खेळी कवितेची

Submitted by किंकर on 13 March, 2012 - 19:10

मांडून पाहिले कवितेचे गणित
प्रश्न ठाकले डोळ्यासमोर, माझ्या अगणित

वृत्त,मात्रा जमेना म्हणून, छंदातून मी मुक्त झालो
अर्थात हि अनर्थ दिसता, लगेचच सरसावलो

मांडण्या माझी मते, केली थोडी आकडेमोड
उत्तरातील चुका शोधण्या,मन घेते तिकडेच ओढ

कधी म्हणालो तीन चोक तेरा ,तर कधी दो और दो पाच
बीज आणि अंक गणिताने,पूर्वीच काढली होती लाज

लसावी मसावी करी जीव कासावीस
झालो काठावर पास, पण नाही कळले त्रैराशिक

नको दिव्पदी ,नको त्रिवेणी,चारोळीतच मन खेळी
काव्य जमेना सूर सापडेना,गझलच सुचते अवेळी

मतला मिसरा सगळे विसरा, म्हणत जीव माझा तळमळी
काहीच येईना म्हणून केली, का का क ची हि खेळी

किंकर, तुम्ही शीर्षक मधूनच सर्व सूचित केले आहे. त्यामुळे कविता वाचताना मजा आली. छान आहे कविता.