जमते तसे करावे .......................

Submitted by वैवकु on 22 March, 2012 - 12:04

जगणे बधीर व्हावे काहीच ना सुचावे
खांबावरी मुतावे झाडावरी मुतावे

जेथे कुणीच नाही तेथे हगून यावे
नाहीच साधले तर रस्त्या'कडे' बसावे

कुंड्या धुवून देणे आहेच काम त्यांचे
हौदांवरी धुवावे हपशांवरी धुवावे...................... (........पण दगडास ना पुसावे !!)

दैवात फक्त ज्यांच्या आहे 'उशीर' होणे
केंव्हातरीच खावे केंव्हातरीच प्यावे

असते सुदैव तेंव्हा टॉय्लेट वापरावे
नसते सुदैव तेंव्हा "मी-बेफिकिर" म्हणावे....!!!!!!!!!

जमते तसे करावे .....जमते तसे करावे .....!!!!!!!
__________________________________________________________________
कुंड्या : कुंडी या अस्सल कानडी शब्दाचे मराठी अनेकवचन अर्थ :शी केल्यावर धुवावीच लागते ती जागा.
टॉय्लेट: इंग्रजी शब्द अर्थ: शौचालय (हा अश्लाघ्य वाटत असेल तर लॅट्रीन हा समवृत्तीय समानार्थी पण ऐकायालां सुंदर शब्द वापरून गझल पुन्हा म्हणावी )
__________________________________________________________________
का. का. डिस्क्लेमर्स :
१)प्रस्तुत विडंबन मूळ रचनाकाराच्या परवानगीनेच सादर करीत आहे तेव्हा प्रतिसादासाठीही परवानगीची आवश्यकता नाहीच हे उघड आहे
२) हे सगळे गमतीनेच पचवावे............ नंतर तक्रार करू नये ही विनन्ती!!
__________________________________________________________________
मूळ रचना :

http://www.maayboli.com/node/18507

__________________________________________________________________

बीभत्स नैसर्गीक Proud

"ओल्या पिपात होते **ले उंदीर सोळा " ह्या महान बीभत्स रसातील कविते नंतर तुमच्याच कवितेचा नंबर लागतोय की हो Light 1

प्रसादराव:
बेफीजीना विचारा मी परवानगी घेतलीय देवाशप्पथ !!
इतर ठिकाणीही विडंबने आहेत त्यात सौम्य पण अशीच बिभत्सना आहे..........
माझी अभिव्यक्त होण्याची नैसर्गिक अशी पद्धत आहे .
त्यास मी प्रयत्नपूर्वक ही सुधारणा करू शकत नाहीय
समजून घ्याच राव