Submitted by चाऊ on 23 March, 2012 - 10:14
धार्मिक सणांच्या, राजकीय मिरवणूका
ढोल - ताशे कर्णकर्कश्य बाजे
टोप्या, फेटे, झेंडे, घोषणा
कोरे करकरीत स्वच्छ कपडे
कोरडे करकरीत उग्र चेहरे
गाड्या, गुलाल, देखावे, शोभा
रस्ताभर रांगोळ्या, वाहतूक खोळंबा
फटाके, भाषणे, झिंदाबाद, जय हो
फोटो, व्हिडियो, बातम्या
गोड गोड छान छान
मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा
यदा यदा हि धर्मस्य..................
गुलमोहर:
शेअर करा
जय हिंद जय महाराष्ट्र....
जय हिंद जय महाराष्ट्र....
आपल्याला या कवितेतून काय
आपल्याला या कवितेतून काय सांगायचे आहे? यादीतील काही गोष्टी सुंदर, काही त्रासदायक व काही अपरीहार्य आहेत. रोजच्या जीवनातील आहेत. पण त्या मांडण्यामागील उद्देश लक्षात आला नाही. एरवी रचना म्हणून सुंदर आहे.