काहीच्या काही कविता

असेल करायची कविता तर

Submitted by आशुचँप on 17 April, 2012 - 08:30

असेल करायची कविता तर
मनात हवे एक हळुवार स्वप्न
अगदी साखरझोपेत पडलेलं
हिरव्या तृणांवरच्या दवबिंदूंसारखे
अलगद शिंपडावेत थोडे शब्द
पडतील तसे द्यावेत पडू
शोधू जाऊ नये त्यात अर्थ

असेल करायचीच कविता तर
मनात हवा एक धगधगता अंगार
करपून ठिक्कर झालेल्या हातात
घ्यावी शब्दांची माती अन
प्रयत्न करावा इमले उभारण्याचा

असेल करायचीच कविता तर
मनात हवी एक हुरहुर अनोखी
ओझरत्या भेटीगाठी अन्
उमलणार्‍या भावना व्हाव्यात व्यक्त
सागरकिनारी पसरलेल्या वाळूत

पण पाठ सोडेल तर शपथ.....

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 April, 2012 - 06:06

सक्काळपासूनचं मनात माझ्या
घालतोय हा थैमान खुळा !
दिनचर्येवर माझ्या नेहमीच
खुश्शाल फ़िरवतो अस्साचं बोळा !

पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा..हा...हा कंटाळा !!!

सुट्टी-बिट्टीचे ज्यादा काम ?
अहो नाही लवकर उघड्त डोळा !
डोकंही होतं जड-जड
अकलेवरही लागतो टाळा !

पण पाठ सोडेल तर शपथ.....
...........मेला...हा...हा...हा कंटाळा !!!

दुपार मोठी...उत्साहाची खोटी,
बाहेर रिप-रिप पावसाळा !
संध्या दाटे...पै- पाहुणे....
चहा अन कॉफ़ीचं सतरावेळा !

आकार

Submitted by sarode_vaishnavi on 5 April, 2012 - 09:57

एक
आकार-
जरा अस्पष्ट
आणि अंधूक..!
डोळ्यांसमोरुन गेला..

त्या आकृतीत
कुठेतरी आपलेपणा दिसला..!

हळुच
पापणी उघडताच..!
तो
दिसेनासा झाला..

भीकूची वाडी

Submitted by चाऊ on 4 April, 2012 - 10:09

भिकूची वाडी, त्यात रहाते लाडी
आणि ती नेसते, गोल साडी

भिकूच्या वाडीत उंच नारळाचं झाड
फ़ांद्या बिन्द्या काही नाही, नुसताच उंच वाढ

भिकूच्या वाडीत आहेत आंबे हापुस
एक फ़ळ कधी देत नाही, त्याचा खडूस बापूस

भिकूच्या वाडीत पडतो जांबांचा खच
मागायला गेलं तर करतो भिकू, कचकच

भिकूच्या वाडीत ओलाव्याला, अळू, तुळस, केळी
नैवेद्यासाठी पानं आणायला जातो वेळोवेळी

भिकूच्या वाडीत दिवसाही काळोख
झाडं भरल्या जमिनीस नाही उन्हाची ओळख

भिकूच्या घरात कायमच पसारा
धिंगाणा घालतात त्याची पोरं बारा

अल्लखकरण

Submitted by निनाद on 2 April, 2012 - 05:56

छ्या! माझ्या मराठी कविताही कळू नयेत?

मी इतकी भव्य कविता केली त्याला - कळत नाही असा रिस्पॉन्स? च्छ्या! एका अकादमी विजेत्या कवीला मराठी जगत मुकले याचे मला मनस्वी वाईट वाटते आहे.
माझा एक मित्र या कवितांना दुर्बोधिका म्हणतो.
नाही हो! सुबोध आहेत त्या.

असो पहिला डोस जरा कडक बसल्यामुळे ही जरा पाणी घालून केली आहे.
आशा आहे ही तरी आवडेल ; )

ए! कोण तिकडे म्हण्तोय रे, शब्दांपुढे शब्द रचले की कविता होत नाही ते?

असो तुम्ही नका लक्ष देउ... वाचा वाचा आणि प्रतिसाद द्या बर्का!

अल्लखकरण

मी तुला पाहताच
मनोमन बद्धरुपांतरण|
रोजच ते अनुभववावे

शब्दखुणा: 

व्युत्क्रमी परिकर्म

Submitted by निनाद on 1 April, 2012 - 02:03

व्युत्क्रमी परिकर्म

स्वयं-संतुलन कच्चीजप्ती शंकुचाचणी अवसीदन।
मिथ्या शस्त्रक्रिया स्व-विमोची रूपद बीजगुणन॥

दुय्यम उघाड दोलनलेखी मळसूत्रउत्परिवर्तन।
वालुकाश्मी भित्ति बीज चाचणी अपवाहचक्रन॥

वैतनिकपद व्युत्क्रमी परिकर्म सदापदावर्तन।
स्थूनांकन दोष अपवाह गुणांक वनसंशोधन॥

प्रतिवेदक अधिकारीसंचय वायु पुनर्मूल्यन।
लालसावर प्रारणप्रतिक्षेप परिपथ प्रत्यावर्तन॥

खजल............

Submitted by वैवकु on 31 March, 2012 - 03:40

गजल करा रे गजल करा
दिसेल त्याची हजल करा

प्रवास थोडा कठिण असे
करा मजल-दर-मजल करा

चकाफिये घ्याच आणि त्यांची-
-च एक सुंदर "चजल" करा
(उदा.: उद्दिष्टच ,गप्पिष्टच, इत्यादीच!
च +गजल =चजल>>>> कॉलिंग प्राजु!! )

उगाच "भंकस" म्हणा कुणा
कमेंट नुसते "प्रजल!!" करा
(प्र+गजल =प्रजल >>>>>>कॉलिंग विदिपा!! )

तखल्लुसांचा नकाब फाडा
खाउन खुन्नस "खजल" करा
(ख +गजल =खजल >>>>>कॉलिंग वैवकु!! )

दिस जातील दिस येतील...

Submitted by बागेश्री on 28 March, 2012 - 04:03

हिरानंदानी मधे घर घेण्याच्या माझ्या सखीच्या स्वप्नाची- कहाणी- थोड्डीशी मसाला मार्के!! Wink
--------------------------------------------------------------------------

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?
३ बेडरुमचं एक घर बघ नवं,
नव्या घरामंदी काय येगळं होईल?
स्टेटस काय असतं, त्ये समद्यांना कळील...

दिस जातील दिस येतील,
फ्लॅट जाईल, ड्युप्लेक्स येईल.... (२)

अवकळा समदी जाईल निघूनी,
मोठ्ठ्य्या घरामंदी राहू, राज्जा रानी वनी
मिळल का त्याला उन-वारा-पानी?
राहिल ते दिसल का ह्याच फ्लॅट वनी?
घर आपलच पण, होईल येगळं
फर्निचरानं छान दिसायचं देऊ त्याला बळं!

दिस जातील दिस येतील,

मनात येते देव बनावे

Submitted by निशिकांत on 27 March, 2012 - 08:03

छोट्या मोठ्या नको अपेक्षा ध्येय जरासे भव्य असावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

अनादि काळापासुन पत्नी श्रीविष्णूंचे पाय चेपते
भुजंग देई सदा सावली ऊन कधी ना तिथे कोपते
मस्त शेषशाही नारायण होउन आकाशात जगावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

खून, दरोडे,बलात्कार अन् लाच फरेबी जीवन झाले
काय जगाया आयुष्यात या? दु:ख वाहते भरून प्याले
स्वर्गलोकच्या मस्त अप्सरा नाच बघूनी होश उडावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

निवडणुकीची हवा न स्वर्गी, ईंद्र कधीचा आहे राजा
पक्ष विरोधी? छे! ईंद्राचा सदैव वाजत असतो बाजा

कवयित्री मी झाली जी.......(उ ला ला च्या धर्तीवर)

Submitted by पुणेकर आजोबा on 27 March, 2012 - 04:07

चाल- उ ला ला, उ ला ला, उ ला ला, उ ला ला

गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
गुरूजी, गुरूजी; गुरूजी, गुरूजी...कवयित्री मी झाली जी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

हाडकुळ्या प्रतिभेला, कशी मी मारू मिठी?
दारूमध्ये विरघळते, साखर जैसी पिठी
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

नवे पाखरू, कविता शिकण्यासाठी; सावज आले
गोण्यांनी हे लिखाण पाहून; 'तुझे' नि मी घाबरले
गा ला ला; गा गा ला; गा गा गा, ला गा गा
मी (बे)वडा, तू बशी
आ हाSSSSSSS, आ हाSSSSSSSS आ हाSSSSSSSSS

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता