अजुन एक प्रयोग

प्लान

Submitted by भूत on 16 March, 2012 - 04:29

जेवणाचा काय आहे प्लान मित्रा ?
लावुया का एक खंबा छान मित्रा ?

आण लिंबू , बर्फ ,सोडा ,डाळ, चिवडा
मी करवितो कोंबडा बलिदान मित्रा

डाळभाताची नको आता विनंती
कोंबडीशी बांधले संधान मित्रा < लिंगनिरपेक्षता >

रोज फुलते पापलेटाची जवानी
रोज येते सुरमईला न्हान मित्रा

मेजवानीचे कधीचे फिक्स होते
आणले नाहीस का सामान मित्रा?

मारली ना टांग त्याने याहि वेळी
काय त्याला वाटतो अभिमान मित्रा ?

शेवटाचा घास आता गिळ जरासा
घेवुया टपरीवरी चल पान मित्रा

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अजुन एक प्रयोग