पुन्हा घेतली मी उधारी वगैरे !

'वगैरे' Returns !!!!

Submitted by नानुभाऊ on 15 March, 2012 - 12:52

सप्रेम नमस्कार! Happy

With All due Respect to the great & the"Orignal" वैभव जोशी जी .....

एक निखळ मनोरंजन म्हणुन पोस्टत आहे.... क्रुपया गैरसमज नकोत... धन्यवाद! Happy

==============================================

पुन्हा घेतली मी उधारी वगैरे!
पुन्हा हासले 'ते' करारी वगैरे !

उचलता असा मी विडा जिंकण्याचा
उरे फक्त हाती सुपारी वगैरे !

अखेरीस ती एक अफवाच ठरली
'चितळे'हि उघडे दुपारी वगैरे !

'बम्बै' बिचारी तिला सर्व प्यारे
गुज्जू, मराठि, बिहारी वगैरे !

नावात 'नानु' नि हातात 'नॅनो' !
स्वप्नात माझ्या फेरारी वगैरे !

मला मारण्याचे ठरवतील तेहिे !

Subscribe to RSS - पुन्हा घेतली मी उधारी वगैरे !