्रश्न पडला तिला

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दुष्ट 'तो' असावा
त्या भ्रमरापरी

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
असेल का वृत्ती,
'सनातन' फार त्याची?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'वृत्तात' राम नाही
का वाटले तिला?

शब्दखुणा: 

रात्रीचे दहा वाजतात

Submitted by Kiran.. on 23 January, 2012 - 11:42

रात्रीचे दहा वाजतात आणि
सामसूम होते
गुलमोहर मान टाकतो
हितगुज वरची कुजबुज
ऐकू येईनाशी होते
गप्पाष्टकांना जाळ्या चढतात
आणि वर्दी येते..
जेवायची पानं वाढली जातात
तर कुठे चालू असतात
टीव्हीवरच्या मालिका
आणि कुठे कुठे
फोनवरच्या गटगगप्पा
काही चोरटे समस
इकडून तिकडे पास होतात
आणि काही..
किबोर्ड बडवण्यात दंग होतात..
उद्याची ती, बरं का, खानेसुमारी असते
पहिल्या पानावर येणा-या
त्सुनामीची तयारी असते..

वीररसाठी असतात इथे
कुरूक्षेत्रं आणि पानिपतं..एव्हरग्रीन
तुटलेल्या गदांची दुरूस्ती होत असते
नि गंजलेल्या तरवारींना तेल चढत असते
खिंडीमधे कापावा शत्रूला कसा

चारोळी

Submitted by अनाहक on 20 January, 2012 - 12:39

तुझं प्रेम मिळवायला तुझ्यावर रोज रागवावं लागतं
नाहीतर तहानलेल्या डोळ्यांना अश्रुंवरच भागवावं लागतं

शब्दखुणा: 

केवळ विनोद क्र.४, रावण कसा मेला-एक बिनडोक कविता

Submitted by pradyumnasantu on 19 January, 2012 - 21:21

केवळ विनोद क्र.४, रावण कसा मेला-एक बिनडोक कविता

मी रावणाचे डोके नम्बर नऊ
मला आहेत जोडीला
आणखी नऊ जुळे भाऊ
मी थोडे मद्य प्यालो काल रात्री आधी जेवणाच्या
चिडुन मग बोलली मंदोदरी अरे कारे ए शिंच्या
ती गेली लगावण्याला जोरामध्ये माझ्या कानशिली
मी थोडा सरकलो मागे अन ती नंबर आठला बसली
आम्ही दोघे आठ, अन नऊ होउनी गेलो निकामी
*
सहा अन सात नंबरची सर्दी-पडशाशी टक्कर
दोन ते पाच यांची मधुमेहाने वाढली साखर
रावण जो झोपला नवीन आणलेल्या पलंगावरी
रूंदी पडली कमी अन शीरे लोंबकळली बाहेर
एक नि दहाच्या मानेमधी उसण भरुन गेली
अशा रितीने दहाही डोकी निरुपयोगी झाली
*

शब्दखुणा: 

" शोध तिचा लागेना ...! "

Submitted by विदेश on 19 January, 2012 - 12:36

कुठे शोधू तुला एकटीला
किती शोधू तुला एकटीला
तुझा विरह असह्य होतोय
तुझ्याविना चडफडतोय !
येताजाता बाहेर फिरायला
कामाला आणि उंडारायला
तुझी साथ असायची !
लांब जवळ गेलो तरी
तू बरोबरच असायची !
दारापासून कार्यालयापर्यंत-
मंदिरापासून मद्यालयापर्यंत
तुझ्याविना बाहेर पडायला
लाज वाटते मला ,
तुझ्याशिवाय बाहेर जायला
तोंड नाही मला ,

शब्दखुणा: 

डोमेगावची शाळा

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 19 January, 2012 - 01:48

डोमेगावच्या शाळेत शिकवीत होते a b c d
पण पोऱ्ह म्हणत होते व्हाय धिस कोलावारी डी?
मग मास्तर म्हणले e f g
आन पोऱ्ह करायला लागले ए जी, ओ जी!
मग मास्तर म्हणले h i j k
आन पोऱ्ह म्हणले माय नेम इज मिस्टर के. के.!
मग मास्तर वैतागून म्हणले l m n
तर गण्या म्हणतो, दिप्याने चोरला माझा पेन!
मास्तर ला आला राग आन मास्तर ओरडलं o p q r
झंप्या म्हनला, मास्तर उद्या सुट्टी, उद्या हाय रविवार
मास्तर म्हणे झंप्या गप आणि म्हण s t u v
झंप्या म्हणतो, उद्या मज्जा, उद्या पाह्यचा tv
मास्तर भांबावून म्हणे w x y z

माझिया जीभेला........

Submitted by सस्मित on 16 January, 2012 - 06:47

'माप्रिप्रिक' ह्या 'काहीच्या काही' मालिकेच्या टायटल साँगच्या चालीवर.

घेउन येशी रोज तु
दुधी, वांगी अन् भोपळे
जीभेवरी ही माझ्या ग
दोडक्याचीच चव रेंगाळे
अ‍ॅसिडीटी ही वाढत आहे
खाउन चणा वाटाणा
माझिया पोटात अन्न पचेना........

रोजच खातो भाजी अळणी
करपट पोळ्या डाळीचे पाणी
आईच्या हातची चव आठवे
तिला सांगावा धाड ना
माझिया जीभेला चव कळेना..........

करुनी हद्दपार दोडकी नी वांगी
शिजव कधीमधी चिकन तंदुरी
कधीतरी तु दया करुनी
मटण रस्सा कर ना
माझिया मनाला भोपळा भावेना........

मुग नी मटकी काळा वाटाणा
ढवळे पोटात अंगी लागेना
कशा मी सांगु तुला ग राणी
माझ्या ह्या भावना

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता