अल्हैया
अल्हैया
जिथे वेदना ही हळूवार होते
गर्भरेशमाची निळी रात्र होते
वृत्ती तिथे मौन संगीत गाते
अल्हैया अल्हैया अशी गाज येते
सूर्य ही सोडतो दाहकाचा पिसारा
गलबते मनाची गाठताती किनारा
सुखाने निजावी पराशांति शय्या
अन आवाज यावा अल्हैया अल्हैया
संकल्प वेळूं सुकलीत बेटे
प्रतिबिंब जेथे बिंबासी भेटे
अकस्मात जावी प्रवाहात काया
आणि घोष यावा अल्हैया अल्हैया
काही कळेना कसे होत आहे
होणे न होणे काही न राहे
जे सत्य होते निघालीच माया
आवाज येता अल्हैया अल्हैया
उ. म. वैद्य. २०१२