काहीच्या काही कविता

गझलेला कंटाळलेले.....

Submitted by बागेश्री on 12 March, 2012 - 08:40

माझ्या गझलकार मित्र मैत्रिणींनो,
सदर रचना अगदी गम्मत- जम्मत आहे, कुणालाही उद्देशून काहीही नाही त्यांत... हघे प्लीज Happy

गझलांमध्ये वारंवार वाचण्यात आलेल्या काही विशिष्ट शब्दांचे हे इवलेसे मनोगत... येन्जॉय्य Happy

_____________________________________________

एके दिवशी गझलांना
'सरण' गेले कंटाळून,
नको म्हणाले जन्म हा
गझलकार घेतो नुस्ता वापरून!!

त्याच दिवशी 'पैंजण'ही
गझलांवर रुसून बसले,
शब्दांमध्ये अडकून बिचारे
तुटले, फसले, धुसमूसले!

'भास- आभासांना' हवी
गझलांतून जरा मुक्ती,
पकडा इतरही शब्दांना
आमच्यावर नकोय सक्ती!!

राहिलच मागे कसा
वैतागलेला 'श्वास'..
आहे सहज उपलब्ध मी,

निषेध

Submitted by चाऊ on 11 March, 2012 - 04:10

सगळं असुन, नसल्यासारख, सगळ नासल्यासारख तोंड करुन, उजेडाकडे पाठ करुन बसणार्‍या, सदा कसली तरी तक्रार करणार्‍या ( माझ्याच सारख्या ? Happy ) मंडळींच्या वरुन सुचलेले हे शब्द.......

पुर्वी ल्यायचो फाटके कपडे त्यांचा निषेध असो
आज अंगावरच्या महागड्या कपड्यांचा ही निषेध असो

वडा-पाव खाऊन दिवस घालवले त्यांचा निषेध असो
पंचतारांकीत खाणे खातो आहे, त्याचा निषेध असो

कधी कष्ट करुन पोट भरले त्याचा निषेध असो
गडगंज कमावणार्‍या आजच्या ह्या नोकरीचा निषेध असो

होत्या चार गोड मैत्रीणी त्यांचा निषेध असो
सुरेख समजुतदार बायको आहे, तिचाही निषेध असो

मरता मरता वाचलो कधी त्याचा निषेध असो

हल्ली..

Submitted by के अंजली on 3 March, 2012 - 08:54

"तुला कविता कळत नाही,"
तू म्हणायचास............

तुला एवढं वाचत गेले....
तू तरी कुठे कळलास मला??

दिवसांची पाने उलटताना
मध्येच कधीतरी...
तुझ्या माझ्या आठवणींची...
सुकलेली फुलंच सापडतात...

वाचतच नाही मग..
मीही हल्ली.....

"हवेत गेली.."

Submitted by sarode_vaishnavi on 3 March, 2012 - 08:29

राग आला,
खुप-
स्वतःचाच....

यश - अपयश
याचा विचार न करता
मदमस्त होउन
जगत असताना,
कुणी म्हणतं
"हवेत गेली.."

मी..!!!!!!!!!
हवेत गेली...!!!!!!

माझे पाय तर
मातीत घट्ट रुतलेले
दिसतात मला..
तरिहि म्हने
"हवेत गेली.."

राग आला,
खुप-
स्वतःचाच....

ओळखलचं
नाहीस ग....

काहिच नाहि..!!

तुझा
"हवेत गेली.."
खरं तर समजला नाही,
काय अर्थ घेउ,
कि
सोडुन देउ..??

तुच सांग..

पण,
राग आला,
खुप-
स्वतःचाच....:)

काहीच्या काही बालकविता: आजोबाच्या काळातली जादूची छप्पी

Submitted by pradyumnasantu on 1 March, 2012 - 19:06

आजोबाच्या काळातली जादूची छप्पी
शनिवारचा दिवस
सकाळची शाळा
कडक चव्हाणमास्तर आणतात
पोटात माझ्या गोळा

कारे बाळा असा
हात धरलायस मित्राचा
उभा रहा तू बघू
आणि म्हण पाढा सत्राचा

स..स...स्स.सर सर
नको मला ते सर सर
म्...म..
नको म म मास्तर
म्हण पाढा सत्राचा भराभर

सांग सत्रा दुणी किती
प प प प पस्तीस
सत्रा पंचे, सत्रा सक्खं
प पन्नास, अ अ अडतिस

शाब्बास, आता दप्तरातून
आण बारा इंची पट्टी काढून
सर पट्टी नाही आणलो
घरी आलो विसरून

मार जरा बागेत उडी
आण जाड मेंदीची फांदी
सट सटासट सट सटासट
नको सर, सत्रा चोक अडुसष्ट

दुस-या दिवशी पाढा मी अगदी पाठ म्हणतो

लपंडाव

Submitted by चिमुरी on 27 February, 2012 - 23:00

जाणतेपण आल्यापासुन
चालु होतो एकच खेळ
एकाविरुद्ध अनेक
असाच घालावा लागतो मेळ

एकीला पकडलं
तर दुसरी रुसुन बसते
तिला पकडायला जावं
तर ती वाकुल्या दाखवुन पळते

कधी कधी एखादी
अजिबात हाती लागत नाही
सांदीकोपरे हुडकुनही
पुसटसं दर्शनही देत नाही

बेसावध क्षणी कधी
अलगद सापडते
एखादी अल्लड,
अव्यक्त मात्रा

टाईम प्लीज म्हणुन
ब्रेक घ्यायला गेलो
तर ठरलेलंच असतं
खेळाचं बदलणं

पळायचं, लपायचं सोडुन
एकापाठी एक करतात गर्दी
पाठशिवणीचा खेळ सोडुन
डाव झब्बुचा करतात चालु

कधी कधी झब्बुचा खेळ
सप्तरंगी होत जातो
एका हळव्या क्षणी मात्र
रंगाचा बेरंग होतो

मग पुन्हा चालु होतात

फट जराशी - कटकट उराशी

Submitted by किरण कुमार on 27 February, 2012 - 05:55

फट जराशी पाहताना
कटकट उराशी जाहली
बुझविता मग घाम फूटला
फडफड जीवाची जाहली

फटीतूनी त्या आरपार
मी किनार होती पाहिली
स्वर्ग होता शोधलेला
तू मनातूनी लाजली

-- किकु................

बाबू

Submitted by चाऊ on 19 February, 2012 - 04:29

चालवून कलम, करती
कत्ले आम, बाबू
नाडली, रडली जनता
म्हणते त्यांना खाबू

लेखणीची एक हरकत
करते रंकाचा राव
फिरली उलटी तर
होई जिंदगी बेकाबू

नाही इच्छा तिची तर
काहीच होत नाही इथे
नुसतेच कगद जुने
त्याची सडकी बदबू

झाली लक्ष्मीची बटिक
सरस्वतीची अक्षरे
सही, शिक्का, प्रमाणपत्र
हीच आजची अब्रू

पयलं पिरेम कंदी कुनाला सोडत न्हाय

Submitted by Sanjeev.B on 15 February, 2012 - 03:26

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
वॅलेंटाईन डे काल संपन्न झाले, त्याचेच प्रेमळ मुहुर्त साधुन ही एक काही च्या काही .
सर्व प्रेम वीरांना / विपुल (विवाह पुर्व लफडं) विरांना ज्यांनी विपुल संख्येने विपुल केले आहे त्यांस समर्पित / अर्पित कि काय म्हणतात ते.
*****************************************************

काल पहायला गेलो होतो शिन्मा
काय सांगु दोस्तांनो झालं माझं खिमा

दरबान म्हणाला कसे आहात तुम्ही
सौ म्हणाली ह्याला कसे ओळखता तुम्ही

मी म्हणालो आहे जुनी ओळख
सौ म्हणाली कळले हो तुमची ओळख

कॉर्नर सीट पाहुन उफाळल्या "जुन्या आठवणी"
पुसल्या जात नाही "काही आठवणी"

धडधड... धडधड... धडधड... भाषा प्रेमाची

Submitted by सत्यजित on 14 February, 2012 - 13:40

माझा अबोला आणि
तुझी अखंड बडबड
मी बोलावं म्हंटल तर
नुसती धडधड... धडधड... धडधड...

म्हंटलं लिहावी एक कविता
यमका वृत्तात जुळवून धड
आणि पान भरुन उतरवली
धडकत्या हृदयाची धडधड... धडधड... धडधड...

कवितेतून बोलावं तर
तिथेही तिच गडबड
पानभर लिहीलं होतं
नुसतं धडधड... धडधड... धडधड..

असा कसा गं मी? न लिहीता येतं
न बोलता येतं धड
तू नसलीस की तडफड
तू असलीस की धडधड... धडधड... धडधड..

माझी धडधड कविता
तू धडाधड वाचलीस
मला वाटलं तू हसशील
पण तू तर चक्क लाजलीस... धडधड.. धडधड.. धडधड

वाटलं बुक्का मारुन छातीत
बंद करवी ही धडधड
तू हसुन लाजलीस ?

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता