काहीच्या काही कविता

वाटते त्यांना आपली गळचेपी होत आहे (हजल)

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 4 June, 2012 - 04:55

क्रूपया सर्वांनी खेळीमेळीने स्विकारावी ही विनंती. कुणालाही दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही आहे.

hajal.jpg

या कविता पुर्ण करुया..!!

Submitted by उदयन. on 29 May, 2012 - 09:38

टांग तुझ्या नानाची
हात तुझ्या बाबांचा
.
टांग तुझ्या नानाची
हात तुझ्या बाबांचा
.

...मी डास आहे...

Submitted by लाजो on 28 May, 2012 - 19:57

ऋयामच्या डास आहे ला डासाचे हे उत्तर Proud

...मी डास आहे...

डास आहे...मी डास आहे..
चावणे हाच ध्यास आहे...

ओडोमॉसचा वास आहे
मच्छरदाणीचा फास आहे...

इलाज काही खास आहे....
बच्चु तयारी झक्कास आहे

आज रक्ताचा ना घास आहे..
झाला आता तास आहे....

शिकार नाही.. काय त्रास आहे
बंदोबस्त आता बास आहे ....

शब्दखुणा: 

डास आहे...

Submitted by ऋयाम on 26 May, 2012 - 12:44

अंतरीच्या गूढ गर्भी, रोज एकच त्रास आहे
सुज अंगी दाटलेली, मूळ त्याचे डास आहे.

व्यर्थ चकल्या, व्यर्थ पेस्टा, व्यर्थ सारे रे फवारे,
लोशनाचे करुन प्राशन, झिंगलेला डास आहे.

बंद खिडक्या बंद दारे, पाचवरती फॅन आहे,
मनमनीच्या कोपर्‍याती, फक्त त्याचा वास आहे.

रानटी अन पाळलेला क्रॉस देखील डास आहे
रंक अथवा राव कोणी, सात होता डास आहे.

सर्व थकले मार्ग आता, फार झाला त्रास आहे,
तोचि रजनी कांत अपुला, फक्त त्याचीच आस आहे ...

* रोबॉट फेम रजनीकांताची माफी मागून..

फक्त

Submitted by शोभा१ on 21 May, 2012 - 06:04

फक्त शब्दाची मजा सांगते मी इथे,
जास्त नाही ’फक्त’ काही शब्द लिहिते इथे ll १ ll

सांगतो, एकमेका ’फ़क्त’ आराम कर,
नशिबी असे परी ’फक्त’ तू काम कर ll २ ll

फक्त चहा, फक्त नाश्ता, फक्त स्वयंपाक कर,
फक्त मुलांचा अभ्यास घे, अन फक्त नोकरी कर ll ३ ll

फक्त स्वच्छता कर, अन फक्त बाजारहाट कर,
फक्त बिले तू भर, अन, फक्त हिशेब कर ll ४ ll

मुलांला सांगतो आम्ही, फक्त अभ्यास कर,
फक्त स्कॉलरशीप, अन फक्त स्पर्धा कर ll ५ ll

फक्त क्लास, फक्त, गाणे, फक्त व्यायम कर,
फक्त, नाच, फक्त प्रत्येक कला आत्मसात कर ll ६ ll

फक्त शब्दाने किती केली जादू ही अशी,

पाच वर्षं आता घरीच नाच कर

Submitted by pradyumnasantu on 20 May, 2012 - 15:08

(कृपया एक नट व एक सिक्युरिटी यांतील हा संवाद केवळ विनोद म्हणून लाईटली घ्यावा ही विनंती)

"माझी मुलं व्हीआयपी
का करतोस जाच
भिकारड्या रखवालदारा
बोटं उठवीन पाच
नेतेमंडळी खिशात माझ्या
फुकट नको दंगा
जादा हुशारी दाखवशील तर
जिंदा गाड दूंगा"

"अरे जारे जा फिल्मी बादशा,
हुशारी दाखवायला शोध कुणी नटी
नाही तुझा चमचा मी
मी आहे इथला सिक्युरिटी
तू आणि इतर सगळेच मला सारखे
ऐसा चोप दूंगा बेटे चलते चलते
हम भी है राही ’प्यारके’.."

"चूप बे ए सिक्युरिटी
पुलीस माझ्या मागे ग्यारा मुल्कांची
पडलो तरी रावण आहे मी
जनता खुळी माझ्या झुल्पांची
भुंकू नकोस, गप्प रहा

शब्दखुणा: 

पोंग्याभूत

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 12 May, 2012 - 15:42

स्वप्न पडल एक निराळ, माझ्या भुताला त्यात मी पाहिलं.......
भूत म्हणल माझ मला, मरायच्या आधी पोंगे खायचं राहील.....
भटकायला लागली माझी आत्मा फक्त पोंग्यांसाठी बरका....
थरार निर्माण झाला माझ्या भुताचा, हे पोंगे भूत बरका...
पोंग्याभुताला सगळीच घाबरली गल्लीतली पोर्ह माझ्या
पोंग्याभुताला मज्जा आली, पोंग्याभूत बनलं राजा...
पोंग्याभूत खायचं पोंगे जे मी लहानपणी खायचो...
शाळेच्या जवळच्या वरल्या गल्लीत कुठेतरी राहायचो...
शहरात आ ल्यावर माझे खायचे सुटले होते पोंगे...
उगीच घेतली होती मी शहरीपनाची भकास सोंगे...
स्वप्नातलं भूत माझ, माझ्या लहानपणीच रमल
राहिलेल्या माझ्या हौशींना पुरं करत सुटलं...

सुप्रभात .. शुभ रजनी ...

Submitted by विदेश on 12 May, 2012 - 02:06

सुप्रभात .. शुभ रजनी ...
कशासाठी दोस्त ?

अफजलगुरू कसाब
मजेत मस्त

आपण महागाईने
नेहमीच त्रस्त

गृहिणी टंचाईत
नित्य चिंताग्रस्त

सामान्यांची स्वप्ने
धुळीत उध्वस्त

नेतेमंडळीचे दौरे
कायम जबरदस्त

जनतेची कमाई
दलालाकडून फस्त

सभागृह नेहमी
गोंधळातच व्यस्त

गुड मॉर्निंग... गुड नाईट...
कशासाठी दोस्त ? "

शब्दखुणा: 

संसार

Submitted by पूजा जोशी on 28 April, 2012 - 16:18

संसाराच्या गाडीची चाके पत्नी आणि पती
एकरूप झाले तरी समांतरच चालती
कधी रुसति फुगति कधी दमती भागती
पाठीवरच्या ओझ्यने पार फाटती तुटती
मग ग्यारेजात जाती हवा पाणी बदलती
पुन्हा नव्याने संसाराचा गाडा ते हाकल ती

कशी गंमत आहे ही लग्न करून कळते ज्याने नाही केले त्याची गाडी बिघडते

'काकाक' दुर्लक्ष निषेध कविता !!!!

Submitted by नानुभाऊ on 28 April, 2012 - 06:06

नमस्कार!

गेल्या काहि दिवसात 'काकाक' कडे झालेल्या दुर्लक्ष वजा अन्यायाचा तीव्रं निषेध नोंदवून हि 'काकाक' पोस्ट्त आहे! Proud

व्रुत्त नसेल, पण 'व्रुत्ती' पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे Happy

चुभुद्याघ्या! धन्यवाद! Happy

===================================================================

लहान तोंडी घेई 'नानु' मोठा-मोठा घास म्हणे !
काल मनाला झाला माझ्या थोडा-थोडा त्रास म्हणे!

'माबो'लीवर काय लिहावे ? कुठे लिहावे ? कळेच ना!
'काकाक'च मग उरला आता एकच माझा ध्यास म्हणे!

जमतच नाही मजला तुमचे ' लगा लगागा लगा लगा'
'लगा लगागा लगा लगागा, असे फक्त बकवास म्हणे!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता